फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गृहितक नाही
स्वानुभव

जर स्त्रिया कमी काम करतात अशी तक्रार असेल आणि त्या आपल्या टीम मध्ये नको असे कोणाला वाटत असेल तर त्यांना मुळात कामावर घेणारच नाहीत ना??

जर एखादी स्त्री वेळेवर काम करून निघून जात असेल आणि तरीही आपला जॉब टिकवून असेल तर तसे एखाद्या पुरुषाने केले तरी कंपनी त्याला का कामावरून काढेल?

तुम्ही जास्त काम केले की तुम्हाला जास्त काम येणार हा नियम आहे. सुरुवातीपासूनच सवय लावायची नाही जास्त कामाची हा माझा फंडा आहे.

मला नेहमी घरचे विचारतात की तुला सगळे असे ऑफिस कसे मिळतात जिथे तू आरामात काम करतोस...
पण ऑफिस तसे नसते तर मी माझ्या मर्जीने जगत असतो.

इथले सारे बोलणेच आपापल्या चष्म्यातून, कॉग्निटिव्ह बायसेस मधुन होते आहे. सॉलिड पुरावा काही नाही (जसे की सर्व्हे वगैरे).>>> Yes...सहमत, मी देखील मी मांडलेल्या मुद्यांच्या अनुषंगांने सर्वेज साठी आग्रही असेन.

काही लोक बेअकली असल्यासारके बोलत आहेत.
बाईला उशिर पर्यन्त थांबवले तर तिला रात्री बेरात्री घररी जाताना इज्जत लुटन्याचा धोका असतो तसं बाप्याला असतं का ?
पुन्यासारक्या भटाबामनाच्या गावात नयना पुजारीला मारुन टाकलं, मग बाकीच्या गावाचं काय साम्न्गता ?
पहिले तर रात्रपालीच नवती. पण काही पुढारलेल्या मुर्ख बायांनी त्य्च्या विरुद्ध जावुन तो नियम काढायला लावला.
कारन मग मालक नोकरी देत नव्हते.
बाईला कामावर थेवलं तर कायदे कडक होते म्हनुन.
आता बाई रात्रपाली पन करते.
पहिले तर बाईला सात आत घरात पाय ठेवायला लागायचं.
नाहीतर मग तिला वाईट चालीची म्हनायचे. बाहेरखयाली म्हनायचे.
बाप्याला कोन असं बोलतं का ?
ज्या बाप्याला इज्जत लुटली जायचा धोका अस्ल त्यानं तसं एफिडेविट करुन मालकाच्या तोन्डावर फेकुन मारावं.
एकांदा रुतिक रोशन सारका अस्ल दिसायला तर असल पन धोका.
नायतर काय येडे चाले लावलेत ?
लय हुशार आनि मला हसा.

रॅशनॅलिजमचं सोंग काही काळ आणता येतं. वारा फिरेल तशी पाठ फिरवून रॅशनल होता येत नाही.
बरेच जण उघडे पडलेत. आमच्या जुन्या कॉलनीतले एक अंकल फेसबुकवर वेगळ्या नावाने फार रॅशनल लेख लिहायचे.
प्रत्यक्षात घरात ते पाय पसरून पडलेले असतात. सतत लॅपटॉपवर असतात. बायको दळण आणण्यापासून सगळी कामं करते.

ज्या लग्नात जाऊ तसा पेहराव करण्यासारखं ते खायचं काम नाही इतकंच तूर्तास. नाहीतर फजिती होते.

पुरुष आपल्या कुटुंबासाठी बाहेर दुनियाभरची बेइज्जती निमूट सहन करून घरी येतो आणि घरच्यांकडून ती इज्जत मिळावी अशी अपेक्षा ठेवतो.>>>>

तुम्ही जास्त काम केले की तुम्हाला जास्त काम येणार हा नियम आहे. सुरुवातीपासूनच सवय लावायची नाही जास्त कामाची हा माझा फंडा आहे.

मला नेहमी घरचे विचारतात की तुला सगळे असे ऑफिस कसे मिळतात जिथे तू आरामात काम करतोस...
पण ऑफिस तसे नसते तर मी माझ्या मर्जीने जगत असतो.>>>>>

तुमच्या या दोन वेगवेगळ्या प्रतिसादांत काही कार्यकारणभाव तर दडलेला नाही ना?

विषय निघालाच आहे तर जरा इथली चर्चा सुद्धा वाचा

आपल्या समाजात पुरुषांवर कमवायचे आणि कमावत राहायचे दडपण असते का?
https://www.maayboli.com/node/72167

एखाद्याने सगळ्याच (किंवा बऱ्याचशा) कार्यालयीन जबाबदाऱ्या टाळायच्या म्हटल्या (आणि सोमिवर पडीक रहायचं ठरवलं) तर शक्यतो त्यांच्यावर कामाच्या जबाबदाऱ्या टाकणं टाळलंच जातं. (बाॅसलाही त्याच्या अप्रेजलची, प्रमोशनची चिंता असतेच की..)
आणि मग अशांना ऑफिसमधे आरामही मिळू शकतो.

निदान प्रायव्हेट मधे तरी वूमन्स एम्प्लॉईज आर प्रिव्हीलेज्ड.>> असं अजिबात नाहिय. मी स्वतः शाळा, कॉलेज, विद्यापीठ, खासगी कंपनी अशा बऱ्याच ठिकाणी काम केलय.
प्रोग्रॅमर म्हणून काम करतांना मी एकटीच स्त्री होते आमच्या ग्रुप मधे कित्येकदा माझा पार्ट पूर्ण करण्याकरता रात्री उशिरापर्यंत थांबले मी एकटीच.

इथे असणारे बरेचसे प्रिवीलेज गटात मोडणारे असावेत. त्यामुळे लहान खासगी कंपनीत बायकांना होणारा त्रास... नाइलाजाने करावी लागणारी नोकरी... फक्त दोन महिने मिळणारी बाळंतपणाची रजा (अविश्वानीय असलं तरीही) ... ह्या गोष्टी माहित नसतील.
अनुभव लिहिते सावकाश,सविस्तर.

स्स्री पुरुश समानता हीस्र प्राण्याच्यात असती.
तो बाईला पण खातो अन बाप्याला पण. कोनालाच सोडत नाही.

आता हे बघा , धागा काढलाय तो पुरुशान्साठी बस मधे राखिव जागा राहाव्या म्हनून
मि लिहिलं कि जागतिक पुरुश दीनाच्या शुभेच्चा का नाहि दिल्या म्हनुन
अजुन सुद्दा एका पण बाईने पुरुशान्ना शुभेच्चा दिल्या नाहीत
नुसतेच सगळे भान्डत बसलेत
द्या शुभेच्चा अन सम्पवा विशय

बाळंतपणाच्या पगारी रजेबद्दल माझा एक धागा आहे. त्यातले चटकन आठवलेले मुद्दे.
आस्थापनाला बाळंतपणाची पगारी रजा देणे परवडणे.
आपल्या घरातील मोलकरणी - यासाठी सध्या घरगुती मदतनीस असा गोंडस शब्द आहे- मोलकरणीला भरपगारी बाळंतपणाची रजा देणे.

या मुद्द्यावरून चर्चा घरगुती मदतनीसांवर गेली. तिथे आपल्या घरातले टॉयलेट मोलकरणी इत्यादिंनी वापरणे काहींना मान्य नव्हते.

स्त्रियांसाठी वेगळी आसने, वेगळे डबे असावेतच. पुरुषांसाठी तसे काही हवे असे मला वाटत नाही.

पण निदान आता तरी पुरुषांचेही पुरुष म्हणून काही प्रॉब्लेम असू शकतात हे मान्य करणेही संवेदनशील, जागरुक म्हणवणार्‍या स्त्रियांना कठीण जाते याचे नवल वाटले.

माबो वाचक + १. पुरुष दिनाच्या शुभेच्छा जाऊ दे, त्याची टर उडवण्यात आली.

महिलादिनाचा आधीपासूनच जितका गाजावाजा होतो, तेवढा पुरुष दिनाचा होत नाही, त्यामुळे तो लक्षात आला नाही खरच.

मायबोली वरील सर्व पुरूषांना (उशिरा का होईना) हार्दिक शुभेच्छा.

असं अजिबात नाहिय.>> तुमच्या माहीतीत नसावं माझ्या माहितीप्रमाणे आहेत. कदाचीत मी जिथे जातो तिथे मला तशाच महिलाच भेटत असाव्यात, त्या मुळे माझा असा ग्रह झाल्याचीही एक शक्यता संभवते. खखोदेजा. We can agree to disagree.

माबोजी आभारि आहे.
काहि काहि लोक बामन लोकांना आरक्शन नको म्हनतात. त्यांना कसलिच सवलत नको म्हनतात.
पन तेच लोक महिला दिनचि टर उडवतात. त्यांना झापल कि डुख धरुन पुरुश दीनाला शुबेच्चा क नाहि दिली म्हनतात.
लोजिकलोचा आहे त्यांचा.
जर बामन लोकांना काहि नको तर पुरुश दीन कशाला पाहिजे?
बामन लोकांना पन बामन म्हनुन काहि प्रोब्लेम नाही का?

एखाद्याने सगळ्याच (किंवा बऱ्याचशा) कार्यालयीन जबाबदाऱ्या टाळायच्या म्हटल्या (आणि सोमिवर पडीक रहायचं ठरवलं) तर शक्यतो त्यांच्यावर कामाच्या जबाबदाऱ्या टाकणं टाळलंच जातं. (बाॅसलाही त्याच्या अप्रेजलची, प्रमोशनची चिंता असतेच की..)
आणि मग अशांना ऑफिसमधे आरामही मिळू शकतो.

Submitted by अ'निरु'द्ध on 21 November, 2025 - 07:50
>>>>>

यावर आपण स्वतंत्र धागा काढुया..
स्मार्टवर्क vs गधामजुरी, टाईम मॅनेजमेंट, वर्क लाईफ बॅलन्स, आयुष्यात प्रायोरिटी क्लिअर असणे..
असे बरेच मुद्दे आहेत यात..
पर्सनल कॉमेंट पलीकडे जाऊन विचार केला तर खरेच खूप छान आणि महत्वाचा विषय आहे या काळात.

नमस्कार मायबोली या साईटवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
धागा नाव वाचून उत्सुकता निर्माण झाली. वेगवेगळी मतमतांतरे वाचत आहे. जागतिक पुरूष दिन असतो हे पहिल्यांदाच ऐकले.
पुरूषांनी हा सण साजरा केला आहे किंवा एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत असे आठवत नाही. बहुतेक कुणालाच अशा दिनाची गरज वाटत नसावी.

महिलांकडून जागतिक महिला दिन साजरा व्हायचा. आता ते ही दिसत नाही. किंवा माझ्या पाहण्यात नसेल.

आपल्या साठी नवनवीन कथा घेऊन येत आहे. ते ही विनाशुल्क!
काय मग? आवडली ना कल्पना?
त्यामुळे आपल्या या धाग्यावर जास्त योगदान देता येणार नाही.
कृपया सहकार्य करावे ही विनंती.

Pages