खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थँक्यू धनश्री, ऋन्मेऽऽष
हे आज सकाळी बनवलेले इन्स्टंट व्हेजिटेबल अप्पे..
गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळ्या भाज्या घालून दिल्या यात.. माझा आवडता नाश्ता आहे हा
Screenshot_2025-12-22-00-11-33-92_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

जुई,

प्लम केक 👌

एकदम ख्रिसमस वाइब्ज. त्यात भावाने बहिणीसाठी बेक केलेला ❤

सो, सो गुड !

थँक्यू देवकी. प्लम केक माझ्या भावाने बनवला आहे आणि तो प्रोफेशनल शेफ आहे त्यामुळे त्याची रेसिपी ऑथेंटिक असणार.. असणार बोलतेय कारण रेसिपी मला देखील शेअर करत नाहीये तो Happy

वामिका, झकास हिवाळी बेत केलाय.

मक्के दी रोटी, सरसों दा साग. हिन्दी सिनेमानी अजरामर केलेला मेन्यू.

आता कुणीतरी “प्यार से बनाया हुआ गाजर का हलवा” केला की झाले 🙂

आता कुणीतरी “प्यार से बनाया हुआ गाजर का हलवा” केला की झाले >>

हलव्याचा प्लॅन होता पण कॅन्सल झाला. मोमोज बनवले त्याऐवजी. मक्के दी रोटी मी बनवली, साग आणि मोमोज नवऱ्याने बनवले.

IMG20251223193833.jpg

जुई केक मस्त मला पण प्लम केक आवडला.मजा आहे तुझी एक तर भावाने काहीतरी करून खाऊ घालणं म्हणजे जगातील आठवं आश्चर्य त्यात तुझा भाऊ शेफ म्हणजे...आमच्याकडे ऑम्लेट जरी मिळालं तरी खुश होते मी. माझ्या भावाला तेव्हढचं येतं आणि मॅगी Happy

वामिका मस्त मेन्यू आणि मोमोज.

अनिंद्य माझा ही प्लॅन आहे गाजर हलव्याचा पण गाजरं अजून बाजारात आहेत Happy
तोपर्यंत हे चायनीज सूप घ्या , हे रेस्टॉरंटमधलं आहे.
IMG_20251223_202839.jpg

हाहा सिमरन भाऊ शेफ असला तरी जॉब मुळे दूर राहतो त्यामुळे कधीतरीच असं खायला मिळतं.. दुसरा भाऊ शेफ नाही त्याची लहर आली तर देतो बनवून किंवा थोडा मस्का मारला तर.. त्याला बऱ्यापैकी येतं बनवता.
@वामिका सरसो दा साग कधीपासून खाऊन बघायचाय मला पण बनवायचा मुहूर्त येत नाहीये.. खूप छान दिसतोय...
@अश्विनी११ थाळी पाहून भूक लागली

हे आज रात्रीचे जेवण.
मटकी शिराळ्याची रस भाजी, टोमॅटोचा ठेचा आणि तांदळाची भाकरी
Screenshot_2025-12-23-21-17-18-02_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

सगळे मेन्यु मस्तच…

टॉमेटोचा ठेचा कसा बनवला? फारच यमी दिसतोय.

आज आमच्याकडे लंपनच्या रेसिपीने दाणा मुठियांनू शाक
IMG_0216.jpeg

अरे आवरा लोकहो..
आजपासून माझ्या घरचे सगळे आठ दिवसांसाठी फिरायला गेलेत आणि मी घरी एकटा. इथे दोन वेळच्या जेवणाचे वांधे आहेत आणि तुम्ही नेमका आजच छळ मांडला आहे

@ सिमरन, so kind of you. 🙏

… गाजरं अजून बाजारात आहेत … 😀

@ माझेमन, ही ऑटाफे हिवाळी डिश 🤤

@ अश्विनी११, औरस-चौरस ताट 👌

@ ऋतुराज. रगडा पॅटीस प्लेटिंग फारच सुंदर. गरमागरम रगडा पॅटीस 🤤

रगडा पॅटीस पाठवा इकडे..
माझेमन हो यम्मीच लागतो टोमॅटो ठेचा.. जेव्हा नेहमीचा मिरची ठेचा खाऊन कंटाळा आला की मी हा बनवते. तोंडाला चव येते.
७-८ लसूण पाकळ्या, ४ हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला तिखट झेपेल त्याप्रमाणे तेल गरम करून चांगल्या परतून घ्यायच्या मिरची वर सफेद चट्टे उठले पाहिजेत. तेल जरासे सढळ ch घ्यायचे. एक टोमॅटो मोठे मोठे तुकडे करून त्यात टाकायचे चांगला परतून टोमॅटो मऊ झाला की त्यात कोथिंबीर देठा सकट टाकायची चवी प्रमाणे मीठ टाकायचे आणि खलबत्त्यात जाडसर भरडून घ्यायचे.. कोथिंबीर अजिबात स्किप करायची नाही.

Pages