फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ बस चे ग्लास पार्टिशन टाकून लिंगाधारीत प्रवाशांच्या संख्येनुसार दोन्ही विभागात सीट्स ठेवाव्यात, महीलांनी पुरुषांच्या विभागात येउ नये पुरुष जाणारच नाहीत ( रेल्वेचा अनुभव पहाता) दोघांना वापरायला दोन वेगवेगळे डोअर्स आहेतच. टिकीटींग सिस्टीम ऑटोमेटेड करावी, आणखी हवं असल्यास दोनही विभागांच्या सीट्स प्रवाशी बसल्यावर एकमेकांचे थोबाड नजरेस पडणार नाही अशा ठेवाव्यात. मग दोघांनाही काय घालायचा तो गोधळ, काय दाखवाची ती सहानुभूती, काय दाखवायचे ते नखरे आपल्या आपल्या भागात दाखवू देत. पाहूया मग कोणाचा विभाग किती शांत रहातो आणि कुणाच्या विभागाला टिकीटाच्याच किमतीत सिनेमा पहायचे ॲडऑन पॅकेज मिळते. Rofl

सलून्स कशी फक्त पुरुषांसाठी, फक्त स्त्रियांसाठी आणि फॅमिली किंवा युनिसेक्स असतात तशा बसेस ठेवायच्या. प्रश्न मिटला.
म्हणजे मिटावा. पण एकदा पुरुषांसाठीच्या सलूनमध्ये एक आई आपल्या ८-१० वर्षांच्या मुलीला केस कापवायला घेऊन आली होती. स्त्रियांचे सलून की पार्लर शेजारीच, अगदी पुढच्या दारीच होते. मुलीला बॉयकट हवा होता कारण ती मैदानी खेळ खेळायची. ब्युटी पार्लरमध्ये पैसे जास्त लागले असते का?

ब्युटी पार्लरमध्ये पैसे जास्त लागले असते का?>> प्रश्न पैशांचाच असेल असं नाही.
कधी कधी पुरुष विभागात काम करणारा एखादा कारागीर स्त्री पुरुष दोघांचेही hair cut करण्यात जास्त तरबेज असतो आणि बऱ्याच स्त्रियांना तोच हवा असतो hair cut करायला.

हरकत नाही
पण सगळ्यांना समुद्र , नद्या आणि जमीन सारख्या प्रमाणात आणि अर्ध्या अर्ध्या हिमालयासकट मिळालाय पाहिजे.

एक so called modern महिला महिलांच्या रिकाम्या सीटवर न बसता जनरल सीट वर येऊन बसली.>> अशा एक मावशीबाई बेस्ट च्या प्रवासात रोजच दिसायच्या. पुर्ण बस रिकामी असली तरी जनरल सीटवरच बसणार. काही म्हणजे काही सांगायचा धर्म नाही. आणि जर कधी सहप्रवाशाचा धक्का लागला तर देवा रे देवा. नेहमीचे प्रवाशी तर त्यांच्या शेजारी बसणं टाळायचेच.

शा एक मावशीबाई बेस्ट च्या प्रवासात रोजच दिसायच्या. पुर्ण बस रिकामी असली तरी जनरल सीटवरच बसणार>>>>

हे कळले नाही.. पुर्ण बस रिकामी असली तर कोणी कुठेही बसुदे की.. काय बिघडते? सांताक्रुझ ते नेरुळ असा मोठा प्रवास बसने करताना जनरल सिटवर बसलेल्या स्त्रिया महिला सिट खाली झाली की स्वतहुन तिथे जाऊन बसलेल्या पाहिल्यात, सहप्रवाशी पुरुषांनीही कधी विनंती करुन तिकडे बसायला सांगितलेले पाहिले आहे.

महिला अपमान करुन उठवतात कारण महिला बाजुला येऊन उभी राहिली तरी राखिव सिटवर बसलेले पुरुष उठत नाहीत. शेवटी तिला ‘आता उठा‘ म्हणुन सांगावे लागते आणि तरी उठले नाहीत तर अपमान करावा लागतो. सगळ्याच करतात असे नाही, काहीजणी उभ्या राहतात तशाच. मी दहा पंधरा मिनिटात् उतरायचे असेल तर उभीच राहायचे. तासभराचा प्रवास असेल तर मात्र बसलेल्या पुरुषाला उठवावे लागायचे. तो साठीच्या वरचा दिसत असेल तर मी गप उभी राहायचे.

अशाच एका प्रवासात खच्चुन भरलेल्या बस मध्ये एका वृद्ध स्त्रीसाठी मी एका पुरुषाला उठायला सांगितले तर तो तरुण पुरुष उठायला तयार नाही. तो ढिम्मच पण दुसरा एक पुरुष मला विचारतो, तुम्ही जरा जास्त शिकलेल्या आहात का?? मी म्हटले हो. इतकी जास्त शिकलेय की स्त्रियांसाठी असे लिहिलेले मला वाचता येतेय, तुम्हा दोन्ही पुरुषांना अद्याप ते वाचता येत नाहीय Happy शेवटी कंडक्टरला बोलाऊन त्याला उठवले.

एस्टी मध्ये राखिव जागा फक्त सुरवातीच्या स्थानकासाठी असतात. एकदा बस निघाली की नंतर स्त्रियांच्या जागी बसलेल्या पुरुशाला उठवता येत नाही. सुरवातीला तिथे स्त्री असली तरी ती मध्येच उतरुन गेली तर कोणीही बसु शकते.

पण एकदा पुरुषांसाठीच्या सलूनमध्ये एक आई आपल्या ८-१० वर्षांच्या मुलीला केस कापवायला घेऊन आली होती..... हिच ती घुसखोरी, पुरुषांना गृहीत धरण्याची मानसिकता. हेच जरा उलट विचार करून पहा. म्हणजे एखादा पुरुष आपल्या लहान मुलीला घेऊन बायकांच्या पार्लरमध्ये जाऊ शकेल का??? आणि जर एखादा गेलाही तरी पार्लर मधील इतर महिला ग्राहक त्या पुरुषाचे तिथे येणे accept करतील का???

ऊन कोणत्या बाजूला येतंय हाही एक मुद्दा घ्या. लोकसत्ता मुंबई वृत्तान्ताने महिलांच्या सीट्स उन्हात अशी बातमी छापली होती. ती वाचून माझा हात आपसूक माझ्याच कपाळावर जाऊन आपटला.
मग तर पार्किंगसाठी सम विषम नियम तसे इकडे 4pm पूर्वी आणि नंतर असे नियम करावे लागतील उन्हाची सांगड घालताना
नुसते ४ PM पूर्वी / नंतर इतकाच विचार करून नाही चालणार. तर बस दक्षिण मुंबईच्या दिशेने जाते आहे की उत्तर मुंबईच्या दिशेने (अप / डाऊन मार्ग) हाही विचार करावा लागेल! म्हणजे महिलांना आरक्षित जागा द्या व त्या उन्हातही असता कामा नयेत! छान आहे! आणि पुरुषांनो तुम्ही तर जनावर आहात, तुम्हाला बसण्यासाठी हक्काची जागा नाही मिळाली तरी चालेल!!!

जातीय आरक्षणातील हुषार मुले जातीय आरक्षित जागा भरायच्या आधी जनरल मधील जागेत अ‍ॅडमिशन घेऊन मोकळी झाली तर काय मत आहे इथल्या लोकांचं?

जातीय आरक्षणातील हुषार मुले जातीय आरक्षित जागा भरायच्या आधी जनरल मधील जागेत अ‍ॅडमिशन घेऊन मोकळी झाली तर काय मत आहे इथल्या लोकांचं?>>> मला वाटते नियम तसाच आहे, जातीय आरक्षणातील हुषार मुले जनरल सीटस् घेऊ शकतात त्या मुळे रिझर्व्ह सीट्स तेवढ्याच रहातात आणि जनरल ( म्हणूनच ईथे ओपन कॅटेगरी अथवा खुला प्रवर्ग हे शब्द जास्त संयुक्तिक आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत) सीट्स मधील कटऑफ मधून एक जागा कमी उपलब्ध होते. या संदर्भात क्वोरावर एक सुंदर विस्तारित उत्तर होते. मिळाल्यास लिंक डकवेन.

>>एखादा पुरुष आपल्या लहान मुलीला घेऊन बायकांच्या पार्लरमध्ये जाऊ शकेल का??? आणि जर एखादा गेलाही तरी पार्लर मधील इतर महिला ग्राहक त्या पुरुषाचे तिथे येणे accept करतील का???>>
क्लायंट कोण आहे ? - लहान मुलगी. मग तिला बायकांच्या पार्लरमधे सेवा मिळायला हवी. सोबत आई, बाबा,काका, मामी कोण आले आहे याने काय फरक पडतो. जे कोणी सोबत आले आहे ते थांबतील वेटिंग एरीआत, डॉक्टरकडे नाही थांबत? मुलीला केस कापायला न्यायला पुरुष नातेवाईकच उपलब्ध आहे, स्त्री नातेवाईक कामात आहे / घरी आराम करत आहे जे काही असेल ते - पालक जबाबदार्‍या वाटून घेत आहेत ही साधी गोष्ट मान्य करता येत नसेल तर मग कठीण आहे.
रच्याकने मी आणि माझ्यासारख्या अनेक मुलींचे पहिले बॉयकट बाबांच्या सोबत सलूनमधे जावून झाले. गावात पार्लर वगैरे नव्हतेच. ३-४ वेळा बाबांसोबत जावून आल्यावर आईला एकंदरीत केस कसे कापलेत ते बघून अंदाज आला मग आईच घरी कापायची.

बाकी बस बाबत माझा अनुभव फार जुना आणि अगदीच तोकडा आहे त्यामुळे पास.

पुर्ण बस रिकामी असली तर कोणी कुठेही बसुदे की.. काय बिघडते?>> काहीच बिघडत नाही.
पण जर रांगेत तुम्ही पहिल्या नंबर वर उभ्या असाल आणि मागे पन्नास प्रवाशी उभे असतील तर मी जनरल सीटवरच बसेल किंवा महिलांसाठी राखीव सीट रिकाम्या असतांनाही मी जनरल सीट वरच बसेल हा अट्टाहास कशासाठी?

महिला अपमान करुन उठवतात कारण महिला बाजुला येऊन उभी राहिली तरी राखिव सिटवर बसलेले पुरुष उठत नाहीत.>> अशा नाठाळांना इतर पुरुष प्रवाशांनीही उठवलेले पाहिले आहे.

ॲक्चुली मला स्वतःला या रिझर्व्ह सीट्सच्या नियमां बद्दल (कदाचीत आजून तरुण असल्याने) काहीही वावगे वाटत नाही परंतू खचाखच भरलेल्या बस मधे कितीही अंग चोरुन पुढे सरकायचा प्रयत्न केला तरी थोडा धक्का लागतोच पण अशावेळी अगदी एक्सक्यूज मी ची पुर्व कल्पना देऊनही ज्या नजरेने/कटाक्षाने पाहीले जाते त्याची चीड येते. स्रीयांच्या सीट्स च्या बाजूला उभं रहायचा प्रश्नच येत नाही परंतू जनरल सीटवर बाहेरच्या बाजूला महीला बसलेली असल्यास आणि पाठून स्त्रिया पुढे सरकत असतील तर आणखी तारेवरची कसरत होउन बसते, मागाहून पुढे सरकणाऱ्या उभ्या असणाऱ्या काही महीला तर आपण मुद्दामहून जणू वाट अडवून उभा असल्याच्या टोनमधे तावातावाने बोलतात. नक्कीच या गोष्टी त्या काही त्यांना मजा येते म्हणून करत नाहीत तर त्यांना त्याप्रकारचे घृणास्पद पुर्वानुभव गाठीला असतात म्हणून. अशा वेळी चीड येऊनही काही उपयोग नसतो गप्प बसण्यात शहाणपण असते.
आमच्या एरिया मध्ये एक वेडा होता काही वर्षांपूर्वी तो विनाकारण सर्वांना शिव्या देत फिरायचा त्याला मारायला कुणीही धावायचे नाही, तर त्याच्या मानसिक स्थिती मुळेच तो असा वागतोय हे समजून पुढे व्हायचे...अगदीच एखाद्याचे डोके एखाद्या दिवशी आधीच आऊट असेल तर मात्र तो त्याला चांगलाच सडकून काढायचा, पण त्याबद्दल मनात खुन्नस नाही ठेवायचा...मला वाटतं या प्रकारच्या बसमधील प्रसंगाना देखील न वाईट वाटून घेता आणि मनात राग न ठेवता असेच सामोरे जायला हवे. जेव्हा मूड खराब असेल आणि तुमची चुकी नसेल तेव्हा घ्या तिथल्या तिथे समाचार, आणि द्या सोडून, मनात काय ठेवायचं एवढं?

क्लायंट कोण आहे ? - लहान मुलगी......
मग याच न्यायाने भरत यांनी दिलेल्या उदाहरणातसुद्धा क्लायंट लहान (१०-१२ वर्षांची) मुलगी असल्याने तिने बायकांच्या सलून / पार्लर मध्ये जायला नको का? तिच्या आईने तिला घेऊन पुरुषांच्या सलून मध्ये का घुसखोरी का केली???

पण जर रांगेत तुम्ही पहिल्या नंबर वर उभ्या असाल आणि मागे पन्नास प्रवाशी उभे असतील तर मी जनरल सीटवरच बसेल किंवा महिलांसाठी राखीव सीट रिकाम्या असतांनाही मी जनरल सीट वरच बसेल हा अट्टाहास कशासाठी?>>> 'मै स्त्री हू, मै कुछ भी कर सकती हू, तुम मेरा कुछ भी नही बिघाड सकते' हा attitude!!! वर जो मी attitude - attitude म्हणतो आहे तो हाच!! आम्ही पुरुषांच्या जागेत घुसखोरी करु, त्यांनी मात्र आमच्याकडे चुकूनही यायचे नाही.

...अशा नाठाळांना इतर पुरुष प्रवाशांनीही उठवलेले पाहिले आहे... +११११

आम्ही पुरुषांच्या जागेत घुसखोरी करु, त्यांनी मात्र आमच्याकडे चुकूनही यायचे नाही.>>> अब मै कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा... Biggrin

आम्ही पुरुषांच्या जागेत घुसखोरी करु, त्यांनी मात्र आमच्याकडे चुकूनही यायचे नाही>>>पुरुषांची राखीव अशी कुठलीही जागा नाही, पण मला वाटतेय प्रॉब्लेम हा नाही आहे, मुळातच पुढची अर्धी बस राखीव असल्याने पुरुषांना गर्दीच्या तुलनेत खुपच कमी सीट्स बसायला उरतात. त्यामुळे कुणी महीला उरलेल्या सीट्सवर बसली तर खटकते

त्यांनी मात्र आमच्याकडे चुकूनही यायचे नाही.>> एकदा जंप मारून धावती लोकल पकडतांना चुकून महिलांचा डबा पकडला होता. आपल्या डब्यात अस्वल शिरलं की काय अशा किंचाळ्या ऐकू यायला लागल्या. मागोमाग " दिखता नही क्या ये लेडीज डबा है. उतर जल्दी." अशा सूचना. ज्या वेगाने डबा पकडला त्याच्या दुप्पट वेगाने प्लॅटफॉर्म वर उतरायला त्या माऊल्यांनी भाग पाडलं. अक्षरशः घाम फुटला होता त्या दिवशी.

क्लायंट कोण आहे ? - लहान मुलगी......
मग याच न्यायाने भरत यांनी दिलेल्या उदाहरणातसुद्धा क्लायंट लहान (१०-१२ वर्षांची) मुलगी असल्याने तिने बायकांच्या सलून / पार्लर मध्ये जायला नको का? तिच्या आईने तिला घेऊन पुरुषांच्या सलून मध्ये का घुसखोरी का केली???
>>> फक्त पुरुषांच्या सलुनमधे ६-७-८ वर्षापर्यंत ठीक आहे, १०-१२ वर्षाच्या मुलीला नये नेवू , त्यापेक्षा युनिसेक्स सलूनमधे न्यावे. कदाचित मुलगी लहानपणापासून तिथे येत असावी, सलून मालकालाही तिचे येणे सवयीचे असावे आणि आता आईला तो कंफर्ट घालवायचा नसावा. अशावेळी खरे तर सलून मालकानेच 'मुलगी आता मोठी झाली आहे तेव्हा...' असे म्हणून दुसरीकडे जायला सुचवायला हवे. बार्बर शॉप प्रकारातले सलून ही खरे तर पुरुषांची खास जागा. ६-८ वर्षाची छोटी आली तर काका लोकं सामावून घेतात,लाडही करतात तो त्यांचा चांगुलपणा. पण याचा गैरफायदा न घेण्याचे तारतम्य मुलीच्या पालकांना (आई/बाबा) हवे, नसेल तर मालकाने जाणीव करुन द्यावी.
बाकी नव्याने, पुरुषांच्या अनोळखी सलूनमधे स्वखुशीने जायला १०-१२ वर्षाची मुलगी नाही तयार होणार !

एकदा जंप मारून धावती लोकल पकडतांना चुकून महिलांचा डबा पकडला होता.
>>>>>>

मला असे दोन तीन अनुभव आहेत.
मी ओशाळून सॉरी बोललो कोणी काही चिडले रागावले वगैरे नाही.
दारात उभा राहिलो आणि पुढचे स्टेशन उतरलो..
त्यात एकदा तर मला अगदी तशीच अर्जन्सी असल्याने ट्रेन सोडायची नव्हती आणि लेडीज डब्यात चढतो हे माहीत असून नाईलाजाने चढलो होतो. तरी कोणी काही म्हटले नाही.

६-७-८ वर्षापर्यंत ठीक आहे, १०-१२ वर्षाच्या मुलीला नये नेवू , त्यापेक्षा युनिसेक्स सलूनमधे न्यावे.
>>>>

हो, १०-१२ वय फार झाले.
ते देखील हल्ली जमाना जसा आहे ते पाहता तर कोणी नेतही नसेल.

ट्रेन मध्ये जनरल डब्बा सिस्टीमच योग्य आहे. पुरुषांना राखीव डब्याची गरज काय? कुठल्या स्त्रिया समोरून येऊन त्यांचा विनयभंग करणार आहेत? भलत्याच अपेक्षा आहेत..
पर्सनल स्पेस म्हणाल तर ती तरी पब्लिक प्लेसमध्ये कश्याला हवी..

ट्रेन मध्ये जनरल डब्बा सिस्टीमच योग्य आहे. पुरुषांना राखीव डब्याची गरज काय?....
1. शांतपणे प्रवास
2. जास्त जणांचा प्रवास (more capacity)
जेव्हा आपण पुरुष प्रवास करतो तेव्हा गर्दीच्या वेळी एका सीटवर 4 जण बसतो. दोन सीटच्या मधल्या जागेत सुद्धा गर्दीच्या वेळेत 3 जण उभे राहतात. म्हणजे या सीटवर 4, समोरच्या सीटवर 4 आणि मधल्या जागेत 3 जण उभे असे एकूण 11 जण त्या एवढ्याश्या जागेत प्रवास करतात.
हेच जर एखादी महिला त्या डब्यात येऊन एका सीटवर येऊन बसली तर त्या सीटवर forth seat कोणी बसत नाही, शिवाय त्या महिलेच्या समोर जागा मोकळी सोडतील (कोणी उभे राहणार नाही) म्हणजे एक महिला आल्याने किमान दोन पुरुषांच्या जागा कमी झाल्या.

आणि मुळात प्रॉब्लेम काय आहे?
म्हणजे 12 डब्यांच्या ट्रेनमध्ये 4 डबे महिलांसाठी राखीव आणि 8 जनरल असतात. हे configuration बदलून 4 डबे महिलांसाठी, 4 डबे पुरुषांसाठी आणि 4 जनरल असे का असू नये????????

4 डबे महिलांसाठी, 4 डबे पुरुषांसाठी आणि 4 जनरल असे का असू नये?
>>>>

जर एखादी सुंदर महिला जनरल डब्यात चढली तर पुरुषांचा डब्बा अर्धा रिकामा आणि जनरल डब्यावर एक्स्ट्रा लोड असे नाही का होणार?

गर्दीच्या वेळी एका सीटवर 4 जण बसतो.
>>>>>

भाई कधीतरी फर्स्टलासने प्रवास करा. पुरुषांना किती माज असतो ते समजेल.
फर्स्ट क्लास पुरुषांच्या डब्यात चुकूनही एका सीटवर चार जण बसू देत नाही.
मी जेव्हा जॉबला लागलो आणि फर्स्ट क्लास मध्ये पहिल्यांदा त्या चौथ्या सीटवर बसायला गेलो तेव्हा मला इतका घाणेरडा लूक मिळालेला जो मी आजवर विसरू शकत नाही.

पण तेच स्त्रियांच्या फर्स्ट क्लास डब्यात चौघी जणी एका बाकड्यावर गुण्यागोविंदाने नांदतात.

म्हणून मला तरी फक्त पुरुषांचा डब्बा नकोय. त्यात महिला सुद्धा असलेल्या उत्तम. जसे बायकांमुळे घराला घरपण येते, तशीच फिलिंग ट्रेनच्या त्या रुक्ष डब्यात सुद्धा येते..

social media संदर्भात Engagement farming हा प्रकार नुकताच कळला.
लक्ष वेधून प्रतिसाद मिळवण्याचा हा एक प्रकार.
प्रक्षोभक, विवादास्पद विधाने करणे, क्लिकबेट हेडलाइन्स म्हणजे आत काही तरी खूप मालमसाला असेल असे वाटावे अशी शीर्षके देणे , पण प्रत्यक्षा मजकुरात तसे काही नसणे , कोलांट्या उड्या मारणे, ड्यु आयडी वापरून प्रतिसाद वाढवणे , आपले जुनेच लेखन वर आणणे या यातल्या काही क्लृप्त्या.
ट्विटर इ. ठिकाणी काही लोक पैसे मिळवण्यासाठी असे करतात. मायबोलीवर लिहून किंवा प्रतिसाद कमवून पैसे मिळत नसावेत.

पण तेच स्त्रियांच्या फर्स्ट क्लास डब्यात चौघी जणी एका बाकड्यावर गुण्यागोविंदाने नांदतात>>> हे चूक आहे . मी लेडीज फर्स्ट क्लासने प्रवास करायचे / करते . चौथी सीट देत नाहीत . उभे राहून प्रवास केला जातो

माझ्या मैत्रिणी तर मला सांगायच्या की त्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात बसतात चार जणी..
खोटे बोलत नसाव्यात..
कदाचित प्रत्येक ठिकाणचे (लाईनचे) कल्चर वेगळे असावे किंवा सध्या होत नसावे..

हे गर्दीवर सुद्धा अवलंबून असावे. महिलांचं फर्स्ट क्लास डबा तुलनेत छोटा असतो. त्यामुळे गर्दी जास्त असते. त्यामुळे जास्त लाड करायला पर्याय नसतो. जिथे तितकी ही गर्दी नसावी तिथे सुद्धा वेगळी पद्धत असू शकते.

काही मुली फर्स्ट क्लास ना चढता पुरुषांच्या डब्यात चढतात याचे एक कारण हे सुद्धा आहे. काही ठिकाणी त्यांचे डबे पुरुषांच्या तुलनेत ओव्हरलोड असतात.
कॉलेज जाणारा क्राउड असेल तर मुलेमुली यांची संख्या समान असते पण डब्बे मात्र छोटे मोठे असतात.

तुम्ही स्वतः लेडीज फर्स्ट क्लास मधून प्रवास न करता तुमच्या मैत्रिणीच्या (?) बोलण्यावर विश्वास ठेवता ? भारी आहे की . पण सांगोवागीचा बोलणे म्हणजे सत्य नव्हे .

मी कमानिमित प्रत्येक लाईनवर पुरेसा काळ फर्स्ट क्लास ने प्रवास केलेला आहे / करते आहे . . त्यामुळे प्रत्येक लाईनचे वेगळं वगैरे पपाऱ्या आहेत

बाकी गर्दी होते म्हणून मुली पुरुषांच्या फर्स्ट क्लास मध्ये चढतात वगैरे वेगळे मुद्दे . त्याचा चौथ्या सीट्सशी सबंध नाही .

Pages