शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुलोम आणि प्रतिलोम हे शब्द समान जातीत लग्न केले की अनुलोम विवाह आणि वेगळ्या जातीत केले की प्रतिलोम विवाह ह्या अर्थानेही वाचले आहे. त्यात पुढे निरर्थक पितृसत्ताक आणि जातीवादी निकषही आहेत.

वरच्या वर्णाच्या पुरुषाने त्याच्या खालच्या वर्णाच्या स्त्रीबरोबर लग्न केल्यास अनुलोम विवाह व वरच्या वर्णाच्या स्त्रीने खालच्या वर्णाच्या पुरुषाबरोबर लग्न केल्यास प्रतिलोम विवाह असे वाचले आहे.

>>> अनुलोम (अंगावरील केसावर सुलट हात फिरविला म्हणजे ते गुळगुळीत लागतात) = यथा- क्रम चालणारी रीति
अनुलोम विलोम (प्राणायाम) याचा अर्थ यासंदर्भाने कसा लावता येईल?

लोमहर्षण ऋषी होते ना एक?

अर्थपूर्ण व रंजक चर्चा !
विलोमचा अर्थही मोल्सवर्थनुसार अनुलोमच्या विरुद्धार्थीच आहे.

या शब्दजोडीकडे यायला कारण घडले ते म्हणजे वाचनात आलेले हे वाक्य :
. . . आपल्या मुलीशी प्रतिलोमविवाह करणाऱ्याचा खून . . . "

त्या निमित्ताने लोम म्हणजे केस ही ज्ञानात मोठी भर पडली.

म्हणजे मग अंगावरील केस उभे राहिले की आपण लोमांचित होतो>>> होय. त्यासाठी मराठी शब्दरत्नाकरात "लोमहर्षण"
असा शब्द दिला आहे. अर्थ दिला आहे "अंगावर रोमांच उठवणारे." पुलकित करणारे.
आपण "लोमहर्षित, लोमहर्षक, " इत्यादि शब्द बनवूया!

अनुलोम विलोम (प्राणायाम) याचा अर्थ यासंदर्भाने कसा लावता येईल? >>> साधारणपणे योगवर्गात सांगितला जाणारा अर्थ असतो धन (सूर्यनाडी) आणि ऋण (चंद्रनाडी) उर्जा जागृत करणारा प्राणायाम. खालच्या लिंकवर दिलेल्या अर्थानुसार अनुलोम विलोमचा अर्थ order - disorder

https://www.learnsanskrit.cc/translate?search=anuloma&dir=se

लोम = केस, अनु = दिशेने/बाजूने, वि = विरुद्ध

अनुलोम = केसांच्या (एका) बाजूने, विलोम = केसांच्या दुसर्‍या (विरुद्ध) बाजूने?

प्राणायामात जाणीवपूर्वक श्वास-प्रश्वास करायचा असतो. श्वास-प्रश्वास करताना हवेचा स्पर्श नाकपुडीत अनुभवायचा असतो. मग "एका नाकपुडीतील केसांना स्पर्श करत श्वास घेणे आणि विरुद्ध नाकपुडीतील केसांना स्पर्श करत श्वास सोडणे " असा अर्थ होइल का?

तुम्ही पहिला सांगितलेला अर्थ बरोबर वाटतो. अनुलोम प्राणायाम म्हणजे अगदी शब्दशः केसांच्या दिशेने नसणार (कारण दोन्ही नाकपुड्यांत केस खालच्या दिशेने वळलेले असणार असा माझा अंदाज आहे, त्यामुळे कुठलाही आत घेतलेला श्वास विलोम होईल). तिथे फक्त लाक्षणिक अर्थाने अनुलोम म्हणजे सहजसरळ मार्गाने आणि विलोम म्हणजे त्याच्या उलट असं असावं.

दोन सोप्या शब्दांचा भिन्न दिशांचा भाषाप्रवास पाहू :
आलबेल
हा इंग्लिशमधील All well पासून मराठीत आला.
दाते शब्दकोश
….
जंगल
हा संस्कृत, मराठी आणि हिंदी या तिन्हीमध्ये असलेला शब्द जसाच्या तसा इंग्लिशने स्वीकारला. त्यावरील व्युत्पत्ती कोशाची टिप्पणी रोचक आहे :

“jungle हा शब्द जरी जातिवंत इंग्लिश शब्द (good English) नसला तरी त्यातून व्यक्त होणारा अर्थ (The sort of wild) अन्य इंग्लिश शब्दातून व्यक्त होत नाही”.
https://www.etymonline.com/word/jungle

हो. Woods मधे उंच उंच झाडांची गर्द झाडी पण एकमेकांत न गुंतलेली आणि जंगल म्हणजे झाडं उंच नसतील पण डेरेदार आणि एकमेकांत गुंतलेली असे वाटते. Forest म्हणजे अरण्य, त्यात काहीही येऊ शकते.

वेउळ
एक हिंस्त्र पशु; वाघ [सं व्याल]
वेउळी- वाघीण
ज्ञानेश्वरीत आहे.

“कुबल” हे एक मराठी आडनाव म्हणून माहित होते. त्याचा काही दुसरा अर्थ असेल असे कधी मनात आले नव्हते.

एका बखरीत “ती कुबल जागा. तेथे बोलाविणे कपट” असे वाक्य होते आणि टिपेत अर्थ दिला होता

कुबल = कठिण, बळकट, मजबूत

तसेच “भिसे” आमच्या एका मित्राचे आडनाव आहे,

पण

हिंदीतल्या “कमलककडी”ला (कमळाच्या देठांना) शुद्ध मराठीत “भिसे” म्हणतात; विश्वास बसत नसेल तर शब्दकोश पहावा !

>>> कुबल = कठिण, बळकट, मजबूत
मग 'अलका' म्हणजे 'none of these' असेल का? Proud

(बुरा न मानो शुक्रवार है! Proud )

मला पुलंचं वर्गातल्या कोणीतरी 'मसाल्याची बेटं कुठली?' या प्रश्नाला 'बेडेकर आणि कुबल' हे उत्तर दिल्याबद्दल ' मास्तरांनी त्याला कुबल कुबल कुबलला' हेच आठवतं नेहमी! Lol

भिसे माहीत नव्हतं. बोली भाषेत त्याचं रूप (नपुंसकलिंगी असल्याने) भिसं असं होत असावं.

वेल्हे तालुक्यात कुंबळे नावाचं एक गाव आहे. आम्ही भोरडी नावाच्या गावाला एसटीने चाललो असताना दुसरी एसटी शेजारून गेली. आमच्या डायव्हरने दुसऱ्या डायव्हरला विचारलं - कुठून आला, तर तो म्हणे "कुंबळं".

कुबल = कठिण, बळकट, मजबूत>>>>>> ही माहिती नवीनच.
हिंदीतल्या “कमलककडी”ला (कमळाच्या देठांना) शुद्ध मराठीत “भिसे” म्हणतात>>>>>> भिस्सा असा शब्द माहीत आहे.
कमलककडी म्हणजे पद्मकंद किंवा कमळगड्डा.
कमळांच्या देठांना मृणाल म्हणतात का?

मला पुलंचं वर्गातल्या कोणीतरी 'मसाल्याची बेटं कुठली?' या प्रश्नाला 'बेडेकर आणि कुबल' हे उत्तर दिल्याबद्दल ' मास्तरांनी त्याला कुबल कुबल कुबलला' हेच आठवतं नेहमी! Lol>>>>>> Lol

* मृणाल
= कमळाचा देठ. [सं. मृण् = इजा देणें]
दाते शब्दकोश

स्टार फ्रुट. = कॅरंबोला
https://en.wikipedia.org/wiki/Carambola#:~:text=%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4...,(%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%83%205%2D6).&text=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8%2D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87,%E0%A4%AB%E0%A4%B3%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87.

स्टार फ्रुट = कॅरंबोला = कमरक
https://en.wikipedia.org/wiki/Carambola#:~:text=%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4...,(%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%83%205%2D6).&text=%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8%2D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87,%E0%A4%AB%E0%A4%B3%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87.

आणि

कमळाच्या बी ला पद्मबीज / मखाना. .
मखानाचे लाडू करतात.

आपण जे मखाने खातो ते कमळाच्या बियांचे नसतात.
ते Euryale ferox नावाच्या वॉटर लिलीच्या बिया असतात.
त्या फुलवून त्याच्या लाह्या करतात.

Lotus and Water Lily are different.

Pages