चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉय यांचा रिव्ह्यू काहीच समजला नाही Proud तेवढी इंटलईक्च्युलीटी नाही माझ्यात.. पण सैयारा आहे जबरदस्त!
एक कट्टर शाहरुख चाहता एका लव्हस्टोरीचे कौतुक करतो यापेक्षा दुसरे प्रमाण नाही.

रॉय छान लिहिल आहे.
पण मला अजून दहा वेळा वाचावं लागेल.
बरोबर डिक्शनरी आणि अर्थशास्त्रीय कोश घेऊन वाचावं लागेल.

प्रोलॅटरीएट म्हणजे भारतातलं ‘हम मेहनतकश इस दुनिया से जब अपनी हिस्सा मागेंगे’ किंवा ‘सारी दुनिया का बोझ उठाता हूं मैं’ Lol

संपला टाईमप्लीज .
बाबूमोशाय बंदूकबाज बद्दल मायबोलीसर्च मधे काहीच सापडलं नाही.
नवाजुद्दीनचा असतो तसाच भरपूर व्हायोलन्स. पण खूप क्लिष्ट स्क्रीप्ट सहज हाताळलीय.
अ‍ॅडल्ट सीन्स नको होते असं वाटलं पण मागाहून त्याचं कॅरेक्टरच तसं आहे, वातावरण पण तसं आहे हे लक्षात आलं.
नवाजुद्दीनचं काम नेहमीच असतं तसं आहे. आउटस्टँडींग.
सिनेमा सुद्धा तस्साच. ग्लॅमर पासून दूर तरीही क्राईम थ्रिलर मुळे एंगेजिंग.
शेवट उगीच वाटला.
( झी ५ , झी क्लासिक युट्यूब चॅनल )

सैय्याराचा ओरिजिनल कोरियन मूवी हॉटस्टार, झी ५, जिओ, प्राईम, नेटफ्लिस यावर नाही.
चिकवाला काही दिवसांसाठी बाय बाय.
>>
या कारणासाठी Uhoh

बाबूमोशाय बंदूकबाज
>>
याची हिरवीण वेगळी कुणी होती, तिनी (अडल्ट सीन बद्दल) नवाज विरोधात काही कमेंट्स करून सिनेमा सोडला होता...

ओह ! म्हणजे येऊन गेलेला आहे का हा ? जुना आहे ?
हिरवीन कधी कधी आवडली, कधी कधी नाही. पण अशा गायपट्ट्यातल्या वातावरणासाठी सूटेबल आहे. ग्लॅमरस नकोच होती.
तृप्ती डिमरीला घेतलं असतं तर गावातले लोक वेगळे आणि ही स्वर्गलोकातून उतरल्यासारखी वाटली असती.

एकेका मूवीचा पण रंग असतो ना ? सांवरिया मधे निळा तसा यात मातकट, राखाडी रंग आहे.

@साधनाताई , गँग्ज ऑफ वासेपुर सारखे पिक्चर आवडत असतील तर पाहू शकाल तुम्ही हा.

> पण फौन्टनहेड रिव्ह्यु म्हणजे काय ते नाही समजलं.
फौन्टनहेड नावाची एक कादंबरी आहे, 'ayn Rand' यांची.
'कोसला' वाचायचे एक वय असते, 'दुनियादारी' वाचायचे एक वय असते तसेच 'फौन्टनहेड' वाचून भारावून जायचेही एक वय असते.

विकु
अगदी अगदी. मी ही त्या वयात वाचली होती. त्यानंतर त्या लेखिकेच्या वाट्याला जायचे नाही असे ठरवले. आपण साधी माणसे. ते तत्वज्ञान मला झेपण्या सारखे नव्हते. आपले तत्वज्ञान काय आहे ना
Meek shall inherit the earth.
पण फौन्टनहेड रिव्ह्यु म्हणजे काय ते नाही समजले नाही.
ठीक आहे. नाही समजले तर नाही समजले. क्या फरक पेंदा,

प्रोलॅटरीएट म्हणजे भारतातलं ‘हम मेहनतकश इस दुनिया से जब अपनी हिस्सा मागेंगे’ किंवा ‘सारी दुनिया का बोझ उठाता हूं मैं’ >>> एक्झॅक्टली.

वर एकजण दीवारचा अमिताभ म्हणत आहे... आता कोणी कूलीचा अमिताभ म्हणत आहे... >>> सेम. कामकरी वर्ग.

अगदी २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या पिक्चर्स मधे मेहनतवाले आणि दौलतवाले अशी सोपी विभागणी दिसते. मेहनतवाले सगळे मनाने चांगले, सज्जन तर दौलतवाले सगळे चोर. हे ढोबळपणे तेच आहे. गेल्या काही वर्षात कमी झाले. स्वतःला मेहनतवाले वर्गात समजणारे लोक दौलतवाले वर्गात येऊ लागले किंवा तशा आकांक्षा ठेवू लागले, म्हणून या थीमचा भाव उतरला. पूर्वी गावाहून शहरात आलेल्या व शहरी लोकांना शहाणपण शिकवणार्‍या गावठी हीरोला लोक "रूट" करायचे. आता तु.क. देतील.

हे खरे तर पु. ल. वाचतानाही मला जाणवले, ज्या उच्च मध्यमवर्गीयांना त्यांनी कोपरखळ्या मारल्या व आपल्याला आवडल्या त्याच वर्गात आता आपण जाऊन बसलो.

फौंटनहेड ही टर्म वाचल्याबरोबर गुगल केलं. त्याबद्दल असंख्य पेजेस दिसतात. ए आय ने मग जिस्ट पुरवले.
पुस्तक वाचण्याची शक्यता शून्य आहे.

वर एकजण दीवारचा अमिताभ म्हणत आहे... आता कोणी कूलीचा अमिताभ म्हणत आहे... >>> सेम. कामकरी वर्ग.
>>>>>>>

आणि तेच घेऊन तो त्रिशूल मध्ये आला.. ये बिल्डिंग बन रही थी तो ईस मे मेरे माँ ने ईटे उठाई थी..
आणि त्याच विटांचा काला पत्थरमध्ये कोळसा झाला.
सिक्रेट ऑफ अँग्री यंग मॅन इज अल्टिमेटली प्रोलॅटरीएट!

पुलंच्या बाबतीत तसे जाणवल्याचे लक्षात नाही पण असू शकेल. त्यांनी सर्वच वर्गांतील लोकांवर विनोद केलेले आहेत. "पंचिंग अप" कधी केलेही असेल (दिल्लीतील उच्चवर्गातील लंच बुफे मधली फ्लॉवरची "निस्तेज" भाजी ई) पण त्यांचा विनोद प्रामुख्याने तसा नाही. ज्या काळात त्यांनी पुस्तके लिहीली त्याच काळातील मध्यमवर्गावरच त्यांचे जास्त विनोद आहेत. उच्च वर्गातील निस्तेज भाजी बरोबरच पुण्यातील लग्नाच्या मेनू मधल्या अळूच्या भाजीचा वाहत जाणारा लोंढा, पातळ मठ्ठा वगैरेवरही त्यांनी लिहीले आहे.

मी फाउण्टनहेड वाचलेले नाही. (त्याच लेखिकेचे) वी द लिव्हिंग वाचले आहे. अ‍ॅटलास श्रग्ड वाचायला सुरूवातही केली होती. पन्नासएक पाने वाचल्यावर पुढे वाचले नाही. का ते लक्षात नाही. बहुधा डिस्ट्रॅक्ट होउन दुसरे एखादे पुस्तक वाचले असेल. किंवा बोअर झाले म्हणूनही सोडले असेल. ऑफिसमधले एक दोन मित्र प्रचंड तारीफ करत म्हणून प्रयत्न केला होता.

हिंदी पिक्चर्स मधे समाजवाद व कम्युनिजमचा कायम असलेला प्रभाव बहुधा चोप्रा-जोहर-बडजात्या लाटेनंतर पूर्ण ओसरला.

किट्टु यांनी ronth चे reko दिले होते jio hotstar वर. एकच नंबर आहे. फार दिवसांनी इतके काही छान बघितले. खूप धन्यवाद. Ronth वर वेगळा धागा यायला हवा. नक्की बघा लोकहो. मति गुंग झाली.

"हिंदी पिक्चर्स मधे समाजवाद व कम्युनिजमचा कायम असलेला प्रभाव बहुधा चोप्रा-जोहर-बडजात्या लाटेनंतर पूर्ण ओसरला" - खरंय.. त्याच बरोबरीनं असंही म्हणता येईल की इप्टा शी संबंधित मंडळी जशीजशी मेनस्ट्रीम हिंदी सिनेमापासून लांब गेली तसा तसा हा प्रभाव ओसरत गेला. ९०' च्या दशकानंतर ग्लोबलायझेशन च्या उदयाबरोबर सामाजिक भान असलं/नसलं तरी त्याच्या अस्तित्वाची जाण असलेला मध्यमवर्गच अस्त पावत गेला.

वी द लिव्हिंग आणि फाउंटनहेड/ऍटलस श्रग्डची जातकुळी पूर्णतः वेगळी आहे. कम्युनिझमची दुसरी बाजू सांगणारं महत्वाचं पुस्तकं म्हणजे वी द लिव्हिंग (आणि डॉ. झिवागो). प्रोलॅटरीएट शब्द बहुतेक पहिल्यांदा वी द लिव्हिंगमधे वाचला.

आता ही मिवापु पोस्ट व्हायला नको म्हणून जाताजाता डॉ. झिवागोचा रेको देते. पुस्तकाचा जर्रासा मर्डर केलाय पण बोरीस पास्तरनाकची कथा, ओमर शरीफ, डेव्हिड लीनचं दिग्दर्शन, रशियन हिवाळ्याचा फील देणारी फिनलंडमधली सिनेमॅटोग्राफी, मॉरीस जारचं संगीत आणि ऑफ कोर्स राज्यक्रांती, पहिले महायुद्ध वगैरेच्या पार्श्वभुमीवरची रशिया पहायची तर हा पिक्चर पहा.

झिवागो म्हटलं की मला somewhere my love आठवते. अगदी आपल्या त्या अशोक पत्कीनी पण ही ट्यून ढापली आहे.

झिवागो म्हटलं की मला somewhere my love आठवते. अगदी आपल्या त्या अशोक पत्कीनी पण ही ट्यून ढापली आहे
>>>
अगदी अगदी..
बऱ्याच हिंदी सिनेमात पण वापरली आहे.

तसे पाहिले तर हिंदी पिक्चर मधल्या सोशालिजम इरा ची सुरुवात सुद्धा चोप्रांच्या मोठ्या भावाने बी आर चोप्रांनीच केली होती. आणि अमिताभचे जे पिक्चर आपण चर्चितो आहोत ते दीवार, त्रिशूल हे यश चोप्रांचेच आहेत. Lol

बहुतेक जसा देश बदलत गेला, श्रीमंती वाढत गेली तसे हिंदी पिक्चर बदलले. T

वी द लिव्हिंग आणि फाउंटनहेड/ऍटलस श्रग्डची जातकुळी पूर्णतः वेगळी आहे. >> हो असू शकेल. ते समजण्याइतके ज्ञान ती वाचली तेव्हा नव्हते Happy डॉ झिवागो बघायला हवा. खूपदा रेको वाचला आहे पण अजून पाहिलेला नाही.

फेफ - इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे सहमत नाही असे नाही - समजून घेतोय. सध्याच्या मध्यमवर्गाला ती जाण नाही असे म्हंटले जाते. तेव्हाच्या - म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गाला ती होती का? कदाचित त्याचे गरिबीतून वर येणे हे नवीन होते त्यामुळे ती जाण/जाणीव ताजी असेल, पुढच्या पिढ्या उच्च मध्यमवर्गात गेल्या व त्यापासून दूर गेल्या. गावाकडून आलेला साधाभोळा, सज्जन नायक व शहरातील कपटी व मानवतेची चाड नसलेले पैसेवाले लोक - हे सुलभीकरण त्याला पटेनासे वाटू लागले - असेही असेल.

धनि - अन्यायाविरूद्ध संतापलेला नायक यश चोप्राने जरूर आणला पण मेहनतवाले-दौलतवाले हा पॅटर्न स्वातंत्र्याच्या काळापासून आहे. राज कपूरच्या पिक्चरमधेही तसेच सुलभीकरण आहे. उस देस मे तेरे परदेस मे/इस गॉंव मे दर्द की छाँव मे वगैरे. किंवा एरव्ही या प्रकाराशी देणेघेणे नसलेल्या देव आनंदला सुद्धा "उस दुनियाने बात ना पूँछी, इस दुनियाने प्यार दिया" वगैरे म्हणावे लागले.

मी जी लाट म्हणतोय ती ९५ च्या आसपासची. हम आपके है कौन, डीडीएलजे, कुकुहोहै ची. यात नायक नायिका सगळेच उच्चवर्गीयच होते.

Pages