चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिक्चर अ आणि अ कॅटेगरीत असेल यात शंकाच नाही कारण या पिक्चरमध्ये गाण्याचं पिक्चरायझेशन इतकं अ आणि अ आहे.
शशीला वाटत असतं की जया (त्याची बायको) आणि ऋषी (तिचा सहकलाकार) यांचं अफेअर आहे. बऱ्याच गाण्यात स्वप्नदृश्य असतात पण स्वप्नात स्वतःच्या बायकोला तिच्या सहकलाकाराबरोबर नाच करताना पाहणारा नवरा विरळाच. बरं ऋषी आणि (भडक मेकपमधली) जया यांची जोडी इतकी गोड आहे की आपण त्यांच्या नसलेल्या लव्हस्टोरीसाठी चीअर अप करू लागतो.

हो नं… Happy

यात काय काय अ आणि अ आहेत याचा शोध घेतला तर रत्ने सापडतील. नंतर नीलम भर सभागृहात हेच गाणे गात असताना पहिल्याच कडव्याला अडखळते. अरे कोण गायला उभे राहिले आणि विसरण्याचा रोग असेल तर हातात गाणे लिहुन तो
कागद तरी घेईल.

काल सहज आठवण झाली म्हणून मुलांना थोडासा 'अमर अकबर अँथनी' दाखवला. म्हणजे त्यांना थोडासाच झेपला एका बैठकीत! Proud
तो फेमस रक्तदानाचा प्रसंग वगैरे तर झालंच, पण निरुपा रॉयचा टीबी बरा कसा झाला हा प्रश्न त्यांना छळत राहिला. Lol
अँथनीभाय एका बाटलीच्या पैशांसाठी आपल्याच बारमध्ये मोडतोड का करतो, झाड पडून डोळे कसे जातात, 'सोने के बिस्कुटोंसे' भरलेल्या आंब्याच्या पेट्यांसारख्या पेट्या ओपन ट्रन्कमध्ये तशाच टाकून लोक का फिरतात, यात शीख रिप्रेझेन्टेशन का नाही... प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न!

आप जैसा कोई :
मला अजिबात आवडला नाही. काल सिनेमा संपल्यावर मोठी पोस्ट लिहिलेली, उद्या नीट वाचू आणि पोस्ट करू म्हणून झोपलो आणि आता ती पोस्ट गायब झाली आहे. तो सगळा पहिल्या धारेचा उत्साह गेला तरी बघू किती लिहिता येतंय.

रिव्हर्स इंजिनिअरिंग लक्षात येईल इतकं दिसणारा आणि बाळबोध चित्रपट आहे. माधवनचे मतपरिवर्तन होते, सुष्टांचा दुष्टांवर विजय होतो इ.इ. शेवट तर ठरलेला आहे. मग तोवर यायला काय काय करता येईल? एकदा लग्न ठरवून मग मोडायचं आणि मग परत ठरवायचं. नाही... पहिल्यांदा दोघांनी ठरवायचं, मग एकाने च्रक्रेगिरी करुन मोडायचं, मग अचानक काही कारण नसताना जोडायचं, मग दुसर्‍याला त्यात काही दम न दिसल्याने त्याने मोडायचं, मग शेवटी पावसात सगळं वाहुन गेलं की मन जुळलीच समजा!

बरोबर त्यात पुरुषसत्ताक आणि समानता हेच दाखवणे आहे. आता लग्न मोडायला दुसर्‍याचा गतजन्मीचा प्रियकर, पूर्वीचे संबंध, मानसिक/ शारीरिक तयारी नसणे, त्या दृष्टीने एकमेकांना पूरक नसणे, पॉर्नच्या आहारी गेलेला असणे, व्यसन असणे, मुलीला व्यसन असणे ... हे सगळं येऊन गेलेलं आहे. मग आता ठरलेल्या विवाहात माशी शिंकायला काय कारण करावं? व्हॉट अबाऊट फोन सेक्स साईट सबस्क्रिप्शन? बेटर ऑनलाईन सेक्स साईट्स! लैंगिक भावना या सर्वसमावेशक लिंगभेदाविपरीत सर्वांना असतात हे गळी उतरवणे हा गाभा. आता हे किती वेळा सांगुन झालंय, पण नवं काही सुचत नाहीये तर हेच परत सांगू!

आईची घुसमट चांगली दाखवली आहे पण आपल्याला धक्का देण्याच्या नादात तिचा सगळा प्रवास एका मोनोलॉग मध्ये कॅप्चर करावा लागला. त्या एका मोनोलॉगने आपला बावळ्या माधवन अपार बदलतो. इतके वेळा आधी बदललेला पण हे बदलणे मधुला बदलणे वाटते. कारण आता पाऊस चालू होणार असतो, त्यामुळे मान जानं अपरिहार्य होऊन बसतं. कॅरेक्टर बिल्डिंग धड करत नाहीत हा ओरडा आपण करतो तर डायरेक्टरने माधवन साधा, बावळट, व्हर्जिन, बुळा आणि संस्कृत शिक्षक आहे हे परत परत परत परत इतक्यांदा सांगितलंय की आपण मंदच आहोत.

फातिमा सना शेख छान दिसते. मला त्यांची बंगाली फॅमिली आहे तेच बरं वाटलं. मराठी लोकं पुढारलेले असले तरी ओपन माईंडेड नसतात, म्हणजे दाखवायला पुढारलेले, पण मनात अढी असते. जनरलाईझ करण्याइतके, स्टिरिओटाईप होईल इतके खुल्या विचारांचे मराठी लोक नसतात असं बघितलं आहे. बंगाली सँपल सेट अर्थात लहान आहे, आणि तो स्टिरिओटाईप आधीच आहे त्यामुळे तेच बरं वाटलं.

लिंगभेदाविपरीत सर्वांना असतात हे गळी उतरवणे हा गाभा. आता हे किती वेळा सांगुन झालंय, पण नवं काही सुचत नाहीये तर हेच परत सांगू!

>>> हे मी चित्रपटाबद्दल मतभिन्नता असल्याने लिहीत नाही. त्याबद्दल मला काही मतच नाही कारण ती गोष्ट मॅटरच करत नाही.

पण काही गोष्टी पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा सांगत राहाव्या लागतात. साधी गोष्ट- फिजिओलॉजिकली स्त्री-पुरुष भिन्न आहेत, त्यामुळे कुस्तीत बरोबरी करता येणार नाही पण सेरेब्रल गोष्टीत- बुद्धिबळ खेळताना सगळे सारखेच एवढी बेसिक गोष्ट सुद्धा बरेचदा लक्षात येत नाही. गुळाच्या गणपतीला गुळाचाच नैवेद्य वाटावे असे उदाहरण - येथे सुद्धा लोक "स्त्री लेखिकेने लिहिलेला लेख" वगैरे म्हणतात, "पुरुष लेखकाने" असं कोणी फारसं म्हणत नाही. हे सेरेब्रलच आहे की सगळे मग आवर्जून का नोंदवावं लागतं ? स्त्री आधी स्त्रीच असते, माणूस असण्याच्या आधी सुद्धा ती स्त्रीच असते. त्यामुळे ही गोष्ट बिंबवायला होऊ देत राहावेत वेगवेगळे प्रयत्न. ते कुठल्या माध्यमातून येतील, कितपत जमतील/ आवडतील ही गोष्ट त्यापुढे महत्त्वाची ठरत नाही. फक्त रिग्रेसिव्ह (दाक्षिणात्य विकृत मानसिकता ) नसावेत म्हणजे झाले. मला क्राफ्ट व्यक्तिशः आवडलं नाही किंवा ओरिजनल वाटलं नाही कारण माझे विचार त्यापेक्षा आधुनिक आहेत तरी मी 'येऊ द्या' म्हणत बसते. कारण बघणारे सगळे आपल्या सारखा पर्स्पेक्टिव्ह ठेवून बघत नसतात. One neuron at a time..!

प्रॉब्लेम परत सांगणं हा नाहीये, ते येडपट्ट आणि अविश्वसनीय पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणं हा आहे. Proud Light 1

मै तुम्हे माफ कर दुंगा. एकबार माफी मांग के तो देखो मेरा दिल बडा है.
वो तो मजाक था. वर मै ऐसा मजाक सबके सामने बोलू... शू!!!! किती ऑब्युअस आणि डायरेक्ट आहे हे. काही तरी स्मार्ट दाखवायचं की. प्रचारकी आहे अलमोस्ट. का स्मार्ट दाखवणारे पूल ओलांडून गेलेले आहेत, आता मराठी सिरियल बघणारे अंकल आंटी राहिलेत तो टार्गेट ऑडियंस आहे. तसं असावं.
मैने तुम्हे माफ करदिया. विथ मुलखाचा बालिश गुड बॉय लुक. परत फार गरीब वाटलं. काही तरी स्मार्ट दाखवा की!
हे सगळं एका मागोमाग एक आल्यावर माझं रक्त उसळलं. Lol

पण निरुपा रॉयचा टीबी बरा कसा झाला >> टीबी पण होता का तिला ? अरे देवा !
दृष्टी गेलीच होती, रक्त पण चढवावं लागलं आणि आता टीबी पण !
सटवाईचा फेराच म्हणायचा. किती कमनशिबी बाई होती निरूपा रॉय.

माझा पेशन्स तो डॅडी बिडी म्हणत जवळीक करताना वहिनी बघून मिसइन्टरप्रीट करते ते बघून संपला. फील गुड प्रकारालाही काही सीमा असते!! Lol
आणि अ-खं-ड बॅकग्राऊंड म्यूझिक का सुरू ठेवलंय?! त्यानेसुद्धा डोकं उठलं माझं!!
प्रकाशयोजना आणि कॅमेरा अ‍ॅन्गल्स असे की प्रत्येकाच्या चेहर्‍यावरची रंध्रंन्रंध्रं दिसत राहातात सारखी! 'इन युवर फेस'ची नवीन हाइट आहे ही!

हायला ते मीम नीट बघितलंच न्हवतं!
बेस्ट मीम आहे. असलं काही आलं की माझ्या तोंडाची वाफ अशीच जात असते. कान्ट टेक इट! Biggrin बरोबर बघणारे म्हणतात नसेल बघायचा तर जा की, कशाला बसला आहेस. पण ते ही होत नाही. चिडचिड करत बघणे हेच प्राक्तन आहे.

मी तर यावेळी स्वतःला आवडूनही तुला आवडणार नाही म्हटलं होतं. आता यापेक्षा काय कस्टमाईझ्ड रेको देऊ. Happy साडीच्या दुकानदारांच्या वेदना कळाल्या मला.

यावेळी स्वतःला आवडूनही तुला आवडणार नाही म्हटलं होतं>> हो हो!
तुला नेफ्लि रेकमेंडेशन इंजिन मध्ये उज्ज्वल भविष्य आहे. करून टाक आपलाय! Happy

१००% सहमती अनेकदा झालेली आहे पोस्ट्सवर पण १००% असहमत असे फार क्वचित होते. अमितची ती दीर्घ पोस्ट वाचताना झाले Happy फार फार तर बंगाली फॅमिली दाखवली हे चांगले केले इतपत सहमत आहे. पण त्यातही मराठी चालले नसते याच्याशी सहमत नाही. बहुधा अमितच्या डोक्यात मराठी लोक मराठी पिक्चर्स मधे कसे दाखवतात ते असावे Happy

बाय द वे, प्रत्यक्षात म्हणत असशील तर प्रोग्रेसिव्ह मराठी असतात की. फक्त मराठी पिक्चर मधे नसतात. प्रत्यक्षात बंगालीइतकेच असावेत. गेली काही दशके तरी होते. आता अनेकांचे व्हॉट्सअ‍ॅप अंकल झाले ते सोडा. पण ते बंगालीतही होत असेल.

माधवनचे व्यक्तिमत्त्व बघून त्याचे बदलणे मला बिलिव्हेबल वाटले. भाभीचे संवाद त्याच्यासमोर घडतात. ते बघून काहीतरी जाणीव झाली असे असू शकते. उलट फातिमाच मला फार इम्प्रेसिव्ह वाटली नाही - तिचे कॅरेक्टर व तिचे काम भारी वाटले, ती स्क्रीनवर छान दिसते असे वाटले नाही. हे थोडेफार करीनासारखे.

मला तरी आवडला.

१००% सहमती अनेकदा झालेली आहे पोस्ट्सवर पण १००% असहमत असे फार क्वचित होते.>> Lol हीच मजा आहे. पिक्चर काय येतात- जातात.

>>> पण १००% असहमत असे फार क्वचित होते.
टीपापाकर असून?! Proud
फा सतत कड्याच्या टोकावर उभा असतो अशाने - किंवा जहाजाच्या म्हणू! Lol

फा सतत कड्याच्या टोकावर उभा असतो अशाने - किंवा जहाजाच्या म्हणू! >>> ते ही एकटाच. टायटॅनिक सारखा नाही Happy

स्वाती व अमितच्या हातात ती टायटॅनिक व मांजराची मीम पडू दिली नाही पाहिजे. ते तेथे "Push him" लिहितील Happy

'सोने के बिस्कुटोंसे' भरलेल्या आंब्याच्या पेट्यांसारख्या पेट्या ओपन ट्रन्कमध्ये तशाच टाकून लोक का फिरतात,
>> सोन्याची घनता लोखन्डाच्या अडिच्पट असते. बिस्कुटाच्या बॅगेचे वजन टनभर तरि असेल.

बिस्कुटाच्या बॅगेचे वजन टनभर तरि असेल. >> हो त्याच्याबद्दलही कोठेतरी वाचले/ऐकले होते, की इतक्या वजनाच्या पेट्या हे लोक इतके सहजपणे कसे घेउन फिरतात Happy

अमिताभ विनोद च्या त्या फायटिंग नंतर अमिताभच्या चेहर्‍यावरची जखम तो पोलिस स्टेशनात येईपर्यंत चेहराभर फिरली आहे हे खुद्द अमिताभनेच सांगितले आहे Happy ती फायटिंग, आधीचे संवाद, तेथील अमिताभची होणारी धुलाई व नंतर "दो ही मारा, पर सॉलिड मारा के नही?" मधे हे कधी लक्षात आले नाही.

अमर अकबर अँथनी वर धागाच काढायला पाहिजे. एकेक स्क्रीन स्वतंत्र फॅन बेस होईल इतका "पॅक्ड" आहे तो अतर्क्यपणामधे. ऋषीकपूर प्राणला हॉस्पिटलमधे घेउन येतो, तेथे त्याला ऑपरेट करतात व तेथे निरूपा रॉय भेटायला येते या एकाच सीनमधे जवळजवळ ८-१० निरीक्षणे होती Happy

अशमीर ग्रोवर एखाद्यावर भडकला कि त्या स्टार्ट अपला त्या एपिसोडनंतर खूप रिस्पॉन्स मिळतो. Lol
आप जैसा कोई आता आवडेल असं वाटू लागलंय Lol

फारएण्ड, नेकी और पूछ पूछ? येऊदे धागा. अमर अकबर अँथनी सगळ्या अचाटपणासहित आवडतो. मी लिहिलं होतं इथे बहुतेक, मध्यंतरी थिएटरमध्ये बघितला. मजा आली!

Pages