Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंगभंगिमा.
अंगभंगिमा.
आज वाचलेला (माझ्यासाठी) नवा शब्द. अर्थ तर स्पष्टच आहे.
भाव-भंगिमा आधी वाचला होता, हा नाही.
वेगळाच आहे. हिंदीतून आलेला
वेगळाच आहे. हिंदीतून आलेला दिसतोय
अर्थ काय स्पष्ट आहे? मला तर
अर्थ काय स्पष्ट आहे? मला तर अजिबात नाही कळला.
असे क्लिष्ट शब्द असणारी कोणती पुस्तकं तुम्ही वाचता अनिंद्य?
अंगभंगिमा>>>>>>कालिदासाच्या
अंगभंगिमा>>>>>>कालिदासाच्या कोणत्यातरी संस्कृत नाटकात/ काव्यात हा शब्द वाचल्यासारखा आठवतोय. पण नक्की कशात ते नाही आठवत.
अभिनेत्री संध्या यांच्यावर
अभिनेत्री संध्या यांच्यावर लेख होता, त्यात वाचला हा शब्द.
हा शब्द पहिल्यांदाच पाहतेय.
हा शब्द पहिल्यांदाच पाहतेय. अर्थ काय याचा?
नृत्यातील त्रिभंग मुद्रा माहित आहे.
Hi.
Hi.
हा शब्द मराठी अभिनेत्री संध्या यांच्याबद्दलच्या एका मराठी लेखात वाचला. त्यात त्यांच्या नृत्य-अभिनय आणि screen presence बद्दल लिहितांना वापरला होता. लेखकाचे नाव लक्षात राहिले नाही.
मला समजलेला अर्थ =
नाटक/ नृत्य वगैरे करतांना शरीराची हालचाल-अंगांचे संचालन करुन दाखवलेले भाव, अदाकारी.
संध्या यांचा शारीर अभिनय बघता शब्दचयन योग्य वाटले. त्याकाळी बहुतेक नटांचा “अभिनय” असाच असायचा. A bit loud, overtly expressive.
@ कालीदास; संस्कृत नाटकात/ काव्यात …
असावा, संस्कृतोत्भव वाटतोय. 👍
चपखल आहे तो शब्द. हिंदी
चपखल आहे तो शब्द. हिंदी शब्दकोशांत मिळाला.
भंगिमा bhaṅgimā (p. 3596)
भंगिमा bhaṅgimā [सं॰ भंड़्गिमन्] कुटिलता । वक्रता । भगि [को॰]
भंगिमा (p. 541) bhaṅgimā भंगिमा bhaṅgimā bhāṇgimā: (nf) pose, posture; curvature; obliquity; slant.
अंगभंगिमा (fascinating or inviting) physical gesture or posture...
शरीरात हाडं आहेत की नाहीत असं वाटावं इतकं संध्या यांचं शरीर लवचिक वाटे व विशेषतः नृत्यात तशा हालचाली करीत.
भरत, थँक्यू.
भरत, थँक्यू.
बिनी
बिनी
‘बिनीचे शिलेदार’ या अर्थी हा शब्द परिचित असतो.
तो फारसीतून आला असून त्याचा मूळ अर्थ नाक किंवा पगडीचा पुढचा भाग असा आहे.
>>>>>> सैन्याची आघाडी.
छान शब्द आहे.
छान शब्द आहे.
शाळेत माझ्याबरोबर बिनीवाले नावाचा सरदार घाराण्यातला मुलगा सहाध्यायी होता.
बिनी ह्या शब्दाबरोबरच बिंदी हा शब्दही कोशात दिलेला आहे. दोघांचे काही नाते असणार.
फारसी मराठी कोशात अशी एन्ट्री आहे.
बिनी बिंदी (स्त्री .) (फारसी बीना =नाक) , म्होरप, सैन्याची आघाडी.
मोहरपी = अग्रेसर, पुढारी. from शब्द रत्नाकर.
हो, सैन्यात “बिनीचे“ लढवय्ये
हो, सैन्यात “बिनीचे“ लढवय्ये / शिलेदार/ सरदार असे वाचलेय.
सैन्याव्यतिरिक्त “बिनी” अन्यत्र वापरल्याचे कुणी वाचले आहे का?
बिनीचे कलाकार हे पण ऐकले आहे
बिनीचे कलाकार
हे पण ऐकले आहे
रॉजर बिनी
रॉजर बिनी
बिनी <> बिंदी कनेक्शन
बिनी <> बिंदी कनेक्शन इन्टरेस्टिंग आहे.
>>> रॉजर बिनी

भाषभ्यासक अविनाश बिनीवाले
भाषभ्यासक अविनाश बिनीवाले
रॉजर बिनी >>
रॉजर बिनी >>
छान चर्चा. बीना म्हणजे नाक हे माहीत नव्हतं. लक्ष्मणाने शूर्पणखेला "बीना के बिना" छोड दिया.
ॲडमिन ह्यांना कसा संपर्क करता
ॲडमिन ह्यांना कसा संपर्क करता येईल? एखाद्या उर्दू कडून मराठीत आलेल्या शब्दाची व्युत्पत्ती ह्यांच्या शिवाय अजून कोण सांगू शकेल?
थोडे अवांतर लिहितो आहे.
थोडे अवांतर लिहितो आहे.
भाषा कशा निर्माण झाल्या असाव्यात?
मी आंतर जालावर ह्यावाद्दल वाचले आणि वाटले की ही माहिती सगळ्यांच्या बरोबर शेअर अरावी,
भाषेच्या उत्पत्ती संबंधी पाच सिद्धांत भाषा शास्त्रींनी मांडले आहेत.
१. भौ हौ सिद्धांत Bow-Wow म्हणजे गुहेत रहाणारे आपले पूर्वज प्राण्यांचे आवाज ऐकून त्याची नक्कल करू लागले. मागे एकदा मी onomatopoeic म्हणजे आवाजाशी साधर्म्य असणारे शब्द ह्याबद्दल लिहिले होते, ही थिअरी मागे पडली कारण कुत्र्यांच्या भुंकण्याला निरनिराळ्या भाषेत निरनिराळे शब्द आहेत.
२. ding dong सिद्धांत म्हणजे केवळ प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे आवाज नव्हे तर इतरही आवाजांची नक्कल मानव करू लागला. उदाहरणार्थ समजा पराक ऐतिहासिक माणसाला जर गुसर्याला सांगायचे असेल की जवळच स्वच्छ पाणी आहे तर कदाचित नदीच्या पाण्याच्या आवाजाची नक्कल करत असेल.
३ पू पू सिद्धांत pooh pooh theory म्हणजे माणसाच्या तोंडातून निघालेले उत्स्फूर्त शब्द wow, ओह, हो, नो, आउच इत्यादि.
ह्या शिवाय ४ yo-he-ho theory म्हणजे माणूस जेव्हा अत्यंत कष्टाची कामे करतो तेव्हा उच्चारलेले शब्द आणि 5.ला ला सिद्धांत. म्हणजे जेव्हा माणूस आनंदी असेल तेव्हा किंवा प्यार मोहब्बत, वा गाणे गायच्या मूड मध्ये असेल तेव्हा बाहेर पडलेले शब्द,
आता ह्या सरळ साध्या सुरवातीपासून आजची प्रगत भाषा हा प्रवास खचितच आश्चर्यकारक आहे.
इंटरेस्टिंग पोस्ट केकू.
इंटरेस्टिंग पोस्ट केकू.

guttural sounds म्हणजे उष्ण आणि रखरखाटी प्रदेशात हवा कोरडी असल्याने घशातून (घसा खरडून?) त्या प्रकारचे शब्द आणि भाषा विकसित होते असे हल्ली टिव्हीवर* कुठेतरी पाहिले - हे माझे दोन पैसे.
'गेम ऑफ थ्रोन्स' मधे 'डॉथ्राकी' ह्या वाळवंटी भागातील आदिवासी लोकांची भाषा "गटरल" असते.
https://www.thoughtco.com
https://www.thoughtco.com/where-does-language-come-from-1691015
ह्या इथे पूर्ण लेख आहे.
चांगली माहिती.
चांगली माहिती.
Submitted by लंपन on 11
Submitted by लंपन on 11 October, 2025 - 08:59
सुपरलोल आहे हे लंपन ! 😄
>>>>>> 11 October, 2025 - 08
>>>>>> 11 October, 2025 - 08:59
हे अमेरिकेत वेगळं दिसतं. हा टाईमस्टँप. त्यामुळे शोधता येत नाही. अनलेस तुम्ही कन्वर्ट टु युअर टाइमझोन कराल.
धनश्री-
धनश्री-
माझा लोल महागुरूंच्या पोस्ट साठी होता
कळले मला ते अनिंद्य पण त्या
कळले मला ते अनिंद्य पण त्या निंदनिय सवयीकरता कॉल आऊट केले
Pages