Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
अस्मिता धन्यवाद. खुप सुरेख
अस्मिता धन्यवाद. खुप सुरेख आहे चित्रपट. पाहते.
मला पण आवडला आप जैसा कोई.
मला पण आवडला आप जैसा कोई. माधवन श्री वाटतो पण फातिमा बंगाली वाटत नाही. पंजाबी मुलगी वाटली मला ती.
सुपरमॅन (२०२५) : बरा आहे.
सुपरमॅन (२०२५) : बरा आहे. इफेक्ट्स आणि सुपरमॅन रीबूट म्हणून आवडला. थोडा हलकाफुलका, हाडामासाचा/ भावना असलेला आहे. बाकी सुपरमॅन सारखाच चित्रपट आहे.
मलाही चांगला वाटला ‘आप जैसा
मलाही चांगला वाटला ‘आप जैसा कोई’, फ्रेश आणि बिलिवेबल.. माधवन , त्याची वहिनी आवडले !
फातिमा नाही आवडली, कोणी मॅडीच्याच वयाची घ्यायची कि, कोंकणा /चित्रांगदा वगैरे .. याशिवाय बंगाली म्हणजे फार उच्च विचारांचे /फॉरवर्ड हा टिपिकल बॉलिवुडी स्टिरीओटाइप बोअर झाला आता.. मराठी कुटुंब दाखवलं फॉरवर्ड म्हणून तरी चालेल !
मला पण बघायचाय आप जैसा कोई,
मला पण बघायचाय आप जैसा कोई, त्यामुळे सध्या हे वाचलं नाही.
मस्तच परीक्षण अस्मिता.
मस्तच परीक्षण अस्मिता.
माधवन फातिमाचं होतंच नाही का लग्न त्याच्या बुरसटलेल्या विचारसरणीमुळे त्याऐवजी वहिनी आणि मामाचं लग्न जुळते का.
आगारतळा आणि जमशेदपूर दाखवलं
आगारतळा आणि जमशेदपूर दाखवलं म्हणून मग प्रोग्रेसिव विचारांचे बंगाली कुटुंब. रांची/जमशेदपूर भागातला रिग्रेसिव लोकल मित्र आणि त्याच भागातला + कलकत्त्याचा उच्च शिक्षित मित्र जवळून बघितले आहेत त्यामुळे ते रिलेट झाले.
बंगाली ऐवजी मराठी कुटुंब दाखवायचे तर मग कदाचित मध्य प्रदेशातला किंवा तेलंगाणातला दाखवावा लागला असता माधवन.
तेलंगाणा मधला जास्तं शोभला
तेलंगाणा मधला जास्तं शोभला असता
इथे वाचूनच पाहिला, आप जैसा
इथे वाचूनच पाहिला, आप जैसा कोई... मला आवडला. माधवन तर RHTDM पासूनच प्रचंड आवडतो. त्याचे expressions खूप आवडतात मला अगदी डोळ्यांत बदाम... चित्रपट पण आवडला, फातिमा पण सुंदर दिसते, कामही छान केलंय तिने पण बंगाली मात्र आजिबात नाही वाटली.
विक्रांत मेस्सीचा ‘ब्लॅकआऊट’
विक्रांत मेस्सीचा ‘ब्लॅकआऊट’ पाहिला. मस्त आहे. एका रात्रीत घडणार्या गोष्टीचा सिनेमा. आवडला.
आप जैसा… पाहिला. आवडला.
आप जैसा… पाहिला. आवडला. पहिला अर्धा तास बोअर झाला. पण नंतर चांगलाच ग्रिपिंग आहे. अवघडलेला श्री माधवनने छान साकारलाय.
दोन्ही नाती जुळतात अन्जुताई,
@आप जैसा कोई -
दोन्ही नाती जुळतात अन्जुताई, लग्न दाखवलं नाही पण मनं जुळलेली तेवढं दाखवलं आहे.
मला पंजाबी/ दिल्ली आणि फेक- एनहॅन्स्ड युपी पेक्षा वेगळे काहीही आवडले असते. त्यामुळे आगरतळा, जमशेदपूर व कलकत्ता आवडले. वेगवेगळी शहरं, वेगवेगळी घरं, लोकेशन्स (भलेही सगळे स्टुडिओतलेच का असेना) वेगवेगळी माणसं, पार्श्वभूमी पाहायला आवडते. चित्रपट अप्रतिम वाटला नाही तरी खूप दिवसांनी चांगला रोमॅन्टिक सिनेमा पाहिल्यासारखे मात्र वाटले. त्यामागे एक थॉट प्रोसेस असलेला. एकदम 'जाट' टाईप आदिमानवी कलाकृती नाही. त्याच्या वीणा वाजवताना चुका होतात तर तो तसं तिच्या नानीला सांगतो, तर ती म्हणते "चुका कुठेत, हे तर तुझे स्वतःचे एक्स्प्रेशन आहे" किंवा पुस्तकात ठेवलेले सुकलेले फूल पाहून "मुरझानाभी एक तरह का खिलनाही है" असे छान संवाद आहेत.
***स्पॉयलर अलर्ट***
***स्पॉयलर अलर्ट***
आप जैसा कोई - मला कैच्याकै वाटला. म्हणजे काहि प्रसंग काहितरी जगावेगळं दाखवावं या हेतुने घुसडलेत. केवळ एका विशिष्ठ डेटींग साइटला साइनप केलं म्हणुन आग पाखड करणारा स्वतःच्याच पन्नाशीतल्या वहिनीला घर सोडण्याकरता पाठिंबा देतो.. बात कुछ हजम नहि हुइ...
ते नंतर ना… आधीचा असता तर
ते नंतर ना… त्या प्रसंगाआधी तोही स्वतःसमोर हार मानुन परत हिच्याकडे येऊन मी तुला एका लिमिटमध्ये स्वातंत्र्य देतो हे बोलल्यावर तु देणारा कोण हा तिचा प्रश्न त्याला विचारात पाडतो. हे घडलेच नसते, तो आधीचा असता तर भावाच्या बाजुने उभा राहिला असता.
अस्मिता हुश्श केलं, दोन्ही
अस्मिता हुश्श केलं, दोन्ही नाती जुळतात म्हणून . मला वाटलं हिरो माती खातो म्हणून फिस्कटते, त्याचे विचार थोडे positive दिशेने वाटचाल करतात म्हणून त्यांचं नातं जुळतं असंच ना, good.
साधना ट्रिगर पॉईंट आला लक्षात.
धन्यवाद अस्मिता, साधना.
आता थांबायचं नाय, दीड तास
आता थांबायचं नाय, दीड तास पाहून थांबवला.
इथे वाचून विनोदी असेल असा समज झालेला. फील गुड कॅटेगरीतला आहे. असे सिनेमे एकामागोमाग एक पाहता येत नाहीत.
नाहीतर गोडाची मिठी बसते.
टूरिस्ट फॅमिली इतक्यातच पाहिलेला. तो थोडा सफाईदार होता.
आ थां ना मधे एका समस्येला हात घातला खरा. पण कुठल्याही देशी फिलगुड मधे असतो तसा पुढचा घटनाक्रम आहे.
पहिल्यांदा रिअलिस्टीक, मग त्यांच्या समस्या आणि प्रत्येकाला होणारा सा़क्षात्कार आणि मग कथेची गाडी रूळावर येते.
तरी सुद्धा देमार पटांपेक्षा चांगलाच आहे.
ध्येयवादी शिक्षक आणि जनहितार्थ राबणारा कडक अधिकारी ही दोन्ही कॅरेक्टर्स फिल्मी आहेत. ओम भूतकरने काम छान केलंय पण कॅरेक्टर गोंधळलेलं आहे. नऊ हजारात मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करावी लागत असताना ३५ हजाराची नोकरी निव्वळ रात्रशाळा जगवण्यासाठी सोडणारा शिक्षक महात्माच असू शकेल.
(मराठी असल्याने थोडा प्रयत्न केला तर सपोर्ट केला पाहीजे).
अस्मिता - आप जैसा कोई ची
अस्मिता - आप जैसा कोई ची पोस्ट मस्त आहे. पाहायचा आहेच.
आता थांबायचं नाय बद्दलही खूप ऐकले आहे.
आप जैसा कोई मला एक-दोन
आप जैसा कोई मला एक-दोन मुव्हिची सरमिसळ वाटली.हिन्दी म्हणजे रिग्रेसिव्ह आणी बन्गाली म्हणजे फॉरवर्ड फॅमिली हे सगळच रानी और राजा की प्रेम कहानी वरुन तसच्य तसच उचलेल वाटल.
एकटा ,लग्नाचा राहिलला ,काका टाइप पर्सनॅलिटिचा श्रीनु तनु वेडस मनु मधलाच पण अजुन १० वर्श वयाने मोठा वाटतो. त्यामुळे माधवनच्या रोल मधे काहिच नाविन्य वाटत नाही.अजुन एक म्हणजे माधवन अजिबातच ४२चा वाटत नाही ५०चाच वाटतो पण फातिमा ३२ची वाटते.
माधवन आवडतोच पण त्याच्यापेक्षा शरद केळकर वैगरे जरा अजुन थोड यन्ग कुणितरी घ्यायला हव होत.
मला यात फातिमाचाच रोल जास्त आवडला, क्लास दिसलिये, वावरलिये..बन्गाली वाटत नसलि तरी खुप मस्त फ्रेश वावर आहे तिचा. साड्या , ड्रेसिन्ग फार सुन्दर आहे.तिचा प्रोग्रेसिव्हनेस वरवरचा वाटत नाही.
आता थांबायचं नाय बद्दलही खूप
आता थांबायचं नाय बद्दलही खूप ऐकले आहे. >>> मी ही. इथेच जास्त.
झाला पूर्ण पाहून. कदाचित मी इथे जास्त क्रूर पणे लिहीलंय असं वाटतंय.
आपल्याला सिनेमाची कथा लिहायची वेळ आली तर आपण तरी काय करणार असा विचार आला.
प्रेक्षक आता इतके युज्ड टू झालेत कि बहुतांश सिनेमे प्रेडिक्टेबल वाटतात.
क्लायमॅक्स असाच काही तरी असेल असं खरंच वाटलं.
शेवटी दहावीची परीक्षा दिलेल्या तेवीस कर्मचार्यांचा उल्लेख आला, म्हणून सत्यकथा आहे हे समजलं. मनापासून कौतुक.
अस्मिता
अस्मिता
माफ करा.
आप जैसा... बघितला नाहीये. बघणारही नाही. पण
"तर ती म्हणते "चुका कुठेत, हे तर तुझे स्वतःचे एक्स्प्रेशन आहे" किंवा पुस्तकात ठेवलेले सुकलेले फूल पाहून "मुरझानाभी एक तरह का खिलनाही है" असे छान संवाद आहेत". >>>> असे संवाद नाटकात चांगले शोभतात, चित्रपटात?
अस कराना. "Last Laugh" नावाचा मूकपट आहे. मूकपट असल्यामुळे संवाद एकही नाही. एव्हढेच काय पण मूकपटात असतात त्या प्रमाणे ह्यात intertitlesही नाहीत. केवळ एक panel आहे. त्यात मोजक्या शब्दात दिग्दर्शकाने आपली भूमिका विषद केली आहे.
बघायची इच्छा असेळ तर ही घ्या लिंक.
The Last Laugh (F.W. Murnau, 1924)
https://www.youtube.com/watch?v=Djqmwlj3ZqQ
Roger Ebert review
https://www.rogerebert.com/reviews/great-movie-the-last-laugh-1924
पाहिजे तर आधी Roger Ebert review वाचून घ्या.
असे म्हणू नका की ते दिवस गेले आता. माझ्या आठवणीत ऑस्कर ==फार पूर्वी नाही === मिळालेला एक मूक पट बघितलेला आहे. नाव आठवत नाही. मला वाटत एका सिने नटाची गोष्ट होती.
फक्त ७० मिनिटांची film आहे.
Silent directors were proud of their ability to tell a story through pantomime and the language of the camera,
the language of the camera! हे कळीचे वाक्य आहे.
गुलकंद नाही पण त्या टीमचा
गुलकंद नाही पण त्या टीमचा ‘एकदा येऊन तर बघा‘ बघितला. गिकु ने सिनेमा आणि इतरांनी स्किट्स केली आहेत. एक बर्यापैकी चांगलं कथाबीज हाती लागलं होतं पण ते फुलवता नाही आलं. सयाजी शिंदेला वाया घालवलंय.
एकदा येऊन तर बघा >>> आठवला.
एकदा येऊन तर बघा >>> आठवला.
सुरूवात चांगली. नंतर सुमार वाटला होता.
काल अशोककुमार-निरुपा रॉय
काल अशोककुमार-निरुपा रॉय मुख्य भुमिकेत असलेला गृहस्थी हा जेमिनीपट पाहिला. जेमिनीपटांची मुख्य ओळख म्हणजे कथा कौटुंबिक आणि घरोघरी असंख्य मुले.
चित्रपट जरी १९६३ मध्ये बनला तरी कथेचा काळ स्वातंत्र्यपुर्व असावा. रंगुनला चांगल्या नोकर्या होत्या व जपानी बॉम्बहल्ला झाला होता या दोन घटना दाखबल्यात.
अशोककुमार-निरुपा जोडी जरी मुख्य असली तरी नाचगाणी वगैरे महत्वाच्या कामांसाठी या जोडीच्या कॉलेजकन्यका मुली व त्यांचे बॉयफ्रेंड्स आहेत. यात राजश्री, मनोजकुमार, मेहमुद, शुभा खोटे, इन्द्राणी मुखर्जी, दोन साऊथचे हिरो हिरोइन, भारती मालवणकर इत्यादी खोगिरभरती आहे.
चित्रपटाच्या पहिल्या दिड दोन तासात ललिता पवारपासुन सगळ्यांचे साखरेत घोळलेले आणि तुपात तळलेले गोड संभाषण आहे. जी काय कथा आहे ती नंतर २०-२५ मिनिटांत आटोपती घेतलीय.
चित्रपट सुरु होतो तेव्हा अकु-निरॉला ८ मुले असतात. त्यापैकी एकीचे लग्न झालेले पण ती शिक्षण घेत असलेल्या नवर्याला उगीच डिस्ट्रॅक्शन नको म्हणुन माहेरी असते आणि दोन मुली कॉलेजात जात असतात. यापुढे रांग उभी असते एकात एक बसणार्या पाच रशियन बाहुल्यांची. त्यात चार मुली व एक मुलगा. पाव भाग चित्रपट झाल्यावर निरॉला चक्कर येते, डॉक्टर नाडी तपासुन ती आई बनणार असल्याचे वर्तमान जाहिर करतात. हे कळल्यावर निरॉ लाजलाजुन मरते. अकु पण खुप
कॉलेजगोईंग मुली, व्याही वगैरेंना हे कळल्यावर आनंदी आनंद. कोणालाही आधीचे आठ असताना नववा का आणताय हा प्रश्न विचारावासा वाटत नाही. आधीच आठ बाळंतपणे काढलेली स्त्री नवव्या वेळी इतकी लाजेल की आता परत बाळंतपण म्हणुन धास्तावेल हे मला सांगता येणार नाही पण धास्तावणे ही जास्त नैसर्गिक प्रतिक्रिया असु शकते. फक्त डॉक्टर अकुला बातमी सांगताना म्हणतो की तुम्हारी बिविको अपनी नॅशनल बिमारी हुयी है - बच्चे पैदा करना.
लाजलाजुन मरतो आणि तिला विचारतो ये ऐसे कैसे हुवा?? ते ऐकुन मी हसुन हसुन मेले. आधीच्या आठ पोरांच्या वेळीही त्याने हाच डायलॉग मारला असणार नक्कीच
तर यथावकाश हे पोरांचे लेंढार आठवरुन नऊवर जाते. तोवर दिग्दर्शकाला इतकी साखरपेरणी करुन डायबेटिस व्हायची वेळ आलेली असते. म्हणुन तो कथानकात रडारड घालतो आणि आपल्याला कळते की अकु दुसर्या गावातही गृहस्थी करतोय आणि तिथे त्याची चार पोरे आहेत. हे पाहुन मी अवाक झाले आणि कसाबसा चित्रपट पाहुन संपवला.
साधना मी पाहिलाय हा सिनेमा .
साधना
मी पाहिलाय हा सिनेमा . मला अशा कौटुंबिक सिनेमातली घरं खूप आवडतात . मोस्टली सेट असतात . शिवाय एकदम पैसेवाले असतात हे कुटुंबीय , घरी नोकरचाकर , छान गार्डन आणि नवरा बायको सतत प्रेमात .
हो.. किती ते प्रेम..
हो.. किती ते प्रेम..
चित्रपट कृष्णधवल असला तरी सगळ्यांचे कपडे मस्त आहेत. केसांच्या विविध स्टाइल्स केलेल्या आहेत आणि फुलेच फुले माळलेली आहेत.
रंगित असता तर सगळ्यांच्या साड्या किती सुंदर दिसल्या असत्या. राजश्री एकदम टकाटक सुंदर दिसते. तिचे फ्रॉक्स, सलवार कमिज आणि साड्याही एकदम टकाटक. (तेव्हा चुडीदार इन्ट्रोडुस झाला नव्हता त्यामुळे मुलींनी पंजाबी घातलेत). तिच्या बहिणीही खुप गोड दिसतात, त्याही टकाटक आहेत एकदम.
नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्णाचे आहे, त्यावर नाचायला राजश्रीसारखी तयार ग्रेसफुल डान्सर. त्यामुळे सगळी गाणी प्रेक्षणीय आहेत. एकुण मस्त टाईमपास आहे. रंगित असता तर अजुन छान वाटले असते.
हॉट स्टारवर अरविंद स्वामीचा
हॉट स्टारवर अरविंद स्वामीचा चित्रपट दिसला म्हणून बघायला सुरुवात केली. चित्रपटाचं नाव मवाली राज. अरविंद स्वामी मवाली आहे. इतका क्यूट मवाली पहिल्यांदाच पाहिला. सुरुवात कोलकत्त्यात वैज्ञानिक जसवंत मल्होत्रा, प्लुटोनियम, हार्ड डिस्क अशी होते. कोलकत्ता आहे ते लिहिलेलं कोणी वाचलं नाही तर, म्हणून हावरा ब्रिजही दाखवलाय. मग उडी मारून सात वर्षांनंतरचा काळ आणि चेन्नई. अरविंद स्वामीच मुलगा शाळेत कराटे शिकतोय. इथले संवाद -
तुम्ही इथे फोन करू शकत नाही.
मी फोन केला नाही, मला फोन आला.
अहो, म्हणजे तुम्ही फोनवर बोलू शकत नाही.
मवाली फोनवर - ए फक्त तू बोल, मी ऐकतो.
फोनवरचा माणूस गुजराती अॅक्सेंट मध्ये बोलतो. कोलकत्ता, चेन्नई, गुजरात - साधली की नाही राष्टीय एकात्मता.
मवाल्याला नुसतेच हवेत हात उडवून हा हू करणं हे कराटेचं प्रशिक्षण आवडत नाही. तो तिथे विरुद्ध पार्टीतले गुंड येतील अशी व्यवस्था करतो आणि त्यांना मारता मारता मुलांना हाणामारीचे शिक्षण देतो. मारामारी करताना तो लुंगी फोल्डही करत नाही आणि हवेत उड्या बिड्या सुद्धा मारतो. तरी लुंगी जशीच्या तशी.
मवाल्याचे वडील चांगले एज्युकेटेड , पैसेवाले आणि फॉरेन रिटर्न्ड आहेत. त्यांचे उद्योगधंदे - बिझिनेस - इंडस्ट्री आहेत. मवाल्याची सही प्रत्येक वेळी वेगळी येते त्यामुळे चेक वर सह्या करायचं काम वडिलांचं.
अरविंद स्वामीचं डबिंग करणार्याने शत्रुघ्न सिन्हाचा किंवा जावेद जाफरीचा आवाज लावायचा प्रयत्न केलाय.
चित्रपटात आफताब शिवदासानी सुद्धा आहे.
मूळ तमिळ भास्कर ओरु रास्कलच पहावा का?
इतका क्यूट मवाली पहिल्यांदाच
इतका क्यूट मवाली पहिल्यांदाच पाहिला
>>>>
असले मवाली आवडतील आम्हांला
इतका क्युट व मवाळ मवाली
इतका क्युट व मवाळ मवाली म्हणायला हवा. अ स्वा किती मवाळ आहे. तो भांडतोय, मारामारी करतोय वगैरे कल्पनाही करु शकत नाही.
अभिषेक बच्चनचा कालीगंज लापता
अभिषेक बच्चनचा कालीगंज लापता पाहिला असेल तर रिव्ह्यू लिहा पटकन.
कालिगंज लापता बघितला गेल्या
कालिगंज लापता बघितला गेल्या आठवड्यात.
कालिगंजला स्मॄतीभ्रंषाचा आजार असतो. त्याचे बहिणभाऊ त्याला कुंभकेमेलेमे सोडून देणार असतात हे तो ऐकतो आणि स्वतःच पळून जातो. आणि मग एका लहान बेवारस मुलाकडून कायकाय शिकतो - शिकवतो अशी कथा आहे.
काही अतर्क्य, काही अगम्य, काही चावुन चोथा गोष्टी आहेत. पण दुसरं काही बघायला नसेल तर एकदा बघायला ठीक आहे.
Pages