खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोळाचे पोहे आणि मिरगुंडं मस्तच दिसतायेत
तांबाट्याचे सार, भात आणि पापलेट फ्राय एकदम जबरी.
धनी आणि rmd, तुमच्याकडे आल्यावर काय काय खायचे याची यादी करायला घेतली आहे. ती वाढतच चालली आहे Lol
जुई, साबू वडे मस्तच आहेत.

आजचे बेकिंग - रस्टिक कंट्री सावरडो लोफ, २०% खपली गव्हाचे पिठ आणि बाकी मैदा वापरून.
country loaf+ 10% khapali wheat, 60% hydration.jpg
हा क्रंब शॉट
country loaf+ 10% khapali wheat, 60% hydration crumb.jpg
उद्याच्या ब्रेकफास्टमध्ये अवाकाडो टोस्ट + सनी साईड अप आणि शाळेच्या डब्यात ओपन मशरूम चीज सँडविच

धन्यवाद ऋ आणि ऋतु Happy

तुमच्याकडे आल्यावर काय काय खायचे याची यादी करायला घेतली आहे. ती वाढतच चालली आहे >>> Lol

@अल्पना,
फारच भारी दिसतोय ब्रेड. फोटो बघूनच नाकाशी खरपूस वास दरवळला.

असा चांगला ब्रेड घरी करू शकणाऱ्या लोकांबद्दल आदर वाटतो.

@ अल्पना, हे “खपली गहू“ काय प्रकरण आहे ?

धन्यवाद मंडळी.
“खपली गहू“ काय प्रकरण आहे ?>> लो ग्लायसमिक इंडेक्स असलेलं गव्हाचं वाण आहे. महाराष्ट्रातले, बहूतेक मावळ परीसरातले. खिरीसाठी वापरतात हा गहू. पोळ्या नाही चांगल्या बनत.

खपली गव्हाची बिस्किटे आली होती मागे. ती मस्त लागायची. असा वापरून पाहिलेला नाही.
लो ग्लायसमिक इंडेक्स >> असे पण आहे का? मला वाटले की फक्त हाय फायबर आहे. त्यामुळेच पोळ्या चांगल्या होत नसणार.

हाय फायबर आहे म्हणूनच लो ग्लायसमिक इंडेक्स.
बऱ्याच डायबेटिस पेशंट ना अशात हा गहू वापरताना बघितलं आहे.

Thanks.

आम्ही खपली गव्हाच्या पोळ्यापण केल्या ३-४ महिने. लाटताना वगैरे पण जमत होत्या. लालसर होतात. पण सुरूवातीला मऊ असतात, जसाजसा वेळ जाईल तशा त्या आपोआप ओलसर होतात. सकाळची पोळी दुपारलाच गिच्च होते तुकडा करून खाताना. शिवाय ज्यांच्यासाठी हा खटाटोप केल्या त्यांनी ३-४ महिन्यांत मिळून ५ पोळ्यापण नाही खाल्ल्या, Uhoh , मग कशाला आम्ही तरी खायच्या, म्हणून बॅक टू नॉर्मल लोकवन गहू.

ब्रेड आणि अवाकडो टोस्ट छान दिसतोय! मलाही डिमांड झाली आहे guacamole करायची. ते नॅचोज सारखं चक्क प्लेन खाकर्‍याबरोबर डिप म्हणून खायचं, भारी लागतं!

असा चांगला ब्रेड घरी करू शकणाऱ्या लोकांबद्दल आदर वाटतो.
+786
आदर कौतुक आश्चर्य मानसन्मान आणि बरंच काही..
घरचे नशिबवान असतात.

अल्पना,
रस्टिक कंट्री सावरडो लोफ जबरदस्त आहे.
असा चांगला ब्रेड घरी करू शकणाऱ्या लोकांबद्दल आदर वाटतो.>>>>>>+११
शाकशुका पण मस्तच. आवडता.
अवाकाडो टोस्ट भारी दिसतंय, साज.

मासवडी जबरदस्त...
इतके कौतुक ऐकून आहे. पण आजवर खायचा योग नाही आला हा पदार्थ Sad

प्लेटिंग उच्च ! >> गावरान पदार्थाला एकदम ५स्टार लेव्हल चे केलेले आहे!

पण आजवर खायचा योग नाही आला >> थोडा माळशेज वरून पुढे आलास की आळे फाटा, संगमनेर ला आमच्या गावी मिळेल

>>> प्लेटिंग उच्च !
+१०८

>>> इतके कौतुक ऐकून आहे. पण आजवर खायचा योग नाही आला हा पदार्थ

#MeToo

छान दिसत आहे. पाहीन कधी करून.

प्लेटिंग उच्च ! >> गावरान पदार्थाला एकदम ५स्टार लेव्हल चे केलेले आहे!>>> अगदी अगदी, फार मस्त दिसतायत मासवड्या.

भारी दिसतेय मासवडी.. प्लेटिंग आणि प्लेट्स पण!
बनवायला थोडा किचकट असल्याने कधी बनवला नाही कोणी बनवून दिला तर खाण्यात येईल.. Happy

Pages