Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काय सुंदर फोटो आहेत एकेक.
काय सुंदर फोटो आहेत एकेक.
मुसांडा नाव आहे ना
मुसांडा नाव आहे ना
यात लाल रंग ही येतो
ही कोणती फुले ?>>>>> मुसांडा
ही कोणती फुले ?>>>>> मुसांडा
सावित्रीच्या लेकी बरोबर.
यात लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा असे रंग येतात.
ऋतुराज यांनी दिलेली फुले इथे
ऋतुराज यांनी दिलेली फुले इथे सह्याद्रीच्या डोंगररांगात भरपुर दिसतात. पांढरी पाने व पिवळी फुले. आमच्या इकडे शेवरी म्हणतात. तिनही त्रिकाळ फुले असतात. त्यावरुन सुकळ नाय दुकळ नाय शेवरो पालेलो अशी म्हणही आहे. म्हणजे शेवर्याला कसले सुखदु:ख नाही किंवा त्याला काळवेळ कळत नाही, तो कायम फुललेला असतो.
सुकळ नाय दुकळ नाय शेवरो
मुसांडा, शेवरो.
सुकळ नाय दुकळ नाय शेवरो पालेलो ….
वाह. सदाफुलीच की. छान माहिती.
आज फिर उन से मुलाक़ात हो गई…
.
साधना ताई,
साधना ताई,
काहीतरी गफलत होतेय.
मुसांडा गार्डन व्हरायटी आहे. जास्त करून बागेत लावण्यासाठी वापरतात. तुम्ही म्हणताय ती शेवरा मला माहित नाही. एकदा फोटो टाका जमल्यास.
टाकते.
टाकते.
गार्डन व्हाराइटीसुद्धा कुठल्यातरी नैसर्गिक व्हरायटीवरुनच बनवली असणार ना??
मी लहानपणापासुन पाहतेय शेवरो, तो आता जंगलात घुसला नाहीय. जंगलात टिकोमा घुसलाय, तो इथला नाहीय पण आता रेसिडेण्ट झालाय.
मला पण वाटते हा मासुंडा नाही
मला पण वाटते हा मासुंडा नाही आहे.. त्याच्या पाकळ्या थोड्या जाड असतात.. & पटकन पडत नाहीत.. ह्या झाडाच्या खाली पांढऱ्या पाकळ्यांचा सडा असतो.. पाकळी एकदम तलम दिसतेय. गावी रस्त्याच्या कडेला असतात हि झाडे.. कदाचित हा जंगली मासुंडा असेल.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Mussaenda
ऋतुराज ह्या फोटोत आहे तो सह्याद्रीत सर्वत्र आढळतो. मी उद्या पाहते घाटात दिसतो का. तो इतका पसरलेला आहे की मला आठवत नाहीय त्याचा सिझन कुठला आनि कुठे शोधु
तो कधीही कुठेही दिसतो 
साधनाताई, तुम्ही लिंक दिली
साधनाताई, तुम्ही लिंक दिली आहे तो मुसांडाच आहे. पण हा सह्याद्रीत मुबलक दिसतो?
हो.. तुम्ही कसा पाहिला नाही
हो.. तुम्ही कसा पाहिला नाही कधी?? जम्गले भरलीत याने. सफेद पानामुळे लांबुनही उठुन दिसतो. मी आंबोली घाटात व गावात लहानपणापासुन पाहतेय. आमच्याकडे गणपतीत फुलेच नसतात. तेव्हा सोनकी शेवरी वगैरे वाहतात. शेरवड पण म्हणतात.
गणपतीत वापरतात ना ही पाने/
गणपतीत वापरतात ना ही पाने/ फुले?
ह्या झाडाच्या खाली पांढऱ्या
ह्या झाडाच्या खाली पांढऱ्या पाकळ्यांचा सडा असतो>>>>>>हो
पण माझ्या घरी मी ornamental plant म्हणूनच आणलेलं आहे
जंगलात मी तरी अजून पाहिलेले नाही
सुप्रभात
सुप्रभात

सुप्रभात. मस्त आहेत गुलाब
सुप्रभात. मस्त आहेत गुलाब
(No subject)
💖 ;
💖 ;
मुसांडा - यात लाल, गुलाबी,
मुसांडा - यात लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा असे रंग येतात…..
आता हे कसे दिसतात त्याची उत्सुकता लागली आहे.
शेंदरी गुलाब आणि गुलाबी अर्डेनियम सुंदर फुले - टवटवीत 😍
सदाबहार … आजची फुले :
आजची फुले :
# Flor de Papel
# My Random Clicks
सदाबहार सदाफुली
# Today’s blooms
# My Random Clicks
फुलं मस्त .माझ्याकडे गुलाबी
फुलं मस्त .माझ्याकडे गुलाबी सदाफुली होती गावात गेलो आणि उन्हाने सुकुन गेली आता परत लावेन.
सर्वांना नाताळच्या शुभेच्छा
सर्वांना नाताळच्या शुभेच्छा 🎉 🎊 ✨
# Merry Christmas
सिमरन तुलाही.
सिमरन तुलाही.
सर्व निगकरांना नूतन
सर्व निगकरांना नूतन वर्षाभिनंदन.
आहा काय सुरेख गुलाब आहे.
आहा काय सुरेख गुलाब आहे. ऋतुराज तुम्हाला नववर्षाच्या शुभेच्छा.
सर्वांना नववर्षाच्या खूप खूप
✨ सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ✨
सिमरन किती मस्त.
सिमरन किती मस्त.
हो धनश्री मस्त आहेत ही फुलं.
हो धनश्री मस्त आहेत ही फुलं. मला नावं माहीत नाहीत पण दिसतात सुंदर.मधलं अष्टर असावं.
सुप्रभात
सुप्रभात
सिमरन छोटी फुले डेझी ची आहेत व मोठी पिओनी सारखी दिसतायत. क्लियर दिसत नाहीहेत त्यामुळे अंदाज.
सगळ्यांना नविन वर्षाच्या हारगदिल शुभेच्छा.

पियोनीच असेल अष्टर ला मध्ये
पियोनीच असेल अष्टर ला मध्ये गोल असतो याला पूर्ण पाकळ्या आहेत. बुके फुलांची लिस्ट आणि नावं शोधली पाहिजेत म्हणजे सांगता येतील .मला फक्त लिली ऑर्किड आणि जरबेरा ओळखता येतात. नाहीतर फुलवाल्याला ये देदो वो देदो करावं लागतं.
Pages