क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*...तर पुढचे तीन दिवस भारत या कसोटीत फेवरेट राहील.*
- विरुद्ध संघाचे 20 गडी बाद करण्याची क्षमता प्रत्यक्ष दाखवल्याखेरीज, कितीही धांवा केल्या तरी कसोटी सामना जिंकता येत नाही; ही क्षमता नसेल तर किती वेळ संघ फेवरीट होता याला माझ्या मते कांहीही महत्त्व नाही ! आपली गोलंदाजी आता प्रभावी ठरावी अशी आशा करणं हेंच महत्त्वाचं !!

का नाही होऊ शकत 20 फलंदाज बाद?

स्कोअर बोर्ड प्रेशर टाकता येईल, बझबॉल इगो दुखावता येईल, हवे तेव्हा ओवर अटेकिंग फील्ड सेट करता येईल, सहा बोलिंग पर्याय आहेत त्यात दोन स्पिनर म्हणजे वेगवान गोलंदाज फ्रेश ठेवता येतील, खेळपट्टी थोडीफार खराब होऊ शकते, कधी ढगाळ वातावरणात नवीन बॉल हलू शकतो, एखादे सेशन चार पाच विकेट जात कॉलॲप्स होऊ शकतो. शेपूट लवकर गुंडाळली जाऊ शकते. फलंदाज चुकीचे फटके मारू शकतात, गेल्यावेळी हातातले कॅच सोडले यंदा अविश्वसनीय पकडू शकतात.....
आणि सगळ्यात मोठी गोष्ट असते प्रेशर! ते एकदा आले की तुम्ही कितीही मोठे फलंदाज असाल, तुमचा खेळ बदलतो. थोड्या विकेट जाऊ द्या.. इंग्लंड फलंदाज सुद्धा टेस्ट होतील.
काढू वीस विकेट आपण Happy

उद्या एक विकेट आल्या आल्या गेली तर ३५० पर्यंत सुद्धा थांबतील किंवा गिल जडेजा सुंदर चांगल्या कंडीशनचा फायदा उचलून खेळले तर ४५०-५०० सुद्धा होऊ शकतात. <<
दोन्ही शक्यता लिहायच्या आणि काहीही घडलं तरी मी आधीच सांगितलेलं असं म्हणायचं.. वा. वा.. बेस्ट पाॅलिसी.

छान ना Happy
त्या आधीच हे लिहिले होते. ते सुद्धा वाचा
काल पंत बाद झाल्यावरची पोस्ट
-------
आता गिल ने मोठे शतक मारावे.
जडेजा आणि सुंदरने साथ द्यावी.
400 आकडा गाठावा.

मुळात तो अंदाज नव्हता. तर आशा होती.
सकारात्मक सोच होती.

आपले 200 धावात पाच विकेट आहेत तर मी असा विचार करतो की अजून असे तीन फलंदाज शिल्लक आहेत जे शतक मारू शकतात किंवा शतकी भागीदारी करू शकतात. अजूनही मोठा स्कोअर शक्य आहे.

तेच समोरच्याचे केवळ 2 बाद 200 झाले तर मी असा विचार करतो की आता पटकन दोन विकेट गेल्या तर 210 ला 4 होतील आणि लवकर गुंडाळायची आशा कायम राहील.

कधी इंग्लंड 200-5 झाले तर ते मी विचार करतो आता एक विकेट आणि शेपूट मध्ये घुसून 250-270 पर्यंत घेऊ यांना..
तेव्हा नाही असा विचार करत किंवा अशी पोस्ट लिहीत की अजून त्यांचे दोन फलंदाज आहेत जे स्कोअर 400 पार नेऊ शकतात वगैरे...

आशा इच्छा व्यक्त करणे आणि ती पूर्ण झाल्यावर आनंदित होणे इतकेच म्हणून बघा.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्याला तसेच राहू द्या Happy

गेला गिल
8-9 विकेट चटचट गेल्या..
शेवटच्या जोडीने तरी त्यांना थोडे फ्रस्ट्रेट करावे खेळून.

*का नाही होऊ शकत 20 फलंदाज बाद?*
- मी असं म्हटलंय किंवा सुचवलंय तरी ? मुद्दा समजून घ्यावा चर्चा करताना !

पहिल्या कसोटीत आम्ही वीस विकेट घेणारच होतो. पण अंपायरने मधेच खेळ थांबवला त्यामुळे उरलेल्या पाच विकेट घेऊ शकलो नाही.

रेड्डी बहुतेक हा चेंडू सोडायचाच असं आधीच ठरवून खेळला असावा नि . बाद झाला तो चेंडू खरंच षटकारासाठी मोहात पाडणारच होता - .ह्या दोन्हीना अनुमोदन भाऊ. गम्मत म्हणजे रेड्डी त्याच्या नैसर्गिक कल बाजूला ठेवू खेळला तर पंत त्याच्या नैसर्गिक कलाने खेळला नि दोन्ही वेळा फासा आपल्या विरुद्ध पडला.

पहिली विकेट..
डकेट शून्यावर..
शुभमन गिल ..
स्लिप कॅच ने सुरुवात
आकाशदिप.. लेफ्ट हॅन्ड समोर राऊंड द विकेट भारी ठरतो नेहमी

याला बोलतात स्कोअरबोर्ड प्रेशर...
अब आयेगा मजा..
प्रेशर झेलणारा त्यांचा बेस्ट प्लेयर आता मैदानात आला

"भारताने 600-650 पार केले तर पुढचे तीन दिवस भारत या कसोटीत फेवरेट राहील. पण सामना जिंकेल असे नाही तर अनिर्णीत सुद्धा राहू शकतो. कसोटीत फेवरेट म्हणजे केवळ जिंकने नाही याचा अर्थ भारतीय संघानेच समजावला." अनिर्णित नाहि राहिला तर टायही होऊ शकतो. टाय नाही झाला तर हरूही शकतो. - पाचव्या दिवशी मी हे भाकित, अंदाज कि आशा होती ही सोच डीक्लेअर करेन Wink

आकाशदिपने पहिल्या ओव्हरला 12 धावा खाल्या. बॉल पुढे टाकत होता. मागून पंत म्हणाला पीछे खेच. आणि त्याने पुढच्या ओव्हरला तेच केले. दोन विकेट आल्या

या गोष्टी हायलाइट्स मध्ये समजत नाही

या गोष्टी हायलाइट्स मध्ये समजत नाही >> These two wickets were result of seam movement. He was direct like Shami; bustling in, seam upright, attacking the stumps. The two boundaries he went for were not errors in execution but a plan to pitch the ball up when it is new. That he kept going full tells you India didn’t mind the boundaries. गेस बॉलरला पण श्रेय द्यायला हरकत नसावी.

अंपायर कॉल.. अगदी काठावर.. वाचला ब्रूक.. द्यायला हवा होता हा अंपायरने

पण भारी काटा बॉलिंग टाकतोय सिराज..
आज काढणार अजून विकेट..

बॉलरला पण श्रेय द्यायला हरकत नसावी >>>> ते स्कोअरबोर्ड देतेच. जे त्यात देत नाही ते मी सांगितले. वर आकाशादीप केलेले कौतुक दिसले नाही का..

उलट तुम्ही लोकच गोलंदाजांना झोडपत होता इतके दिवस Happy काय तर म्हणे ७०० हवे यांच्यासमोर...

असो, मजा घ्या सामन्याची..
काय मस्त बॉलिंग चालू आहे

उलट तुम्ही लोकच गोलंदाजांना झोडपत होता इतके दिवस >> तू अल्टरनेट युनिव्हर्स मधे राहतोस बाबा जिथे पहिला सामना भारतीय बॉलर्सनी इंग्लंडला शभरमधे गुंडाळून जिंकून दिलेला आहे. आमचे जग वेगळे आहे.

जिथे पहिला सामना भारतीय बॉलर्सनी इंग्लंडला शभरमधे गुंडाळून जिंकून दिलेला आहे. आमचे जग वेगळे आहे.
>>>>>>>

चित्र काय आयुष्यभर असेच राहते का?
तुम्ही एका सामन्यातला परफॉर्मन्स बघितला मी पोटेन्शिअल बघितले. काय सुधारता येईल आणि ते शक्य आहे का हे बघितले.

जसे पहिल्या सामन्यात कॅच पकडल्या गेल्या असत्या तर गोलंदाजांसाठी सामना वेगळा असता...
किंबहुना आज सुद्धा कॅच सुटल्या असत्या तर...
असो..
मजा आली आज..
गेल्या सामन्यापासून मी जिथे तिथे या संघाला सपोर्ट करत आहे हेच मुद्दे घेऊन.. त्याचे आज सार्थक होतेय अशी चिन्हे आहेत. Happy

तीनचार मुद्दे मांडलेले बघा मी गेल्या पराभवानंतर...

1) फलंदाजी फॉर्मला आहे ती कायम राहणार .... आणि ती राहिली.

2) पाठीमागे डाव कोसळत आहे त्यासाठी संघ बदल होणार.
तो या सामन्यात झाल्यावर सुद्धा हे योग्य केले असे म्हटले होते.
..... आणि ते यावेळी कामात आले.

3) गोलंदाजीत स्लीप कॅचिंगच्या चुका टाळणार..
..... आज तीन विकेट आणि तीन उत्तम स्लीप कॅच बघायला मिळाल्या

4) सिराज चांगली गोलंदाजी टाकत होता पण विकेट नव्हत्या ज्यावेळी येऊ शकतात आणि प्रसिद्ध कृष्णा गेल्या सामन्यातील चुकातून शिकेल..
सामना पुढे जाईल तसे सुधारणा अपेक्षित. बघूया काय होते. मजा आहे उद्या सुद्धा इतके नक्की .. शुभ रात्री !

“ भारतीय फलंदाजांनी ते करून दाखवले ” - ह्याचं कौतुकच आहे. पण “ त्या आधीच हे लिहिले होते“ - ह्यात काय पॉइंट आहे तुझा?

चित्र काय आयुष्यभर असेच राहते का?
तुम्ही एका सामन्यातला परफॉर्मन्स बघितला मी पोटेन्शिअल बघितले. काय सुधारता येईल आणि ते शक्य आहे का हे बघितले. >> "मी पोटेंशियल बघितले" तू नक्की अजित आगरकर, गंभीर, गिल ह्यामधला नक्की कोण आहेस बुवा ? दोन्हीकडून बोलायचे नि मग त्यातले जे घडेल ते सोयीस्करपणे उचलून त्याचेच टुमणे जिथे तिथे ओढून ताणून आणत बसायचे. फेव्हरिट म्हणजे जिंकण्यासाठी फेव्हरिट नाही असे हास्यास्पद एकदा नाही तर सतत बोलून स्वतःचेच तुनतुणे सुरू ठेवायचे. कसला आनंद मिळतो ह्यातून हे देवच जाणे !

पहिल्या दिवशीही सकाळी नि संध्याकाळी बॉलिग क्लिक झाली होती. आजही तसेच झाले. उद्या सकाळी १-२ विकेट्स गेल्या तर धमाल येईल. विकेट्स गेल्या नाही तर ब्रूक्स नि रूट चंगळ करतील असे पिच आहे. शेवटच्या दोन दिवसांमधे पावसाचे भाकीत आहे . तसे झाले तरीही इंग्लंड त्यांच्या अ‍ॅग्रेसीव्ह अ‍ॅप्रोचला कमी करेल असे वाटत नाही. चेस करायला लागेल ते चेस करायचा प्रयत्न करतीलच. ह्याउलट आपण अगदी दीडशे दोनशेचा लीड मिळाला तर गंभीर - गिल विजयासाठी जातील कि हे बघणे इंटरेस्टींग असेल.

कुठल्या दोन बाजू
एकच बाजू घेत आहे
असो
पण आज मजा आली Happy

तू नक्की अजित आगरकर, गंभीर, गिल ह्यामधला नक्की कोण आहेस बुवा ?
>>>

मी एक सच्चा भारतीय क्रिकेट प्रेमी आहे.
इतके पुरेसे आहे मला Happy

“ उद्या सकाळी १-२ विकेट्स गेल्या तर धमाल येईल” - उद्या लंचपर्यंत जर रूट, ब्रूक, स्टोक्स च्या विकेट्स गेल्या तर भारत एकदम अ‍ॅडव्हांटेजियस पोझिशनमधे जाईल. पण तू म्हणतोस तसं, ते नाही झालं तर नंतर बराच घाम गाळावा लागेल बॉलर्सना.

एक गोष्ट गंभीरने चांगली केली. ह्या मॅचपुरता बघितलं तर भारताची बॉलिंग बेंच स्ट्रेंग्थ जबरदस्त आहे (बुमराह, कुलदीप, अर्शदीप) Wink Happy

भारताची बॉलिंग बेंच स्ट्रेंग्थ जबरदस्त आहे >> Lol

स्टोक्स सरळच म्हणतोय कि जिंकण्यासाठीच प्रयत्न करू. फक्त जरा बघावे लागेल असे एक शेपूट जोडले आहे. ब्रूक किंवा रूट पैकी एक जरी लवकर उडाला तर खरच दूध का दूध , पानी का पानी होऊन जाईल.

“ स्टोक्स सरळच म्हणतोय कि जिंकण्यासाठीच प्रयत्न करू.” -

शक्यता १) पुढच्या १८० ओव्हर्स ४.५ च्या रेटने खेळून भारतापुढे ३०० चं आव्हान ठेवून पाचव्या दिवशी भारताच्या १० विकेट्स काढून इंग्लंड जिंकू शकतं.

शक्यता २) ७० ओव्हर्समधे ३०० रन्स करून डिक्लेअर करून, पुढच्या ५० ओव्हर्समधे भारताचा ऑल-डाऊन करून उरलेल्या दीड दिवसात ३५०-४०० चं टारगेट चेस करून इंग्लंड जिंकू शकतं.

अश्या अनेक शक्यता निघू शकतात. पण ह्यातली दोन महत्वाची गृहीतकं म्हणजे इंग्लंडची बॅटिंग दोन्ही इनिंग्ज मधे क्लिक होईल आणि भारताची बॅटिंग दुसर्या इनिंगमधे अयशस्वी ठरेल. हे सगळं अशक्य नसलं तरी खूप अवघड आहे.

इंग्लंडची बॉलिंग इतकीही भेदक वाटत नाहीये कि भारताची बॅटिंग दुसर्या डावात गुंडाळली जाईल. बॅझबॉलची डाऊनसाईड म्हणजे इंग्लंडमधे तयार होणारी फ्लॅट पीचेस - आणि त्यावर भारतीय बॅटिंगला सुद्धा तितकीच संधी मिळू शकते. पण इंग्लंड ह्या अ‍ॅप्रोचने खेळले तर मॅच इंटरेस्टिंग होईल.

Pages