शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंगभंगिमा.

आज वाचलेला (माझ्यासाठी) नवा शब्द. अर्थ तर स्पष्टच आहे.

भाव-भंगिमा आधी वाचला होता, हा नाही.

अर्थ काय स्पष्ट आहे? मला तर अजिबात नाही कळला. Happy
असे क्लिष्ट शब्द असणारी कोणती पुस्तकं तुम्ही वाचता अनिंद्य?

अंगभंगिमा>>>>>>कालिदासाच्या कोणत्यातरी संस्कृत नाटकात/ काव्यात हा शब्द वाचल्यासारखा आठवतोय. पण नक्की कशात ते नाही आठवत.

Hi.

हा शब्द मराठी अभिनेत्री संध्या यांच्याबद्दलच्या एका मराठी लेखात वाचला. त्यात त्यांच्या नृत्य-अभिनय आणि screen presence बद्दल लिहितांना वापरला होता. लेखकाचे नाव लक्षात राहिले नाही.

मला समजलेला अर्थ =

नाटक/ नृत्य वगैरे करतांना शरीराची हालचाल-अंगांचे संचालन करुन दाखवलेले भाव, अदाकारी.

संध्या यांचा शारीर अभिनय बघता शब्दचयन योग्य वाटले. त्याकाळी बहुतेक नटांचा “अभिनय” असाच असायचा. A bit loud, overtly expressive.

@ कालीदास; संस्कृत नाटकात/ काव्यात …

असावा, संस्कृतोत्भव वाटतोय. 👍

चपखल आहे तो शब्द. हिंदी शब्दकोशांत मिळाला.

भंगिमा bhaṅgimā (p. 3596)
भंगिमा bhaṅgimā [सं॰ भंड़्गिमन्] कुटिलता । वक्रता । भगि [को॰]
भंगिमा (p. 541) bhaṅgimā भंगिमा bhaṅgimā bhāṇgimā: (nf) pose, posture; curvature; obliquity; slant.
अंगभंगिमा (fascinating or inviting) physical gesture or posture...

शरीरात हाडं आहेत की नाहीत असं वाटावं इतकं संध्या यांचं शरीर लवचिक वाटे व विशेषतः नृत्यात तशा हालचाली करीत.

Pages