Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देवकी, मृणाल आणि सर्वांचे
देवकी, मृणाल आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
कोकोनट पण आवडाच.
दुसरा भू भू दिसल्यावर त्यांच्यात होणारे बदल, दबा धरणं, गुर्रगुर्र आवाज हे सगळं दिसलंच.
आधीच्या धाग्यावर सगळ्या बाळांना भेटून झालं होतं. मस्तच आहेत सगळे.
देवकीने बरोब्बर ओळखले. ऑश्कु
देवकीने बरोब्बर ओळखले. ऑश्कु चॅप्टर आहे जाम
कसला गोड फोटो आहे हा! एका डोळ्यावर जुल्फे 
ऑश्कुचा फोटो अगदीच क्यूट आलाय
ऑश्कुचा फोटो अगदीच क्यूट आलाय. किती छान भाव आहेत चेहर्यावर!
ऑश्कु क्यूट दिसतोय, कोकोची
कोकोनटचा नवीन मित्र गाढव आहे, खरंच..! ही टीनेज गाय/ वासरू आणि गाढव, घोडा शिष्ट होता तो आला नाही बोलायला.



*
कोकोनटला भरपूर सोशल लाईफ आहे, आमच्यापेक्षा जास्त. हा उगाच छान बघत होता म्हणून -
होय वासरु टीनेजरच दिसतय.
होय वासरु टीनेजरच दिसतय. सुंदर फोटोज.
कोकोनटचा नवीन मित्र गाढव आहे,
कोकोनटचा नवीन मित्र गाढव आहे, खरंच..! ही टीनेज गाय/ वासरू आणि गाढव, घोडा शिष्ट होता तो आला नाही बोलायला >>>
पण एकदम छान मैत्री दिसते आहे.
३ मित्रांचा फोटो फार मस्त
३ मित्रांचा फोटो फार मस्त
इसापनीतीतल्या गोष्टीतल्यासारखे काहीतरी संवाद बोलत असतील असं वाटतेय.
सगळे किस्से मस्त.... आपला
सगळे किस्से मस्त.... आपला ओडिन कुठाय? ओडिनचे काही किस्से वाचले नाही एवढ्यात...
ऑस्करचा फोटो मस्त आलाय..
ऑस्करचा फोटो मस्त आलाय..
कोको च स्वागत, छान आहे कोको..त्याला बर्थडे च्या शुभेच्छा
कोकोनटला भरपूर सोशल लाईफ आहे, आमच्यापेक्षा जास्त. >>
थँक्स र्म्द, अस्मिता !
थँक्स र्म्द, अस्मिता, प्राजक्ता !
मस्तं आहेत कोकोनटचे मित्रं, सगळ्या प्रकारचे प्राणी, आयॅम सो जेलस
गाढव प्राणी मला नेहेमीच शान्तिप्रिय , निरुपद्रवी वाटतो , प्रेमाने बघतोय कोकोनट अगदी !
व्वाव! कोकोनट ची टीम भारी
व्वाव! कोकोनट ची टीम भारी आहे.
भुंकत नाही म्हणजे शांत आहे मुलगा. घोडा खडूस नाही पोक्त असेल.
अरे मी पण यांच्यात जाऊन पोरगेलासा होऊ का या मोड मधे असावा.
गाढव प्राणी मला नेहेमीच शान्तिप्रिय , निरुपद्रवी वाटतो >> +1
शान्तिप्रिय , निरुपद्रवी प्राणी नेहमीच गाढव वाटतो.
कोकोनटला फिरायला केव्हढं विस्तीर्ण शिवार आहे. मज्जा आहे एका मुलाची.
कोकोचं नाव मी स्कूबी ठेवलेलं. पण धाकट्यांनी कोको म्हणून हाक मारायला सुरुवात केली. दिवसभर तेच त्याच्या जवळ असायचै, शिवाय आजूबाजूची बच्चेकंपनी पण. तो कोको नावालाच रिस्पॉन्स द्यायचा. मग स्कूबी डू चा हट्ट सोडून दिला.
मंडपात किती शांत होता याचा हा फोटो. याच रंगाची चड्डी पण होती. पण हा रिव्हर्स सलमान खान असल्याने ती निषेध म्हणून फाडून टाकली.
खूप छान दिसतोय कोको आका
खूप छान दिसतोय कोको आका स्कुबी
मस्त फोटो, राभु
मस्त फोटो, राभु
अरे कित्ती गोडपणा करतोय कोको.
अरे कित्ती गोडपणा करतोय कोको.. हसतोय अगदी प्रॉपर.. डिस्नी डॉग अगदी !
थॅंक्स सामो, आर एम डी आणि
थॅंक्स सामो, आर एम डी आणि डीजे
रिव्हर्स सलमान खान ——
रिव्हर्स सलमान खान ——
सध्या बॅकयार्डात २-३ ससे
सध्या बॅकयार्डात २-३ ससे कायम असतात. माउई ची रिअॅक्शन बघण्यासारखी असते. निवांत घरात सोफ्यावर, खुर्चीवर वगैरे बसलेला असताना कुठल्यातरी खिडकीतून त्याला एखादा ससा दिसतो. तो बिचारा गवतात ऊन खायचा प्रयत्न करत असतो . झाले. माउईचे डोके फिरलेच. मग असेल तिथून जोरजोरात अगदी अर्जन्सी दाखवत भुंकत मागचे दार उघडून दे म्हणून धोशा लावतो. जाऊ दे ये एकदाचे काय ते भुंकून असे म्हणत दार उघडून दिले की तिरासारखा बाहेर सुटतो. आता आमच्या घराला मागे आधी एक फरशी घातलेला पॅटिओ मग त्याला झुडुपांची बॉर्डर अणि त्यापलिकडे लॉन असे आहे. पॅटिओ तून लॉन वर जायला उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूने रस्ता आहे पण काहीही झाले तरी माउई डाव्या बाजूच्या च रस्त्याने पॅटिओतून लॉन वर उडी मारतो . तो ससा मोस्टली उजव्या बाजूला लॉन च्या टोकाला बसलेला असला तरी हा बावळा डाव्या बाजूने जाऊन पूर्ण पॅटिओ आणि लॉन ला वळसा घालून त्या सश्याकडे जातो. तेही आरडाओरड करत. तो ससा कसा थांबेल याच्यासाठी?!
तो पळून गेला तरी माउई मग शिव्या दिल्याप्रमाणे भुंकत २-३ राउंड्स आख्ख्या बॅकयार्डात मारतो आणि मग येतो घरात 
हा सगळा एक्सरसाइज दिवसातून तीन चार वेळा होतो :डोक्याला हातः
>>>>माउई मग शिव्या
>>>>माउई मग शिव्या दिल्याप्रमाणे भुंकत
हाहाहा होय तसेच करतात प्राणी.
एखाद्या पक्ष्याचे नीरीक्षण करत बसले की तो चिडून उडतो तेव्हा शिवी दिल्यासारखाच आवाज करुन उडतो
माउई!
माउई!
माऊई
माऊई
नवीन फोटो मस्त आहे राभु.
माउई मग शिव्या दिल्याप्रमाणे
माउई मग शिव्या दिल्याप्रमाणे भुंकत >>> याला फुटलेच!
धागा एकदम पेटलाय मस्त …
धागा एकदम पेटलाय मस्त …
माऊई माउई मग शिव्या
माऊई माउई मग शिव्या दिल्याप्रमाणे भुंकत >>>
अस्मिता थँक्स .
सशाची शिकार

कुत्रा असाच असतो.
ऑश्कु पण सेम माउवी आहे , रोज
ऑश्कु पण सेम माउवी आहे , त्याला पण ज्या रुटने जिथे जातो तस्सेच जायचे असते , घरात्/बाहेर सगळीकडे कुठल्या रुटने जायचे फिक्स आहे



रोज पार्क मधे वॉकला जातो बिळां मधे तोंड घालून घालून ससे आणि उंदिर शोधत असतो
फोटो काय सुंदर आलेत.
फोटो काय सुंदर आलेत.
या भुभुंच्या शिकारीचं काहीही खरं नसतं. शिकार कमी ढोल जास्त बडवायचे असतात.
शिकार पळून गेली कि आपल्याकडे पाहून कुईं कुईं आवाज काढतात.
म्हणजे सांगत असतात " थोडक्यात हुकली नाहीतर आज शिकार झालीच असती"
हे सगळं शाबासकीसाठी करत असतात.
फोटो काय सुंदर आलेत.
फोटो काय सुंदर आलेत.
या भुभुंच्या शिकारीचं काहीही खरं नसतं. शिकार कमी ढोल जास्त बडवायचे असतात.
शिकार पळून गेली कि आपल्याकडे पाहून कुईं कुईं आवाज काढतात.
म्हणजे सांगत असतात " थोडक्यात हुकली नाहीतर आज शिकार झालीच असती"
हे सगळं शाबासकीसाठी करत असतात.
शिकार कसली जमतेय ,नुसतं मागे
शिकार कसली जमतेय ,नुसतं मागे धावण्यात इन्टरेस्ट आणि एकमेकांना चिडवायचं असतं
खारी तर महाबिलंदर असतात, टिझिंग मधे नं. १ !
(No subject)
^^या भुभुंच्या शिकारीचं
^^या भुभुंच्या शिकारीचं काहीही खरं नसतं. शिकार कमी ढोल जास्त बडवायचे असतात^°^^
एकदम बरोबर...
मांजरे या बाबतीत एकदम प्रो....
शिकारीला पण कळत नाही कधी आपली शिकार झाली ते..
आमच्याकडे पण खार आणी सिंबा
आमच्याकडे पण खार आणी सिंबा यांच्या रोज पकडापकडी सूरू असते. आजवर त्याला एकही खारू पकडता आली नाहीये पण पळापळी मात्र रोजचीच. खारी चिडवण्यात ऐक्सपर्ट असतात, मागे भरपूर झाडं आहेत, त्या फांदीवरू खाली पहात आवाज काढत रहातात आणी हा खालून केवीलवाणा पहात असतो.
Pages