Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयता कोणी देत असेल तर कधीही
आयता कोणी देत असेल तर कधीही चालेल ताजा ज्यूस ..
+१
मलाही आयताच मिळाला, कस्टम मेड.
बाहेर ज्यूस पितांना बर्फ नको, साखर + मीठ+ चाट मसाला वगैरे नको असे मात्र नीट सांगावे लागते आणि पिण्याच्या “आधी” सांगितले तसे केले आहे ह्याचा Assurance घ्यावा लागतो 😀
चामुंडराय,
चामुंडराय,
चेरी ऑन द केक सारखेच cherry on the sauce 🙂
आयडियाची कल्पना आवडली आहे, योग्य जागी वापरण्यात येईल.
आज काय एकसे एक फोटो आलेत.
आज काय एकसे एक फोटो आलेत. ब्रेकफास्ट होऊन सुद्धा परत खावेसे वाटत आहेत सगळे पदार्थ
भजी, ज्युस, इडली फ्राय >>>
भजी, ज्युस, इडली फ्राय >>> नुसता जीव जाळतायत इथले फोटो
एकसे एक आहेत!!
मश्रुम इन व्हाईट ग्रेव्ही
मश्रुम इन व्हाईट ग्रेव्ही
प्लेट्स लग गई है….
प्लेट्स लग गई है….
- मेरे प्यारे प्यारे राईस
- बोंबील
- प्रॅान्स आंबोटीक
- भाकरी
आईग्गं ... कातिल मेनू!!
आईग्गं ... कातिल मेनू!! ताबडतोब फोटोतून प्लेट उचलून घ्यावीशी वाटतेय.
मस्त..
मस्त..
हे घरचे आहे की बाहेरचे?
आई मीन आमच्याकडे सार भात मासे असले की कांदा लिंबू नसतो म्हणून विचारले..
बाई दवे,
आपला तो श्रावण कधी सुरू होत आहे.. आजही काही लोक गटारी करत होते. मला वाटले होते रविवारी आटोपले..
आज अमावस्या. आमच्याकडे
आज अमावस्या. आमच्याकडे काहिंनी काल केली, आज गुरवार म्हणुन. मी तसेही फारच कमी नॉन्वेज खाते त्यामुळे काल केली नाही. श्रावणात मुड लागला तर तेव्हाही खाते.
साज मस्त प्लेट… मी आज तांबाट्याचे सार करुन त्यात सुका जवला घालेन. माझी गटारी.
महाराष्ट्राच्या वर मध्यप्रदेशपासुन श्रावण १५ दिवसापुर्वी सुरु झाला. तिकडे महिने पोर्णिमेपासुन सुरु होतात. कावड यात्रा गाजतेय सध्या, ती श्रावणातली.
धनी मश्रुम रेसिपी झक्कास दिसतेय, योजाटा, आधी टाकली नसल्यास.
मध्यप्रदेशपासुन श्रावण १५
मध्यप्रदेशपासुन श्रावण १५ दिवसापुर्वी सुरु झाला. तिकडे महिने पोर्णिमेपासुन सुरु होतात. कावड यात्रा गाजतेय सध्या, ती श्रावणातली. >>> हो इथे दिल्लीत श्रावण सुरू होवून १५ दिवस झाले. काल इथे शिवरात्र होती श्रावणातली, कावडिये त्या दिवशी जल चढवतात बहूतेक. गेले तिन दिवस कावड यात्रा + शिवरात्र यामुळे युपीमध्ये शाळा - कॉलेजांना सुट्टी दिली होती. आख्ख्या युपीमध्ये होती कि फक्त बुलंदशहर जिल्ह्यात हे माहित नाही.
मश्रुम इन व्हाईट ग्रेव्ही मस्त आहेत. माश्याची प्लेट पण छान दिसतेय, पण मी मासे खात नसल्याने माझा पास.
काल आम्ही लेमन कोरिएंडर सूप + हनी - चिली चिकन ड्रमस्टिक (एअरफ्रायर मध्ये) केलं होतं. पण फोटो राहून गेला.
मला हे हिंदू महिने पुढे -
मला हे हिंदू महिने पुढे - मागे सुरू होतात, हे मॅटर माहिती नव्हतं. कैलास यात्रेत एका यात्रींनी 'आज आषाढ प्रतिपदा है' असं सांगितल्यावर मी माहितीचं गाठोडं उघडून 'आज कालिदास दिन' वगैरे ज्ञान प्रदान केलं. एकादशी आल्यावर पालखी आज सासवडला जातील असा विचार आला.
यात्रा संपवून घरी आल्यावर पालखी पुण्यात आली. तेव्हा हे कळलं!
उत्तरेत पोर्णिमेपासून महिने
उत्तरेत पोर्णिमेपासून महिने सुरू होतात. पंजाबात तर यापेक्षा वेगळा पण एक प्रकार आहे, दर महिन्याच्या संक्रांतीपासून पण मोजतात महिने. एरवी श्रावण बघताना पोर्णिमेपासून बघतात, पण मुलांचे वाढादिवस तिथीने बघताना संक्रांतीपासून काहीतरी मोजतात. त्यामूळे वाढदिवस तिथल्या तिथीने साजरा करायचा असल्यास १-२ दिवस मागेपुढे होतो.
बरोबर, विक्रम संवत फॉलो
बरोबर, विक्रम संवत फॉलो करणारे पौर्णिमा ते पौर्णिमा मोजतात महिना आणि नर्मदेच्या खाली भारतात शक संवत गणनेत (नंबूदरी, स्मार्तांसारखे काही मोजके अपवाद सोडून) सर्वजण अमावस्या ते अमावस्या महिना मोजतात.
@ अल्पना तुम्हाला झब्बू. 👆
Liquid diet वर असतांना घेतलेले लेमन कोरिएंडर सूप.
मस्त आलाय सूपचा फोटो.
मस्त आलाय सूपचा फोटो.
आज काढेन फोटो सूपचा. लेमनग्रास, कोथिंबिरीच्या काड्या, आलं, फ्लॉवरची पानं आणि दांडे आणि थोडे खडे मसाले घालून व्हेज ब्रॉथ बनवून ठेवलाय सकाळी. आता फक्त सूप ठरवायचे आहे कोणते ते. व्हेज सूप असेल कोणतंतरी.
या पोर्णिमेला जे गटारी हे नाव
या पोर्णिमेला जे गटारी हे नाव दिले आहे (सांप्रत) ते तिरस्करणिय वाटते विशेषतः गटारात लोळाणे वगैरे जी कन्सेप्ट आहे ती विकृत आहे.
>>> रसमलई मस्त झाली होती.
>>> रसमलई मस्त झाली होती.
+१ त्या पदार्थाला दुसरे नाव द्यावे लागेल!
मश्रूम इन व्हाइट ग्रेव्ही मस्त! तुमची रेसिपी सांगाल?
पोळी / चपाती कशाची आहे? स्टफ केलेली वाटतीय. 8-)
लेमन कोरिएंडर सूप मस्त! पण डाएटवर असताना पलीकडे पापड शंकू काय करताहेत?
आज दीपपौर्णिमेनिमित्त अहोंनी
आज दीपअमावास्येनिमित्त अहोंनी शेवयाची खीर केली होती.
पापड शंकू
पापड शंकू 😁
मी नाय घेतले. सोबतच्या लोकांनी शंकूंना आणि बऱ्याच जलचरांना मोक्ष दिला, sea food special रेस्तरां होते.
तुमची प्लेट सुबक-सुंदर वाढलेली आहे. काटेकोर, no mess. 👌
या पोर्णिमेला जे गटारी हे नाव
या पोर्णिमेला जे गटारी हे नाव दिले आहे (सांप्रत) ते तिरस्करणिय वाटते विशेषतः गटारात लोळाणे वगैरे जी कन्सेप्ट आहे ती विकृत आहे.
>>>>>>
सामो,
हे गूगल सर्च करून,
__
गटारी अमावस्येचं मूळ नाव ‘गतहारी अमावस्या’ आहे, ज्याचा अर्थ आहे “त्यागलेला आहार”. श्रावणात जे पदार्थ वर्ज्य असतात, त्यांचा त्याग करण्याआधीचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.
____
थोडक्यात गटारी हे नाव अपभ्रंशातून आले आहे.
त्याचा गटाराशी संबंध नाही.
तसेच गटारी अमावस्येला म्हणत नसून श्रावणाच्या आधीचा जो रविवार बुधवार वगैरे जो शेवटचा मांसाहार खायचा दिवस येतो त्या दिवसाला म्हणतात.
याउपर गटारात लोळणे वगैरे जे या दिवसाला दारू पिऊन साजरे करतात त्यांना चिडवायला आले आहे.
वैयक्तिकरीत्या मला कुठलाही सण उत्सव समारंभ सेलिब्रेशन लोकं दारू पिऊन का साजरा करतात हे समजत नाही. त्या आनंदाच्या क्षणांना शुद्धीत नाही अनुभवले तर त्यात काय मजा
वामनराव.. ताट नेहमीप्रमाणे क्लास!
पदार्थ आवडीचे नसतील तरी तुम्ही मांडलेल्या ताटावर जेवायला बसेन मी
@वामन राव >>> ताट मस्त. ती
@वामन राव >>> ताट मस्त. ती काकडीची फेसलेली मोहोरी घालून केलेली कोशिंबीर आहे का? आणि बरोबर मध्ये काय आहे?
पडवळ किंचित हळद घालून वाफवून
@अनिंद्य, धन्स.
@ऋन्मेऽऽष येवा, तेलंगाणा आपलाच असा!
@माझेमन, पडवळ किंचित हळद घालून वाफवून केलेली कोशिंबीर आहे. बरोबर मध्ये पेढा आहे.
वामनराव ताट भारी दिसतय. आणि
वामनराव ताट भारी दिसतय. आणि वाढलं ही परफेक्ट आहे. ताट गच्च भरलेलं आवडत नाही सम हाऊ.
गच्चं भरलेलं ताट मलाही आवडत
गच्चं भरलेलं ताट मलाही आवडत नाही, थोडी मोकळी-मोकळी जागा हवी असते. म्हणूनच फोटो काढायला लहान-लहान वाट्या घेतल्या होत्या.
वामन राव, पांढऱ्या भातावर
बाकी ताट मस्त. पडवळाची कोशिंबीर करायची आयडिया भारी आहे.
कारण कधी भाजी केलीच , तर घरी फार असंतोष होतो!!!
पडवळाची कोशिंबीर कशी करतात?
पडवळाची कोशिंबीर कशी करतात? मी कधी पाहिली किंवा खाल्ली नाही.
>>> पांढऱ्या भातावर चमचाभर
>>> पांढऱ्या भातावर चमचाभर तरी वरण घालावे...
हो हो, आईचीही हीच शिकवण! भातावर तूप घातलं होतं; पण फोटोसाठी सुंदर ताट दाखविण्याच्या नादात वरण घालायचं राहून गेलं. जाणीव करून दिल्याबद्धल धन्स.
ताटात आधी भाजी, वरण (जे काही कोरड्यास आहे ते) वाढावं; भात, पोळी, भाकरी वगैरे त्यानंतर वाढावी. पोळी चार तुकडे करून वाढावी. भाकरी उलटी वाढू नये; पापुद्रयाची बाजू वर असावी. हेही आईचे संस्कार.
---
आमच्या आजोळी नैवेद्यावर तुळस ठेवतात.
>>> पडवळाची कोशिंबीर कशी
>>> पडवळाची कोशिंबीर कशी करतात?
पडवळ चिरून आतील बिया वगैरे काढून टाकून लहान-लहान फोडी करून घ्या. थोडं तेल, मीठ घालून नंतर अधूनमधून थोडं-थोडं गरम पाणी घालून (व आवडत असल्यास हळद घालून) मऊ वाफवून घ्या. थंड झाल्यावर मोहरी पूड, चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, दही (, आवडत असल्यास कोथिंबीर बारीक चिरून) घाला. वरून फोडणी थंड करून घाला.
याच पद्धतीने दुधी भोपळ्याचीही कोशिंबीर करता येईल.
पूर्वीचे फोटो -
या ताटात दुधी भोपळ्याची कोशिंबीर आहे -
या ताटात पडवळाची कोशिंबीर आहे -
अवकुरा
अवकुरा
- दु भो कोशिंबीर चा शब्द
.
सुंदर दिसतंय ताट
थँक यू वामन राव. आमच्या इथे
थँक यू वामन राव. आमच्या इथे एक मावशी सफाळ्यावरून छान पडवळं आणते. करून बघतेच आता.
.. कधी भाजी केलीच , तर घरी
.. कधी भाजी केलीच , तर घरी फार असंतोष होतो
+ ११११११११११
😂
Pages