Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
बट फॉर द ग्रेटर गुड असं समजून
बट फॉर द ग्रेटर गुड असं समजून काकू पाजीला "सॉरी बोल" म्हणाल्या नाहीत.

काय अभ्यास काय अभ्यास' आधीच म्हणून ठेवत आहे
>>
धन्स
या अभ्यासाची परीक्षा असती तर....
फस्सक्लास दाभाडे बघितला.
फस्सक्लास दाभाडे बघितला. आवडला.
तीनही भावंडांचं काम केलेले कलाकार आवडतात. अमेय वाघचं कॉमेडी टायमिंग आवडलं. त्याला कॉमेडीतले आणखी चांगले चांगले रोल मिळायला हवेत.
हेमंत ढोमेलाही चांगला कॉमेडी सेन्स आहेच.
निवेदिता जोशीचा मेक-अप मात्र अजिबात आवडला नाही. काहीतरी गंडलंय तिच्या पडद्यावरच्या अवतारात.
इथे च गुलाबी आंखे च निरुपण
इथे च गुलाबी आंखे च निरुपण चाललेलं ना?
https://www.instagram.com/reel/DLC6Gnlo6wP/?igsh=ZjFkYzMzMDQzZg==
या स्टोरीवर सुंदर चित्रपट बनू
.
जे पी दत्ताच्या बॉर्डर मधे
जे पी दत्ताच्या बॉर्डर मधे दाखवलेलं साफ खोटं आहे - एअर मार्शल ( रिटायर्ड) ए एस बावा यांचा खुलासा
https://www.youtube.com/watch?v=DaYpFPM1FvY
Stolen पाहिला prime वर. मस्त
Stolen पाहिला prime वर. मस्त आहे. अभिषेक बॅनर्जी आहे यात तो आवडतो त्याच्यामुळे पाहिला. चांगला आहे. सगळ्यांची acting जबरदस्त>> +११११ खूप छान आहे. व्यक्ती कशा मुळातून चांगल्या असतात & चांगुलपणा बाहेर यायला १ क्षण पुरतो, हे चांगले दाखवलेय.
भुल चूक पाहिला, नाही आवडला. आजकाल कुठल्या विनोदावर हसू का येत नाही कळेना झालय. माझंही अस्मिता सारखंच चिडी मूड लागला. कमवत नाही काही नाही आणि ह्याला ग्फ्रे च्या जिवावर लग्न करायचय, काही महत्वाकांक्षा नाही पण दील सच्चा म्हणुन मुलीचा बाप ही लग्न लाऊन देतो. कहिही.वामिका खुफिया, जुबिली & ग्रहण मधे जबरदस्ट काम करते. ह्यात तिला काही वाव च नाही, पण मेनस्ट्रीम मधे टिकून राहायला म्हणुन हा रोल केला असावा.
खूप च बारीक दिसतेय.. ग्रहण मधे बोलका चेहरा सुंदर डोळे. चोरी चोरि हुआ हे गांण नक्की बघा, प्रेमात पडायला होईल.
हसी तो फसी , प्राईम
हसी तो फसी , प्राईम
नाव आणि कलाकार पाहता पटकन बघावे असे न वाटल्याने कधी ट्रेलर सुद्धा पाहिला नव्हता.
पण मध्यंतरी लेकीने एक ट्रेडिंग रीळ बनवले होते.. त्यात sarsarahat, sansanahat, Gudgudahat, dagmagahat, farfarahat, thartharahat, Kapkapahat, bharbharahat, dabdabahat, chhatpatahat, fadfadahat
Sugbugahat, kulbulahat, gudgudai, chilmilaai, chull... असे लांबलचक वाक्य छान चालीत होते. ते नक्की कुठून आले याचा शोध घेता या पिक्चर पर्यंत पोहोचलो. काहीतरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटले म्हणून बघितला आणि आवडला.
परिणीता येडचाप चाळे करणारी आईनस्टाईन बुद्धीची मुलगी दाखवली आहे. जी आपल्याच घरात चोरी करून आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायला पळून गेली आहे. सात वर्षांनी पुन्हा उगवते ते आपल्याच घरात अजून एक चोरी करायला. जेव्हा तिच्या बहिणीचे लग्न सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ठरले असते. पण ही त्यालाच आपल्या प्रेमात पाडते.
शेवट काय होणार हे आपल्याला माहीत असतेच. पण तरी हळूहळू पिक्चर पुढे सरकतो आणि तिचे वेडगळ वागणे सुसह्य होऊ लागते तसे चित्रपटात इंटरेस्ट वाढतो. म्हणजे माझे असे झाले. पुढे काय होणार हे माहीत असूनही ते कसे होणार याची उत्सुकता वाटून राहते तेव्हा पिक्चर मला आवडतो. हा सुद्धा आवडला.
टुरिस्ट फॅमिली... हॉट स्टार
टुरिस्ट फॅमिली... हॉट स्टार .. हिंदी डब
बरेच चांगले ऐकलेले
तितकाच चांगला पिक्चर आहे
फार आवडला
श्रीलंकन रेफ्यूजी फॅमिली भारतात येते. आणि शेजारपाजारच्यांची मने जिंकून कायमचे भारतातच राहते.
इतकीच स्टोरी आहे.
लॉजिक नाही तर मॅजिकवर विश्वास ठेवत असाल तर नक्की आवडेल
आणि हो, वर्जिनल भाषेत बघायला जास्त मजा येईल असे वाटते. कारण बराच भाषेचा खेळ आहे. पण आता आपल्याला ती भाषाच समजत नसल्याने पर्याय नाही.
Beautiful Mind
Beautiful Mind
थोड्याशा अनिच्छेनेच बघायला सुरूवात केली होती.
बायोग्राफी प्रकाराचा जरा जास्तच ओव्हरडोस होतोय असे वाटत असल्याने. पण हा पिक्चर अपवाद ठरतोय. एकाच वेळी आपल्याला तटस्थ निरीक्षक म्हणून अंतरावर ठेवतानाच काही वेळा जॉन नॅशच्या स्वतःच्या शोधाच्या या प्रवासात सहप्रवासी म्हणून सामील ही करून घेतो हा सिनेमा. कथानायकाबद्दल आधी काहीच माहिती नव्हतं ही जमेची बाजू ठरते कधी कधी. तसं झालं आहे. आटा शेवट कसा करतील एव्हढाच विचार आहे.
टूरिस्ट फॅमिली आईला आवडला. वेळ मिळाला तर बघणार आहे. माझी बकेट लिस्ट नुसतीच भरून वाहते , तिला मुहूर्त लागत नाही.
हसी तो फसी छान आहे, वेगळी कथा
हसी तो फसी छान आहे, वेगळी कथा आहे.. सर्व रोझी नाही. हीरो पण स्ट्रगलींग दाखवलाय.
मला दिल धडकने दो, कपूर & सन्स, गूड न्युज, तुम्हारी सुलू, डियर जिंदगी हे ही आवडलेत. १ पेक्षा जास्त वेळा पाहिलेत.
ब्युटिफुल माईंड - पहायचे
ब्युटिफुल माईंड - पहायचे धैर्य झालेले नाही.
-----------------------
फाईंडिंग निमो, फ्रिकी फ्रायडे दोन्ही पाहीले. परत पाहीले. फाईंडिंग निमो - एव्ह्ह एव्ह्ह एव्हरग्रीन.
पहायचे धैर्य झालेले नाही. >>
पहायचे धैर्य झालेले नाही. >> असं होतं खूपदा. कदाचित नंतर ट्राय करता येईल.
>>>>कदाचित नंतर ट्राय करता
>>>>कदाचित नंतर ट्राय करता येईल.
होय रानभुली
ब्युटीफुल माईंड पाहिलेला आहे
ब्युटीफुल माईंड पाहिलेला आहे
फार आवडलेला
नंतर केव्हातरी शटर आयलंड पाहिला होता
तेव्हा हादरायला झालेलं.
आणि ब्युटीफुल माईंड आठवला.
झकासराव,
झकासराव,
चिकवा वर उल्लेख झाल्याची आठवण आली होती. कुणाची पोस्ट ते लक्षात नाही.
नेटफ्लिक्सवरचा US कोणी
नेटफ्लिक्सवरचा US कोणी पाहिला का? कसा आहे?
मी सहज दिसला म्हणून काल
मी सहज दिसला म्हणून काल नेफ्लि वर क्रेझी स्टुपिड लव पाहिला. जुना आहे तसा. लाइट रोमॅन्टिक कॉमेडी बघायला मजा आली. अॅक्टर्स चांगले आहेत सगळे, स्टीव कॅरल, ज्युलिअॅन मूर, रायन गॉसलिंग, एमा स्टोन, एक छोट्या रोल मधे मरिसा टोमेई पण आहे!
फार वैचारिक वगैरे नाहिये, ट्रेलर आवडला तर पहा
https://www.imdb.com/video/vi3722091801/?ref_=ext_shr_lnk
राधिका आपटे, छाया कदम असलेला
राधिका आपटे, छाया कदम असलेला 'सिस्टर मिडनाईट' लावला. डार्क कॉमेडी, काय सत्य - काय आभास, सिनेमोटोग्राफी आणि ब्ला आणि ब्ला.... काय चालू आहे, आणि का? काय कॅमेरा काय अँगल काय दृष्ये... नवं लग्न झालेली राआ आणि नवरा झोपडपट्टीतील घरी रहायला येतात. नवरा शरीससंबंधास अनुत्सुक, दारुडा, कधी नीट कधी सटकलेला. राआ नेहेमी सारखीच स्टाँग वुमन पण वायझेड. सेक्शुअल क्रेविंग असणारी पण घुसमटलेली. किळसवाणी दृष्ये आणि अगम्य काहीतरीच चालू होतं. परत परत तेचतेच दाखवून काय आर्ट होते कोण जाणे. सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड आहे तर ते सात वेळा दाखवून काय उपयोग? खार पासून चर्चगेटला बादली आणि मेरा जुता है जापानी सारखा खांद्यावर मॉप घेऊन गेली. रोजच. एकदा तृतीयपंथीयांनी चिडवलं, दोनदा चिडवलं, तिसर्यांदा सकाळी त्यांच्या बरोबर कटिंग घेत सुखदु:खाच्या गप्पा केल्या. शोधा आता आर्ट.
छाया कदम डोसा आणि मालपुए का रबडी काय ती गाडी चालवून चालवून स्वयपाकांत हुषार झालेली असल्याने राआला दोन चार वेळा गृकृद्य धडे देते. मग चालू पिक्चर मधुन मला बाहेर गावी जायचंय म्हणून निघुन जाते. अरे!!! पिक्चर तर पुरा कर आणि मग जा. इतकी काय घाई? आणि चार धडे... ते सोडा पूर्ण वाक्यांचे दोन चार संवाद पदरी पडते तर दुवाच दिला असता. नुसते एकाक्षरी संवाद किती वेळ ऐकायचे!
डम्ब डाऊन करुन दिला कोणी तर बघेन ... नाही तर काय झेपलं नाही.
रात्री ११ वाजता तो प्रकार तासभर सहन केला आणि बंद केला.
इन्फरनो(हेच नाव बहुतेक)
इन्फरनो(हेच नाव बहुतेक) नावाचा टॉम हँक्स चा पिक्चर नवरा बघत होता, मी ही येता जाता बघितला, आपला इरफान खान दिसल्यावर, त्याच्यासाठी बघायला सुरुवात केली पण तरी मध्ये मध्ये बघितला, शेवटी अर्धा तास मात्र सलग बघितला, चांगला होता. इरफान खान मरतो, वाईट वाटलं, सगळ्यात इम्प्रेशन त्याचंच पडलं माझ्या मनावर. उगाच लवकर गेला हा माणूस.
गेल्या काही दिवसात चार मूक
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले.
१ A Trip To The Moon.
2 The Last Laugh
3 The Cabinet of Dr. Caligari (1920)
4 Metropolis
प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल.
आत्ता फक्त A Trip To The Moon. बद्दल लिहितो. ही फिल्म जॉर्ज मेलीएसने दिग्दर्शित केली आहे. जॉर्ज मेलीएस हा एक प्रसिद्ध जादुगार होता. ही film १९०२ बनवली होती. त्या आधीचे "सिनेमे" दोन तीन मिनिटांचे असत. ही film तब्बल साडे बारा मिनिटांची फीचर film आहे. म्हणजे ह्या सिनेमाला कथा आहे. वर ही पहिली वहिली Sci Fi film मानली जाते. ज्युल्स व्हर्न च्या कथेच्या कल्पना ह्यात वापरल्या आहेत. तोफेच्या गोळ्यात बसुन अवकाश यात्री चंद्रावर स्वारी करतात अशी कल्पना आहे.
बॉलीवूड SCI FI सिनेमात विज्ञान ह्या विषयावर लिहिलेल्या एका लेखात ह्या सिनेमाबद्दल विस्तृत चर्चा वाचून मग मी ही film बघितली.
यू ट्यूब बघू शकता. कदाचित तुम्हाला रंगीत चित्रपट मिळेल. त्याला संगीतही दिलेले असेल. पण त्या काळी रंग ही नव्हते आणि संगीतही नव्हते. हे लक्षात असू द्या.
'इन्फर्नो' नोट केला आहे.
'इन्फर्नो' नोट केला आहे. दोघेही आवडतात, त्यात इरफान खान तर फारच! ऐकलं आहे ह्या चित्रपटाबद्दल पण पाहायचे राहून गेले होते.
अमित
'डम्ब डाऊन' केलं तरी पुन्हा कशाला त्या वाटेला जायचे. हे आधीच- आपल्यालाच वाटले काहीतरी उच्च अभिरुची/ ॲब्स्ट्रॅक्ट पण मुळात too mundane to enjoy- नसेल कशावरून?
राधिका आपटे असेच रोल करते, सेक्शुअली आणि इमोशनली सप्रेस्ड. छाया कदमनेही स्ट्रीट फूडचे कंत्राट घेऊन ठेवले आहे. यावरून आठवलेला-
'पार्च्ड' (Parched) नावाचा एक बऱ्यापैकी जड चित्रपट आहे. त्यात राधिका आपटे, सुरवीन चावला, शायनी गुप्ता, आदिल हुसैन आहेत. गुजरात/ राजस्थान मधल्या अतिशय छोट्याशा खेड्यातले स्त्रियांचे आयुष्य - त्यात नवरा नपुंसक असलेली एक, पोटी वाया गेलेला तरुण मुलगा असलेली पण नवरा नसलेली - सासूची सेवा करणारी एक - देहविक्रय करणारी एक, अशा तीन मैत्रिणींंची कथा आहे. जबरदस्त चित्रपट आहे. अतिशय अंगावर येतो. खेड्यातले जेंडर रोल - स्त्रियांकडून अपेक्षा, स्त्री -पुरुषांचे सेक्स लाईफ, स्त्री लैंगिकता, शोषण यावर बेतलेला आहे. शेवट चांगला आहे. फार विचारप्रवर्तक आहे. नंतर दोन दिवस तुमच्या मनात राहतो सिनेमा. तिथली जमीन जशी दुष्काळग्रस्त भागातील असल्याने पावसासाठी तरसतेय, तसेच स्त्रियांही भावनिक- शारीरिक सुखापासून वंचित - तृषार्त - Parched आहेत. चित्रपट प्रचंड 'हेवी' होतो पण कलाकृती म्हणून दर्जेदार आणि व्यावसायिक चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे.
छाया कदम खाण्याच्याच गाड्या
छाया कदम खाण्याच्याच गाड्या चालवते आणि उच्च उच्च प्राणी ज्यांची शिकार ban आहे, ते खाल्लेल मीडियात सांगितल्याने मध्ये तिला नोटीस आलेली की कोणी उपलब्ध करून दिलं हे, पुढे काय झालं माहिती नाही. चांगलं काम करते मात्र म्हणजे अभिनय म्हणायचा आहे मला.
एकंदरीत काय खाण्याशी संबंधित कामामुळे फेमस झाली, पैसे मिळाले आणि ban झालेले पदार्थ खाल्याने अडचणीत आली.
'पार्च्ड' (Parched) ची
'पार्च्ड' (Parched) ची हाताळणी जबरदस्त आहे. एकूण एक पात्रे परफेक्ट जमली आहेत. प्रीची न होता मुद्दा स्पष्ट होत जातो.
'पार्च्ड' (Parched) बद्दल
'पार्च्ड' (Parched) बद्दल अनुमोदन.
सितारें जमी पर बघायला आज आमची
सितारें जमी पर बघायला आज आमची पूर्ण फॅमिली एकत्र जाणार आहे. मी बाहेर असल्याने जाऊ शकत नाही.
या पिक्चर बद्दल काही दिवसांपासून बरेच नकारार्थी मेसेजेस, पोस्ट्स येत आहेत. त्याचे कारण आज समजले.
https://www.youtube.com/watch?v=H_1xHCwVtfo
काल आमीर खानने खूप थोड्या स्क्रीनवर सिनेमा रिलीज केला. आजच्या काळात माऊथ पब्लिसिटीचा ऑप्शन हा रिस्की वाटतो. या शोजला मिळणारा रिस्पॉन्स पाहून शनिवारी शोज वाढवा असे त्याने एक्झिबिटर्सना सुचवले आहे. रिस्की स्ट्रॅटर्जी. काल बघून आलेल्यांनी सुंदर सिनेमा आहे म्हणून सांगितलंय. घरच्यांचा रिपोर्ट चांगला असेल तर पुढच्या आठवड्यात पाहीन.
का येताहेत असे मेसेज?
का येताहेत असे मेसेज?
Thudarum नावाचा सौथेंडियन
Thudarum नावाचा सौथेंडियन पिक्चर हिंदी डब पाहिला.
बरेच कौतुक ऐकत होतो. IMDB 7.6 दिसत होता. दृश्यम सोबत लोकांनी तुलना केली होती. यात सुद्धा आपल्या कुटुंबाचा रखवाला मोहनलाल होता.
पण अपेक्षा जास्त आणि वेगळ्या झाल्याने म्हणा तितका नाही आवडला. फर्स्ट हाफ चांगला वाटला. प्लॉट आणि टेन्शन चांगले बिल्ड केले. पण नंतरचा जो पार्ट बुद्धीचातुर्याने काहीतरी करेल अशी अपेक्षा होती तिकडे सगळी हाणामारी करून टाकली. ते आमचा सनी करतो मग तुमचा मोहनलाल कशाला बघू असे झाले.
>>>>>>>का येताहेत असे मेसेज?
>>>>>>>का येताहेत असे मेसेज?
ऑटिस्टिक मुलांवर हा सिनेमा आहे. तर पंप्र मोदींना त्यात एक संदेश पर वाक्य घालायचय म्हणे. जेवढं ऐकलं त्यावरुन हा दुराग्रह वाटतोय मला.
रानभुलीने वरती लिंक दिलेली आहेच - https://www.youtube.com/watch?v=H_1xHCwVtfo
पण मला वाटतं मोदींना जसा विचारायचा हक्क आहे तसाच अमीरला, नाकारायचा. तेव्हा कॉन्ट्रोव्हर्सी होण्याचे कारण नसावे.
हा प्रश्न घ्यायला हवा होता.
हा प्रश्न घ्यायला हवा होता.
पण मला वाटतं मोदींना जसा
पण मला वाटतं मोदींना जसा विचारायचा हक्क आहे तसाच अमीरला, नाकारायचा. तेव्हा कॉन्ट्रोव्हर्सी होण्याचे कारण नसावे. >>> मोदींनी कुठे विचारलेय काही ?
त्या व्हिडीओत सगळंच सांगितलंय . सेन्सॉर बोर्ड असा प्रस्ताव कसा काय देऊ शकते ? ही कॉन्ट्रोव्हर्सी नाहीये का ? इतके दिवस काय काढायला सांगितलं यावरून वाद होत. आता काय दाखवायचं ते सेन्सॉर बोर्ड सांगू लागलंय. ते कशासाठी आहे ? आमीर खान असेल किंवा कुणीही ते काय सरकारी निर्माते नाहीत त्यांना आदेश द्यायला.
Pages