तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सामो, अहमद हुसेन व मोहमद हुसेन आवडतो तर ही पण ऐका:

दो जवाँ दिलों का ग़म दूरियाँ समझती है
कौन याद करता है हिचकियाँ समझती हैं

त्यात ह्या लाईन्स जिना उतरणाऱ्या सुंदरीसाठी :

बाम से उतरती है जब हँसी दोशीजा
जिस्म की नजाकत को सीढ़ियाँ समझती हैं

चावट्ट आहे शायर पण गोड आवाज दोघांचा. Wink

संथ वाहते कृष्णामाई आणि
हा माझा मार्ग एकला
या गाण्यांवर जॅझ +भांगडा + हिप हॉप असं फ्युजन नृत्य बसवतोय.

ऐकते अनिंद्य. धन्यवाद.
>>>>दो जवाँ दिलों का ग़म दूरियाँ समझती है
कौन याद करता है हिचकियाँ समझती हैं
या ओळी तर कमाल आहेत Happy

>>>>यूँ तो सैर-ए-गुलशन को कितना लोग आते हैं
फूल कौन तोड़ेगा डालियाँ समझती हैं।
यातली हिंसा नाही आवडली. अरे फूल थोडीच ना तोडायचं असतं Sad

https://www.youtube.com/watch?v=7KdMGjqqd5I
Boney M. - Ribbons Of Blue (Starparade 14.06.1979)
Ribbons of blue
Remind me of you
Ribbons of red
Are the way that my heart bled
Memories so clear
Are still ringing in my ears
So I wanna send to you
My Ol' ribbons of blue

Ribbons of blue
Now remind me of you
Ribbons of red
Are the way that my heart bled
Memories so clear
Are still ringing in my ear
So I wanna send to you
My Ol' ribbons of blue

बाम = वरची खोली / उंचावरचा छज्जा, जिन्यानी चढून जावे लागेल असा भाग

दोशिजा = यौवना, तरुण स्त्री

आता त्या लाईन्स परत वाचा Happy

केकता निर्मित टुकार जोधा अकबर सिरीअलमध्ये विषकन्येला सगळे दोशीजा म्हणायचे. त्यामुळे मला आपलं दोशीजा म्हणजे विषकन्या नाहीतर व्हॅम्प वाटायचं.

हॅश टॅग तदैव लग्नम नावाचा पिक्चर येतोय, असं युट्युबने दाखवलं. त्याचा एक प्रोमो बघितला त्यातलं गाणंच आता डोक्यात बसेल, ते गाणं 'सगळ्यांचा फोटो आला पाहीजे', कसलं फनी आहे.

संगीत मानापमान मधलं 'सांगू कसा मी' गाणं सध्या वरचेवर ऐकते आहे. शब्दांची निवड छान आहे, नाद निर्माण होतोय एकप्रकारे. चालही आवडली. मला हे गाणं पहायला जास्त मजा आली. सुमीतच्या चेहर्‍यावर मधूनच साहिल साराभाई झळकतो Happy

https://www.youtube.com/watch?v=mPrYT5fqdms

हे फार फार आवडते गाणे - https://www.youtube.com/watch?v=HulSu-MmGf0&list=PLo4u5b2-l-fDdXM260sl34...

जुल्फ बिखराके निकले वोह घरसे - अहमद हुसेन व मोहमद हुसेन>>>> So far a song which is worthy as a find of this thread for me ......Thanks सामो Happy

कौन आया सामने ( ग़ज़ल - बशीर बद्र ) - कविता सेठ

'ज़िस्म'मधलं 'आवारापन बंजारापन' - सईद काद्री यांचे अर्थपूर्ण गीत, एम एम क्रीम/किरवाणी यांचे मिनिमल तरीही गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे संगीत आणि केकेचा मखमली आवाज याचा सुंदर संगम
जाने ये कैसी आग लगी है, इसमें धुआँ, ना चिंगारी
हो ना हो, इस बार कहीं कोई ख़ाब जला है सीने में

>>>>So far a song which is worthy as a find of this thread for me ......Thanks सामो Happy
Happy फाविदडि आभारी आहे.

आवारापण… मलाही खुप आवडते. जिस्ममधली सगळी
गाणी मस्त है.. जादु है नशा है. पण मस्त. रिपिट वॅल्यु आहे.

हल्लीची गाणी चुकुन मस्तही निघतात पण रिपिट व्हॅल्यु कमी असते. पुढचे आले की आधीचे विस्मरणात जाते. ताकदीचे गायक नाहीत हा मोठा दोष आहे हेमावैम. श्रेयाची गाणी लक्षात राहतात तितकी इतरांची नाही राहात.

माझेमन, साधनाताई काय मस्त गाण्यांची आठवण काढली.. किती छान गाणी यायची त्याकाळी..!

सकाळी वाचल्यापासून डोक्यात 'आवारापन ' गाणंच वाजत होतं..

शेवटी दुपारी वेळ होता तर youtube वर ' जिस्म' चित्रपटच पाहूनच टाकला.. आला तेव्हा पाहिला नव्हता.. इच्छा असूनही हिंमत नव्हती थेअटर मध्ये जाऊन पाहायची.. आज पाहिला .. खास जॉन अब्राहमसाठी.. त्याच्या खळीवाल्या किलर स्माईलवर तर एकदम फिदा आहे मी..!

उद्या जीममध्ये 'जिस्मची' सगळी गाणी रिपीट मोडवर जाणार नक्की..!

सकाळी वाचल्यापासून डोक्यात 'आवारापन ' गाणंच वाजत होतं.. >>> माझ्याही Happy मी सुद्धा वाचलेली पोस्ट सकाळी. त्यातील गाण्यांची धून ॲक्च्युअली आहे तशीच..
लॅपटॉप उघडा आहे. काम चालू आहे. लावतो साईड बाय साईड Happy

सोनू निगमने यातल्या जागा सांगितल्या म्हणून पुन्हा पुन्हा ऐकतोय.
हुई शाम उनका खयाल आया.... कसला मखमली आवाज लागलाय.

सुरमई शाम इस तरह आये, दोन दिवस डोक्यात आहे. ते म्हणजे चाल एका मराठी गाण्यावरुन घेतली आहे, तेच नेमकं आठवत नाहीये, गुगल करुन मिळेल पण मेंदूला चालना देतेय.

रुपाली जॉन अब्राहम मलाही आवडतो >>> जर निकष दिसण्याचा असेल तर मला लतादीदींचा आवाज आवडतो म्हटल्यासारखे आहे हे Happy

शेवटी दुपारी वेळ होता तर youtube वर ' जिस्म' चित्रपटच पाहूनच टाकला.. आला तेव्हा पाहिला नव्हता.. इच्छा असूनही हिंमत नव्हती थेअटर मध्ये जाऊन पाहायची.. >>>>

का नव्हता पाहिला? इतकी बोल्ड दृष्ये नसावीत बहुतेक. आता आठवत नाही. मी यु ट्युबवर पाहिलेला. पाँडिचेरी व गाणी दोन्ही छान, चित्रपट ठिकठाक.

तेव्हाच करीना, शाहिदचा फिदा पण आलेला. त्यातले नजर नजर, ढुंढे उसे मेरी नजर फेमस झाले होते.

तेव्हा एक जोक फेमस झाला होता. अविवाहीत तरुणीच्या प्रेमात पडुन बरबाद कसे व्हायचे हे बघायचे तर फिदा बघा, विवाहित तरुणीच्या प्रेमात पडुन बरबाद कसे व्हायचे हे बघायचे तर जिस्म बघा…

का नव्हता पाहिला? इतकी बोल्ड दृष्ये नसावीत बहुतेक.>> आता वाटते खरंच बघायला काय हरकत होती तेव्हा.. खूप अशी बोल्ड दृश्य नाहीच आहेत चित्रपटात.. आताच्या चित्रपट आणि वेबसिरीजच्या तुलनेत तर काहीच नाही त्यात.. कितना जमाना बदल गया इस बीस साल में..!

चित्रपट ठिक आहे बघायला एकदा..पण त्यावेळी महेश भट्ट आणि कंपनीचे चित्रपट जरा कामुक कल्पनेवर निघायचे.. जसे राज, मर्डर, जिस्म, आशिक बनाया आपने.. वगैरे..

कॉलेज मध्ये होते त्यावेळी .. त्यामुळे हिंमत नव्हती एवढी.. पोस्टरवरचे बिपाशाचे बोल्ड फोटो पाहून उगाच
गैरसमज व्हायचा.. भरीस भर म्हणजे त्यात चित्रपटाच नाव काय तर म्हणे ' जिस्म..' वयही तसंच होतं म्हणा तेव्हा ... कुजबूज असायची सगळ्या मुलामुलींत.. वातावरण आजच्या एवढे मोकळे ही नव्हते तेव्हा..!

एकटीने चित्रपट पाहायला जाईन एवढी हिंमत तर नव्हतीच पण मैत्रिणीही तश्याच .. त्या आल्या तर नसत्या.. पण नुसत्याच चिडवत बसल्या असत्या मलाच..तरीपण ' राज ' चित्रपट पाहिला होता थेअटर मध्ये मैत्रिणींसोबत..

@ सामो, ऋन्मेष..
जॉन अब्राहम चित्रपट सृष्टीतला सगळ्यात ' सेक्सी ' हिरो आहे असं निदान मला तरी वाटते. बिपाशा उगाच दिवानी नव्हती त्याची..

आता एवढा मोठा प्रतिसाद लिहिलाय तर त्यात एक थोडासा अवांतर किस्सा ..

जुन्या ऑफीसमध्ये एक स्त्री यायची मुंबई वरून.. ऑफीससाठी मागवलेनी IT, Taxation ची पुस्तक घेऊन.. आधी पती यायचा पण तो वारला नंतर ती यायची.. लंच ब्रेकमध्ये यायची .. थोडावेळ बसायची गप्पा मारत माझ्याशी.. मला चौकश्या करायची भारी हौस.. एकदा गप्पा मारताना तिने मला सांगितलं होतं की, मुंबईला भट्ट कंपनीच्या ऑफिसमध्येही ती अशीच पुस्तकं नेहमी घेऊन जात असते..

ऑफीसच्या मागेच त्यांचा स्टुडीओ आहे आणि तिथे नेहमीच चित्रपटाच शुटींग सुरु असते .. मग हसत हसत मला म्हणाली की, मी तिथे बसलेली असले की, भट्ट कंपनीच्या ऑफीसचा स्टाफ म्हणतो, मॅडम आपको भी film में रोल चाहिए तो जाओ.. कॅमेरा के सामने खडे हो जाओ..!

मग मी पण तिची हसत- हसत गंमत करायचे,

" मॅडम, आप भी बोल दे ना उनको, देखो , बिपाशा जैसा रोल रहेगा तो ही मैं काम करूँगी आपके Film में..!"

तेवढीच ती खळखळून हसायची.

Pages