भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! डेंजर दिसतोय साप.

पण भुभूंना बरोब्बर लागतो सुगावा. मी लहान असताना आमच्याकडे कुत्रा होता. जर्मन शेफर्डच. त्याला गेटबाहेर नाग दिसला होता. भुंकून भुंकून उच्छाद आणला होता त्याने नाग तिथून जाईपर्यंत.

सिम्बा एकदम गार्डियनच्या भुमिकेत..जर्मन शेपर्ड फार प्रोटेक्टिव्ह असतात ना?
ओडिनचे काहि अपडेट आले नाही खुप दिवसात..

सर्व फोटू मस्त. सोनेरी मांजरांना ऑरेंज किंवा जिंजर कॅट म्हणतात हे मला अमेरिकेत आल्यावर कळले. आणि ऑरेंज जरा एक्स्ट्रा म्याड असतात ना, Proud दिवसभरात ऑरेंज कॅट्सची रील्स बघितल्याशिवाय चैन पडत नाही आणि बाकीच्या मांजरांची अर्थातच जोडीला.

फोटोत सुद्धा साप बघून तंतरली ....
मिनी ला हल्ली एक नवीन सवय लागलीय, खाऊन झाले की ती तिची खाऊची वाटी फरशी उकरून झाकून ठेवायचा प्रयत्न करते... मांजरे शी कशी झाकून ठेवतात न, तसे... त्या नादात खूप वेळा खाऊ सांडून जातो.

हे असे साप आमच्याकडेही दिसतात. रॅट स्नेक, गार्टर स्नेक पण इथे विषारी रॅटल स्नेक, विंचू, सरडे, पाली, सापसुरळ्या, ग्राउंड फ्रॉग जे टॉक्सिक असतात व पाऊस पडला की बाहेर निघतात. अजूनही काय-काय कुरूप विषारी सगळे आहे. रात्री कोकोनटला यार्डमधे लवकरात लवकर उरकून घ्यायला लावते, लक्ष ठेवते.

कोकोनट अतिशय फ्रेंडली व भोचक व्यक्तिमत्त्वाचा भुभु होत आहे, सगळ्या येणाऱ्याजाणाऱ्या लोकांकडे, गराजमधे साफसफाई करणाऱ्यांकडे, गवताला पाणी घालणाऱ्यांकडे, त्यांच्या भुभूंकडे, खारींकडे, मनिमाऊकडे ते पार दिसेनासे होईपर्यंत बघत बसण्यासाठी रस्त्यातच मांडी घालून बसतो आहे. त्यात शक्यतो फरपटत नेणं पटत नाही व मलाही ह्याचं होईपर्यंत कुठे बघावं कळत नाही, त्यामुळे मी पण बघत बसत हळूहळू भोचक होत आहे. Happy त्यामुळे पाच मिनिटात होणाऱ्या वॉक साठी आम्हाला वीस मिनिटं लागतात.

ही पोझिशन दुसरीकडून येणाऱ्या भुभू साठी -
IMG-20250525-WA0000.jpg
ही खारीसाठी -
IMG-20250525-WA0001.jpg

एक काका ड्राईव्ह वे वरील कारच्या ट्रकमधून सामान काढताना हा समोरच बघत बसला. मग मी त्यांना म्हटले की माझ्या कुत्र्याला तुम्ही खूप आवडलात, आम्ही तुमचे भोचक शेजारी (नोझी नेबर्स) आहोत आणि आता तुमच्याकडे बघत बसलो आहोत. ते हसून म्हटले, किराणासारखा किराणा आणि कार सारखी कार. बघा, बघा. सामानच ठेवतो आहे. Happy

कोकोनट - मागील जन्मी पुण्याचे काका होता बहूदा … सगळी कडे पाहून पुढे जाणं … पण आता चांगलाच मस्कुलर दिसतोय मस्त

कोकोनट क्यूट दिसतोय एकदम! तिकडे ससे आहेत का? इकडे सध्या सश्यांचा पिले देण्याचा सीझन आहे त्यामुळे खूप ससे आहेत जिकडे तिकडे. माउई ला चालताना कुठून तरी लांबून एखादा गवतात लपलेला ससा दिसतो आणि झालाच मग वॉक. तिथेच बसून रहातो बघत. अशा वेळी शेपूट एक्सायटमेन्ट ने थरथरत असते. मग चला चला ओरडा, ओढा , लीश सोडुन चालत पुढे निघाले तरी ढिम्म येत नाही.

maitreyee - ईकडे आहेत ससे आणी हरणं पण … वॅाकवर मी दोन्ही न दिसू नये अशी प्रार्थना करतो मी, कारण आमच्यातला शिकारी जागा होतो आणी मग सोड मला आणतोच मी एखादा ससा किंवा हरीण मारून असा लूक देतो. एकदा सस्यामागे सोडले होते, त्यांचा स्पीड पाहून चूपचाप परत आला.. कळतय पण वळत नाही अशी अवस्था आहे त्याची.

या धाग्याचे कर्तेधर्ते, तसेच सगळ्या पेटांचे नेते ओडीन दादा उर्फ ओड्या भाऊ यांची बरेच दिवसात काहीच खबरबात नाही …

कोकोनटचे फोटो गोड आलेत.
एकदा सस्यामागे सोडले होते, त्यांचा स्पीड पाहून चूपचाप परत आला.. कळतय पण वळत नाही अशी अवस्था आहे त्याची.>>smiley36.gif

फ्रेंडली व भोचक व्यक्तिमत्त्वाचा भुभु >>> Lol भारी गोड आलेत फोटो कोकोनटचे!

आमच्या इथे जवळच एक ग्रीन पॅच आहे असा ससे वाला. तिथे सगळी भूभीमंडळी चौखूर उधळलेली असतात अशीच Happy

Screenshot_20250528_131114_Facebook.jpgआम्हाला कोको एक महिन्याचा असताना सापडला. नवरात्रात देवीच्या मंडपात केविलवाणा होऊन बसला होता. (कृपया श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय यात आणू नये).
आम्ही तोच त्याचा वाढदिवस समजून नवरात्रात साजरी करतो. या वर्षी जवळ मंडप होता तर उद्देश सांगितल्यावर सर्वांनी त्याचे लाड केले. धार्मिक कार्यक्रम संपल्यावर तिथे केक कापला.
Screenshot_20250529_131031_Gallery.jpg

कोको आणि कोकोनट भाऊ शोभतील. मस्त दिसतोय कोको.

काल मी एका दुचाकीवर मस्त निवांत बसून गाव हिंडणारा भुभु बघितला. म्हणजे तसे रोज दिसतातच, कारने पण फिरणारे असतात. पण कालचा लक्षात राहिला. पाऊस नव्हता म्हणून फिरायला मिळतंय असं काहीतरी मस्त मज्जेचं वाटत असणार त्याला. जाम एक्साईट होऊन शेपूट हलवत होता, सिग्नल आल्यावर त्याने थोडा वेळ झाल्यावर वर मान करून बाबाकडे बघितलं. "अजून किती वेळ" टाईप भाव होता चेहर्‍यावर कारण सिग्नल १४० सेकंदांचा होता तर बहुतेक वैतागला असावा. मग बाबाने हसून चला म्हटलं तर शेपूट हलवायला सुरूवात! भारी वाटलं मलाच! Happy

मला भू भू चे प्रकार सगळे माहीत नाहीत. पण एक व्हेट आहे त्याने सांगितले कि हे ब्रीड लॅब्रो- रिट्रीवर आहे. लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिट्रीवर माहिती होतं. हे पहिल्यांदाच ऐकलं. आकार मोठा असला तरी प्रेमळ आहे.

लाडात येणं हे आवडतं काम आहे. बाहेरून येऊन लक्ष दिले नाही कि एकेक आवाज काढत राहतो. जर कधी शास्त्रीय संगीत लावलं किंवा राग दारी प्ले केली तर भुंकून घर डोक्यावर घेतो. ऐकू देत नाही. स्पीकरला भुंकतो.

पण तेच किसी होटल मे जाये सारखी टपोरी गाणी लावली कि शांत असतो. जमिनीवर लोळण घेऊन चारही पाय वर करून तिरके डोळे करून हसत अशतो. हा नक्कीच गोविंदा मिथुन फॅन आहे.

अरे वा..कित्ती गोडु आहे कोको, त्याचा केकही त्याला शोभणारा !
वेलकम, कोको !
श्रद्धा, अन्धश्रद्धा सगळ्या पलिकडचे ऋणानुबन्ध असतात हे.. तुम्हाला देवीच्या मंडपात सापडला कारण या जगात देव कोणी असतील तर आपली भुभुबाळच , dog god थोडे इकडे तिकडे करायचे लेटर्स ..देवीनेच दिला तुम्हाला !
ऑश्कुला पण मी कधी कान्हा , कधी रामलल्ला म्हणते.
बाळकृष्णा सारखा खोडकर, प्रेमळ, लाडिक आणि मिल्क प्रॉडक्ट्स भयंकर आवडणारा.. रामलल्ला कारण त्या आयोध्येच्या मन्दिराचे उद्घाटन होते तेंव्हा आमची मध्यरात्रं झाली होती, मी बघत होते लाइव्ह.
ऑश्कु अचानक वरच्या बेडरुम मधून खाली लिव्हिंग रुम मधे आला आणि टि.व्ही पुढे बसला.. तो बसायला आणि रामलल्ला मूर्ति दिसायची एग्झॅक्ट एकच वेळ झाली.. त्यामुळे ऑश्कुच आमचा रामलल्ला Happy

IMG_20250529_213547_164_0.jpg

फोटो कसला गोड आहे. क्युट बाळ आहे हे.
लाडीक आहे.
dog god थोडे इकडे तिकडे >>> भारीच कि
रामलल्ला किती विलक्षण आहे ना!!
ग्रेट!! इमॅजिन करून पाहिलं.
ज्यांच्या कडे भू भू नाही त्यांना ऐकायला खरं वाटत नाही. पण घरी आल्यावर स्वतः डोळ्यांनी पाहिलं कि प्रत्यय आला म्हणतात.

डीजेचा ऑस्कर तर मला कायम सॉफ्ट टॉयच वाटतो! Lol
कमाल निरागस भाव असतात फोटोत, नाहीतर एकदम खट्याळ तरी.

प्रज्ञा आणि देवकी,
बरोब्बर ओळखलय तुम्ही, निरागस भाव असतात खरे पण मोस्ट्ली काहीतरी खोड्या करायचे कट शिजत असतात त्याच्या डोक्यात Biggrin
थँक्यु रानभुली !

खूप छान पोस्ट्स आहेत...
बाकीचे काही म्हणोत, आपल्याला माहित असते की आपले हे फर वाले बाळ किती जीव लावते ते...

Pages