फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज जागतिक पुरुष दिन आहे की नाही कल्पना नाही परंतु प्रत्येक दिवस अगतिक पुरुष दिन असतो हे मात्र खरे आहे.

१९ नोव्हेंबरच्या जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा!

---

८ मार्चचा महिला दिन ज्या scale वर साजरा होतो त्याच्या शतांशानेही पुरुष दिनाला exposure मिळत नाही. ही तक्रार नसून निरीक्षण आहे. पृथ्वीवरील सजीवांना सर्वत्र इतर सजीव दिसतात. त्या सजीवांना जिवंत ठेवणारी हवा कुठे दिसते? पुरुषांचेही असेच काही होत असेल का? हा केवळ analogical तर्क आहे, ती हवा दिसावी अशी मागणी नाही.

दोन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी पुरुषांची क्रिकेट टीम वर्ल्डकप हरली होती...
घाव अजून भरले नाहीत Sad
१९ नोव्हेंबर मी तुला कधी माफ नाही करणार....

Submitted by अni on 20 November, 2025 - 13:05>> Rofl

Ani Lol

पुरुष आपल्या कुटुंबासाठी बाहेर दुनियाभरची बेइज्जती निमूट सहन करून घरी येतो आणि घरच्यांकडून ती इज्जत मिळावी अशी अपेक्षा ठेवतो.
म्हणून कुठल्या पुरुषाला त्याच्या घरच्यांसमोर कधी बेइज्जत करू नका.

बाहेर म्हणजे मायबोलीवर सुद्धा का ?
>>>>>
हे व्यक्तीपरत्वे बदलू शकते.
कोणासाठी मायबोली हेच घर असेल तर कोणासाठी नसेल.

आमचे सर म्हणजे तेल लावलेले मल्ल आहेत. त्यांना पकडायचा प्रयत्न केला तरी ते चपळाईने त्यातून बाहेर पडतात. Wink

"आज स्वयंपाक काय करायचा?" असा प्रश्न पुरूषांना जेव्हा दिवसातून एकदा तरी पडायला लागेल, तेव्हापासून त्यांच्यासाठी राखीव जागा करायला हरकत नाही.

रोज पडतो.
आणि आणि तरीही राखीव जागा अजिबात नको. स्त्रियांना का आहेत आणि त्यांना प्रवासात काय सामना करावा लागतो ते समजू शकतो.

रोज जेवण काय करावे या विचारासाठी स्त्रियांना जागा मिळतात हा जावईशोध महान आहे. Lol

जावईशोध

>>> सूनशोध म्हणायला हवे ना!

म्हणजे जे पुरुष घरी स्वयंपाक करतात त्यांच्यासाठी राखीव डबा ठेवायला हरकत नाही. फक्त ते ओळखायचे कसे हा प्रश्न आहे.

तसेच ज्या बाईकडे स्वयंपाकाला बाई असते तिला राखीव डब्याची गरज नाही.
ती सुद्धा ओळखायची कशी हा प्रश्न आहे.

>>>>>>>"आज स्वयंपाक काय करायचा?" असा प्रश्न पुरूषांना जेव्हा दिवसातून एकदा तरी पडायला लागेल, तेव्हापासून त्यांच्यासाठी राखीव जागा करायला हरकत नाही.
शर्मिला स्पॉट ऑन. इतकं प्रिव्हिलेज्ड जेंडर असूनही रडतायतच.

रोज जेवण काय करावे या विचारासाठी स्त्रियांना जागा मिळतात हा जावईशोध महान आहे.>> अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. (हे मी आधीच लिहायला हवं होतं)
बाकी नकोसे धक्के सहन करण... वैगेरे आहेच.

मी माझ्या अवतीभवती अनेक बायका बघितल्या आहेत, ज्यांचा दिवस सकाळी पाच किंवा त्या आधीही सुरू होतो. त्यांना पहिल्यांदा बसायला मिळतं ते कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावरच. शिक्षकी पेशा असेल किंवा गेल्या गेल्या स्टँडिंग मीटिंग अटेंड करायची असेल तर तेही नाही. थकून दमून अगदी रडकुंडीला आलेल्या मुली बायका बघितल्या आहेत.
घरी परत गेल्यावर परत स्वयंपाकघर मुलांचे अभ्यास जेना च्या मागण्या असतातच.
स्वयंपाकाची बाई सगळ्यांनाच मिळेल/परवडेल असं नाही.

"आज स्वयंपाक काय करायचा?" ह्या प्रश्नामध्ये घरातल्या जबाबदऱ्या घेणं अपेक्षित आहे.

>>>>>>बाकी नकोसे धक्के सहन करण... वैगेरे आहेच.
नो वन कुड अ‍ॅग्री स्ट्राँगर दॅन मी.
पण सार्‍या पुरुषांना वेठीला धरण्याच्या मी विरोधात आहे. हे जे हिट & रन फ**र्स पुरुष असतात, तेच जर सापडले तर अन्य पुरुष त्यांना बुकलुन काढतात. तेव्हा ... सर्वच काही गुन्हेगार नाहीत.
पण ...
स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी पुरुष घेत नाहीत हे खरे आहे. याउलट आर्थिक स्वास्थ्याची पूर्ण जबाबदारी स्त्री घेते.

सोशल मीडीया आल्यापासून बसमधे जागा का सोडायची याची कारणे देऊन थकल्यानंतर मग नमुना म्हणून वेगळं कारण पुढे केलं असेल. टू द पॉईण्ट सांगूनही फारसा फरक पडतो असं वाटत नाही. शंभरात एखादा शहाणा होतो.

कधी कधी असं वाटतं कि जागा का सोडायची म्हणून वाद घालणार्‍यांना साडेसहा फुटी दीडशे किलो वजनी आफ्रिकनांसोबत कुस्ती खेळायला लावावे.

Pages