तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केकू मस्त आहे ते गाणे. पहील्यांदा ऐकले.>>>> तुम्ही पिक्चर बघितला नाहीये का?
ही घ्या लिंक.
https://www.youtube.com/watch?v=jf2gOSORoqU
माझ्या मते the बेस्ट movie.
बर्फी ही तोडीं तोड आहे पण त्यात खूप अफरातफर आहे,

Do re me
Sound of music 1965
Beautiful

Do re me
Sound of music 1965
Beautiful

Do re me
Sound of music 1965
Beautiful

Do re me
Sound of music 1965
Beautiful

Do re me
Sound of music 1965
Beautiful

Do re me
Sound of music 1965
Beautiful

The dream journey
नावाचा अल्बम. अप्रतिम आहे.

The dream journey
नावाचा अल्बम. अप्रतिम आहे.

लेकिनमधलं केसरिया बालमा
पहिलाच केसरिया असा लागला आहे की आपण वशीकरण झाल्यासारखे भारून जातो. तबला, घुंगरू आणि सारंगीची मिनिमल साथ घेऊन आवाज झळाळत जातो. एरवी लताबाई एखाद्या कसलेल्या ट्रॅपीझ आर्टीस्टसारख्या एका सुरावरून दुसऱ्या सुरावर अलगद झोका घेतात. पण या गाण्यात कडव्यांच्या मध्ये त्या मुद्दामहुन पॉज घेतात. कडव्यांची चाल अतिशय अनवट आहे. आणि या पॉजेससोबत सामान्य माणसाने ते म्हणायचा प्रयत्न केला तर रेल्वेचं टाईमटेबल वाचतो आहे असं वाटेल. केवळ लताबाई त्याला पद्याचं स्वरूप देतात.

दुसरं म्हणजे आपल्या गाण्यात श्वासांचा आवाज येऊ न देण्यासाठी लताबाई प्रचंड नावाजल्या जातात. कित्येक गायक गायिकांनी यासाठी त्यांच्या गाण्याच्या शैलीचा अभ्यास केला आहे. पण या गाण्यात विशेषतः दुसऱ्या कडव्यात बाई बारीकसा श्वासाचा आवाज येऊ देतात आणि लगेच त्यात घुंगराचा आवाज ब्लेंड होतो.
त्यांनी लेकीननंतरही गायन केले आहे. त्यात आवाज जाड झालेला जाणवतो. पण श्वासांचा आवाज कधी आला नाही. किंवा त्याच पिक्चरमधल्या इतर गाण्यांतही तो येत नाही. त्यामुळे वयामुळं हे झालं असेल असं वाटत नाही. हे मुद्दाम केलेलं आहे आणि परिणाम अत्यंत सुंदर आहे. ईअरफोन लावून ऐकून बघाच आणि सांगा काय वाटलं ते.

माझेमन, तुम्ही खूप उत्कटतेने लिहीलेले आहे आणि तुम्हाला गाणे आवडले ही फार आनंदाची गोष्ट आहे. सहसा मी नकारात्मक मत व्यक्त करायला कचरते कारण माबोवरची सरासरी प्रगल्भता. परंतु, तुम्ही आहात म्हणुन सांगायचे धाडस करते - लताबाईंचा आवाज हा लताबाईंचाच वाटतो आणि त्यात कोवळिकतेपेक्षा मला तो मॅच्योर वाटला आहे या गाण्यात. पहीली तान ऐकूनच बंद केले गाणे. इथे शोभा गुर्टु किंवा किशोरी आमोणकर अन्य कोणीही 'आवाजाचे अजीर्ण' न झालेल्या आवडल्या असत्या.
.
सारंगीचे सूर नेहमीच उदासवाणे वाटतात. ते आवडले.

मॅच्योर तर आहेच आवाज. ५० किंवा ६० च्या दशकातल्या लताबाईंचा नक्कीच नाही.
आणि तुम्हाला आवडले नाही तरी हरकत नाही. लोकांना आवडणारी कित्येक गाणी मलाही नाही आवडत.

Happy _/\_

धनश्री, मलाही केसरीया बालमा.. बद्दल तुझ्यासारखेच वाटते.
म्हणजे गाणे खूपच सुंदर आहे, पण नवथर प्रेयसीची कोवळीक नाही! लताबाई डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतात जणू गाताना....!!

अगं मॅच्योर आवाजही चालला असता कारण फक्त तरुण लोकांनाच विरहाचे दु:ख होते असे नाही. पण मला साक्षात लताबाई दिसू लागल्या म्हणजे मला तरी अजीर्ण झालय त्यांच्या आवाजाचं Sad

Pages