धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!
सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!
तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?
वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)
अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.
म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
माझं वाक्य - आज स्वयंपाक काय
माझं वाक्य - आज स्वयंपाक काय करायचा हे गेली जवळपास वीस वर्षे मी ठरवतोय आणि करतोय. आई होती, तेव्हा तिच्या सोबतीने. आता एकटा>>>>
म्हणजे आता एकट्याने हे मान्य आहे तर. मी त्याबद्दलच लिहिलेय. धन्यवाद.
(No subject)
पालथ्या घागरीवर पाणी ओतून उपयोग नाही. तरीही लिहितो. आईला जाऊन आता ५ वर्षे होतील. म्हणजे आधीची १५ वर्षे मीच स्वयंपाक घरात मुख्य भूमिकेत होतो. (जायच्या आधीचे काही महिने सोडले तर आई संपूर्ण स्वयंपाक स्वतः करू शकत होती. - आणखी काही गोष्टी गृहीत धरल्या असतील तर ) विशेषतः आज स्वैपाक काय करायचा हा कळीचा प्रश्न मीच सोडवायचो.
आताही डबे लावणे, स्वयंपाकासाठी पगारी माणूस ठेवणे हे पर्याय आहेत. अनेक जण - यात स्त्रियाच अधिक - सांगतातही. पण मीच करतो.
मग????
मग????
>>>>>>>> आधीची १५ वर्षे मीच
>>>>>>>> आधीची १५ वर्षे मीच स्वयंपाक घरात मुख्य भूमिकेत होतो.
कौतुक आहे. असे दिसत नाही. सहसा बाईमाणूस करत नसेल (अनुपस्थिती अथवा काहीही कारण असो) तर खानावळीचा डबा लावलेला असतो.
बाई ही जबाबदारी नाकारु शकत
बाई ही जबाबदारी नाकारु शकत नाही पण भांडु शकते/मुलांना मदत नाही तर जबाबदारी उचला हे शिकवू शकते/कामाचे वाटप करायचा प्रयत्न करु शकते पण ह्या झगड्यात मानसिक शिणवटा खुप येतो.>>> हेच विधान आपण पुरुषांच्या बाबतीत कुटुंबाच्या निवाऱ्याचा, आर्थिक भाराचा बहुतांश भाग ऊचलण्या बाबतीत ही करु शकतो ना??
पुरुषांना प्रचंड प्रिव्हलेज
पुरुषांना प्रचंड प्रिव्हलेज आहे. माझा फक्त स्त्रीयांना (पुरुषांना अजिबात म्हणजे अजिबात नाही, म्हणजे नाहीच) राखिव आसने आणि डबे ठेवण्याला पूर्णपणे, काहीही किंवा/ परंतु न ठेवता पाठिंबा आहे.
पण बायका घरी जेवण करतात म्हणून हे कारण महाप्रचंड विनोदी आणि चर्चा भरकटवणारे, स्लिपरी स्लोप वाटले. तसेच झाले ही.
पुरुष दिनाची टिंगल करणेही चूक
पुरुष दिनाची टिंगल करणेही चूक आहे.
सगळ्यात पहिले जातीचं आरक्शन
सगळ्यात पहिले जातीचं आरक्शन बंद करा. इतक्या वर्शात विकास झाला नाहि का ?
त्यांना आरक्शन पाहिजे आणि बाईला नको हे असले पुरोगामी लोक हाकलुन दिले पाहिजे.
छ.शिवाजी महाराजच्या काळत जाती नव्हत्या. आरक्शन नव्हतं. तरॉ पन सर्वान्ना सारखा न्याय होता. घटना शिवाजी महाराज राज्य कारभारापसुन प्रेरना घेऊन लिहीली . मग आरक्शन का टाकलं ?
पण बायका घरी जेवण करतात
पण बायका घरी जेवण करतात म्हणून हे कारण महाप्रचंड विनोदी आणि चर्चा भरकटवणारे, स्लिपरी स्लोप वाटले..
>>>>>>>
शर्मिला यांनी एक वाक्य म्हटले त्याचा मतितार्थ तुम्हाला समजला नाही याचे आश्चर्य वाटले अमितव.
त्यांनी एक उदाहरण दिले पण भाष्य एकूणच स्त्री-पुरुष असमानतेवर करायचे होते.
अर्थात तो मतितार्थ देखील मला पटला नाही. कारण स्त्रियांना स्वतंत्र डबा असायचे कारण त्यांच्या शीलाची सुरक्षा इतकेच आहे. गर्दीच्या ट्रेनमध्ये कोणी पुरुष आपल्या अंगचटीला येऊ नये हे कारण आहे.
बाकी धागा विनोदी झाला ते मुळातच इथे कोणी सिरीयस चर्चा करत नसल्याने..
पण बायका घरी जेवण करतात
पण बायका घरी जेवण करतात म्हणून हे कारण महाप्रचंड विनोदी आणि चर्चा भरकटवणारे, स्लिपरी स्लोप वाटले. तसेच झाले ही.>> + १
यासारखंच पुरुष ही बोलू शकतात की ऑफिसेस मधे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांवर वर्क लोड अधिक टाकला जातो, एक्स्ट्रा वर्किंग अवर्सच्या अपेक्षा पुरुषांकडून अधिक बाळगल्या जातात....पुरुषांना मिळणाऱ्या फायरींगची धार किती बायका आसवं न गाळता सहन करु शकतील? किंबहूना ती आसवंच बॅकफायर होतील या भितीने त्यांच्या बाबतीत नरमाईचे धोरण अवलंबले जाते.. त्यांच्यासाठी ही कामाचे ठिकाण अगदी नंदनवन नसले तरी त्याच सेम ऑफिस मधे पुरुष सहकारी अनुभवत असलेला नरक त्यांच्या वाट्याला अभावनेच येतो. टाईम टू टाईम, इन आउट पंच करायची मुभा असणेही देखील आपल्या देशात आणखी एक प्रिव्हिलेजच आहे.
हेच विधान आपण पुरुषांच्या
हेच विधान आपण पुरुषांच्या बाबतीत कुटुंबाच्या निवाऱ्याचा, आर्थिक भाराचा बहुतांश भाग ऊचलण्या बाबतीत ही करु शकतो ना??>>>
हो करु शकतो की. पण स्त्रिया फक्त पुरूषांची जबाबदारी समजला जाणारा हा भार आधी मदत म्हणुन आणि आता जबाबदारी म्हणुन उचलायला सुरवात करुन ५० वर्षे झाली
असावीत. साधारण दुसर्या महायुद्धाच्या काळापासुन जागतीक स्तरावरील स्त्रियांप्रमाणे भारतीय स्त्रियादेखिल नोकर्या करु लागल्या असे वाचलेय. ४० वर्षांपुर्वी ममव समाजात नोकरी न करणार्या मुलीही असत आणि त्याण्ची लग्ने जमणे कठिण जाई. आज शिकुन घरी बसणार्या मुली अभावानेच असतील. स्त्रियांनी अर्थार्जन करणे आज जबाबदारी समजली जाते.
आणि बेस्ट बसने या निकषावर स्त्रियांसाठी राखिव जागा सुरु केलेल्या नाहीत. बेस्टची दादरहुन एक महिला पेशल बसही सकाळची असायची, आताचे माहित नाही. पुण्यात हल्लीच एक महिला स्पेशल बस बघितली होती, ड्रायवर मात्र पुरुष होता. . स्त्रियांची दगदग थोडी कमी व्हावी हा उद्देश असावा.
मला बिलकुल स्वयंपाक करता येत
मला बिलकुल स्वयंपाक करता येत नाही. याची मला जराही लाज नाही.
आमच्या घरात मी एकटा कमावणारा आहे. याचा मला जराही अभिमान नाही.
हे माझ्या सुखी आयुष्याचे रहस्य आहे.
स्त्रियांना स्वतंत्र डबा आणि
स्त्रियांना स्वतंत्र डबा आणि बसमध्ये वेगळ्या सिटा असण्याचे त्यांच्या शीलाची सुरक्षा हे कारण कोणी ठरवले?
मग त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनात वेगळं प्रवेशद्वार आणि वेगळे जिनेही हवेत. कारण ट्रेनच्या बाहेरच्या गर्दीतही त्यांच्या शीलाला धोका असतोच. अगदी रस्त्यावरही असतो.
मग को एड स्कूल्स आणि कॉलेजेस बंद करायला हवीत. फक्त मुलींसाठी शिक्षणसंस्था असाव्यात आणि तिथे फक्त स्त्री कर्मचारी असावेत.
काही विमानांत कधी सगळा क्रू स्त्रियांचा असतो, तशी फक्त स्त्रियांसाठी ऑफिसेस हवीत. कारण कार्यालयातही लैंगिक शोषण होते.
फक्त स्त्रियांसाठी ऑफिसेस
स्त्रियांना स्वतंत्र डबा आणि बसमध्ये वेगळ्या सिटा असण्याचे त्यांच्या शीलाची सुरक्षा हे कारण कोणी ठरवले?
फक्त स्त्रियांसाठी ऑफिसेस हवीत. कारण कार्यालयातही लैंगिक शोषण होते.
>>>>>>
गर्दीची अनोळखी लोकांनी भरलेली ट्रेन आणि आपली स्वतंत्र जागा असलेले ओळखीचे लोक असलेले ऑफिस याची तुलना करता म्हणजे यातला फरक लक्षात येत नसेल तर काय बोलू? त्यासाठी स्त्रीचा जन्म घ्यावा लागणार. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे ..
उद्या म्हणाल घरी स्त्री पुरुष एकच टॉयलेट बाथरूम वापरता तर बाहेर तुम्हाला वेगवेगळे कशाला हवेत एकच वापरा..
फरक लक्षात घ्या
यासारखंच पुरुष ही बोलू शकतात
यासारखंच पुरुष ही बोलू शकतात की ऑफिसेस मधे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांवर वर्क लोड अधिक टाकला जातो, एक्स्ट्रा वर्किंग अवर्सच्या अपेक्षा पुरुषांकडून अधिक बाळगल्या जातात>>>>
सगळ्याच ऑफिसात हे होत नाही. प्रायवेट मध्ये तर अजिबातच नाही. मी स्वतः रात्री १२ पर्यंत बसुन कामे केलीत, पुरुष बॉस घरी गेलेला असताना. अकाऊंट्स टिममध्ये स्त्रिया व पुरुष कायमच उशिरा बसतात. स्त्री म्हणुन कसलीही सवलत मिळत नाही, अपेक्षाही नसते. अशी अपेक्षा ठेवली तर अप्रेझलच्या वेळी भांडता येत नाही
सर , तो प्रतिसाद पहिल्या
सर , तो प्रतिसाद पहिल्या वाक्यापासून वाचा.
सर , तो प्रतिसाद पहिल्या
सर , तो प्रतिसाद पहिल्या वाक्यापासून वाचा.
>>>>
राहू द्या बॉस, शाहरुखच्या धाग्यावर या...
जे कधी होणार नाही त्यावर फार चर्चा नको..
>>>>शीलाची सुरक्षा
>>>>शीलाची सुरक्षा
शीलाची सुरक्षा हेच कै च्या कै आहे. पुरुषांच्या अंगचटीला स्त्री गेली तर त्यांचे शील धोक्यात येते का? शील ही कल्पनाच स्त्रियांना चिकटवुन, पुरुषांनी फक्त गुलाम करुन ठेवलेले आहे.
कोणालाही अंगचटीला आलेले आवडत नाही. बेसिक नीड आहे - प्रायव्हसीची.
सगळ्याच ऑफिसात हे होत नाही.
सगळ्याच ऑफिसात हे होत नाही. प्रायवेट मध्ये तर अजिबातच नाही. मी स्वतः रात्री १२ पर्यंत बसुन कामे केलीत, पुरुष बॉस घरी गेलेला असताना. अकाऊंट्स टिममध्ये स्त्रिया व पुरुष कायमच उशिरा बसतात. स्त्री म्हणुन कसलीही सवलत मिळत नाही, अपेक्षाही नसते. अशी अपेक्षा ठेवली तर अप्रेझलच्या वेळी भांडता येत>>अजिबातच नाही?? आर यू स्यूअर?? याबाबत मी स्वयंपाकाप्रमाणे एकटे दुकटे उदाहरण हा नॉर्म होऊ शकत नाही असे सुचवेन.
साधना, आजवर मी ९ आयटी कंपनीज स्विच केल्यात आणि स्वानुभवातून हे ठामपणे सांगतो निदान प्रायव्हेट मधे तरी वूमन्स एम्प्लॉईज आर प्रिव्हीलेज्ड.
सगळे अडानीसारखे बोलतात.
सगळे अडानीसारखे बोलतात.
बाईला सीट का राखून ठेवायचं हे सान्गितलेच आहे. बाई आनि बाप्या हे देवाने वेगळे बनवले.
बाप्याच्या अन्गात ताकद आहे. मग त्याने उभं राहिलं तर काय बिघडत नाही.
बाप्याच्या अन्गात कीडा असतो म्हनुन तो लडाया करतो. एकमेकान्ना ठार मारतो.
बाया जर ठरवत असत्या तर एक पन लडाई झाली नसती. कारन बाई लडाई साठी बनवलीच नाही.
लडाया होतात म्हनुन बाईला बुरका केला.
मोगलान्ची नजर चान्गली नव्हती म्हनुन मग भारतात बाईला घरात बसायला लागलं.
नायतर आधी बाया वादविवाद परीक्शेत भाग घ्यायच्या.
गारगी आनि मैत्रेई अशा दोन आथवल्या.
अनेक बाया सम्राट होत्या. खिलोपात्रा नावाची रानी होती.
पन मोगल आले आणि बाईला चुलमुल आलं.
घुन्गट आला.
मग बाईचा दर्जा आटला. कमी झाला.
घरात बसल्यानं सेंस ऑफ रुमर कमी झाला.
त्यामुळं बाका प्रसन्ग आला तर त्या बावचळुन जातात.
पिक्चरमधे पण रनजित मागे लागल्यावर बाईला पळुन जायचं सुचत नाही.
ती कानावर हात ठेवुन ओरडती.
नाहीतर पळुन जाताना थेच लागुन पडती.
हे असं होतं.
म्हनुन आता आपन बसायला जागा नाही दिली तर सरकारनं नियम बनवला.
यात एवढा काथ्या कुटायची काय गरज ?
शील ही कल्पनाच स्त्रियांना
शील ही कल्पनाच स्त्रियांना चिकटवुन, पुरुषांनी फक्त गुलाम करुन ठेवलेले आहे.
>>>>>
धिस इज इंटरेस्टिंग!
कोणीही चिकटवली नाहीये.
ज्या स्त्रियांना हे नाही आवडत त्यांच्यासाठी वेगळा डबा आहे.
ज्यांना काही हरकत नसते त्यांना जनरल डब्यात एकत्र प्रवास करायची सोय आहे.
>>>>>स्त्रियांच्या तुलनेत
>>>>>स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांवर वर्क लोड अधिक टाकला जातो, एक्स्ट्रा वर्किंग अवर्सच्या अपेक्षा पुरुषांकडून अधिक बाळगल्या जातात फक्त खो खो खो खो हसू आले . व कीव आली या विधानाची.
‘अर्थार्जन करणार्या महिलांचे
‘अर्थार्जन करणार्या महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण' : माहिती, प्रतिबंध व उपाय
रमेश स्वागत आहे. फार
रमेश
स्वागत आहे. फार आवडली तुमची स्टाइल.
बाळगल्या जातात फक्त खो खो खो
बाळगल्या जातात फक्त खो खो खो खो हसू आले . व कीव आली या विधानाची.>>> कीव नका करु, आपल्या पुरुष सहकाऱी आणि महीला सहकारी उपसत असलेल्या कामाकडे तौलनिक दृष्ट्या पहा...फरक समजून येईल आणि तेवढचं पुरे असेल. Ever wonder why manegers mostly asked for men team members??
<स्त्रियांच्या तुलनेत
<स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांवर वर्क लोड अधिक टाकला जातो, एक्स्ट्रा वर्किंग अवर्सच्या अपेक्षा पुरुषांकडून अधिक> हे आमच्या ऑफिसात व्हायचं. संध्याकाळी उशिरा थांबायची वेळ आली तर पुरुषच थांबायचे. फक्त पुरुषांची दुसर्या शहरात ट्रान्सफर व्हायची. स्त्रीची दुसर्या शहरात ट्रान्सफर तिने मागितली तरच व्हायची. हे मी बँकांतही पाहिलं आहे.
स्त्रीयांना ऑफिसमध्ये लेट
स्त्रीयांना ऑफिसमध्ये लेट नाईट कामाबाबत सवलत मिळणे हे नॉर्मल आहे. पण याबाबत काही तक्रार नाही. पुरुषांनी लेट नाईट काम करायचा त्रास स्वतःहूनच ओढवून घेतला असतो. नाही केले तर कोणी फासावर चढवत नाही. फक्त पैसे कमी मिळतात.
अरे वा! आणखी गृहीतकं.
अरे वा! आणखी गृहीतकं.
इथले सारे बोलणेच आपापल्या
इथले सारे बोलणेच आपापल्या चष्म्यातून, कॉग्निटिव्ह बायसेस मधुन होते आहे. सॉलिड पुरावा काही नाही (जसे की सर्व्हे वगैरे). वरती अरुंधती च्या लेखाची लिंक छान दिसते, वाचेन.
पुरुषांनी लेट नाईट काम करायचा
पुरुषांनी लेट नाईट काम करायचा त्रास स्वतःहूनच ओढवून घेतला असतो. नाही केले तर कोणी फासावर चढवत नाही. फक्त पैसे कमी मिळतात.>> 🙏
Pages