तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत ते गाणंही चार दिवसांपूर्वी डोक्यात आलेलं, लिहिलं नव्हतं. आत्ताच्या माहोलच्या विरुद्ध म्हणून, पण छान आहे तेही गाणं. रखुमाईच्या दृष्टीने योग्य आहे.

देवाक काळजी, जीव गुंतला, आकाश पांघरोनी सर्व आवडीची गाणी.

आकाश पांघरूनी काही वर्षांपूर्वी रोज लागायचं आमच्याकडे, दोन बेसिक मोबाईल मुलासाठी त्याची आवडती गाणी घालून केलेले तो ऐकत बसायचा, सुमनची बरीच, आशा, लता, हृदयनाथ, अरुण दाते, श्रीधर फडके आणि हिंदीत फक्त किशोरकुमार. विशेष काही समजत नसलं तरी लेकाची गण्यातली आवड फार उच्च दर्जाची वाटते वैयक्तिक मला.

रखुमाईच नव्हे, विठ्ठलभक्तांसाठीही.

विक्रय चाले देवपणाचा , राहायचे मग इथे कशाला?

हम्मम खरं आहे, सगळीकडे तसं आहे. पंढरपूरला अति पूर्वी लग्नाआधी एकदाच गेलेले, ते ही गर्दी वगैरे कमी असताना त्यामुळे त्यावेळी चांगला अनुभव आलेला.

शेगाव, अक्कलकोट इथे मात्र भक्तांना चांगले अनुभव येतात, मी तिथेही लग्नाआधीच गेलेले, प्रसन्न वातावरण होतं, सध्या फक्त ऐकून लिहितेय.

श्रीरामपूरला असताना शिर्डीत गर्दी, विशिष्ट दिवस टाळून जायचो त्यामुळे चांगला अनुभव आला, नाहीतर माझ्या बाबांनी मला सांगून ठेवलेलं, घरी बसून नमस्कार कर कारण मी त्यांना गुरू मानते, शिर्डीत गर्दीत वगैरे सोसासोसाने जाऊ नकोस.

माऊंट मेरी दर्शनाला पूर्वी गेलेलो दोनदा, तिथेही तसंच. तिथे पहिल्यांदा कुतूहल म्हणून गेलेले, दुसऱ्यांदा सार्थकच्या आत्याने सांगितलं म्हणून गेलेलो, तसंच सर्व, बजबजपुरी.

एनिवे फार अवांतर झालं.

चला यावरून गाणं लिहिते

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी.
देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई.

फार सुरेख अर्थपूर्ण गाणं आहे हे.

सकाळी उठले की कॉफी घेताना - प्रभात झाली स्वरुपनाथा - शमिका भिडे
.
उदारा जगदाधारा - शमिका भिडे
अन्जू यु विल लाईक. तुला आवडेल खात्री आहे मला.

>>>>>फार सुरेख अर्थपूर्ण गाणं आहे हे.
ऐकते.

ऐकते नक्की सामो.

आठवलं, सुरेख आहे. माझा एक स्कुल फ्रेंड स्वामी स्वरूपानंद संप्रदायातला आहे, त्याने खूप मागे स्कुल grp वर शेअर केलेलं. प्रसन्न वाटतं खरोखर, विसरून गेलेले, आज तू परत आठवण करून दिलीस.

Happy तुला आवडले ऐकून छान वाटले.
त्यांची 'सोहम' उपासना आहे. किती अवघड असेल. मला तरी निर्गुण उपासना फार अवघड वाटते. सगुण, साकार आवडते.

मला एवढं समजत नाही सामो. छान अभ्यास आहे तुझा. दुसरीकडे कुठे सोप्या शब्दात समजावून सांगशील का, विपुत लिहिलंस तरी चालेल.

माऊलीच्या भेटीसाठी आतुरला जीव,
विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव.

तुज काय देऊ सावळ्या मी खाया तरी,
मी दुबळी बटीक नाम्याची जाण श्रीहरी.
उच्छीष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी,
तू जगन्नाथ तुज देऊ कशी रे भाकरी.
नको अंत मनी रे पाहू सख्या भगवंता, श्रीकांता
मध्यांनरात ही झाली आण चित्ता,
जा होईल तुझा रे काकडा नी राऊंळांतरी,
आणतील भक्त नैवेद्यही नानापरी.
तुज काय देऊ सावळ्या मी खाया तरी,
मी दुबळी बटीक नाम्याची जाण श्रीहरी.

पहिले गाणं आणि दुसरं संत जनाबाईचं पद.

दुनिया ज़माने से रिश्तें मिटाए हैं
तुझ से ही यारी हैं हमारी, एक बार तो आ
मैंने निभाया हैं, करके दिखाया हैं
ले तेरी बारी, इक वारी तू भी प्यार निभा
तू भी प्यार निभा, ओ यारा

तेरी बेरुख़ी से हैं बड़ी, उम्र इंतज़ार की मेरी
के मारेगी ज्यादा मुझे मौत से, नाराज़गी तेरी

क्यों इतना हुआ हैं तू खफ़ा? हैं ज़िद किस बात की तेरी?
के मारेगी ज्यादा मुझे मौत से, नाराज़गी तेरी

जां निसार हैं, जां निसार, तेरे प्यार पे मेरे यार

अमिताभ भट्टाचार्य, अमित त्रिवेदी आणि अरिजित ही या काळातली टॅलेंटेड टीम आहे. यांची गाणी हळू हळू भिनत जातात मनात.

ना उरली भवभयचिंता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे, तनमनात झरली गाथा

तू कळस तूच रे पाया
मज इतुके उमजुन जाता
राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता

लोचनात त्रिभूवन अवघे
लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय

या गाण्याचा रेको यूट्यूबवर आला. अजय अतुलचे विठ्ठलावर गाणे म्हणून ऐकायची इच्छा नव्हती. कारण 'माऊली माऊली' नंतर अजय अतुल परत काही त्या लेव्हलचे बनवू शकतील याबद्दल खात्री नव्हती. पण हे गाणे ऐकून सुखद धक्का बसला. नुसता मुखडा आणि पहिले कडवे हे स्वतंत्र गाणे म्हणून छानच आहे. पण दुसऱ्या कडव्यात त्याला माऊलीमध्ये सुरेख ब्लेंड केले आहे. एक नवी कलाकृती म्हणून हे गाणे मला आवडले.
अजय अतुलचा आसमंत भरून टाकणारा पखवाज, शंख, टाळ, कोरस आणि यावेळी सोबत व्हायोलिन्स आहेत. क्षितिज पटवर्धनचे शब्दही सुयोग्य आहेत.

छान वाटतंय. जरूर ऐकेन.

आज माझ्या डोक्यात वेगळंच गाणं.

नकळता असे ऊन मागून येते,
सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते.

माऊलीचे हे गाणे ऐकले नव्हते.. किंवा ऐकले तरी लय भारी माऊली गाण्याचेच वर्जन वाटले असावे. छान आहे हे सुद्धा.
बाकी माऊली गाण्याला तोडच नाही. पूर्ण गाणे अंगावर शहारा येतो. पुन्हा पुन्हा ऐकताना येतो. ऑल टाईम रिपीट मोड गाणे आहे.

लेकीच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात वेगवेगळे राज्यांची थीम असताना महाराष्ट्र राज्याचे हे गाणे घेतलेले तेव्हा आपल्याच राज्याचे गाणे लय भारी असे वाटले होते.

ये दिल और उनकी निगाहों के साये
मुझे घेर लेते हैं बाहों के साये

पहाड़ों को चंचल किरण चूमती है
हवा हर नदी का बदन चूमती है
यहाँ से वहाँ तक हैं चाहों के साये
ये दिल और उनकी निगाहों के साये

लिपटते ये पेड़ों से बादल घनेरे
ये पल-पल उजाले, ये पल-पल अंधेरे
बहुत ठंडे-ठंडे हैं राहों के साये
ये दिल और उनकी निगाहों के साये

गीतकार : जां निसार अख्तर,
गायक : लता मंगेशकर,
संगीतकार : जयदेव,
चित्रपट : प्रेम परबत (१९७३)

सच्चा, माझे अतिशय आवडते गाणे.
लताचा अप्रतिम गोड आवाज, नुकत्याच प्रेमात पडलेल्या एका नवथर तरुणीचे भाव व्यक्त करणारे निर्व्याज शब्द आणि स्वर्गीय संगीत.
एखादी कलाकृती अशी जमून जाते!

वाह फार सुंदर गाणे व चित्रिकरणही.
>>>>यहाँ से वहाँ तक हैं चाहों के साये
खरच प्रेमात पडल्यावर असेच दिसते.

रिमझिम गिरे सावन...
पावसाळ्यात दरवर्षीच खूप वेळा पाहते हे गाणं.
ह्याची चाल, लता किशोर यांचा आवाज, अमिताभ मौसमीचा अभिनय, मुंबईचा धुवाधार पाऊस , साऊथ मुंबईतील परिचित, प्रेमात पाडणारी लोकेशन्स ह्या पैकी सर्वात काय आवडतं सांगू नाही शकत पण गाणं खूप आवडतं.

ये दिल और उन की निगाहों के सायें, रिमझिम गिरे सावन दोन्ही गाणी आवडतात.

निगाहों के सायें ही कन्सेप्टच किती भारी आहे.

कच्चे धागेचं गाणं तसं आवडतं. पण ते पैंदा है नाही आवडत.

प्रेम परबत (१९७३), हा चित्रपटगृहात झळकालाच नाही, कारण वितरित होण्याच्या आधीच चित्रपटाची प्रिंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, परंतु चित्रपटाची गाणी विविध भारतीवर प्रसारित झाली असल्यामुळे आजपर्यंत ऐकता येतात. यू ट्यूबवर हे गाणे वेगवेगळ्या चित्रपटातील पार्श्वभूमीवर उपलब्ध आहे. जास्त करून मधुमती चित्रपटातील "आ जा रे, मैं तो कब से खड़ी इस पार" या गाण्याच्या चित्रीकरणावर "ये दिल और उनकी निगाहों के साये" चे बोल लावले आहेत.

ये दिल और उनकी निगाहों के साये - लता दीदींचा आवाज अगदी चपखल आहे. कुठेही किंचीतही स्वरांवरची पकड कमी जास्त झालेली नाही. ही स्वर्गीय अनुभूती शब्दात मांडता येणे अशक्य आहे.

अवांतर : जां निसार अख्तर म्हणजे जावेद अख्तर साहेबांचे वालिद

https://www.youtube.com/watch?v=FrKDafA-ZpY&list=RDGZQlcwUIUYQ&index=6
पुन्हा एकदा नूर जहान
तुमची मदत पाहिजे आहे. ह्या चित्र फितीच्या शेवटी दोन गायक हेच गाणे गात आहेत. हे गायक कोण आहेत? जाणून घ्यायची इच्छा आहे.

Pages