चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" तेव्हाच्या - म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गाला ती होती का?" - जाण असणं हे जाणीव असणं ह्या अर्थानं नाही तर आपल्या आजूबाजूला समाजात काही दुर्बल घटक आहेत हे किमान अ‍ॅक्नोलेज करण्याइतपत जाण असणं ह्या अर्थानं लिहिलं होतं. त्यामुळे गरिब, निम्न मध्यमवर्गीय समाज प्रेक्षकांना अ‍ॅक्सेप्टेबल / रिलेटेबल होता.

धनि, हिंदी सिनेमात समाजवादी नायक स्वातंत्र्याच्या आसपास च होता. १९५१ चा आवारा किंवा १९५३ चा दो बिघा जमीन ही काही पटकन आठवणारी उदाहरणं. गंमत म्हणजे १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच १९५१ मधल्या आवारातला नायक समाजातल्या विषमतेविषयी भाष्य करत होता. १९५५ मधे आलेल्या श्री ४२० मधे तर हे अधिक प्रॉमिनंट आहे. म्हणजे लोकांचा भ्रमनिरास किती लवकर झाला?

त्याच बरोबरीनं असंही म्हणता येईल की इप्टा शी संबंधित मंडळी जशीजशी मेनस्ट्रीम हिंदी सिनेमापासून लांब गेली तसा तसा हा प्रभाव ओसरत गेला >> +१
दिग्दर्शकांपेक्षाही कथा-पटकथा लेखकांनुसार हिंदी सिनेमा घडत गेला. सुरुवातीचा आदर्श समाजवाद/साम्यवाद इप्टाच्या ख्वाजा अहमद अब्बासची देणगी आहे. नीचा नगर (मॅक्सिम गॉर्कीच्या लोअर डेप्थ्सचे रुपांतर), जागते रहो, आवारा वगैरे त्याच्या कथा. म्हणून मेरा नाम जोकरचे अपयश बॉलिवूडचा टर्निंग पॉईंट आहे. ख्वाजा अहमद अब्बासच्या थीम्सना तेव्हाच्या मेनस्ट्रीम प्रेक्षकाने साफ नाकारले. कट्टर समाजवादी/साम्यवादी धाटणीच्या लेखकांचा तो पहिला सेटबॅक.
यश चोप्रा लेखकाचा दिग्दर्शक आहे. सोबत सलीम-जावेद असतील तर दीवार/त्रिशूल मिळेल, आदित्य चोप्रा असेल तर वीर-झारा.
सूरज बडजात्या-आदित्य चोप्रा हे खर्‍या अर्थाने पहिले नॉन-समाजवादी लेखक. करण जोहरही थोडा नंतरचा. त्यांना समविचारी दिग्दर्शक मिळालेच नाहीत (उदा. अब्बासना राज कपूर होता) मग तेच दिग्दर्शक बनले.

मी बी आर चोप्रा म्हणालो कारण नया दौर त्यांनी बनवला.

आदित्य चोप्रा बरोबर वाटतो कारण तो पूर्णपणे ९० च्या उदारीकरणाच्या नंतर पिक्चर बनवायला लागलेला आहे. तो पर्यंत यश काकांचे पिक्चर हनी इराणी वगैरे लिहित होत्या. त्याचे सगळ्यात मोठे योगदान दिल तो पागल है म्हणता येईल. जेव्हा पेप्सी वगैरेंचे कॅन भारतात just आले होते तेव्हा त्याने शाहरुखच्या रिहर्सल स्पेस मध्ये पेप्सीचा व्हेंडिंग मशीन दाखवला.

बडजात्या पूर्णपणे समाजवादापासून फारकत घेतलेला नाही वाटत. त्याने राजश्रीचे तसे जुनेच पिक्चर नव्या धाटणीने तयार केले. प्रेम ने लावलेली factory हे उदारीकरणानंतर आलेले ऐश्वर्य असले तरी त्यांचे संस्कार हे मारवाडीच राहिले. अगदी विवाह पर्यंत तो तसाच राहिला.

बडजात्या पूर्णपणे समाजवादापासून फारकत घेतलेला नाही वाटत.
>>> नाही. बडजात्या मला समाजवादी नाही वाटत. फार फार तर सुबत्तेसोबत भारतिय संस्कृतीला घट्ट पकडून असणाऱ्या बनिया समाजाचं रिप्रेझेंटेशन आहे. तिथे अंगमेहनत करणारे फारसे लोक नाहीत. पण ज्ञानी माणसाला किंमत आहे. म्हणून जे बिझनेसमधे नाहीत पण सुस्थित आहेत असे प्रोफेसर, डॉक्टर वगैरे आहेत. आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी माणसांना त्यांच्या गुणांनुसार ऍप्रिशिएट करण्याची समज आहे म्हणून सुना मध्यमवर्गातून येऊ शकतात, (मुलगी मवत नाही जात. पण वेळ पडली तर कुटुंबियांच्या आधारे मॅनेज करते) नोकरांशी नीट वागलं जातं आणि जुने भावबंध असतील तर चक्क दुसऱ्या धर्माची माणसंही एक्सेटेंडेड कुटुंबिय ठरू शकतात.

त्यातही फक्त पैशाचा विचार करणारी बिंदूसारखी शॅलो किंवा परीस्थितीनुसार प्रॅक्टीकल वागू पाहणारी सीमा विश्वास आहे. पण त्यांना फायनली पश्चात्ताप करवून रिडम्प्शन दिले आहे.

एका अर्थाने ही जागतिकीकरणापूर्वीच्या श्रीमंतीतील मुल्यव्यवस्था आहे. जागतिकीकरणानंतर ती तशीच राहिली असेल का यात शंका आहे.

छान चर्चा. वेगळा बाफ सुरू केला तर त्यावर लगेच सापडेल.
चिकवावर अनेक चांगल्या चर्चा होतात, पण नंतर त्या शोधायला कठीण जातात.

<गंमत म्हणजे १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच १९५१ मधल्या आवारातला नायक समाजातल्या विषमतेविषयी भाष्य करत होता. १९५५ मधे आलेल्या श्री ४२० मधे तर हे अधिक प्रॉमिनंट आहे. म्हणजे लोकांचा भ्रमनिरास किती लवकर झाला?> भ्रम निरास म्हणण्यापेक्षा तेव्हा जाणीव झाली.
भ्रमनिरास सत्तरच्या दशकात दिसू लागला. गुलजारचे मेरे अपने आणि आंधी. सलीम जावेदचे नायक - आता जावेद अख्तर म्हणतात आम्ही काही आजूबाजूची परिस्थिती पाहून तसे नायक रंगवले नाहीत. किंवा त्यामागे वर्गसंघर्ष दाखवायचा विचार नव्हता. ( सलीम जावेदवरच्या ओटीटी सिरीजमध्ये)

हम आप के हैं कौन , दिलवाले दुल्हनिया इ, मध्ये मध्यमवर्गीयाला आवड णारं चित्र दिसायला लागलं . तेव्हा मध्यमवर्गाचं प्रमाण आणि स्तर दोन्ही वाढू लागले होते.
---
मैंने प्यार किया फालतू होता असं मायबोलीवर कुठेतरी वाचलं. तीव्र असहमती. हा चित्रपट ट्रेंडसेटर होता. सलमान खान, प्रेम, रीमा लागूची छान दिसणारी आई, लक्ष्मीकांत बेर्डे, अशा अनेक गोष्टी या चित्रपटांतून आल्या. श्रीमंत घरातल्या मुलाने गरीबाघरच्या मुलीच्या वडिलांना राजी करण्यासाठी मेहनतीचं काम निवडणं हेही वेगळं होतं. हे कदाचित आधी आलं असावं. पण फार उदाहरणं आठवत नाहीत. कदाचित मराठीत असेल. स्वतःला सिद्ध करून दाखव. रवींद्र महाजनीचा एक सिनेमा होता असा.

मला पण भरत यांना सहमती दर्शवायला आवडेल.
एकाच राजकपूरच्या चित्रपटांवरून निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. त्यातून आपल्यापैकी कुणीच त्या काळात नसावे. म्हणून आपल्याला तेव्हढेचे सिनेमे माहीत आहेत जे आपल्याआधीच्यांनी आपल्याला सांगितले.

नया दौर राहिला यात.
चित्रपट हा धंदा म्हणूनच बघितला गेला आहे. साहजिकच आहे ज्यांच्या जिवावर तो चालणार त्यांना आपला वाटेल असा सिनेमा बनवणार. राज क पूरच्या सिनेमात फरक दिसणे स्वाभाविक आहे. कारण एकसारखे सिनेमे बनवून त्याला आपल्याकडे एव्हढीच प्रतिभा आहे असे दाखवून चालले नसते. मोटा मोटा बघितले तर त्या काळात बहुसंख्य लोकांची असलेली आर्थिक स्थिती बघता त्याच वर्गातून येणारा नायक असणार.
क्रोनोलॉजी बघायला वेळ नाही. पण मदर इंडीयाचा उल्लेख गरजेचा आहे.

हम आपके है कौन वगैरेच्या वेळी व्हिडीओ पायरसी मुळे लोकांना छोट्या स्क्रीन ऐवजी मोठ्या पडद्यावर खेचून आणतील अशी रंगीबेरंगी गाणी, भव्यता हा फॉर्म्युला आला होता. त्यामुळं सिनेमात सगळ्या गोष्टी मोठ्या स्केलवर दाखवायची स्पर्धा सुरू झाली.

तोपर्यंत गरीबीतून आलेला नायक सुद्धा नंतर श्रीमंत दाखवत होतेच की. लोकांना ते आपणच श्रीमंत झाल्यासारखे वाटत असेल.
नंतर पूर्वी ज्याला श्रीमंत म्हणत त्या स्टेजला मध्यमवर्ग आला, तर श्रीमंत हे अजून श्रीमंत झाले. मल्टीप्लेक्स मधे याच वर्गाला लक्ष्य करून सिनेमे बनवले जातात. कारण तीनशे , चारशे रूपयाचं तिकीट काढून हाच वर्ग येईल असा हिशेब आहे. एका आठवड्यात कमाई करायची तर मल्टीप्लेक्सच्या सगळ्या स्क्रीनवर रिलीज झाला पाहीजे, तिथे पहिल्या आठवड्यातले चढे रेट परवडणारा प्रेक्षक येणार तर त्याला आवडेल असेच चित्रपटातले वातावरण असणार.

बहुतेक जसा देश बदलत गेला, श्रीमंती वाढत गेली तसे हिंदी पिक्चर बदलले.
>>
देश बदलला पेक्षा निर्माते दिग्दर्शकांची पुढची पिढी व्यवसायात आली. या पिढी नी बऱ्यापैकी उच्चवर्गीयच दुनिया पाहिली असल्याने त्यांच्या सिनेमातूनही हेच चित्र यायला लागलं
परदेशात स्थायिक झालेल्या NRI लोकांना हे सिनेमे अपील होताहेत आणि डॉलर मधे धंदा करताहेत हे बघितल्यावर त्याचीच लाट आली...

रानभूली>> मी वरतीच बी आर चोप्रांच्या नया दौरचा उल्लेख केला आहे.

अँकी नं.१ >> बरोबर आहे. आदित्य चोप्राने कधीच एक कला म्हणून किंवा आवड म्हणून चित्रपट बनवले नाहीत. त्याने नेहमी बिझनेस च्या दृष्टिकोनातून पाहिले त्यामुळे तो जिथे धंदा वाढला तसले पिक्चर काढायला लागला.

भारत >> तुम्हाला आराम हराम आहे आठवतोय बहुतेक. त्याच्या मुलाचा पण तसाच पिक्चर आलेला आहे.

मैंने प्यार किया फालतू होता असं मायबोलीवर कुठेतरी वाचलं. तीव्र असहमती. हा चित्रपट ट्रेंडसेटर होता. >>> भरत हे खाली पेस्ट केलेले लिहीले होते मी सैय्यारा च्या धाग्यावर. तो ट्रेन्डसेटरही होता आणि भिकारही, असे म्हणतोय मी Happy

"आजच्या पिढीची म्युझिकल लव्ह स्टोरी" म्हणता येईल असा पिक्चर बर्‍याच वर्षांत आलेला नाही. कयामत से कयामत तक, मैने प्यार किया, डीडीएलजे, थोडाफार दिल तो पागल है, कहो ना प्यार है - हे लक्षात आहेत. त्या त्या वेळेस शाळेतून नुकतीच कॉलेज मधे गेलेली पिढी ते पिक्चर उचलून धरते. (यातले कयामत से कयामत तक व डीडीएलजे वेगळ्या लीग मधे आहेत - इतर त्या लेव्हलचे नाहीत. मैप्याकि तर भिकार आहे. पण हे सर्व गाजले आहेत हे नक्की).

चलती का नाम गाडी (रंगीत) थोडा वेळ पाहिला. अनुप कुमार गाडी नीट करायला मधुबालाच्या घरी जातो आणि तिच्या मैत्रीणीला पाहून घाबरून पळत सुटतो तिथपर्यंत.

केसाळ छातीचा उघडा उभा सलमान खान आणि त्याच्या पायाशी बसलेली पटवर्धन हे पोस्टर असलेला चित्रपट : मैंने प्यार किया.
पोरी फिदा होणार नाहीत तर काय?
अप्रतिम अवीट गाणी. बापरे, विजय पाटील हे पोचलेले संगीतकार होते. अचूक नस पकडत असत भारतीय लोकांची. शक्यतो देव कोहलींचे लिरिक्स असावे. अत्यंत दुर्लक्षित राहिलेला अफाट संगीतकार. मला खूप आवडतात रामलक्ष्मण.

आते जाते हसते गाते हे माझे ऑटोफे आहे. इख्तियार, ऐतबार आणि त्याला स्वीकार हे यमक जुळवणाऱ्या आणि ते अजिबात ऑड ना वाटू देणाऱ्या देव कोहलींना सलामच आहे फक्त.

दिल दिवाना हे गाणे ऐकताच दिल एकदम ९०s मधेच जातो.

या रामलक्ष्मण यांची स्टोरी त्यांना इंडस्ट्रीने आवर्जून ठरवून मारून टाकायचं ठरवलं होतं की काय? राजश्रीनेच त्यांच्यावर विश्वास दाखवला.

मैने प्यार किया मधे तो एकदम भाग्यश्री आणि आलोकनाथ यांच्या समोरच लाकडे फोडतो. एकदम प्रामाणिक लाकूडतोड्या का व्हावं लागलं? दुसरी कसलीही नोकरी मिळत नाही म्हणजे अशिक्षित आहे, गरीब असण्यापेक्षा ते जास्त भिववतं. वर हे बघून - मोळी विका पण शाळा शिका- आठवते. Happy अशिक्षित तरूण वडिलोपार्जित संपत्ती तरी कसा सांभाळू शकणारे. त्यामुळे अधुनमधून बरजात्या त्यांच्या गाण्यात ए बी सी डी, कबुतरांसोबत चिठ्ठ्या वगैरे घालतात. त्यात अतिमारवाडी कल्चरचा मारा करतात. 'चकली, चिवडा ले के चले' म्हणतात, जा ना मग. आम्हाला सांगायची काय गरज आहे, आम्ही आमचं जेवून बसलोय. Lol

आलोकनाथ सुद्धा अपमान व अहंकारापायी रूसून बसलेला आहे, सलमानला कष्टाची सवय नाही म्हणून नाही. हे तर गळ्यात पडलेय असे वाटले. शिवाय सलमान त्यात वेडसर वाटतो - दिल दिवाना गाण्यात त्याच्या हालचाली बघून त्याच्यासोबत बोटीत बसणाऱ्या भाग्यश्रीची काळजी वाटते. जमीनीवर पळून तरी जाता येते बोटीतून कुठे पळून जाणार!

दुसरी कसलीही नोकरी मिळत नाही म्हणजे अशिक्षित आहे, गरीब असण्यापेक्षा ते जास्त भिववतं. >>> Lol टोटली खरे आहे.

मला त्यातले एकही गाणे आवडत नाही. पूर्वीही कधी आवडली नाहीत.

भाग्यश्री स्वतः लग्नानंतर धार्मिक कार्यक्रमात घालतात तसे कपडे घालून आलेली असते ना उटीच्या त्या लेकवर पिकनिकला? दोघांत जास्त सर्किट कोण आहे प्रश्न पडेल. त्या गाण्यातील खांब कुत्र्याला भिणार नाही इतका सलमानला भितो हा माझाच जुना जोक परत मारतो. त्यावेळचा सलमानचा डान्स आणि जगातील सर्वात ऑल टाइम अजरामर डान्स यात फार फरक नाही.

सलमानची ही तर्‍हा तर तिकडे भाग्यश्री गाण्याच्या मधेच एका लहान मुलाला कडेवर सुद्धा घेउन मोकळी झाली. फ्लर्टिंग गाण्यात फार फार तर तिसर्‍या कडव्याला शहनाईचे म्युझिक वापरायचे असते व फूल खिलेंगे वगैरे इमेजरी आणायची असते. आधी फ्लर्टिंग, रोमान्स तरी करा. ही आशा काळेसारखी पहिल्याच कडव्यात संसार मांडायला निघाली.

अस्मिता>> तो खूप चांगली गाडी चालवत असतो त्यामुळे ड्रायव्हर ची नोकरी करतो.

विलायत वरून शिकून जरी आला असला तरी त्याला त्या खाणीच्या गावात कोण management consultant ची नोकरी देणार असते? आणि त्याला तर तिच्यापासून दूर जायचे नसते. लाकडे फोडणे हे फक्त संस्कारी ला गुळ लावण्याकरता अगं Lol तुला पिक्चर कळलाच नाहीये - परत जाऊन नीट बघ बरं Wink

रॉय +१
रामलक्ष्मण मस्त गाणी केलीत सगळी. अगदी चपखल आहेत प्रसंगांना. कबुतर जा जा तर काय हिट झालेले.
आता फनी वाटते पण कदाचित त्यावेळेसच्या बडजात्या समोर असलेल्या मुलींच्या मांग मे सिंदूर वगैरेच कल्पना असतील. मैं लाडकी हू गाण्यानंतर तो आयोडेक्स लावतो तिच्या पायाला तर डोळे मिटून घेतो. आता फारच बाळबोध वाटते ते Lol

फा Lol

घाणेरडी पिवळी साडी दिली आहे तिला. बरजात्यानी चॉकलेट लाईम ज्यूस मधेही सगळे पिवळं केले आहे. पिवळा बाथ टब आहे त्यात, कधीही स्वच्छ वाटत नाही. नवश्रीमंत वाटतात हे श्रीमंत, त्यांना पिढीजात श्रीमंतांचा क्लास नाही. माधुरी दीक्षितचा कपडे पट अतिशय वाईट आहे हमापके मधे. भंगार एकदम. हिरवे टॉप, पांढरा लेहंगा, पिवळा टब - परमेश्वरा !

रॉयची कमेंट सार्कास्टिक वाटली होती मला. Happy

धनि. Lol गूळ.
मी नाही बघणार. मला समाजवाद बोअर होतो. मला रामलक्ष्मण आवडत नाहीत. मला बरजात्याचे पॅकेजच तुपकट वाटते. विवाहची पिसे काढलीत आता आणखी कशाला बघू Proud

मागे येथे दिग्दर्शकांच्या हिरवणींची वर्गवारी लिहीली होती. इच्छुकांसाठी.
https://www.maayboli.com/node/50316?page=11
कॅलिफोर्निया ग्रूप मधे आहे.

इथे खूप कौतुक केलेला जारण हा चित्रपट झी ५ आल्याने पाहिला. (घरच्या होम थेटरात, पडद्यावर, उत्तम साउंड सहित (हे सांगण्याचे कारण कळेलच))

पहिला हाफ ते पाऊण चित्रपट एवढा जबरदस्त बोअर होतो. त्याची कारणं शोधली.

१. अत्यंत भंगार दर्जाचे साउंड डिज़ाइन
२. टुकार डबिंग. का डबिंग केले आहे ते काही कळेना. आजकाल शक्यतो कोण करत नाही नंतर डबिंग.
३. अक्षरश: एकही मिनिट सामान्य दर्जाचे बॅकग्राउंड म्युझिक थांबत नाही. आणि तेही इतके स्टॉक संगीत आहे की मला वैताग आला. मधे चित्रपट पळवू का असे वाटत होते. पण धीर धरला.
४. धाकट्या सुभाष यांची थोरल्या सुभाष यांच्यासारखीच डोक्यात जाणारी acting (या दोन्ही सुभाष खूप अभिनय करतात. मला झेपत नाही एवढा अभिनय)

आता कथेबाबत (स्पॉयलर टाळायचा प्रयत्न करतो)

०. जारण करताना अघोरपूजा करताना लामणदिवे आणि समया लावल्यात. आवरा. समया त्याही मोर असलेल्या. कुठे गेले आमचे पीठाचे वगैरे दिवे. मोर असलेले लामणदिवे? आणि अहिराणी बोलणारी जखिण!! अरे जरा तरी विचार करा की राव. रेफरन्स म्हणून सहदेव भादळी किंवा तसली पुस्तकं वाचा की. मला खरच कळत नाही. कदाचित जगात इतकं भूताखेतांचे, डॉक्युमेंटेड अघोरी गोष्टींचे वैविध्य भारत सोडून क्वचितच कुठे तरी असेल. जरा बघत चला की. प्लँचेट वगैरे कशाला पाहिजे?
१. अगदी नेहमीचे ट्रोप वापरल्याने भीती आजिबात वाटली नाही. जंप स्केअर अपेक्षित असल्याने मला काही विशेष भीती वाटली नाही.
२. मानसोपचार घेत असलेल्या बाई बरोबर नऊवाऱ्या घालून कोण प्लांचेंट करायला बसतं यार. काय हास्यास्पद प्रकार आहे तो. आणि तेही नेमके उसी माळेपे. छे. मूडच गेला माझा.
३. वाडा आता सर्व मराठी/मराठी संस्कृती असलेल्या चित्रपटातून विशेषत: भयपटातून पूर्ण बाद करायला पाहिजे. तुंबाड ने जो बेंचमार्क केला आहे त्यापर्यंत जर वाडा पोचत नसेल तर प्लीज थांबवा. मला अजिबात पटेना हे वाड्याचे लॉजिक.

अमृता सुभाष अचानक भुवया ताणून चेहऱ्यावरचे भाव बदलण्याची एक्टिंग अगदी पेटंट करत असते सगळीकडे. इथे या स्क्रिप्टमुळे तिला मोकळं रान मिळालय त्यामुळे ती अभिनय करतच सुटली आहे.

शेवट खूप आवडला. तोच पेस आधीपासून ठेवला असता तर चित्रपट आवडला असता.

मला त्या एक्सटर्नल जखिण आणि तिचं हसणं किंवा तिचे अहिराणी बोलणे याचे अजिबात कौतुक वाटले नाही खरेतर. त्याने भीती अजिबात वाटली नाही.

अशा प्रकारच्या चित्रपटात खरी भीती कधी वाटते? जेव्हा बघणाऱ्याला जाणीव होते की बघणारा तो सध्या स्वतःला एक मानसिक संतुलन इंटॅक्ट असलेला सामान्य माणूस समजत आहे पण त्याची समज इतकी fragile आहे की असं समजा त्याच्या किंवा त्याच्या जवळच्या माणसाबाबत झालं तर? त्या माणसाची फाटलीच पाहिजे अशी ही जाणीव करून देणारा चित्रपट खरा सायकोभयपट.

परवा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात अम्रुता सुभाष थोडावेळ होस्ट होती...पुर्णवेळ रडक्या चेहर्‍याने हसतेय असे काहितरी अवघडलेले भाव तिच्या चेहर्‍यावर होते..अभिनय येतो पण व्हेरिएशन देता येत नाही..चेहर्‍यावर ती एकच त्रासलेले रडके भाव घेवुन आहे असच वाटत.
स्माइल ट्रेनिन्गची गरज आहे.

रॉय, धनि, फारेण्ड , एमपीके वरच्या पोस्टस आवडल्या.
रॉय जारण पोस्ट भारी.
धनी, मागे जाऊन वाचली ती पोस्ट. Happy

मुलांनो, युट्यूबवर कलर चलती का नाम गाडी मधे "मै सितारों का तराना" म्हणणारी मधुबाला बघून घ्या. कधीही उडवतील.
साम्राज्ञी दिसतेय.

मला मैप्याकिमधलं ‘आते जाते’ हे एकच गाणं आवडतं. हआहैकौ मधलंही फक्त टायटल सॉंगच आवडतं. बाकी ‘जुते दे दो पैसे ले लो’ इ. गाणी मला सिंधी लोक फिल्मी गाण्यांच्या चालीवर भजनं म्हणतात त्या कॅटेगरीतील वाटतात. अर्थात त्यातली ओरिजिनल गाणी शक्यतो चांगल्या दर्जाची असतात.

मोळी विका आणि शाळा शिका
बोटीतून कुठे पळून जाणार
आधी फ्लर्टिंग, रोमान्स तरी करा. ही आशा काळेसारखी पहिल्याच कडव्यात संसार मांडायला निघाली.
>>> Rofl

माधुरी दीक्षितचा कपडे पट अतिशय वाईट आहे हमापके मधे. भंगार एकदम. हिरवे टॉप, पांढरा लेहंगा,
>>>>
माय बिगेस्ट ग्राऊज. मोहरमच्या ताबुतासारखा ड्रेस आहे तो.

जुते दे दो एम पी के मधे नाही.
एम पी के मधे सलमनचा बिगरी ते मॅट्रीक हा प्रवास आहे. मुलांसाठी असलेली बडबडगीतं "कबूतर जा जा जा " सुमन त्याच्याकडून पाठ करून घेते. जुते दे दो मधे कॉमर्स साईडला त्याच्याकडून दीक्षित टीचर व्यापाराचे धडे गिरवून घेत असतात. त्या मन लावून शिकवत असतात. मठ्ठ विद्यार्थ्यांना कसे शिकवावे हा संदेश हम आपके है कौन मधे दिला आहे.

तो आयोडेक्स लावतो तिच्या पायाला तर डोळे मिटून घेतो. आता फारच बाळबोध वाटते ते
>>>
त्या सिनेमाला २५ वर्षं झाली अशा कुठल्यातरी निमित्ताने एक यूट्यूब व्हिडिओ मुलाखतीत सलमान खानने सुद्धा त्या सगळ्या प्रकाराला खूप ट्रोल केलं होतं.
घोट्याला आयोडेक्स लावताना डोळे कशाला मिटावे लागतात, पण शूटिंगच्या वेळेस भाग्यश्रीनेच अट घातली की मी गुडघ्यापर्यंत स्कर्ट वर केलेला दाखवणार नाही, कारण माझं आता लग्न ठरलंय; सू.ब.ने ते मान्य केलं पण डायलॉग बदलले नाहीत - असं सांगत सलमान खान हसत होता.

माझेमन, तुझे आणि माझे फॅशन कुकातकुका बरेचदा जुळतेच.
मोहरमच्या ताबुतासारखा>>> Lol चपखल आहे.
तो धागा पब्लिक करणं वेमा/ ॲडमिनना शक्य आहे. पण ग्रूपमेंबर होऊन वाचता येते.

Pages