Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तीर्थरूप आईस >>>
तीर्थरूप आईस >>>
तर काय लोकहो,
तर काय लोकहो,
आईस्क्रीमला आईस्क्रीमच म्हणूयात आणि एखाद्या साहेबाने देखील
‘वरणफळे, बिसिबेले भात आणि कटाची आमटी’
या नावांचे भाषांतर करण्याच्या फंदात पडू नये. नाहीतर कटाच्या आमटीला गुगलमध्ये टाकले असता ‘कॉन्स्पिरसी करी’ बाहेर पडायची !
कटाची आमटी>>>>> कॉन्स्पिरसी
कटाची आमटी>>>>> कॉन्स्पिरसी करी
आईस्क्रीमचे एवढे मोठे नाव वाचून I Screamed.
>>>>>कॉन्स्पिरसी करी
>>>>>कॉन्स्पिरसी करी
माबोवरचा जोक ऑफ द इयर पुरस्कार हपा व कुमार यांना विभागुन देत आहोत.
तीर्थरुप आईस व कॉन्स्पिरसी करी
धन्यवाद हो !
धन्यवाद हो !

अधूनमधून हास्याचे फवारे उडवत राहिले म्हणजे आपली आनंदजनके कशी छानपैकी प्रसवतात.
कटाची आमटी>>>>> कॉन्स्पिरसी
कटाची आमटी>>>>> कॉन्स्पिरसी करी
आईस्क्रीमचे एवढे मोठे नाव वाचून I Screamed >>>>
तीर्थरूप आईस आणि कॉन्स्पिरसी
तीर्थरूप आईस आणि कॉन्स्पिरसी करी
आईस्क्रीम आणि रेल्वे सिग्नलला ते लांबलचक शब्द मला फारच ओढुन ताणुन केलेली टिंगल वाटते.
आईसक्रीमसाठी आणि मिल्कशेकसाठी संस्कृतमध्ये अनुक्रमे पयोहिम आणि पयोमिश्रण असे शब्द घेतलेले दिसतात.
हे कोणी घेतले/मान्य केले कोण जाणे.
>>>आईस्क्रीमला आईस्क्रीमच म्हणूयात आणि एखाद्या साहेबाने देखील
‘वरणफळे, बिसिबेले भात आणि कटाची आमटी’
या नावांचे भाषांतर करण्याच्या फंदात पडू नये. >> अगदीच.
इंग्रजीत बरेच शब्द इतर भाषेतून जसेच्या तसे स्वीकारले तसेच करायला हवे.
कॉन्स्पिरसी करी >>>
कॉन्स्पिरसी करी >>>
इंग्रजीत बरेच शब्द इतर
इंग्रजीत बरेच शब्द इतर भाषेतून जसेच्या तसे स्वीकारले तसेच करायला हवे
+ १
अर्धवटपणा पेक्षा हे बरे
>>> कॉन्स्पिरसी करी
>>> कॉन्स्पिरसी करी

सर्वहारा
सर्वहारा
= सर्व काही गमावलेला.
हा हिंदीतला शब्द अलीकडे मराठी वाचनात आला :
“मनुष्य आत्मघात करून घ्यायला का आणि केव्हा उद्युक्त होतो ? त्याला सर्वहारा झाल्याची बोचणी लागते त्यावेळी”.
रिघणे
रिघणे
= दाटीमध्ये किंवा अडचणीच्या जागेमध्ये बळाने प्रवेश करणे ; शिरणे.
. . . पण मला आत रिघावे असे काही वाटले नाही..
https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A...
संत साहित्यात ऐकल्यासारखा
संत साहित्यात ऐकल्यासारखा वाटतो आहे हा शब्द. बहुदा ज्ञानेश्वरीत.
सापडला -
सापडला -
आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
दि बा मोकाशींची "आता आमोद सुनांसि आले" ही कथा ऐकली तेव्हा ह्या ओवीबद्दल शोध घेतला होता. त्यात रिघाले हा शब्द वाचला होता. ह्या ओवीच्या अर्थाबद्दल खूप छान माहिती आनंद मोरे यांनी ऐसी अक्षरेवर लिहिली आहे.
होय ! त्या ओवीबद्दल काही
* आमोद सुनांसि >>
होय ! त्या ओवीबद्दल काही जणांचे लेख पूर्वी वाचले आहेत. अगदी अलीकडे साधना साप्ताहिकात पण एक आला होता.
मी रिघावे हा शब्द विजय तेंडुलकर यांच्या लेखनात वाचला.
खूपच सुंदर धागा. या धाग्यावर
खूपच सुंदर धागा. या धाग्यावर चालत असेल तर..
जावईशोध हा शब्द कसा काय प्रचारात आला असेल ?
* जावईशोध
* जावईशोध
= मूळचे बरोबर असता त्यात ज्ञानाच्या घमेंडीने चुकीचा घातलेला शोध.
>>> त्या काळच्या 'जावई प्रवृत्तीला' उद्देशून आला असावा असे वाटते.
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
जावई जे काही म्हणेल तेच खरे या अर्थाने हा वाकप्रचार आला असेल का ?
मला वाटले, एखाद्या नडलेल्या
मला वाटले, एखाद्या नडलेल्या वधूपित्याने , मुलीच्या वराचा घेतलेला शोध तो जावईशोध!
Communist literature/
Communist literature/ propaganda material मधे “सर्वहारा समाज” “सर्वहारा वर्ग” पुन:पुन्हा येतो.
समस्त जावई वर्गाला आगाऊ ठरवणारा “शोध” ?
निषेध असो 😀
* “सर्वहारा वर्ग” पुन:पुन्हा
* “सर्वहारा वर्ग” पुन:पुन्हा येतो.
>>> अच्छा ! समजले.
Proletariat या लॅटिन शब्दावरून तो आलेला दिसतो आहे
Pages