Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी आहे बाबाb, तु काही काळजी
मी आहे बाबाb, तु काही काळजी करू नकोस”, “अपून है ना“ ....किती गोड!
पर्सी ज्योईचा किस्सा भारी.
सिंबू, कसला शूर आहे, शब्बास..
सिंबू, कसला शूर आहे, शब्बास.. गुडबॉय !
सिंबा, केवढी काळ्जी घेतो
सिंबा, केवढी काळ्जी घेतो बाबांची.
सिंबा, केवढी काळ्जी घेतो
सिंबा, केवढी काळ्जी घेतो बाबांची.
त्या पिटबुल च्या अंगावर धाऊन
त्या पिटबुल च्या अंगावर धाऊन जाणारा सिंबा डोळ्यासमोर आला अगदी.
सिंबाचा किस्सा भारी आहे.
सिंबाचा किस्सा भारी आहे.
सिंबा शुरवीर आहे,
सिंबा शुरवीर आहे,
जोई/पर्सी बेस्ट फ्रेंड्स ..
पिटबुल आर नटोरिअस. फार डेंजर
पिटबुल आर नटोरिअस. फार डेंजर ब्रीद आहे. लोकांनी झुंझार अधिकाधिक झुंजार ब्रीडींग केलेली जात आहे.
dog's way home << रडायला
dog's way home << रडायला लावणारासिनेमा, नेट्फ्लिक्स वर आहे
सिम्बा शूरवीर आहे . पिटबुल ला
सिम्बा शूरवीर आहे . पिटबुल ला पिटाळून लावलं म्हणजे टेरर चं आहे.
dog's way home << रडायला लावणारासिनेमा, नेट्फ्लिक्स वर आहे>>>> तसाच भुभु वरचा "चार्ली777" सिनेमा पण छान आहे सॉलिड इमोशनल पण मस्त.
डोअरमॅट क्युट आहेत आणि त्यावरचे लिहिलेलेही. सॅमी ची खिडकीतली पोज बघून ही शॉर्टफिल्म आठवली .https://youtube.com/shorts/b4V4ecl4YD4?si=ARJiAc7scffR15l0

मांजरांना खिडकी अतिशय प्रिय, आमचा बंड्याचं पण सतत खिडकी बाहेर लक्ष असतं यासाठी खिडकीवरच ठाण मांडून असतो बघून बघून कंटाळा आला की खिडकीवरच झोपतो.
हा त्याचा जुना फोटो.
सकाळी चिमण्या पाहणे आणि मी त्याला पाहात सकाळची सुरुवात करणे आमचा फेवरेट उद्योग.
“Megan Leavey” २०१७ ला आलेला
“Megan Leavey” २०१७ ला आलेला true story based पहा जर पहायला नसेल तर. एक अप्रतिम स्टोरी आहे
सॉलिड इमोशनल पण मस्त.>> छे
सॉलिड इमोशनल पण मस्त.>> छे !नकोच ते. मी २०-२५ माणसांचे मुडदे पाडणारा सिरियल किलर सिनेमा किंवा सीरीज जराही विचलित न होता पहाते पण डॉग मूव्हीज बघवत नाहीत.
मी पण क्राइम रक्तपात सिरियल
मी पण थ्रिलर ,क्राइम ,रक्तपात असणाऱ्या सिरियल किलर वाल्या सिरीज जास्त पाहते मध्यंतरी तर हिंदी बरोबरोबर इंग्लिशही खूप पाहिल्या .मग लक्षात आलं फारच सरावलोय आपण या सगळ्याला आणि त्याचं काही वाटतही नाही ,इमोशन लेस तर नाही ना होऊ!.मग अधूनमधून असे इमोशनल ,रडारडी वाले चित्रपट बघायला सुरुवात केली, मग अजूनही जिवंत आहेत इमोशन्स, हे पटलं
(पण पर्सनली मला असे इमोशनल रडारडी वाले पिच्चर आवडतात हेही एक कारण आहे
)शेवटी पर्सनल आवड महत्वाची.
हो क्यूट आहे हा विडीओ. बंडू
हो क्यूट आहे हा विडीओ.
बंडू
बंड्या जामच क्यूट आहे!
बंड्या जामच क्यूट आहे!
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DJMmx-0xL1L/?igsh=eWt0b2xvaXhydDN3

शहाणं पोरगं gentle म्हणजे काय ते कळायला लागलंय
परिक्षा पास! १०० पैकी १००
परिक्षा पास! १०० पैकी १०० मार्कानी...
कॅटचा व्हिडिओ आणी चिमणी वॉचर क्युट!
मिनी , आमची माऊ, परवा कशी काय
मिनी , आमची माऊ, परवा कशी काय कोणास ठाऊक, पण बाल्कनी मधून खाली उतरायच्या प्रयत्नात खाली पडली. बहुतेक कबुतर धरायचा उद्योग करत होती.
ती घरात दिसेना म्हणून मी खूप बेचैन झाले. सगळीकडे शोधले, कपाटे, रूम, कुठेच नाही. खाऊचा डबा वाजवला की ती येते लगेच. ती घर आणि बाल्कनी सोडून कुठे जात नाही. मला खूप अस्वस्थ वाटू लागले. ऑफिसला जाण्यासाठी पाय निघेना. मग अर्धा दिवस रजा घेतली.
कविता ला ( मायबोली वरची कवीन ) फोन केला. ती animal communicator आहे आणि तिच्या त्या कौशल्याचा मला पूर्वी पण खूप छान अनुभव आला होता. तिला सांगितले की मिनी २० मिनिटे सापडत नाहीय.
तिने पटकन सांगितले की मी बोलते मिनिशी. लगेच म्हणाली की मिनी घराजवळच आहे, तिच्या ओळखीच्या ठिकाणी आहे, निळा पत्रा आणि लाकडी चप्पल स्टँड च्या जवळ आहे. मी बोलतेय तिच्याशी, तू शोध तो पर्यंत.
मी पटकन बिल्डिंग मधे, जिन्यावर, ज्यांनी कॉमन पॅसेजमध्ये चप्पल स्टँड ठेवलीत तिथे शोधले. तर खाली पार्किंग च्या एका कोपऱ्यात मिनी सापडली. गप्प बसून होती. उचलले तर दिसले की तिला नाकावर आणि तोंडावर जखम आहे, रक्त येत होतं आणि पुढचा पाय खुप दुखावला आहे.
उचलून घरी आणले. कविता ला फोन केला, म्हटले की तू जसे खुणा सांगितल्या तिथेच सापडली. जणू कविताला ती प्रत्यक्ष दिसत होती. कविता म्हणाली की मिनीने तिला सांगितलं आहे की माझा पाय खुप दुखतोय, खाली टेकवायची भीती वाटतेय.
मग डॉक्टर कडे नेले. सुदैवाने मेजर फ्रॅक्चर नव्हते. पेन किलर इंजेक्शन दिले.
मिनी खूप मलूल झाली होती.
कविता ने च फोन वर होमिओपॅथी औषधे सांगितली, जी मांजराना चालतात.
त्यांनी खूप फरक पडला. ३ दिवसात मिनी हळू हळूहळू चालू लागली. तिच्या वेदना खूप कमी झाल्यात.
कविता चे हे कौशल्य ऐकायला आणि वाचायला कितीही अविश्वसनीय वाटले तरी १००% खरे आहे, अद्भुत आहे. मी जवळपास गेले ३ वर्षे याचा अनुभव घेत आहे.
तुमच्या सारख्या प्राण्यांना आपुलकीनं वागवणाऱ्या लोकांशी हे शेअर करावे वाटले.
कविता - कवीन, माहित नाही
कविता - कवीन, माहित नाही तुम्ही या धाग्यावर आहात , पण तुमचे स्कील जबरदस्त आहे. मी याचा कधी अनुभव घेतली नाहिये आणी अशे काही स्कील असतं यावर विश्वास नव्हता, पण हा अनूभव वाचून विश्वास ठेवावा वाटतो.
मिनीला आता बरे आहे हे वाचून छान वाटले.
मिनीला आता बरे आहे हे वाचून
मिनीला आता बरे आहे हे वाचून छान वाटले.>> +१
कविन च्या स्किल्सचही कौतुक.
हरितात्या यांच्या प्रतिसादाला
हरितात्या यांच्या प्रतिसादाला मम !
धन्यवाद हरितात्या, प्राजक्ता,
धन्यवाद हरितात्या, प्राजक्ता, देवकी. ..
अरे वा अस कम्युनिकेट करता आलं
अरे वा अस कम्युनिकेट करता आलं तर किती छान ना...
मिनी चा किस्सा अद्भुत आहे.
मिनी चा किस्सा अद्भुत आहे. मिनीला लौकर बरं वाटू दे.
कविन , ग्रेट आहेस तू!
आणी अशे काही स्कील असतं यावर
आणी अशे काही स्कील असतं यावर विश्वास नव्हता, <<<>>>> नक्की ठेवा विश्वास. कविन माझ्या मांजरांचीही गो टू कम्युनिकेटर आहे. मीही बरेचदा तिची मदत घेत असते.
धनश्री - कविता ईतक्या लांबवर
धनश्री - कविता ईतक्या लांबवर कम्यूनिकेट करू शकतील का हा खरा प्रश्न आहे
कविता ईतक्या लांबवर
कविता ईतक्या लांबवर कम्यूनिकेट करू शकतील का हा खरा प्रश्न आहे <<>>> अंतराचा काहीही संबंध नाही. आम्ही दोघी वेगवेगळ्या शहरात राहतो.
^^कविता ईतक्या लांबवर
^^कविता ईतक्या लांबवर कम्यूनिकेट करू शकतील का हा खरा प्रश्न आहे^^°
मेलडी खाओ, खुद जान जाओ
धनवन्ती आणि धनश्री धन्यवाद.
धनवन्ती आणि धनश्री धन्यवाद. हरितात्या, रमड, आदिती, देवकी तुमचेही आभार.
माबोवर चक्कर हल्ली कमी मारली जाते म्हणून इथे तुम्हाला धन्यवाद म्हणायचे राहीले होते.
कम्युनिकेशन बद्दल मला जे वाटते ते लिहीते थोडक्यातः
१) समोरा समोर किंवा स्वतःच्या पेटशी तुम्ही जसे घरातील इतर सदस्यांशी बोलाल तसे आरामात बोलता येते. ते वाईब्ज/एनर्जी कॅच करतात आपली. आपल्याला त्यांची एनर्जी/वाईब्ज समजले की झालेच कम्युनिकेशन
२) टेलिपथिक कम्युनिकेशन हे इन्ट्युटिव्ह टाईप असते. थोडे सिक्स्थ सेन्स डेव्हलप झालाय म्हणू आता. हे थोडे विश्वास ठेवायला अवघड जाते. (रेकी किंवा इतर हिलिंग मोडॅलिटी वगैरेवर विश्वास असेल तर यावर विश्वास ठेवणे त्यामानाने पटकन जमते) बाकी खरच सांगते मला स्वतःलाही काही वर्षांपूर्वी नसते पटले पटकन काही. अनुभव येत गेल्यामुळे निव्वळ विश्वास बसत गेला. सुरवातीला बुद्धीने "योगायोग" खात्यात जमा करुन उडवून लावले पण दरवेळी योगायोग आणि दरवेळी वेगळा अनुभव जमा होत गेल्यामुळे केवळ मेंदूला पटलं की आपल्याला ढोबळ मानाने सायन्स द्वारे सांगता येतय आत्ताच्या घडीला त्याहून कदाचित वेगळं काही असलं तरी ते खोटे नक्कीच नाही त्यावरही विश्वास ठेवायला हवा.
हे प्रमोशन नाही किंवा श्रद्धा अंधश्रद्धा मंडळाला वाद घालायचे निमंत्रणही नाही. माझ्यापुरते म्हणायचे तर मी स्वतःशी प्रामाणिक आहे ना? हे नक्की तपासत रहाते. त्यामुळे आलेले अनुभव नाकारत नाही आणि एखाद्याचा यावर विश्वास नसेल तर त्याला तू विश्वास ठेवच असा दट्याही देत नाही.
४ वर्षांपूर्वी माझ्यासाठीही हे सारे अविश्वसनियच होते. आज तसे नाहीये. त्यामुळे तुमचाही कोणाचा विश्वास नाही बसला तरी ठीक आहे. यायचा असेल तर येईल अनुभव तेव्हा बसेलही कदाचित विश्वास आणि नाही बसला तरी बिघडलं कुठे? आपण आपल्याशी प्रामाणिक असल्याशी मतलब.
गेली चार वर्ष अनुभव घेतेय. माझ्या limiting belief system ला एकेक करत दणके बसलेत
कविता चे हे कौशल्य ऐकायला आणि
कविता चे हे कौशल्य ऐकायला आणि वाचायला कितीही अविश्वसनीय वाटले तरी १००% खरे आहे, अद्भुत आहे. मी जवळपास गेले ३ वर्षे याचा अनुभव घेत आहे. >>> खरचं अद्भुत आहे, दैवी देणगीच लाभली आहे कविन तुम्हाला.
आणि कदाचित तो परत आला असता.
जर माणसांसोबत असे कोणी कम्युनिकेट करत असता तर ४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या माझ्या भावासोबत तरी संवाद साधता आला असता
Pages