शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> तसा ‘आनंदाधीन’ ऐकला आहे? का नाही?
हा खरंतर सुख आणि आनंद यांतला फरक स्पष्ट करण्यासाठी विचारलेला 'र्‍हिटॉरिकल' प्रश्न होता, पण त्यावरून इथे बरीच मजामजा झालेली दिसते आहे. Lol

हरचंद पालव ,वा!
मला सेट थिअरी आठवली. त्यांचे डायाग्राम. चित्रे. १.दोन वेगळी वर्तुळे बाजु बाजूला आणि २.एका मोठ्या वर्तुळात दुसरे छोटे वर्तुळ.
क्रमांक (१) मध्ये थोडेच नशिबवान, क्रमांक (२) भार्याधीन.

आयुष्यात माणसाची स्थिती सुखातून दुःखात व दुःखातून सुखात सतत पालटली जात असते . त्यासाठी भाषेत एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे :
चक्रनेमिक्रम
= चाकाप्रमाणे पुनःपुनः वरून खाली व खालून वर जाण्याची स्थिती
याची फोड कशी करायची ? ( चक्र, नेम अनुक्रम ?? )
. .
याला समानार्थी अजून एक :
कूपयंत्रघटिका न्याय
= रहाटगाडग्याच्या पोहऱ्यांची सदोदित पालटणारी स्थिती. रहाटगाडगी फिरू लागली म्हणजे रिकामे पोहरे घालून पाण्याने भरून येतात, त्यातील पाणी ओतले जाते व ती रिकामी होऊन पुन्हा खाली जातात आणि पुन्हा भरून वर येतात.
>>>>>>> उत्कर्ष > अपकर्ष > उत्कर्ष .

चक्रनेमी क्रम.
नियमितपणे/नेमाने पुनरावृत्त होणारा चक्रीय/चक्रानुसारी क्रम

चक्र नेमि क्रम.
लंपन, सुभाषित मस्त
चक्रनेमिक्रम यावर मेघदूतात एक सुभाषित आहे.
शोधतो.

चक्रनेमिक्रम यावर मेघदूतात एक सुभाषित आहे >> हो, त्याबद्दल मी माझ्या पुलंवरच्या धाग्यात लिहिलं आहे. ही संकल्पना कालिदासाची आहे का माहीत नाही, पण चक्रनेमिक्रम हा शब्द त्याचा असावा.

लंपनने दिलेलं सुभाषित छान आहे आणि त्याच अर्थाचं आहे.

चक्रनेमिक्रम - वडलांच्या नोट्स मधे छंदशास्त्र म्हणून काही नोंदी आहेत. मूळ शब्दकोशाचे पुस्तक सापडत नाही. त्यामुळे संदर्भ सांगता येत नाही.
चक्र - चाक, नेमि - परीघ , क्रम - अनुक्रम. काव्य किंवा घटना. तैत्तिरीय संहिता.
वैदिक साहित्यात काव्य छंद ऋग्वेदात "चक्रनेमिक्रम" चा थेट उल्लेख नाही .
काव्यशास्त्रात (पिंगल सूत्र) आणि वैदिक छंदकाव्याच्या वर्णनात येतो.

अर्थ काव्याच्या छंदाचा क्रम / लय किंवा जीवनाची लय.
आणखी इंटरेस्टिंग नोंदी आहेत. विषयांतर होणार नसेल तर देऊ का ?

उत्तम ज्ञानवर्धक चर्चा !

*आणखी इंटरेस्टिंग नोंदी>>>
विषयाला पूरक माहिती थोडक्यात लिहायला काहीच हरकत नाही. Happy

चक्रनेमिक्रम काय, कूपयंत्रघटिका न्याय काय, तर्जनीनासिका न्याय काय …. भारीच. 👌

@ लंपन,

सुभाषित = 👌

@ रानभुली,
… काव्याच्या छंदाचा क्रम / लय किंवा जीवनाची लय.… चपखल. 👍

वेदकाल : ऋग्वेदात "चक्रनेमि" सारखे शब्द येतात ( ऋग्वेद १.३२.११ इंद्राच्या रथाच्या चक्राचा उल्लेख), आवर्तनाचा क्रम.

"चक्रनेमिक्रम" हे पिंगल सूत्र (पिंगळाचार्य कि पिंगलाचार्य ?) (काव्य छंद - पहिले शतक) मधून विकसित झाले. यात वैदिक छंद (जसे गायत्री, अनुष्टुप) यांच्या लयीचे वर्णन केले आहे.

मध्ययुगीन साहित्य: भास्कराचार्य आणि अलंकार-कारिक ग्रंथांत (१२वे शतक) हा शब्द (चक्रमेनिक्रम) काव्य चक्र" (poetic cycle) या अर्थाने क्रम सांगतो.

आधुनिक वापर: मराठी साहित्यात ( गो. नि. दांडेकरांच्या लेखनात) हा शब्द साहित्यिक इतिहासाच्या चक्राकार विकासा करता वापरला आहे.

"भारतीय साहित्य के इतिहास" ग्रंथांत (जसे राजस्थानी साहित्य) गद्य साहित्य चक्रनेमिक्रम (छंदा) पेक्षा वरचढ ठरते असा उल्लेख आहे.

ऋग्वेद :
ऋग्वेद १.३२ (इंद्र सूक्त) - "चक्रं ते नेमिरभि रथं..." - इंद्राच्या रथाच्या चाकाचा वर्तुळाकार क्रम (लय).
ऋग्वेद १०.८५ (सूर्य सूक्त) - "सूर्यस्य चक्रं नेमिक्रमे..."
ऋग्वेद १.१६४ (अश्विनी कुमार सूक्त) - "चक्रं क्रमेण नेमि...

ऋग्वेदातील छंद (जसे गायत्री, अनुष्टुप) चक्रीय (छंदोबद्ध) असतात, आणि "चक्रनेमिक्रम" हे त्याच्या लयीचे वर्णन आहे.
छंद सूत्रात (वैदिक छंद ग्रंथ) हे छंदबद्ध लय सांगते.

वडलांच्या वहीतल्या नोंदी टंकताना दुखर्‍या बोटांनी मान टाकल्याने एक एक शब्द - वाक्य गुगल सर्च करून तिथून कॉपी पेस्ट केले आहे. अर्थ लावून घ्यावा ही विनंती. वैदीक छंदाबद्दल एक योगीजी आहेत जे कवी सुद्धा आहेत, त्यांच्या पोस्टस पहाव्यात. त्यात सुद्धा मिळेल. वाचकांना रस असेल तर नंतर टाईप करून इथे देता येईल.

उत्तम !
सांगोपांग माहिती दिलीत.

चर्चा उशिरा वाचली... सुख आणि आनंद वरून जावेद अख्तरांचे गाणे आठवले.
सुख है अलग और चैन अलग है
पर जो ये देखे वो नैन अलग है
चैन तो हैं अपना सुख है पराए!!

अस्मिताचे दोन रुपये बाजूला काढलेत.

सिंहकटी
स्त्रीच्या सडपातळ व नाजूक कंबरेसाठी वापरले जाणारे हे विशेषण.

एक शंका मनात आली की सिंहाला तर आपल्यासारखी कंबर नसते. मग सिंहाच्या कमरेची उपमा स्त्रीला का दिली असावी? या प्रश्नाचे AIने सविस्तर उत्तर दिले आहे त्याचा सारांश लिहितो.

इथे दिलेली सिंहकटीची उपमा ही मुख्यतः प्रतिकात्मक असून त्यात शरीररचनेशी तुलना अपेक्षित नाही. सिंह जसा राजबिंडा, रुबाबदार आणि धट्टाकट्टा आहे त्या अनुषंगाने त्या उपमेतून उत्तम आरोग्य, ताकद आणि जननक्षमता हे अपेक्षित आहे.

जननक्षमता या मुद्द्याची आधुनिक वैद्यकानुसार सांगड घालायची झाल्यास,

  • बारीक कंबर = लठ्ठ नसणे = जननक्षमतेला पोषक घटक

ही उपमा विशेषतः प्राचीन भारतीय आणि चिनी साहित्यात वापरलेली आढळते.
. . .
यासंबंधी अन्य काही संदर्भातून कोणाचे वेगळे मत असल्यास जरूर लिहावे.

शाहीर रामजोशी यांची लावणी होती शाळेत
सुंदरा मनामध्ये भरली...त्यात आहे हा शब्द
....सिंहसम कटी उभी एकटी

जननक्षमता या मुद्द्याची आधुनिक वैद्यकानुसार सांगड घालायची झाल्यास,
बारीक कंबर = लठ्ठ नसणे = जननक्षमतेला पोषक घटक>>>>>>> interesting

एक शंका मनात आली की सिंहाला तर आपल्यासारखी कंबर नसते. मग सिंहाच्या कमरेची उपमा स्त्रीला का दिली असावी? >>
"उपमेसाठी आपल्यासारखा कम्बर हा अवयव असावाच का?" असा विचार आला. सिंह धट्टाकट्टा परंतु त्याच्या पोटाखालचा (की मागचा म्हणावे) भाग तुलनेत बारीक यावरून अथवा सिंहांच्या रुबाबदार चालण्यावरूनही असु शकेल असे वाटले. बहुत करून ही उपमा नर्तकीला देतात ना?
मला तरी AI ने दिलेली वरील माहिती पटली नाही. त्याला तसे संदर्भ असतील तर मात्र ते मानावे लागेल.

>>>>मला तरी AI ने दिलेली वरील माहिती पटली नाही.
+१०१
>>>>>>>>परंतु त्याच्या पोटाखालचा (की मागचा म्हणावे) भाग तुलनेत बारीक
तसेच वाटते.

सिंहामधे नराला आयाळ असते, माणसाच्यात बाईला आयाळ असते. बाईमाणुस जर सिंहाच्या पोझिशनमधे चार पायांवर उभे राहीले आणि केस खांदिआवरून पुढे घेऊन चेहरा वर करून गर्जना केली तर ती सिंहासारखी दिसते. फेसकट सारखा म्हणून सिंहकटी असे असेल.

याउलट पुरूषमाणसाला आयाळ नसते. सिंहीणाला आयाळ नसते आणि गेंड्यालाही नसते. गेंड्याची कंबर अजिबात बारीक नसते. पुरूषमाणूस चार पायावर उभा राहीला तर तो थेट गेंड्यासारखा दिसेल. गेंड्याला नाकावर शिंग असते, पुरूषाला नाकाखाली मिशी असते. त्यामुळे पुरूषाला गेंडाकटी म्हणायला पाहीजे.

“सिंहकटी” हे gender neutral विशेषण आहे; स्त्री- पुरुष दोघांच्या सौंदर्यलक्षणात वाचले आहे. कुठे वाचले ते आठवल्यास संदर्भ इथे टंकेन.

जाणकार दाखले देऊ शकतील

सिंहकटी आणि गज गती अशी विशेषणे स्त्री साठी वापरलेली वाचली आहेत.

पुलंचा काहीतरी विनोद पण आहे ना की हे उलटे होऊ नये अशा अर्थी.

* AI ने दिलेली वरील माहिती
>>> मलाही त्याबाबत साशंकता आहे. म्हणूनच मी प्रतिसादाच्या शेवटी टीप लिहिली.
माहितीपूर्ण चर्चा

* पुरूषाला गेंडाकटी >>> हे भारी !

स्त्री सौंदर्याची सर्व विशेषणे शब्दकौमुदी कोशात (बृह्दकोश) वाचता येतील.

* “सिंहकटी” हे gender neutral विशेषण
>>> ??
वझे व मोल्सवर्थनुसार
सिंहकटी = f A lion-waisted female,
(i.e. having a waist delicately slender)

मी हा शब्द विश्वास पाटीलांच्या लेखनात वाचला :
“. . . त्याच्या प्रेमात कोसळणारी सिंहकटी गोडगहिरी नायिका . . . “
. . .
delicately slender >>> हे शब्द पुरुषाला सहसा लागू होतात?

सिंहकटी आणि गज गती अशी विशेषणे स्त्री साठी वापरलेली वाचली आहेत >> +१.

मानव >> +१

Pages