Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राभु, दीपांजली मस्त लिहील्यात
राभु, दीपांजली मस्त लिहील्यात कमेन्टस. खरच

.
>>>>>शिकार पळून गेली कि आपल्याकडे पाहून कुईं कुईं आवाज काढतात.
म्हणजे सांगत असतात " थोडक्यात हुकली नाहीतर आज शिकार झालीच असती"
हाहाहा
>>>>>शिकार कमी ढोल जास्त बडवायचे असतात.
काय गं
भुभुंच्या शिकारीचं काहीही खरं
भुभुंच्या शिकारीचं काहीही खरं नसतं. शिकार कमी ढोल जास्त बडवायचे असतात^°^^
एकदम बरोबर...... +१
मांजरे या बाबतीत एकदम प्रो...... +१
हा फोटो सिंबाला एकदम सुट होतो
हा फोटो सिंबाला एकदम सुट होतो. त्याला गोळ्या देणं म्हणजे एक दिव्य असते. कश्यातही गोळी लपवा, याला वास येणारच. मग बाहेरचे खाऊन गोळी पद्धतशीर पणे थूंकून देतो. कुटून घातली कशात तर मग तो अख्खा पदार्थच बाद, अजीबात तोंड लावणार नाही.
तुमच्या बाळांचा काय अनुभव? काही ट्रीक असतील तर सांगा.
कश्यातही गोळी लपवा, याला वास
कश्यातही गोळी लपवा, याला वास येणारच. >>> सेम हिअर.
गोळ्या देणं दिव्य असतं.
माउई साठी हे बर्यापैकी वर्क
माउई साठी हे बर्यापैकी वर्क झालेय - लिक्विड औषध असेल तर ते नाकाच्या थोडे खाली लावायचे, आवडले नाही तरी केवळ प्रतिक्षिप्त क्रियेने ते चाटतात. गोळी असेल तर आधी बोटाने १-२ दा नुसते पीनट बटर चाटवायचे आणि मग गोळी पीनट बटर ने सर्व बाजूने पूर्ण कव्हर करून द्यायची. पिल पॉकेट्स मिळतात ते वर्क झाले नाहीत अजिबात.
व्हॉट आर दे थिंकिंग!!
वरचे कार्टून सही आहे
maitreyee - पिनट बटर, पिल
maitreyee - पिनट बटर, पिल पॅाकेट, आईसक्री, दही असे सगळे प्रयत्न करून झालेत पण कश्यालाही भिक घालत नाही तो. आता मला वाटते कि डायरेक्ट गोळ्या मेकिंग कंपनाशी बोलावे लागेल काही ईनोव्हेटीव्ह सोल्यूशन साठी
Much awaited reunion
Much awaited reunion

ऑश्कु आलेला आहे! माउई ला
ऑश्कु आलेला आहे! माउई ला ऑश्कु बरोबरच मावशीचे पण फार अप्रूप असते. भरपूर ट्रीट्स आणि खेळणी आणणारी मावशी
ऑश्कु ला फार अट्रॅक्शन्स आहेत बाहेर.
आमची आता बॅकयार्डात कुठे भगदाडे असतील ती बुजवण्याची गडबड उडाली
कित्ती कित्ती गोड असावं काही
कित्ती कित्ती गोड असावं काही जणांनी. 'डबल का मीठ्ठा' फोटो.
डबल का मीठ्ठा >>> +१
डबल का मीठ्ठा >>> +१
कित्ती कित्ती गोड असावं काही
कित्ती कित्ती गोड असावं काही जणांनी. 'डबल का मीठ्ठा' फोटो>> + १ एकदम गोड आलाय फोटो.
हाहा फारच गोड आहेत भावंडं..
हाहा फारच गोड आहेत भावंडं..
अरे काय बसवून ठेवलय आम्हाला.
अरे काय बसवून ठेवलय आम्हाला. लवकर काय ती सेल्फी काढा आणि आम्हाला खेळायला मोकळं करा
हे आई-बाबा, काका-मावश्या ना नुसते लाड लाड करुन करुन, नाकी नऊ आणतात. आम्हाला मोकळं (की मोकाट?
) सोडा पाहू.
Fantastic... Photo of the
Fantastic... Photo of the year ...
कसले क्युट आहेत दोघेही.
कसले क्युट आहेत दोघेही.
आणि पोझ काय देतात एकदम प्रो सारखे.
यांच्यासाठी हेअर ड्रेसर ठेवावी लागेल एक.
एकदम मिठाई फोटो !
मऊई ला औषध चाटवायची आयडिया आवडली.
वा, मस्त आहे फोटो
वा, मस्त आहे फोटो
आता रोज मजे मजेचे अपडेट
आता रोज मजे मजेचे अपडेट येतीलच. ही एक झलक. पहिला फोटो बाहेर सोडा असा हट्ट करताना. बाकीचे बाहेर कुस्ती खेळताना
प्रचंड गोड दिसतायत दोघं!
प्रचंड गोड दिसतायत दोघं! दृष्ट काढा
मै, क्लास टिपल्या आहेस
मै, क्लास टिपल्या आहेस मोमेंट्स! भारी!!
वॉव!! उन्हाळी सुट्टी सुरु
वॉव!! उन्हाळी सुट्टी सुरु झाली बाळांची. मस्त बाँडिंग होऊ देत.
नुकताच एक सिनेमा पाहिला - The
नुकताच एक सिनेमा पाहिला - The Heart Knows.
सिनेमाही तसा चांगला आहे, फील गुड मुव्हीज आवडत असतील तर आवडेल. तर त्या सिनेमात हिरोला एका ऑर्गन डोनरचं हार्ट मिळतं आणि त्यामुळे जीवदानही. समहाऊ त्याला त्या डोनरच्या कुटुंबाविषयी माहिती मिळते आणि तो तिथे येतो. त्या भागातला एक भुभू त्याच्याभोवती घुटमळायला लागतो. 'मला माहित आहे तू कोण आहेस ते' हा अभिनय इतका अप्रतिम केलाय त्या भुभूने की मी तो प्रसंग मागे जाऊन परत एकदा बघितला. भुभू लोकंना खरच असं काही कळतं का ते माहित नाही पण तो प्रसंग खूप सुंदर झालाय. दिग्दर्शकाची कमाल आहेच पण त्याबरोबर त्या भुभूचीही कमाल वाटली.
वा काय मस्त फोटो आलाय दोघांचा
वा काय मस्त फोटो आलाय दोघांचा
काय मस्त फोटो आलेत दोघांचेही
काय मस्त फोटो आलेत दोघांचेही
सुपर्ब !!
दोघेही खूप छान दिसताहेत.
दोघेही खूप छान दिसताहेत.
ऑस्कु माउवी जोडगोळीने घर
ऑस्कु माउवी जोडगोळीने घर डोक्यावर घेतलेय नुसते, डबल धमाका चालु आहे !

पहाटे सहा ते रात्री नऊ सगळीकडे जोडीने धुमाकुळ घालणे सुरु आहे !
बॅकयार्डचं दार उघडायची वाटच बघतात.. मग काय दिवस भर एकत्रं झुमीज, एकत्रं खेळणे, एकत्रं खिडकीतून व्ह्युज एन्जॉय करणे, एकत्रं झोपणे, काही खुट्ट झालं तरी दोघांनी अचानक झोपेतून उठून एकाच सूरात आकांताने भुंकणे आणि एकाच स्पॉटला पाय वर करत सुसु करणे .. Dogs that pee together stay together
सिनेमास्कोप मुव्हीज बघावा तसे आम्ही त्यांची डबल एन्टरटेन्मेन्ट बघत बसतो !
माउवीला त्याचे जेवण घाईघाईने संपवून ऑश्कुच्या जेवणातही इंटरेस्ट असतो, ऑश्कु हॅन्डफेड डॉग आहे त्यामुळे माव्याला त्याचेही अॅटॅक्शन आहे, मधे मधे काही घास त्यालाही भरवले जावेत अशी आपेक्षा असते आणि ते मिळतातच, मिळे पर्यन्त पेशन्स नसेल तर ऑश्कुचे तोंड चाटु लागतो
Btw अस्मिता,
Btw अस्मिता,
‘ डबल का मीठा’ टायटल या जोडी साठी वापरायला सुरवात केली आहे
सुपर सुपर क्यूट क्यूट जोडी...
सुपर सुपर क्यूट क्यूट जोडी....

मै आणि डी जे नी आता शेजारी शेजारी घरे घेतली पाहिजेत या दोघांसाठी
डबल का मीठा
डबल का मीठा
मस्त जोडी आहे. एकमेकांशी पटवून घेत असतील तर भारीच आहे.
क्युट जोडी आहे. फोटो बघत रहावेसे वाटतात.
कसली गोंडस आहेत दोन्ही बाळं..
कसली गोंडस आहेत दोन्ही बाळं...मज्जा येत असणार तुम्हाला...
ऑश्कु- माउई च्या
ऑश्कु- माउई च्या कार्टूनगिरीमुळे आम्हाला सध्या डीस्नेलँड च्या एखाद्या शो मधे कायमची फ्रन्ट रो सीट मिळाल्यासारखे वाटते आहे. सारखे त्यांची नोक झोक, कुस्त्या, क्षणात आडवे पसरणे तर पुढच्या क्षणाला बाहेर कुठल्यातरी आवाजाचा कानोसा घेऊन जिवाच्या आकांताने भुंकाभुंक. वागणे पण अगदी सुट्टीला आलेल्या टॉडलर भावंडांप्रमाणे. माउई मावशीच्या मांडी वर, मावशी च्या शेजारी, मावशीच्या बेड वर जागा पकडतो आणि ऑश्कु मला खेटून बसतो. झोपलेले असले की एंजल्स आणि पुढच्या मिनिटाला सैतान
किचन मधे कोणीही गेले की दोघे तातडीने जे करत असतील ते सोडून त्या व्यक्तीच्या मागे. कोण काय खातंय त्यावर डोळा ठेवून असतात. प्रत्येक व्यक्तीकडून ट्रीट्स वसूल करतात. त्यांचे व्हिडिओज इन्स्टावर टाकतो आहोत अधे मधे जमेल तेव्हा.
Pages