तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिप्स व तो लिव इन मध्ये होते कित्येक वर्षे. बिप्सने लग्न करुया म्हटल्यावर फिसकटले. जणु त्याला लग्न नकोच होते.
नंतर लगेच त्याने लग्न केले. बिप्सचे नंतर झाले बहुतेक. ती सुखी असावी, मुलगी आहे एक. तो तिचा नवरा जरा वेडसर दिसतो पण as long as he loves her and she has enough money to support both of them, how does it matters..

रुपाली, भट्ट कंपनीची पोस्टर्स भडकाऊ असत हे मात्र खरे, चित्रपट घातलेले पैसे वसुल करतील इतपत असत.

सामो क्या बात करते हो.. तुम्हाला जॉन माहीत आहे, बिपाशा माहीत आहे, पण त्यांची जोडी होती हे माहित नव्हते. मला तर आजही जॉन म्हटले की पहिले बिपाशा आणि बिपाशा म्हटले की जॉन आठवतो.

रुपाली हो, हॉट गुड लुकिंग, कोणी आसपास सुद्धा नाही.. मला तो त्याच्या साया, पाप या सुरुवातीच्या चित्रपटांपासून आवडला.. जिस्म चित्रपटाची बोल्ड अशी हवा झाल्याने तो तेव्हा मी सुद्धा घरी बघू शकलो नव्हतो. आजवर बघायचा राहिलाच आहे. धूम चित्रपट मात्र थिएटर मध्ये पाहिला आणि एखादी हॉलीवूड मूवी बघावी अशी फिलिंग आली ते जॉनमुळेच. इतका हँडसम गूड लूकिंग व्हीलन ही पद्धत नव्हती आपल्यात आणि जॉनपेक्षा भारी पर्याय नसावा. किंबहुना आजही नाहीये हे पठाणमध्ये त्याने दाखवले Happy

रुपाली , सामो, तुम्ही दोस्ताना नाही पाहिला?

<तो तिचा नवरा जरा वेडसर दिसतो पण as long as he loves her and she has enough money to support both of them, how does it matters..> टिप्पिकल काकुबाई कमेंट. त्यात इंग्लिशमधली व्याकरणाची चूक जी हल्ली शाळाकॉलेजात असलेली वा नुकतीच कॉलेज संपलेली मुलं मुली करतात.

भरत , दोस्ताना चित्रपट नाही पाहिला .. प्रदर्शित झाला तेव्हा खूप हवा होती चित्रपटाची .. जर जॉन बद्दल मत बदलणार असेल तर बघू की नको ह्या विचारात आहे.. अज्ञानात सुख असते म्हणतात .. ते सुख राहू द्यावं का बरं..?

सध्या करण जोहरचे AN UNSUITABLE BOY मराठीत अनुवादित 'खरं सांगायचं तर' हे आत्मचरित्र वाचत्येयं.. ' दोस्तानाचा' उल्लेख आहे त्यात..!

जॉन , बिपाशाला उचक्या लागत असतील एवढी आठवण काढलीयं दोघांची..!

आजची गीतं - कोरा कागज था मन मेरा, गुन गुना रहे है भँवरे, आराधना चित्रपट..!

आजही तेच गाणे चार प्रतिसादामागे लिहीलेलं..
उद्या १०० वर्षांचा होईल रफी.

आज मी रफीच ऐकतेय. जाग दिल ए दिवाना, वो ख़ुशी मिली है मुझको, ऐ वतन ऐ वतन आणि इतर असंख्य रिपीट मोडवर.....

जर जॉन बद्दल मत बदलणार असेल तर बघू की नको ह्या विचारात आहे..
>>>
ते वरचे मत म्हणत असाल तर ते अजून घट्ट होईल.
त्यात जॉनने थोडी मिसोगिरी केली आहे.
भरत त्या बद्दलच बोलत आहेत का याची कल्पना नाही.

सॉरी आजच झाला कि १०० वर्षांचा. मी २३ तारीखच समजत होतो.

@माझे मन पहिली दोन गाणी ओळखू येत नाहीत. ऐकल्यावर लक्षात येतील.

तू है तो दिल धडकता है
तू है तो सास आती है
तू ना तो घर, घर नही लगता
तू है तो डर नही लगता

साथिया तूने क्या किया ?
बेलिया ये तूने क्या किया ?
मैंने किया तेरा इन्तज़ार
इतना करो न मुझे प्यार

>>>>>साथिया तूने क्या किया ?
बेलिया ये तूने क्या किया ?
मैंने किया तेरा इन्तज़ार
इतना करो न मुझे प्यार

आहाहा!!! मस्त मस्त!!!

रेवतीसाठी हा पिक्चर मी आणि मैत्रिणीने थेटरात जाऊन बघितलेला. रेवती मला आवडते, सोबत सलमान खान होता. एन एस यांनी गाणं लिहिल्याने कॉलेजातली आठवण ताजी झाली.

टिप्पिकल काकुबाई कमेंट. त्यात इंग्लिशमधली व्याकरणाची चूक जी हल्ली शाळाकॉलेजात असलेली वा नुकतीच कॉलेज संपलेली मुलं मुली करतात>>>>>>

thank you.. माझ्या कमेंटमुळे तुमचा अर्धा तास चांगला गेला. अशाच काकुबाई कमेंट्स टाकत राहिन आणि व्याकरणाच्या चुकाही करत राहिन. तेवढेच तुम्हाला कामही मिळेल आणि तुमचे मनिरंजनही होत राहिल. परत एकदा thank you.

कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे...
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे...

हे गाणे मला फार आवडले.

काल हे गाणे 'आपकी फर्माइश' मध्ये ऐकले. आवडले.

https://www.youtube.com/watch?v=-u1YYyRmmsc

अक्सर इस दुनिया में अंजाने मिलते हैं
अंजानी राहों में मिल के खो जाते हैं
आँखों से बात होती है, धड़कन भी साथ होती है
कोई ना समझे ये इश्क की ज़ुबां
धीरे-धीरे से वो, दिल में बस जाते हैं
चोरी-चोरी से वो, दिल को चुराते हैं
फिर एक दिन वो बिछड जाते है

कितीदा नव्याने तुला आठवावे >> सुन्दर आहे हे गाणे. मला मेल व्हर्जन जास्त आवडते.
>>>>

+७८६
त्या गाण्याने पूर्ण पिक्चरचा मूड सेट केला आणि म्हणून मग पिक्चर सुद्धा आवडला

Pages