खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्स सर्वाना काल उलट वेळ नव्हता म्हणून पटकन होणारी खीर म्हणून ही केली नाहीतर शिकरणच करावं लागलं असतं .ही खीर मला माझ्या मावशीने शिकवली त्यामुळे याचं क्रेडिट तिला जातं. खरंतर तांदळाची शिजायला वेळ लागतो म्हणूनच कोणीतरी पटकन होणारी जुगाडू खीर बनवली असेल.

ममो हो नारळाच्या दुधात मस्तच लागेल शिरवळ्या सारखी.मी तर शेवयांच्या खिरीतही कधीकधी भरपूर ओलं खोबरं घालते. खोबर्याची टेस्ट आवडते.

तांदळी आणि पोकळा वेगळी आहे बहुतेक. पोकळ्याची भाजी मीपण खाल्ली नाहीये. त्यामुळे नक्की माहीत नाही.

खीरीची पाकृ छान आहे, सोपी एकदम. ताटही छान.

तांदुळजा/तांदळी/ पोकळआ/ राजगीरा सगळे मावसचुलत आअहेत. पोकळ्याची खुण म्हणजे पाने तांदुळज्यासारखी पण देठ लाल्/गुलाबी. विषिष्ट हवामानात विशिष्ट भाजी होते. माझ्याकडे लाल माठ व तांदुळजा भरभरुन होते पण पोकळा खुरटलेला राहतो. पानेच नीट फुटत नाहीत.

ऋतुराज, ज्वारीचे डोसा रेसिपी साठी धन्यवाद . घरातल्या डायबेटिक ज्येना मस्त पर्याय मिळाला. एरवी मी पूर्ण तांदूळ चे घावन करते. आता असे करेन.
वाफाळते क्रिस्पी कॉर्न आणि ग्लास दोन्ही मस्त !! Anniversary साठी couple glass ची खरेदी करावी काय ?
नैवेद्याचे पान ही छान !

मी डोसे आजकाल रोजच रात्री करतेय.. नवरा भाकरी खायला कंटाळा करतो म्हणून.. भाकरी नाहीतर डोसा ( नाचणी , ज्वारी, बाजरी ) पण रात्री नो राईस.

मला ते वाईन ग्लास. पेस्टल कलरचे सिरॅमिक प्लेट्स खूप आवडतात पण मीच ऍक्सीडेन्ट प्रोन असल्यामुळे.. गिफ्ट मिळालेले पण तसेच ठेवले आहेत..

चीज एग ऑमलेट सँडविच
सध्या आमच्याकडे मिड नाईट स्नॅक्स म्हणून हा आयटम हिट आहे. मीच मुलांच्या कलाने प्रयोग करून बनवला आहे.

IMG-20251213-WA0035.jpg

सार पाहून >> हो ना, शाळेच्या ग्रूपवर सुद्धा हिच कॉमेंट आली Proud

वामिका मस्तच… मटर पुरी/कचोडी करुन चाट का??

मासे ताट मस्तच.. खायची इच्छा झाली. आज बघते मासे मिळतात का..

बटाटा आप्पे म्हणजे बटाटे किसुन घातले?

कळंण, माडगं हे कडधान्ये भरपुर पाण्यात शिजवुन ते पाणी वेगळं काढुन करतात. मला तितका पेशन्स नाही पण रात्री असले काही प्यायला आवडते. घरात कुळथाची पिठी असते. तीच पाण्यात कालवुन करते. मात्र पिठी अगदी चमचाभर घ्यायची आणि अगदीच पातळ वाटले तर अजुन एक चनचा पाण्यात कालवुन घालायची. जास्त घालायची नाही नाहीतर सोबत भात करुन पिठी भात खायची वेळ येईल Happy

@साधना ताई..
बटाटा आप्पे म्हणजे बटाटे किसुन घातले?,>>>>
कच्चा बटाटा फोडी करून दह्या बरोबर मिक्सर मध्ये बारीक वाटला. आणि त्या मिश्रणात रवा भिजवून आप्पे केले

नाही साधना. पिवळा/सफेद वाटाणा भिजत ठेवून मग मीठ घालून बटाट्यासोबत उकडून घेतला. मग थोडंसं स्मॅश करुन त्यात चिंचगुळाची चटणी, कोथिंबीर-हिरवी मिरची चटणी, फेटलेले दही आणि वरून कांदा, टोमॅटो, किसलेले आले, चाट मसाला, सुंठ पावडर टाकली. क्रंचीनेस साठी मठरी कुस्करून टाकली.

वामिका थँक्स, सोपे काम आहे, चव मात्र अगदी भारी असणार… Happy

मनिम्याऊ, थँक्स, करुन पाहते. नाश्त्याला पोहे करुन कंटाळलेय Happy

तांबाट्याचे सार जबरी आहे.
मटार चाट तर लाळ गाळू...
थंडी स्पेशल अळीव लाडू मस्तच, आता करायला हवेत

नवीन एन्ट्रीज भारी. पैकी नानखटाई उद्याच करणार !

मनीमोहोर,

प्लेट लक्ष वेधून घेत आहे. लाडवांपेक्षा काकणभर जास्तच.

चाट आप्पे सगलयाच एन्टऱ्या मस्त.
ममो,
लाडू भारी दिसतायत आणि प्लेटपन.

न्यू एयर रेज्युलेशन ठरवलंय हेल्दी पदार्थ जास्त बनवायचे सुरुवात मुगाच्या डाळीचा ढोकळा पासून करतेय.
IMG_20251216_201452.jpg
हा कुकरमधून डायरेक्ट काढलेला फोटो एव्हडा खास नव्हता म्हणून हा जरा प्रेझेन्टेबल चटणी बरोबर
IMG_20251216_201518.jpg
मस्त स्पॉंजी झाला होता. टेस्ट च्या बाबतीत म्हणायचं झालं तर हेल्दी खातोय हे जाणवत होतं. ज्यांना carb कमी खायचेत त्यांच्या साठी उत्तम नाश्ता आहे.

लाडू मस्तच!
मोठ्या आकाराच्या चिंच गोळ्या वाटत आहेत Happy

ढोकळा – मस्त स्पॉंजी झाला होता.>>> हे एवढे झाले तर टेस्ट उन्नीस वीस चालते मला Happy

Pages