Submitted by हेमंतकुमार on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम माहिती भरत. धन्यवाद.
उत्तम माहिती भरत. धन्यवाद.
बहुव्रीही समास >> हा शालेय अभ्यासक्रमात आता नाही काय? पूर्वी होता. अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही - असे चार प्रकार आणि त्यांचे उपप्रकार शिकलो होतो. इतरेतर, समाहार हे द्वंद्वाचे उपप्रकार. बहुव्रीही हा उपप्रकार नाही.
हो बरोबर. पुस्तकात समासाच्या
हो बरोबर. पुस्तकात समासाच्या प्रकारांत तिसरा द्वंद्व. त्यात वर लिहिलेले तीन प्रकार दिल्यावर पुढे चौथा बहुव्रीही दिसल्यावर मला तो द्वंद्व समासाचा प्रकार म्हणून दिलाय असंच वाटलं.
आता तुम्ही लिहिल्यावर आठवलं , बहुव्रीही होता. वय झालं माझं.
बरेचदा उच्चारावरून र्
बरेचदा उच्चारावरून र्हस्वदीर्घाचा अंदाज बांधता येतो. तुम्ही 'तिळगुळ' म्हणता की तीऽळगुळ?
बरेचदा (उदा. गाजराचा इ.) 'कीस' हा शब्द 'किस' असा लिहून त्यावरून विनोदही केलेले वाचलेत. तुम्ही 'आज उपासाला रताळ्याचा किस केला' असा उच्चार करता की 'कीऽस केला' असा? मग लिहिताना र्हस्व का?
हेच 'सूर्य'सारख्या शब्दांबाबत. प्रत्येक वेळी व्याकरणाचं पुस्तक उघडायची आवश्यकता नसते, देवनागरी बर्याच अंशी फोनेटिक लिपी आहे.
याला काही अपवाद म्हणजे 'सुख' - ज्याचा आता बरेचदा बोली उच्चार 'सूऽख' असा होतो. ('रूप पाहता लोचनी | सुख झाले हो साजणी' आठवा - खरा उच्चार तसा आहे.)
तसंच दीर्घ 'अकारा'साठी देवनागरीत चिन्ह नाही. उदा. मन - उच्चारी मऽन.
'दंव'सारख्या शब्दांत ते अनुच्चारित अनुस्वाराने दर्शवलं जातं - पण हल्ली अनेकदा मी हा शब्द अनुस्वाररहित पद्धतीने लिहिलेला पाहिला आहे. नियम बदलला किंवा कसं ते माहीत नाही.
मख्खीचूष शब्द आठवला
मख्खीचूष शब्द आठवला.
स्वाती - इंटरेस्टिंग! असा
स्वाती - इंटरेस्टिंग! असा विचार केला नव्हता या शब्दांबद्दल. मात्र रताळ्याचा कीस चा उच्चार दीर्घ वेलांटीच्या जवळचाच आहे ना?
आयुर्वेदात लेह्य, चोष्य वगैरे प्रकार असतात ना औषधांचे? >>> चोष्य वाचल्यावर हेच आठवले
'माझे पौष्टिक जीवन' मधे पोस्टातील खळीच्या बद्दल पुलंनी लिहीलेलेच पहिले आठवले. हपा - तुलाही हे लिहीताना आठवले असणार नक्कीच 
>>> मात्र रताळ्याचा कीस चा
>>> मात्र रताळ्याचा कीस चा उच्चार दीर्घ वेलांटीच्या जवळचाच आहे ना?
हो ना, म्हणून तो दीर्घच लिहायला हवा.
अहं वैश्वानरो भूत्वा
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥
२०२५ ला चिन्मय मिशन ने १५ वा अध्याय ठेवला होता पाठांतरा साठी. मुलांमुळे परत एकदा शिकणे झाले. त्यातला हा प्रसिद्ध श्लोक. अन्नाचे चार प्रकार (पेय, लेह्य / चाटता येणारे, चौष्य, आणि भोज्य / चावता येणारे) 'मी' च पचवतो.
फा, हो बरोबर, तोच संदर्भ होता
फा, हो बरोबर, तोच संदर्भ होता डोक्यात
लंपन, बेस्ट! चतुर्विध म्हणजे हे चार ते माहीत नव्हतं.
वा ! उत्तम ज्ञानवर्धक चर्चा
वा ! उत्तम ज्ञानवर्धक चर्चा
धन्यवाद
चूष
चूष
हा शब्द मी पहिल्यांदा लोकप्रभा मधे किशोरी आमोणकरांवर "कलानंद ही काही चूष नव्हे" असा एक लेख आला होता, त्यात वाचला.
@ चामुंडाराय
मख्खीचूष की मख्खीचूस?
@लंपन,
श्लोक आठवला.
भोज्य की खाद्य?
लिहायचे राहिले. काल
लिहायचे राहिले. काल लोकसत्ताने काल चूष असा वापरला होता :
..धनाढ्याने चूष म्हणून सांभाळलेल्या प्राण्यांवरील खर्च …
…हिंदीत चूसना पण चूष वरून
…हिंदीत चूसना पण चूष वरून आलाय का?…
अगदीच शक्य वाटते हे. 👍
BTW, चोष्य बंगालीतही वापरात आहे आणि मी इथे माबोवरच “कोलकात्याची खाद्ययात्रा” लेखात वापरला आहे.
…उच्चारावरून र्हस्वदीर्घाचा अंदाज बांधता येतो….
True that. When in doubt, हेच करतो
छान . . .
छान . . .
इथे चोखंदळ मंडळींची मांदियाळी जमली आहे !
कुमार
कुमार
म्हण (लोकोक्ति), वचन, विधान,
म्हण (लोकोक्ति), वचन, विधान, उक्ति, सूक्त
हे सर्व शब्द एका जातकुळीतील आहेत. त्यांचे शब्दशः अर्थ जर आपण बघायला गेलो तर त्या अर्थांच्या सीमारेषा पुसट असून बऱ्याचदा एकमेकांमध्ये मिसळून जातात. वरील शब्दांशी साधर्म्य दाखवणारे अनेक शब्द इंग्लिशमध्ये पण आहेत. त्यांचा अभ्यास करताना epigram हा शब्द वाचनात आला आणि त्याचा गुगलनुसार अर्थ चतुरोक्ती असा आहे.
चतुरोक्ती हा मराठी शब्द प्रथमच वाचला आणि आकर्षक वाटला. जालावर इंग्लिशमधल्या epigramsची भरपूर मोठी यादी पाहायला मिळते. मराठीमध्ये ‘चतुरोक्ती’चे एखाद दुसरे उदाहरण काय असावे असा विचार करतोय. कोणी सांगावे.
एक उपप्रश्न असाही आहे की,
म्हण आणि चतुरोक्ती यात फरक करता येईल का ? की सर्व/बहुतेक म्हणी चतुरोक्तीच असतात ?
(म्हण = चटकदार असे दृष्टांतभूत वाक्य, इति दाते शब्दकोश)
म्हणी साठी चतुरोक्ती छानच आहे
म्हणी साठी चतुरोक्ती छानच आहे पण … चटकदार असे दृष्टांतभूत वाक्य… यातला “दृष्टांतभूत” शब्द फार सुंदर वाटला. चपखल.
यावरून आणखी काही भूत आठवले :
आधारभूत
पराभूत
पंचमहाभूत
वशीभूत
अभिभूत
भांबरभूत
कारणीभूत
कुकातकुका 😀
* “दृष्टांतभूत” शब्द फार
* “दृष्टांतभूत” शब्द फार सुंदर >>> +१११
* आणखी काही भूत >>> सर्व 'भुते' छान
भांबरभूत व अभिभूतचा अर्थ
भांबरभूत व अभिभूतचा अर्थ माहीत नाही याचे वैषम्य मला वाटले.
धनश्री,
धनश्री,
@ वरील भुताटकी :
१ } अभिभूत मी हिन्दीत वाचतो, “प्रेम भरे स्वागत से अभिभूत हूँ” वगैरे. म्हणजे भावना दाटून येणे-अत्यंत भावूक होणे
मराठीत हा शब्द आहे का हे इथल्या जाणकारांनी सांगावे.
२} महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कडकलक्ष्मी - भांबरभूत-भांबरभुत्या वगैरे प्रचलित आहेत. स्वपीडन/ स्वत:वर आसूड वगैरे ओढून भीक मागणे वगैरे करतात.
धन्यवाद अनिंद्य.
धन्यवाद अनिंद्य.
वासुदेव
वासुदेव
>>> भावना दाटून येणे-अत्यंत
>>> भावना दाटून येणे-अत्यंत भावूक होणे
)
मराठीत सद्गदित होतात. (
असं निदान म्हणतात तरी.तुमच्या वरच्या लिष्टीत 'पंचमहाभूतं' ऑड भूत आउट आहेत. 'भांबरभूत'ही. तिथे भूत हा प्रत्यय नाही, तेच नाम आहे.
ऑड भूत आउट
ऑड भूत आउट…
बरोब्र. भुतांना odd MAN out तरी कसे म्हणणार?
😂
पटकन आठवली ती भुतं पाठवली इथं.
आशाळभूत
आशाळभूत
(स्वतःच्या कुळाला) ललामभूत.
(स्वतःच्या कुळाला) ललामभूत.
दयाभूत
वा वा! भूत भूत खेळताय होय.
वा वा! भूत भूत खेळताय होय. अद्भूत!
ऑड भूत आउट
ही सगळी भूते सफिक्स आहेत
ही सगळी भूते सफिक्स आहेत
भूतकर हे प्रिफिक्स भूत
चामुंडराय,
चामुंडराय,
Prefix हवे तर “भूतभावन” हे एक शिवाचे नाव. भूतनाथ हे दुसरे.
(धनश्री, please confirm)
मी नाही ऐकले अनिंद्य हा
मी नाही ऐकले अनिंद्य.
हां भूतनाथ, भूतपती ऐकून आहे. कालच शिवसहस्रनाम म्हटलेले.
>>> भूतनाथ हे दुसरे.
>>> भूतनाथ हे दुसरे.
मला 'भूतनाथ' म्हटलं की 'साहब, बीबी और गुलाम'च आठवतो.
Pages