चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायनल रेकनिंग मधले स्टंट्स जास्त खरे वाटतात, डेड रेकनिंग पेक्षा. मला ते चेहरा बदलून मास्क लावून कुरापती करणं इतकं विश्वसनीय वाटत नाही पाहताना. वजन, उंची, बांधा तर तोच राहतो की. ते ह्यात जास्त आहे. पण 'फायनल' मधे ते नाही, त्यात कन्व्हिक्शन जास्त आहे.

यात गेब्रियलचा मला राग आला चक्क. टॉम नसता तर आज आपण नसतो, इतका दुष्ट तो गेब्रिएल. Happy टॉमने केसही वाढवलेत ह्यात. जे आधीपेक्षा छान दिसतात, असा हिरोईनच्या तोंडून संवादही आहे. 'जो दिखता है वो बिकता है' हे शो-बिझनेसेचे सत्य असतेच. येथे अवघे पंच्चानव वयमान असलेली डेक्कन क्वीन क्रश असू शकते तर हा तर फारच तरूण झाला त्यामानाने. Happy Wink

रमड, पुरेसे आहे का टॉमचं हे कौतुक, की अजून करू ? Happy Wink

इतकी चपळता, वेग आणि शिवाय देखणेपण हे पॅकेज >> त्याने "तुम पास आये" चं इंग्लीश ट्रान्स्लेशन असलेला तिकडचा डीडीएलजे केलेला बघायला आवडेल Proud

उधर का सनी पाजी अर्नोल्डच है.

येथे अवघे पंच्चानव वयमान असलेली डेक्कन क्वीन क्रश असू शकते >> Lol

पुरेसे आहे का टॉमचं हे कौतुक, की अजून करू ? >>> इथे मला ती तू कोठेतरी टाकलेली करीनाची मीम दिसत आहे Happy "आप कन्विन्स हो गये या और बोलू"?

आप कन्विन्स हो गये या और बोलू >>>> Lol येस, मला पण तेच आठवले होते.

बाकी अस्मिता तूमाखमै हे मगाशी लिहायचं राहिलं होतं ते आत्ता लिहून घेते Proud

Happy Happy हो. मलाही आठवले होते ते मीम. माबोकर मुलींच्या क्रशसाठी कायपण, मध्यरात्री बोलवा अनुमोदन द्यायला. Wink
असहमत असताना तर कन्व्हिन्स करू शकतेच, सहमत असले तरी बोलत राहू शकते. Proud

फायनल रेकनिंग मधले स्टंट्स जास्त खरे वाटतात, डेड रेकनिंग पेक्षा. >> आधी मी हे "फायनल रेकनिंग मधले स्टंट्स जास्त खरे वाटतात" एव्हढेच वाचलेले. "डेड रेकनिंग पेक्षा" मूळे काँटेक्स्ट आला. Wink क्रूज बहुतेक स्टंटस स्वतः करतो हे जबरी कौतुकास्पद आहे पण फायनल मधे सबमरीनमधले ओव्हर द टॉप खरच जरुरी होते का ? ओपनिंग सीनमधे तो मारतोय हे न दाखवतो हेलीचे हावभाव, त्याचे ग्रंट्स नि बॅ़अग्राऊंड स्कोअर मधून जो इफेक्ट आला होता तो मला जास्त आवडलेला. नंतर गाडी नेहमीच्या अफाट, अचाट नि अतर्क्य रुळावर गेली नि स्पीड पकडतच राहिली. शेवटच्या प्लेनमधल्या सीक्वेन्सवर पैसे वसूल झाले.

मायग्रेन असलेली लोक गंध, आवाज आणि प्रकाशाला जास्त सेन्सिटिव्ह असतात.
>>
मी व्हॅम्पायर कॅटेगरी (पडद्या मधल्या फटीतून प्रकाशाची तिरीप डोळ्यावर आली की डोकं आऊट)

क्रूज कसा वाटला >>> इश्श Proud

फायनल रेकनिंग आऊट अँड आऊट आवडला. खरं सांगायचं तर त्या अ आणि अ गोष्टींसाठीच मी ही सिरीज पाहते. बहुतेक स्टंट्स टॉम्या स्वतः करतो हा सगळ्यात मोठा आकर्षणाचा मुद्दा.

"आप कन्विन्स हो गये या और बोलू"? >>> Lol

नंतर गाडी नेहमीच्या अफाट, अचाट नि अतर्क्य रुळावर गेली नि स्पीड पकडतच राहिली. >> अ नि अ बद्दल शंभर टक्के तक्रार असत नाही. फक्त ते कन्विसिंग वाटलं पाहीजे.

अस्मिताने वर ते सिलिकॉनच्या मुखवट्यांचा पॉईण्ट मांडलाय. मर्द मधे असे मुखवटे घालून सुरूवातीचा एक सीन दाखवलाय, त्याची आपण थट्टा करतो. एम आय मधे पहिल्यांदा खटकलं पण नंतर ते सवयीच वाटू लागलं. आपला हा प्रॉब्लेम असतो. अ आणि अ प्रेक्षकांना न जुमानता दाखवत राहिलं कि ते सवयीच होतं. Lol

स्पीकर वर शेवटचा तास पाहिल्याने तो प्रभावी वाटला. म्हणजे कानठाळ्या बसवणारे साऊंड इफेक्ट्स सुद्धा आपली विचारशक्ती मंद करून टाकत असतात. Lol

>>>मायग्रेन असलेली लोक गंध, आवाज आणि प्रकाशाला जास्त सेन्सिटिव्ह असतात.<<< जियो
हे इतरांना अजिब्बात समजतच नाही. खास करून नवऱ्यांना Proud Angry ही

पोलीस स्टोरी १ (जॅकी चॅनचा) कुठेच सापडत नाही.
कुणाला माहिती आहे का भारतात कुठे बघता येईल ते ?

२ आणि ३ आहेत. ( तिसरा कंटाळवाणा आहे)

कसचं कसचं रानभुली.

ते 'जी' मात्र नकोच. Happy

***

मिशन इंपॉसिबल चर्चा भारीच. सगळे बघून झालेत. आता मूळची टीव्ही सिरीज १९६६-७२ ची बघायला घेतोय आजपासून. सात सीझन्स आहेत २२-२३ एपिसोड्सचे.

जाट बघण्याचा थोडावेळ प्रयत्न केला Happy Happy भयानक कृत्रिम फोनी क्रिंज प्रकरण आहे. हे असले पिक्चर कोण आणि कसे बघू शकतात? काय त्या stylized over the top हाणामाऱ्या, काय त्या बळेच मारामारीसाठी बनवलेल्या situations, काय ती ओव्हरॲक्टिंगची दुकानं! Ewww...

सुनील .
तुमच्या मुळं मस्त मजेत वेळ गेला. अर्धा तास पाहिला पोलीस स्टोरी. फुल्ल टाईमपास.
एव्हढी अ‍ॅक्शन पण कुठेही बीभत्स होत नाही कि अ आणि अ वाटत नाही.
जॅकी चॅनचा सेन्स ऑफ ह्युमर लाजवाब !!
डाऊनलोड करता आला. उरलेला मोठ्या पडद्यावर बघीन आता. Happy

जाट साधारण अर्धा पाहिला. सतत मारामारी आहे, सतत. चित्रपट कुठेच नाही फक्त मारामारी. कथा कुठेच नाही फक्त मारामारी. शंभर माणसांच्या पनीरच्या भाजीत पनीरचा एक तुकडा टाकून बाकी ग्रेव्ही वाढत 'हे घ्या पनीर' चा आव आणला आहे. संपूर्ण चित्रपट साऊथचाच आहे. त्यामुळे विचित्र पेट्रियार्कीची परंपरा आहे, सारखं स्त्रियांना विवस्त्र करून त्यांचा अपमान करण्याचे सीन आहेत. पोलिस असलेल्या स्त्रियांना सुद्धा विवस्त्र केले आहे, चित्रपट तेथूनच सुरू होतो.

साऊथच्या सिनेमात स्त्री प्रेक्षकांना ऑकवर्ड करणारे पण सन्मान देतोय असं भासवणारे सीन्स देण्याची पद्धत आहे. हिरोला महानायक करण्यासाठी त्यांनी त्याची परंपरा केली आहे. जी किळसवाणी वाटते. 'पुष्पा' हा एक महामूर्ख सिनेमा होता. त्यात पुष्पाने व्हिलनला मारताना 'औरतोकी इज्जत करते
है' वर प्रवचन देऊन नंतर रश्मिकाला त्याच्याकडे बघून हसण्याचे पाच हजार दिले होते. हे इतकं दर्जाहीन आहे की ज्याचं नाव ते. पण त्यांच्या आदराच्या व्याख्या हुकलेल्या आहेत.

पुन्हा जाट - हा ट्रेकिंगला या साऊथच्या गावात आलेला आहे म्हणे. आधी तो दालरोटीच विचारतो धाब्यावर. त्यातल्या काकू ( ज्या वयाने त्याच्यापेक्षा लहान असतील खरेतर) -इडली सांबार चटणी आहे गरमागरम म्हणतात. हा सुरवातीच्या गाण्यापासून अवतारी पुरुष वाटत होताच, सगळ्या साधुंसोबतच प्रवास करत चुकून हूडाच्या लंकेत आला. सामान्यजनांना अवतारी पुरुषांचे महत्त्व असेही फार उशिरा कळते त्यामुळे अर्धा सिनेमा झाला तरी मला 'तीन इडल्यांसाठी कशाला हिंसा' वाटते आहे पण नाही म्हणजे नाही. त्या काकूंच्या हंड्यात अजूनही पाचपन्नास इडल्या होत्या पण नाही म्हणजे नाही.

पुराणातील नचिकेताची गोष्ट आठवत असेल तर तो जसा मृत्यू किंवा काळ कुणाच्या अधीन आहे हे जाणून घेण्यासाठी सगळी पौराणिक हायरॅर्की चढतो तशीच ह्या अपुची (अवतारी पुरुष) गोष्ट आहे. सुरवातीला इडली सांडली तर त्याने -सॉरी म्हण असे मृदू भाषेत सांगूनही न ऐकल्याने त्या लोएस्ट लेव्हलच्या खरदुषणांना व त्याच्या पंटरांना बडवबडबवबडवले. आता तुझा बॉस म्हणेल 'सॉरी' म्हणून त्यांना गाडीत घालून त्या वरच्या अहिरावण व त्याच्याही पंटरांना बडवबडबवबडवले. कारण 'मैं इडली खा रहा था' आणि तुमच्या बी ग्रेड धटिंगणांनी मेरी इडली सांडी वर सॉरी नहीं बोला. ह्या इडली पायी दंडकारण्यातील सर्व राक्षसांचा संहार व्हायची पाळी येते. पिक्चर अर्धाच होईपर्यंत तो हूडा जो रावणाची पूजा करतोय त्याच्या पुढ्यात येऊन पोचतो. हुडाची मंदोदरी रजायना कसांड्रा आहे, जी गुंडीण आहे. नवरा बायको दोघेही गुंड आहेत, अशी अचानक आलेली स्त्री पुरुष समानता बघून टडोपाच.

विवस्त्र केलेल्या पोलिसीणींच्या ग्रूपला सैयामी खेरसहित रजायनाने एका खोलीत कोंडून टाकले आहे. "इडली - सॉरी" हायरार्की चढत अपु - सन्नी ह्या रावणापुढे येऊन "सॉरी बोल" म्हणतो. रावण चक्क "सॉरी" म्हणतो. पण अवतारी पुरुषांच्या लीला तुम्हाला आम्हाला काय कळणार, तो जाताजाता उंबऱ्यावरून परत येतो. कारण ह्या पोलीस ग्रूपचे पडलेले कपडे त्याला दिसतात. तो ते कपडे गोळा करून रक्ताच्या थेंबाचा पाठपुरावा करत योग्य खोलीपाशी येतो. खोलीचे दार उघडेही असेल कदाचित पण लीला म्हणजे लीला, याकारणे खिडकीचे गजच उखडून फेकून देतो. मग खिडकी उघडून दुसऱ्या दिशेला बघत हे कपडे त्यांच्या हातात देतो, मर्यादापुरुषोत्तमाला सर्व स्त्रिया माताभगिणी समान म्हणून पुन्हा रागात येऊन मारामारीचे अपग्रेडेड व्हर्जन बाहेर पडते. या अपु - मर्यादापुरुषोत्तमाला स्वतः ची वानरसेना सुद्धा नाही, त्यामुळे प्रेक्षकांचा माकड होणं भाग आहे.
हे सगळं फक्त अर्ध्या दिवसात झाले आहे, संपूर्ण दंडकारण्य पणाला लागलेय.

सन्नी ठरल्याप्रमाणे सगळ्या महालातले इंटिरिअर आणखी स्ट्रक्चरल डिझाईन फोडून गुंडांची धुलाई करतो. महालात सिंहाच्या अजस्र मुर्ती त्या ढकलून, संपूर्ण रेलिंग उखडवून, खांबांना सुद्धा तडे जातात, लाकडी झोका आदळून सगळी राक्षससेना त्राहिमाम होते. महाल कोसळायची वेळ येते. एकदा तर वरचा पंखा दांड्यासहित उखडून तो मिसाईल प्रमाणे लीलया हातात धरून मारले आहे. आम्हाला पंखा बदलून घ्यायला माणूस मिळेना म्हणून वर्ष लागलं होतं. पण लीला म्हणजे लीला. हे सगळे होत असताना नुसतं बघत बसायला रावण काय आपल्यासारखा सामान्य प्रेक्षक थोडीच आहे, तो पिस्तूल उगारतो. पण पिक्चर अर्धाच झाल्याने तो मंदोदरीचे -पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त- ऐकून अपुला जाऊ द्यायचा निश्चय करतो. एकदमच उर्वशी रौटेलाचे आयटम नृत्य आहे त्यातही - 'दिल तुझकोही दुंगी पहले सॉरी बोल' अशा ओळी आहेत. एवढंच झालं आहे सध्या.

अस्मिता Lol
एकदम सटीक लिहीले आहे.

अस्मिता, फारएण्ड किंवा आणखी कुणी तरी छान पिसं काढतील हा अंदाज बरोबर ठरला. Lol
सलमानच्या पिक्चरच्या वाटेला कुणी जाणार नव्हतंच म्हणून त्यावर लिहीलं .
हा धुरंधरांसाठी सोडला हा निर्णय अचूक ठरला Proud

रावण, मंदोदरी
गुंडीण, समानता इतक्यातच धमाल सुरू झाली आहे.
ते बॅकग्राउंडचं पंजाबी विव्हळगीत राहीलं Lol

अवतारी पुरूष : साऊथ चे हिरो जेव्हां सुटीवर जातात तेव्हां अवतार घेऊन देव म्हणून स्वर्गात काम बघतात. तिथली कामगिरी पार पडली कि पुन्हा पृथ्वीवर येतात.

Pages