Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कबीर सिंग - Background Theme
कबीर सिंग - Background Theme
https://youtu.be/oO9bjcUeRLA?si=eI_HtjihR9FsIIvi
सध्या तोंडात हे आदिमा, हे
सध्या तोंडात हे आदिमा, हे अंतिमा.
अरे मस्त वाटतय. ऐकते अन्जू
अरे मस्त वाटतय. ऐकते अन्जू
सामो तू गोड आहेस, गाण्यावर
सामो तू गोड आहेस, गाण्यावर मनापासून प्रेम दिसतं तुझं. खूप माहीतीही असते तुला.
अन्जू धन्यवाद. उत्तम नैसर्गिक
अन्जू धन्यवाद. उत्तम नैसर्गिक मूड स्टॅबिलायझर आहे.
२-३ दिवसांपासून सतत 'मेरा
२-३ दिवसांपासून सतत 'मेरा आसमां जल गया रे' डोक्यात घोळत आहे. आधी पी एस २ मधल्या इतर गाण्याएवढं आवडलं नव्हतं. गुलज़ारचे शब्द चांगले ते ऍव्हरेज रेंजमध्ये गटांगळ्या खातात. चालही मुक्तच्छंदासारखी आहे. स्ट्रिंग्स, एकच ठेका धरलेला ड्रम आणि तबल्याचा ठेका आणि स्पर्शून जाणारा अरिजीतचा आवाज गारुड करतोय सध्या.
आवडतं गाणं असा माणूस यांचा एक
आवडतं गाणं असा माणूस यांचा एक धागा आहे.
रिपीट मोड वर फक्त गाणं बसवतानाच ऐकणं होतं. एरव्ही नाही. पूर्वी इथे धागा माहिती नसल्याने आवडती गाणी लिहीली गेली आहेत.
कानात वाजणारं गाणं असाही धागा पाहिलाय.
आज इतकी गाणी एकापाठोपाठ एक
आज इतकी गाणी एकापाठोपाठ एक डोक्यात घोळतायेत आणि गुणगुणतेय मी. समजतच नाहीये मला.
अस्तित्व सिरियल होती जुनी त्याचं ' मलाच कळले नाही, हरवले कधी मी स्वत्व '
दुसरं चुकीची ऐकू आलेली गाणीवरही लिहिता येईल ' दो दिवाने शहरमे, रातमे या दोपहरमे, आबूदाना धुंडते है आबूदाना ' हे गाणं लहानपणी मला साबूदाना धुंडते है साबूदाना ऐकू यायचं आणि मला समजायचं नाही की साबूदाणा डोंबिवलीत इतका सहज कोपऱ्यावर मिळतो, ह्यांना का मिळत नाहीये, हाहाहा.
तिसरं गाणं माझं खूप आवडतं गाणं आहे
माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा.
भोगी म्हणूनी उपहासा मी योगी कर्माचा.
अन्जू वाह! मत्र्त्यातलच एक
अन्जू वाह! मला त्यातलच अकेला इस शहरमे - फार उदास करत.
हो ते उदास आहे.
हो ते उदास आहे.
रसिकांसाठी खास मेजवानी!
रसिकांसाठी खास मेजवानी!
सुरैय्या गात आहे
नुक्ताची है गमे दिल....
मिर्झा गालिब
https://prabhatdayaljaipur.medium.com/post-9-nukta-chen-hai-gamae-dil-72...
आणि Enjoy the eternal Ghalib, evergreen Saigal and indomitable Suraiya.
सलोना सा सजन है, और मै हु!
सलोना सा सजन है, और मै हु!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Q6aOWA08g-Y
Pyaar To Hona Hi Tha
Remo, Jaspinder Narula
केशवकूल , छायागीतमध्ये नेहमी
केशवकूल , छायागीतमध्ये नेहमी लागायचे हे गाणे.. छान वाटायचं तेव्हा ऐकायला.
मला ९० च्या काळातली बहुतेक गाणी आवडतात. कयामत से कयामत तक ची गाणी सध्या ऐकतेयं.
केकू, प्यार तो होना ही था
केकू, प्यार तो होना ही था मस्त गाणं. तो सिनेमाही (फ्रेंच कीस वरून कॉपी केला असला तरिही) मस्त होता.
जस्पिंंदर नरुलाने फारच कमी गाणी गायली. नंतर ती गायबच झाली. प्यार तो होना ही था आणि बुमरो आजही प्रचंड आवडतात.
रेमोचं 'जलवा' अफलातून आहे.
जस्पिंंदर नरुलाने हेच गाणे
जस्पिंंदर नरुलाने हेच गाणे सोलो गायले आहे. पण रेमो बरोबर चे हे गाणे म्हणजे... माला त्यातली काही जाण नाही पण तिचा आवाज कुठल्या सप्तकात फिरतो आहे? तिचे हे गाणे ऐजले की मला Adeleचे skyfall किंवा hello ची आठवण येते.
आता ती भजने गाते असे ऐकले आहे.
जस्पिंंदर नरुलाने फारच कमी
जस्पिंंदर नरुलाने फारच कमी गाणी गायली. >> विरासत मधले 'तारे है बाराती' तिच्या आवाजाला जबरदस्त सूट झालय.
कुसुम्बी सावळे निळे, उदे अनंत
कुसुम्बी सावळे निळे, उदे अनंत जांभळे,
मेघ मेघ, सूर्य सूर्य मावळे.
सूर येती , विरुन जाती
सूर येती , विरुन जाती
हे लता आणि हृदयनाथच्या आवाजातील मला खुप आवडतं. लता आणि पं. सत्यशील देशपाण्डेंच्या आवाजात देखिल हे गाणे आहे, पण तितकसं अपील नाही झालं
माझे माहेर पंढरी किशोरी
माझे माहेर पंढरी किशोरी आमोणकर यांचं... पावसात खूप छान वाटत.
साज ह्यो तुझा.. जीव माझा
साज ह्यो तुझा.. जीव माझा गुंतला..
उशाखाली फोटो तुझा.. चांद रातीला..
https://youtu.be/e25zWcOnrh8?si=klIWS7qRmzRF5MLs
साधे साधे म्हणता आवडू लागलेले गाणे
त्याची धून झंकारली रोमारोमात.
त्याची धून झंकारली रोमारोमात.
गायिका मंगला नाथ. ह्या गाण्याची ओळख मला मायबोलीकर मुग्धा (मुग्धटली), जिने इथली आईस्क्रीम रेसिपी लिहिली आहे तिने करून दिली. दहा वर्षांपूर्वी वगैरे ती घरी आलेली, तिचा आवाज चांगला आहे माहिती होतं, माझ्या मुलाला भावगीतं खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी तिला गायला सांगितलं, तेव्हा तिने हे गाणं म्हटलेलं. दक्षिची बहीण सई आलेली तेव्हाही तिला गाणं म्हणायला लावलेलं, तिने सुमन कल्याणपूरचं गायलेलं. सुमन लेकाची अतिशय आवडती गायिका.
त्याची धून झंकारली रोमारोमात
त्याची धून झंकारली रोमारोमात
>>> माझं आवडतं गाणं
सुरेख गाणं आहे.
सुरेख गाणं आहे.
सध्या tv वर, youtube वर वारी
सध्या tv वर, youtube वर वारी बघत असल्याने डोक्यात तीच गाणी, अभंग वेगवेगळे गुणगुणतेय.
पाऊले चालती पंढरीची वाट.
तुका म्हणे होय मनाशी संवाद,
आपुलाची वाद आपणाशी.
खरंतर वारी रिलेट करू शकत नाही, इथे तो माहोल नसतो, जसा पुण्यात असतो. वारकरी संप्रदाय जवळून बघितलाय, माझं बालपण गेलं, तिथे जवळ विठोबाचे देऊळ होतं तिथे. ते वारीला जायचे पण कधी जायचे ते बघितलं नव्हतं, आम्ही शाळेत असताना मुलांची वारी (दिंडी) काढलेली आठवत नाही, हल्ली काही वर्षे दिंडी असते कुठे कुठे शाळांची.
तरीही tv वर बघून एकदम भारल्यासारखं वाटतं. समस्त वारकरी लोकांच्या भक्तीपुढे नतमस्तक.
देवाक काळजी रे..
देवाक काळजी रे..
हे गाणे चुकून ऐकले तरी रिपीट मोड होऊन जाते. एकदा ऐकून पुढे जाता येतच नाही. थोड्यावेळ त्या भावनेत त्या मनस्थितीत अडकून राहावेसे वाटतेच
https://youtu.be/x0AUAR2eKSY?si=-rHwSNjzyxbWolMW
देवाक काळजी रे >>> हो…
देवाक काळजी रे >>> हो…
काल सारेगम कारवाँ वर
काल सारेगम कारवाँ वर विठुमाउली स्टेशन लावलं. त्यातलं कोणतं गाणं डोक्यात अडकावं?
पंढरीनाथा झडकरी आता पंढरी सोडून चला
म्हणून आज अभंग तुकयाचे ऐकतोय. यातले कोरसने गायलेले हरिपाठही किती सुरेल आहेत!
जीव गुंतला ..मुक्ता बर्वे वर
जीव गुंतला ..मुक्ता बर्वे वर चित्रित गाणं.
चित्रिकरण विचित्र वाटलं पण काही स्टोरी असावी तशी. ऐकायला मस्त आहे.
आकाश पांघरूनी जग शांत झोपले
आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
https://youtu.be/yxRjqLpZIAI?si=Y45qPPkMwi7l65qt
Pages