Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
गृहस्थी - सगळ्या पोस्टी
गृहस्थी - सगळ्या पोस्टी
मी आधी हा बघायचा म्हणून
मी आधी हा बघायचा म्हणून कटाक्षाने न वाचलेल्या पोस्टी या पानावर नजरेखालून गेल्याच. आता बघावा का नाही!
मुलुंड... ओके, माहिम किंवा लोअर परळला प्रेम केलं आणि खून पाडले काय आणि नाही पाडले तर कोण बघायला जाईल
>>>> अगदी अगदी. एक वेळ धारावीला ग्लॅमर आहे पण आमचं दहिसर, नाहूर, विद्याविहार, गोवंडी वगैरे अस्तित्वातच नाहीत बॉलिवूडसाठी.
निरूपा रॉय आठच्या आठ मुले सुरूवातीपासून शेवटपर्यंत सांभाळते हे. पुढे तिचे हे कौशल्य हरवले.

र धों कर्व्यांचे कार्य महाराष्ट्रातुन दिल्लीपर्यंत पोचले नव्हते
>>>>
उरलेला "आप जैसा कोई" पाहिला.
उरलेला "आप जैसा कोई" पाहिला. आवडला मला. दुसरा 'एमसीपी' वाला भाग चित्रपट म्हणून जास्त चांगला आहे. पहिला रोमान्सचा भाग मस्त/मजेदार आहे. माधवन व फातिमाची ओळख झाल्यापासून पुढे एंगेजमेण्टपर्यंतचे संवाद फार जमले आहेत. पुढचेही चांगले आहेत पण पहिले जास्त लक्षात राहिले. गाणी छान लिहीलेली आहेत असे जाणवले. बंगालीमधे "शाचिनी" म्हणजे साखर असावे असे एका गाण्यातील सबटायटल्सवरून समजले. मधूची ओळख करून देणारे/तारीफ करणारे गाणे आहे त्यात. शब्दरचनेमधे बंगाली भाषेचा नैसर्गिक गोडवा आहे. किमान त्या एका कारणाने ती मराठी दाखवली नाही हे बरे आहे
पण दुसरे कारण म्हणजे बंगाली असल्याने कोलकाताही खूप दिसतो. गेल्या काही वर्षांत हिंदी पिक्चर जसा उत्तरेतील शहरी/निमशहरी गल्ल्यांमधे गेला तसा भारतात इतर ठिकाणी गेला तर बघायला मजा येईल. असंख्य शहरे, गावे - त्यांचे युनिक व्यक्तिमत्त्व हे दिसेल. मुंबई, दिल्ली, पंजाब हे खूप झाले. इव्हन आता युपीही बराच झाला आहे दाखवून.
फातिमा बंगाली वाटत नाही हे बरोबर. बाकी तिच्या नातेवाईकांत एक दोन बंगाली स्टीरीओटाइप स्त्रिया वाटल्या (पंजाबी-बंगाली स्टीरीओटाइप्स विकी डोनर मधले मस्त होते). बाय द वे, यात "सरस्वतीपूजे"चा उल्लेख आहे. दुर्गापूजेपेक्षा हा वेगळा उत्सव असतो का? वाटला तसा.
माधवनची भाभी व फातिमाचा मामा यांचे लव्ह अॅट फर्स्ट साइट होते का? ते कधी फुलले वगैरे दिसलेच नाही. एकदा तो भाजी का काय आणून देतो ते थेट नंतर कलकत्त्याला कारमधेच दिसले ते
तेथे चौकात भानू व इतरांना दुसर्या गाडीत ते दिसतात. तेथे एक ज्याला आपण "डायरेक्शन" म्हणतो तसे आहे. सिग्नल सुटल्यावर भानूची व भाभीची गाडी वेगवेगळ्या रस्त्याने जातात.
माधवनचा समानतेबद्दल क्लॅरिटी येण्याचा प्रवास मला बिलिव्हेबल वाटला. तो शेवटी तिला मी भानूसारखाच आहे म्हणतो. पण प्रत्यक्षात तो वेगळा आहे. समानतेबद्दल झेन लेव्हल नॉलेज सगळे जन्मापासून घेउन येत नाहीत. पण आपले बिलिफ्स तपासायची व ते बदलायची तयारी असलेले लोक टिपिकल पुरूषसत्ताक विचाराच्या लोकांपेक्षा तर चांगले आहेतच पण इव्हन स्वतःला ऑलरेडी लिबरल समजणार्या पण विचारांबद्दल आडमुठ्या लोकांपेक्षाही कधीही बरे. हे केवळ स्त्रीपुरूष समानतेबद्दलच नव्हे, तर कोणत्याही अन्यायकारक प्रथा/समज/चालीरीतींबद्दल खरे आहे.
कारण अशा लोकांशी तुम्ही संवाद साधू शकता. आणि त्यांना तु.क न देता चुका दाखवून देऊनच असे बदल होतात. बाकीचे पब्लिक आपण ऑलरेडी बरोबर आहोत या समजात राहतात व कधीही बदलत नाहीत. ते बोलले तर दुसर्याला तो/ती कसे चूक आहेत हे दाखवून देण्यावर जास्त भर असतो. हा संवाद कसा असू नये याचे अगदी चपखल उदाहरण "दिल धडकने दो" मधला फरहान व राहुल बोसचा सीन आहे. त्यातील फरहानचा मुद्दा बरोबर असला, तरी प्रत्यक्षात असा संवाद झाला तर त्यातील राहुल बोस त्यातील फरहानचे त्यानंतर काहीही ऐकणार नाही. तेव्हा ऐकणार्याला एलियनेट न करता असे संवाद व्हायला हवेत. आप जैसा कोई मधे कोणी तिसरा माणूस हे सांगत नाही तेव्हा तो सीन व यातले सीन यांच्यात तुलना होणार नाही. यात फातिमा व त्या भाभी त्यांच्या स्वत:बद्दलच बोलत असतात. पण त्याही प्रीची नाहीत -स्वतःच्या संदर्भातच बोलतात. त्यामुळे माधवनच्या ते लक्षात येते हे पटण्यासारखे वाटते.
आप जैसा वरच्या पोस्टी
आप जैसा वरच्या पोस्टी वाचायच्या राखून ठेवलेल्या आहेत.
फा, दुर्गापूजा नवरात्रात
फा, दुर्गापूजा नवरात्रात म्हणजे अश्विन महिन्यात तर सरस्वती पूजा वसंत पंचमीला म्हणजे माघ महिन्यात असते. माघी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी. विठ्ठल रखुमाईचं लग्न त्या दिवशी असतं.
थँक्स अनया. दुर्गापूजेबद्दल
थँक्स अनया. दुर्गापूजेबद्दल माहीत होते पण वेगळा एक सरस्वतीपूजेचाही समारंभ असतो हे माहीत नव्हते. आपल्याकडे दसर्याला सरस्वतीपूजन असते त्यापेक्षा बंगालमधे वेगळे दिसते. रत्नागिरीला माघी गणपतीच्या वेळेस "गणेशोत्सव" पाहिला तेव्हा असेच आश्चर्य वाटले होते.
आप जैसा वरच्या पोस्टी
आप जैसा वरच्या पोस्टी वाचायच्या राखून ठेवलेल्या आहेत. >>> मी ही. वीकेंडला पाहायचा प्लान आहे.
फा, दुर्गापूजा नवरात्रात म्हणजे अश्विन महिन्यात तर सरस्वती पूजा वसंत पंचमीला म्हणजे माघ महिन्यात असते.
>>>
आपल्याकडे जसं दसऱ्याला मुळाक्षरं गिरवून घेतात तसं वसंत पंचमीला बंगालमध्ये करतात. पिवळे कपडे घालतात. लहान मुलींसाठीही छान पिवळ्या साड्या मिळतात त्या दरम्यान.
अगदी खरं सांगायचं, तर मलाही
अगदी खरं सांगायचं, तर मलाही आत्ता आत्तापर्यंत माहिती नव्हतं. महाराष्ट्रात विशेष गवगवा नसतो. त्यातून 'चैत्र, वैशाख वसंत ऋतू ' हे डोक्यात पक्कं असल्याने ही कुठली वसंत पंचमी? असं वाटायचं. पण उत्तरेकडे, बंगालमध्ये मोठा सण असतो. पिवळे कपडे घालून पतंग उडवतात वगैरे. पाकिस्तानल्या पंजाब प्रांतात सरकारने ह्या उत्सवावर बंदी घालायचा प्रयत्न केला, पण लोकांनी ऐकलं नाही, असं वाचलं होतं.
तेव्हा मोहरीची शेतं पिवळ्या फुलांनी नटलेली असतात, म्हणून आपणही पिवळे कपडे घालायचे.
ओह थँक्स. पिक्चरमधेही त्यांनी
ओह थँक्स. पिक्चरमधेही त्यांनी पिवळे कपडे घातले होते
मस्त माहिती सरस्वतीपूजेची.
मस्त माहिती सरस्वतीपूजेची. मलाही आपल्याकडची पाटीपूजा आठवली होती.
मस्त पोस्ट फा. काही निरीक्षणे मी पाहताना सुटली होती व लिहायची राहून गेली ती नोंदवली आहेस. आता सगळं कव्हर झाल्यासारखं वाटलं.
'दिल धडकने दो' सुद्धा भारी आहे. त्यातही 'मी तिला अलाऊ केले आहे' असे म्हटले आहे. ते कॅरेक्टरही MCP असून 'ग्रोथ माईन्डसेट' नसलेले आहे. 'आप जैसा कोई' मधेही मोठा भाऊ 'आताही क्षमा माग, मी स्विकारेन तुला' असं म्हणतो. दोन्ही रिजिड/ क्लोजड माईन्डसेट MCP. माधवन 'ओपन फॉर न्यू आईडियाज', विचार करू शकणारा व आपापले भानही असलेले पात्र आहे. अशा गटात बरेच पुरुष येतील, जेथे समानतेला वाव आहे. पहिले दोघे मात्र पुरुषी अहंकार घेऊन वावरणारे आहेत. माधवन बाबत - अगदी समोरच घडलेलं असल्याने, भावाच्या काही गोष्टी त्यालाही पटत नसल्याने, वहिनीबद्दल खरोखरच जिव्हाळा/ आपुलकी असल्याने ते त्याला समजून घेता आले असे बघताना वाटले. विचार बोलून पटवण्यापेक्षा तो अनुभव अधिक बदल घडवणारा असतो. तेही अगदी लाऊड न दाखवता आधी ग्रॅज्युअली- मग सटल असं स्थित्यंतर वाटलं.
चाशणी -चाचणी म्हणजे साखरेचा पाक. चांदणीका चूरा, चाशणी का भुरा- गोड आणि सौम्य - शीतल आहे मधू.
विकी डोनर आणि पिकू दोन्हीतलेही बंगाली स्टिरिओटाईप्स आवडले होते.
अनया छान माहीती.
अनया छान माहीती.
अनया त्यावरच अमीर खुसरो ची
अनया त्यावरच अमीर खुसरो ची सकल बन फूल रही सरसो आहे (हिरामंडी मध्ये घेतलेली). त्यात वसंत ऋतू बद्दल आहे वर्णन.
स्वतःला स्थळ म्हणून आलेल्या
स्वतःला स्थळ म्हणून आलेल्या मुलीची माहिती काढायला स्वतःचाच विद्यार्थी (त्यातूनही असा जो मुळातच टिचरची टर उडवणारा वगैरे आहे) कोण घेऊन जातं?
पंधरा मिनिटात बंद केला आप जैसा कोई.
बसंत पंचमीचा उल्लेख आणि
बसंत पंचमीचा उल्लेख आणि पिवळी वस्त्रं परिधान करून ती साजरी करतात ही संकल्पना पहिल्यांदा रेखा आणि शेखर सुमनच्या 'उत्सव' मध्ये पाहिली होती.
पाकिस्तानात आणि वायव्य सरहद्द
पाकिस्तानात आणि वायव्य सरहद्द प्रांतात वगैरे बसंत पंचमीला जश्न ए बहारा म्हणतात. आपल्या संस्कृत साहित्यातली वसंतपंचमी आणि हे कनेक्शन मला जास्त गोड वाटलं.
आधी ‘कहने को जश्न ए बहारा’ गाणं म्हणजे नुसतीच उपमा वाटायची.
तिकडे खूप दिवस पतंगबाजी वगैरे करतात.
‘रुत आ गयी है’ गाण्यात पतंगबाजी, सरसों दाखवलं आहे.
अरे! भारी कनेक्शन जश्न ए
अरे! भारी कनेक्शन
जश्न ए बहारा
आता दरवेळी ऐकताना हे आठवेल.
'सकल बन' आणि 'जश्ने बहारा'
'सकल बन' आणि 'जश्ने बहारा' दोन्ही आवडले. असं काही कनेक्शन लागलं की उगाच गुदगुल्या होतात.
पाकिस्तानात आणि वायव्य सरहद्द
पाकिस्तानात आणि वायव्य सरहद्द प्रांतात वगैरे बसंत पंचमीला जश्न ए बहारा म्हणतात >>> हे सिरीयसली माहीत नव्हते. धन्यवाद. मलाही तो जानेमन जानेजा सारखे जनरल पर्पज फिलर शब्द असतात तसा जनरल वाटायचा
मला हीरामंडी सिरीज अजिबात आवडली नाही पण त्यातले सकल बन चे चित्रीकरण फार सुंदर आहे.
आप जैसा कोई बद्दल अजून एक फन फॅक्ट: त्याच्या शेवटी अॅनिमेशन मधून कथा दाखवली आहे. त्यात एक रेल्वे दाखवून "कोलकाता" हे स्टेशनही दाखवले आहे. हे कोणते नवीन स्टेशन आले असे आधी वाटले मला. कारण कलकत्ता/कोलकाता नावाचे स्टेशन कधी ऐकले नव्हते . कलकत्त्याची हावडा आणि सिअॅल्धा ही दोन मुख्य स्टेशने माहीत होती (मुंबई सीएसएमटी व मुंबई सेण्ट्रल सारखी). मग जरा चेक केले तर गेल्या काही वर्षांत खरोखरच एक "कोलकाता" नावाचे स्टेशन बनवले गेले आहे.
अर्थात या अॅनिमेशनमधला उल्लेख ढोबळ असावा. जमशेदपूर वरून येणारी गाडी बहुधा हावडा स्टेशनवर येईल. आगरताळ्याच्या गाड्यांचे माहीत नाही.
फारसी मध्ये बहा(हॉ)र म्हणजे
फारसी मध्ये बहा(हॉ)र म्हणजे वसंत.
मग जश्न ए - बहार म्हणजे
मग जश्न ए - बहार म्हणजे वसंतोत्सव असा अर्थ झाला. "वसंत पंचमी" कुठून आले ?
मला वाटलं वसंत पंचमीच्या
मला वाटलं वसंत पंचमीच्या दिवशी वसंतोत्सव होतो किंवा त्याचा आरंभ होतो म्हणून 'जश्न ए बहारा'. रंगपंचमी सारखे काही तरी.
मला कोलकाता स्टेशन नाही हेच माहीत नव्हते म्हणून दोनदा आश्चर्य वाटले.
आता मुंबई (बाँम्बे सेंट्रल)
आता मुंबई (बाँम्बे सेंट्रल) पण नसेल. त्याचा जनन्नाथ शंकरशेठ असं नामकरण होणारे म्हणे.
तसंही बॉम्बे सेंट्रल स्टेशन आहे पण मुंबई म्हटलं की बाहेरगावच्या माणसांना बाँम्बे सेंट्रल आठवलं तरी मुंबईच्या माणसाला व्हिटी किंवा चर्चगेटच दिसतं.
मुंबई म्हटलं की बाहेरगावच्या
मुंबई म्हटलं की बाहेरगावच्या माणसांना बाँम्बे सेंट्रल आठवलं>> बिहारी माणसांना LTT आठवत असेल. छपरा एक्सप्रेस तिकडेच येते ना
मला कोलकाता स्टेशन नाही हेच
मला कोलकाता स्टेशन नाही हेच माहीत नव्हते म्हणून दोनदा आश्चर्य वाटले >>>
बॉम्बे सेंट्रल स्टेशन आहे >>> आणि ते सेंट्रल रेल्वेचे नसून वेस्टर्न रेल्वेचे आहे हे एक आणखी बाहेरच्यांना गोंधळात टाकणारे.
तसेही महाराष्ट्रातून येणाऱ्या
तसेही महाराष्ट्रातून येणाऱ्या बऱ्याच गाड्या व्हीटीलाच येतात. त्यामुळे दिसणारे स्टेशन तेच असते. लहानपणापासून मुंबईला रेल्वेने जायचे तर व्हीटी हेच ऐकत आलो आहे.
फारसी मध्ये बहा(हॉ)र म्हणजे
फारसी मध्ये बहा(हॉ)र म्हणजे बसंत..>>>>
मग पतझड सावन बसंत बहार ह्या गाण्यात तिनच मौसम झाले की… की सामान्य प्रेक्षकांना काय कळतेय म्हणुन बसंत व बहार ठोकुन दिले????
ह्या चित्रपटात हे गाणे स्टेजवर जयाप्रदा व ऋषी कपुर गात असतात व पिटात बसुन शशी कपुर, तिचा नवरा पाहात असतो. गाणे संपवुन बाहेर पडल्यावर शशी लोकांच्या वाह्यात कमेंटी ऐकुन भडकतो आणि जयाप्रदाला घराबाहेर काढतो. हिं.चि. नियम क्र. अमुक तमुक प्रमाणे पुढच्याच प्रसंगात त्याच्या गैरसमजाचे निराकरण होते पण जयाप्रदा जाते ती जातेच.. नंतर सगळे म्हातारे झाल्यावर त्याला जप्रचा पत्ता कळतो. तिथे गेल्यावर तिथले दृश्य पाहुन तो परत एकदा गै स करुन घेतो. एखाद्या कुत्र्याची शेपटी वाकडी असेल तर ती किती वाकडी असावी??? म्हातारा झाल्यावर तरी सरळ करुन घे रे बाबा… नैतर तुझ्या आयुष्यात पतझडच राहायची कायम.
पतझड सावन बसंत बहार
पतझड सावन बसंत बहार
>>
अरे, मेजर साब मधे, विमल देवगण अन् सोनाली बेंद्रे च्या गाण्यात हेच शब्द परत वापरलेत
हो, पतझड़ हो या हो सावन, हो बसंत या बहार
तेरे रूप का नज़ारा देता मुझे क़रार
ना झटका के ज़ुल्फें फिराया करो
नज़र लग जाएगी
अकेली ना बाज़ार जाया करो
नज़र लग जाएगी
मला वाटलं वसंत पंचमीच्या
मला वाटलं वसंत पंचमीच्या दिवशी वसंतोत्सव होतो किंवा त्याचा आरंभ होतो म्हणून 'जश्न ए बहारा'
>>> मलाही असंच वाटलं. कारण वसंतोत्सव डेझिग्नेटेड दिवशी असायचा ना?
फारसी मध्ये बहा(हॉ)र म्हणजे बसंत..>>>>
फारसी लोकांच्यात बहार आने तक वाट पहायचा पेशन्स नसेल. म्हणून त्यांनी बसंतलाच बहार करून टाकलं.
ह्या चित्रपटात हे गाणे स्टेजवर जयाप्रदा व ऋषी कपुर गात असतात>>> बघितला आहे हा पिक्चर. पण थॅंकफुली हे गाणं सोडल्यास काही आठवत नाही.
पण थॅंकफुली हे गाणं सोडल्यास
पण थॅंकफुली हे गाणं सोडल्यास काही आठवत नाही.
शुरु करेंगे शुरु कर!
<<<<<
हेच ते योग्य निमित्त पुन्हा सिनेमा पाहून त्यावर लिहिण्यासाठी.
यात पिसे काढाया भरपुर मटेरिअल
यात पिसे काढाया भरपुर मटेरिअल आहे, सो कामाला लागा
Pages