धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!
सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!
तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?
वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)
अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.
म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
समानता म्हटली की मला नेहमी हे
समानता म्हटली की मला नेहमी हे चित्र आठवते.
मस्त चित्र आहे! फारच आवडले
मस्त चित्र आहे! फारच आवडले
चपखल चित्र आहे.
चपखल चित्र आहे.
काही डबे जनरल ठेवा बाकीचे
काही डबे जनरल ठेवा बाकीचे निम्मे निम्मे स्त्रिया व पुरुषांना विभागुन द्या.
जनरल डबे ओळखण्याकरता त्यावर
जनरल डबे ओळखण्याकरता त्यावर "प्यार कि दुनिया" नाव द्या.
एले जनरल हवे कारण कोण्या
एले जनरल हवे कारण कोण्या वडीलांना मुलीला घेउन जायचे आहे. कोण्या आईला तिच्या मुलास घेउन जायचे आहे.
हो . म्हणजे फक्त या डब्यात
हो . म्हणजे फक्त या डब्यात युद्ध नसेल म्हणून प्यार कि दुनिया.
मुहब्बत कि नाही ओ.
चेन्नईत सार्वजनिक बसमध्ये
चेन्नईत सार्वजनिक बसमध्ये उजवी बाजू पुरूषांकरिता व डावी बाजू स्त्रियांकरिता असते. ५०-५० व जयललिताकृपेने महिलांना चकटफू प्रवास ! फादवि व रुन्म्याची दोन्ही चित्रे आवडली.
विमु यांना हा प्रश्न धसास
विमु यांना हा प्रश्न धसास लावायचा आहे.... विमु खरेच गंभिर आहेत या विषयाबाबत हे सिद्ध होईल.
Submitted by साधना on 22 January, 2026 - 14:31
मी गंभीर आहेच, पण आत्ता लगेच कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे मागणी केलेली नाही किंवा इतक्यात करायचा विचारही नाही. कारण रेल्वेसारखी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी व्यवस्था किंवा MSRTC (म्हणजे गावची ST) अशी राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी व्यवस्था या खूप मोठ्या गोष्टी आहेत. अगदी साधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या 'बेस्ट' मध्ये किंवा त्याहूनही लहान म्हणजे एकाच मार्गावर धावणाऱ्या 'मुंबई मेट्रो लाईन १' (वर्सोवा - घाटकोपर) मध्ये जरी स्वतंत्र्य डब्याची मी मागणी केली तरी माझ्या एकट्याच्या मागणीने काहीही होणार नाही, त्यासाठी पुरेसा जनमताचा रेटा पाहिजे. साधे २-५ हजार सह्यांचे निवेदन जरी द्यायचे म्हटले तरी इतक्या सह्या मिळवायलाच किती दिवस
लागतील, सांगता येत नाही. त्यामुळे वर ऋन्मेष म्हणाला तसे, सध्या केवळ पुरुषांना जागरूक करणे, हाच या धाग्याचा उद्देश आहे. अर्थात त्यासाठी राजकारण्यांप्रमाणे सभा वगैरे घ्यायचा किंवा आंदोलन वगैरे करण्याचा काहीही विचार नाही.
पुरुषांनी पुढाकार घेउन हे इव्हेन्टस घडवुन आणावेत.>>>
तेच तर पुरूषांच्या बाजूने पुरूष ही नाहीयेत. >> Exactly! तीच गोष्ट इथे या धाग्यावरही दिसते आहे!
पुरुषांना सुद्धा त्रास होतो, तेही संवेदनशील असतात, त्यांनाही भरडावे- सोसावे लागू शकते, ह्याची जाणीव आहे.>>> धन्यवाद, अस्मिताताई! इतके जरी समजून घेतले तरी पुरेसे आहे!
कुणावरच अन्याय होऊ नये, आणि कुणावरही झाला तर आपण व्हिक्टिम कुणीही अगदी कुणीही असो त्याच्या बाजूने उभे रहायला हवे. आपले पर्सनल प्रेफरन्सेस/ अजेन्डे मधेच आणू नयेत, ते नैतिकदृष्ट्या चूक आहे. स्त्रियांविषयी होणाऱ्या गुन्ह्याबद्दल मधेच पुरुषांना कुणीच वाली नाही वगैरे बोलून त्या गंभीर गोष्टींची तीव्रता कमी करू नये. किंवा एखाद्या पुरुषाला शोषणातून जावे लागले तेव्हा स्त्रियांना तर मोठ्या प्रमाणात जावे लागते आता तुम्ही सहन करा वगैरे अप्रोच ठेवणं अत्यंत चुकीचे आहे. दोन्ही वेगवेगळे असले तरी तितकेच गंभीर आहे. तितकेच सिरियसली घेणे आवश्यक आहे.>>> १००% सहमत
सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत पुरुषांना वेगळे डबे देऊन त्यावर उपाय निघणे शक्य नाही. तेव्हा ते नकोच.
Submitted by अमितव on 22 January, 2026 - 21:19>>
निदान प्रवासात आपल्यावर 'खोटे आरोप' (false allegations) (संदर्भ : नुकतीच केरळमधील घटना) होण्याचे टेंशन तरी राहणार नाही, हे कमी आहे का? btw पुरुषांना वेगळे डबे का नकोत, याचे नेमके कारण सांगू शकाल का? म्हणजे समजा, उद्या माझ्यासारख्या अनेकांनी मागणी केली आणि सरकारने ती मागणी पूर्ण केली. म्हणजे एकूण डब्यांचे ३३% - ३३% - ३३% असे विभाजन केले. ३३% महिलांसाठी, ३३% पुरुषांसाठी व ३३% जनरल तर नेमकी कोणती आपत्ती समाजावर कोसळणार आहे??? हे मला पामराला कृपया समजावून सांगण्याची तसदी घ्यावी, ही विनंती.
काही डबे जनरल ठेवा बाकीचे निम्मे निम्मे स्त्रिया व पुरुषांना विभागुन द्या.
Submitted by धनश्री- on 23 January, 2026 - 01:14>>> अगदी बरोबर, हीच तर माझी मागणी आहे!
अशी चित्रे टाकली की सगळ्यांना
अशी चित्रे टाकली की सगळ्यांना समान संधी देण्याऐवजी, मग reservation चे justification करता येते. मग मेट्रोमध्ये पण स्त्रियांसाठी राखीव जागेची सोय मागता येते.
मुळात प्रश्न हा आहे की केवळ भारतात स्त्रियांना वेगळ्या राखीव जागा द्यायची वेळ मुळात का यावी? स्त्रियांच्या अंगचटीला न येता प्रवास करता येत नाही का? इतर देशांप्रमाणे सार्वजनिक प्रवास सर्वांना समान का करता येऊ नये? जगात (विशेषत: भारतात पण) आता unisex toilet ची सुरुवात होत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे.
मुळात प्रश्न हा आहे की केवळ
मुळात प्रश्न हा आहे की केवळ भारतात स्त्रियांना वेगळ्या राखीव जागा द्यायची वेळ मुळात का यावी? स्त्रियांच्या अंगचटीला न येता प्रवास करता येत नाही का?
>>>>>>
मुंबई लोकलमध्ये न चिकटता प्रवास अशक्य आहे.
जगात (विशेषत: भारतात पण) आता
जगात (विशेषत: भारतात पण) आता unisex toilet ची सुरुवात होत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे.
>>>>>
आमच्या सोसायटीत असेच आहे.
अशी चित्रे टाकली की सगळ्यांना
<<< अशी चित्रे टाकली की सगळ्यांना समान संधी देण्याऐवजी, मग reservation चे justification करता येते.
>>>>>
पण reservation मध्ये वाईट काय आहे?
मला दोन मुले आहेत. त्यांना भविष्यात माझ्या मृत्यूपश्चात माझ्या प्रॉपर्टीची गरज पडू नये अशीच अपेक्षा. पण तशीच गरज पडली तर मी वाटताना दोघांना समान नाही कोणाला किती गरज आहे हे बघूनच वाटणी करेन.
किंबहुना मी आजही त्यांना सांगतो की आमच्यापश्चात तुमच्यात कोणी एखादा मागे पडला तर दुसऱ्याने त्याला सांभाळून घ्या. सगळ्यांनी एकत्र सुखात राहण्यातच जगण्याचा आनंद आहे. आणि हे समाजाला सुद्धा लागू..
>>>>>मुंबई लोकलमध्ये न चिकटता
.
तुम्ही वेगळे बोलत आहात मी
तुम्ही वेगळे बोलत आहात मी वेगळे बोलत आहे.
गर्दीमुळे स्त्रियांच्या अंगाला चिकटावेच लागते असे मी म्हणत नाहीये.
गर्दीमुळे सगळी लोक एकमेकांना चिकटून प्रवास केल्याशिवाय इलाज नसतो म्हणून स्त्रियांना स्वतंत्र डबा गरजेचा आहे असे म्हणत आहे.
कधी मुंबई लोकल मधील गर्दी बघितली असेल तर विचार करा स्त्रियांना स्वतंत्र डब्बाच नसता तर काय स्थिती असती?
एखाद्या पुरुषाला सुद्धा दुसऱ्या पुरुषाच्या अंगाला चिकटायची किळस वाटते. तरीही नाईलाज असतो. कश्यासाठी पोटासाठी..
ऋन्मेऽऽष +१००
ऋन्मेऽऽष +१००
ऋन्मेऽऽष कधीतरी असा पते की
ऋन्मेऽऽष कधीतरी असा पते की बात करून जातोस. वरील चित्र चपखल आहे. केरळ ची घटना दुर्दैवी आहे.
नुकतीच घडलेली मालाड च्या माणसाची शुललक ट्रेन मधून उतरतानाच्या वादातून दुसर्या माण्साने धारदार शस्त्राने हत्या केली हे किती गंभीर आहे.. रीपब्लीक डे ला स्टेटस लावताना दिसली.. खूप वाईट वाटले..
अरेरे.. मुंबईत असे घडले की
अरेरे.. मुंबईत असे घडले की मनाला आणखी त्रास होतो.
Pages