
तर हैदराबादकरहो,
पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.
तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9
भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.
तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.
https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8
कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.
गटगला यायचंच हं!
आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:
वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५
शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…
निवासी गटग चा पहिला फोटो
सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.
एक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…
बरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!
माबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना
सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.
जेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)
दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!
फानुस हॉटेलात काही माबोकर्स
प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.
हलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश
रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.
सूप आलं
त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.
कुमार१ यांचे अभिवाचन
यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.
वेज बुलेट्स १
चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश
नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.
दम की बिर्याणी
शाही तुकडा आणि खुबानी का मीठा
लॉबीमध्ये एक फोटो काढला
पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.
हलीम ऐकण्यात नाही. खास
हलीम ऐकण्यात नाही. खास हैद्राबादी आहे का?
(गुगल केलं. दालचा सारखं काही आहे का?)
कल्ला शब्द पहिल्यांदा ऐकलं पण भाव समजला.
कुठल्या भागातला शब्द आहे?
अस्मिता.,
अस्मिता.,

नक्की खाईन, चवीने !
. . .
ते हलीम- फिलीम माझ्या काही कामाचे नाही !
मला खरं तर उत्सुकता आहे की मानव पाण्याच्या फोडणीचे जे खाद्यपदार्थ बनवतात ते चाखून बघण्याची
कल्ला हा शब्द मी प्रथम
कल्ला हा शब्द मी प्रथम नागपूरच्या माझ्या मित्रांच्या तोंडून ऐकला.
तो हैदराबादला पण वापरतात हे वाचून नवल वाटले.
मित्रहो,
मित्रहो,
गेल्या काही दिवसांपासून मानव-वामन ही जोडी आपापले व्याप सांभाळून आम्हा सर्वांच्या 30, 31 व 1 अशा तीन दिवसांचे भरगच्च नियोजन करीत आहे. त्याबद्दल त्या दोघांना - म्हणजे या हैदराबादी " मा-वा" जोडीला शतशः धन्यवाद !
ते दोघे घेत असलेल्या कष्टाबद्दल आम्हा सर्वांतर्फे त्यांना इथे एक कडक सलाम . . .
(जरा वेळाने संभा त्यांच्या पोतडीतून सलामाचे एक कडक चित्र चढवतील अशी आशा आहे
रानभुली,
रानभुली,
मायबोली हॉस्पिटल>>>> भारीच आहे 😂
ऋतुराज हे अमेरिकेतील गटगला नव्हते. त्यांना ऐनवेळी व्हिसा नव्हता मिळाला का?>>>>>> 😂
बाई दवे,
मी पुणे गटगला पण नव्हतो.
व्हिसा आहे, पण दुसर काम आलं.
गप्पा इतकंच गटग ला काय खातो हे महत्वाचं आहे हे आता माझ्या लक्षात आलं आहे. 😂
* कल्ला हा शब्द >>>
* कल्ला हा शब्द >>>
याचा उगम चक्क संस्कृत आहे : [ध्व. सं. कल्].
हैदराबादशी त्याचा संबंध वाटत नाही. 1980च्या दशकात आम्ही तो पुण्यातील कॉलेजमध्ये वापरत होतो ना !
होय. कलकलाट, कल्लोळ इत्यादि
होय. कलकलाट, कल्लोळ इत्यादि.
" मा-वा" जोडीला शतशः धन्यवाद
" मा-वा" जोडीला शतशः धन्यवाद !
मावा म्हणजे गटग गोड्च होणार. मावा बर्फी नक्की ठेवा मात्र गटगला.
हो.
हो.
हैदराबादला पोचण्याआधीच मावा छान रंगू लागला आहे
बाई दवे >>> हाहाहा, सहीच.
बाई दवे >>> हाहाहा, सहीच.
@रानभूली: हैदराबादी हलीम
@रानभूली: हैदराबादी हलीम
>>"ते दोघे घेत असलेल्या
>>"ते दोघे घेत असलेल्या कष्टाबद्दल आम्हा सर्वांतर्फे त्यांना इथे एक कडक सलाम . . .">>
कडक सलाम तो बनता ही हैं बॉस...
येस बॉस एकदम झकास चित्र !
येस बॉस
एकदम झकास चित्र !
आमच्या वाटच्या नहारी ,
आमच्या वाटच्या नहारी , बिर्याणी खाणारं कोणी नाही का?
>आमच्या वाटच्या नहारी ,
>आमच्या वाटच्या नहारी , बिर्याणी खाणारं कोणी नाही का?>>
सतीश, ऋतुराज, मा-वा आणि मी आहोत की 😀
भारी! गटगचा सिझन आलाय जणु..
भारी! गटगचा सिझन आलाय जणु...अजुन लोकानी जमा, भरपुर दन्गा/कल्ला करा, खादाडी करा आणी फोटो काढा.
(हैदराबाद गटग म्हटल्यावर अमा ची खुप आठवण आली, त्या असत्या तर नक्की आल्या असत्या...त्याच लाडक घी रोस्ट चिकन घेवुन आल्या असत्या)
सतीश, ऋतुराज, मा-वा आणि मी
सतीश, ऋतुराज, मा-वा आणि मी आहोत की >>> धन्यवाद
मानव थॅंक्स.
मानव थॅंक्स.
रेसिपी बघितली नाही अजून.
पण लाप्शीचं तिखट भावंडं दिसतंय.
लाप्शी - बिर्याणी.
मी पण व्हेजच.
इच्छुकांसाठी हा घ्या हलीमचा
इच्छुकांसाठी हा घ्या हलीमचा फोटो -
रमड भारी दिसतय. मधला लाल
रमड भारी दिसतय. मधला लाल कांदा आणि लिंबु. उफ्फ!! बाकी काजू आवडत नाहीत.
हलीम काय असतं.
हलीम काय असतं.
असो मी वेज आहे, उगाच चौकशी.
मलाही अमांची आठवण आली.
मूळ पुणेकर आणि नंतर हैद्राबाद आणि नंतर बरीच वर्ष मुलुंडला असल्याने इथली तिन्ही gtg त्यांना जवळचीच तशी. शेवटी अल्पकाळ वेस्टर्न, अंधेरी का कुठे होत्या. अमेरिकेत जायचंही स्वप्न होतं त्यांचं, वाचल्यासारखं वाटतं.
खरंय, आता गटगला अमांची
खरंय, आता गटगला अमांची जागा कोण घेणार बोला
प्रतीक्षेत . . .
अमांची जागा कोण घेऊ शकणार!
अमांची जागा कोण घेऊ शकणार!
हलीम ही रवा, मूगडाळ, तूप, मटण
हलीम ही रवा, मूगडाळ, तूप, मटण, मसाले इ. पासून बनवलेली एक लोकप्रिय पाककृती आहे. हलीम ची consistency साधारणतः पिठल्यासारखी असते. सकाळी दहा वाजता करायला सुरु केलं तर दुपारी चार वाजेपर्यंत तयार होतं.
हैदराबादेतील नामांकित रेस्टॉरंट्स दरवर्षी रमजानच्या वेळी महिनाभर हलीम विकतात. इतर वेळी नाही.
हैदराबादची विभिन्न लोणची हा
हैदराबादची विभिन्न लोणची हा पण एक कुतुहलाचा विषय आहे.
>>"सकाळी दहा वाजता करायला
>>"सकाळी दहा वाजता करायला सुरु केलं तर दुपारी चार वाजेपर्यंत तयार होतं.">>
बापरे... बराच निगुतीने बनवण्याचा पदार्थ दिसतोय हा! ह्याआधी चाखला असला तरी तुम्ही म्हणाला होतात तो 'उत्तम चवीचा हलीम' खाऊन बघायची ईच्छा होती, पण आता तो मिळण्याची शक्यता का नाही हे लक्षात आले 👍
हलीम चा फोटो भारी आहे.
हलीम चा फोटो भारी आहे.
सहा तास लागत असतील तर अवघड आहे. याचं मिनी हलीम बनवता येत असेल तर ठीक.
हे गटग खमंगपणा कडे वाटचाल करीत आहे.
Happy गटग.... फोटो काढा भरपूर
Happy गटग.... फोटो काढा भरपूर..
खूप पूर्वी एकदा हैदराबाद ला गेलो होतो..आवडलं होतं तेव्हा.. पांढरा वाघ पहिल्यांदा बघितला होता zoo मध्ये.. रामोजी पण मस्त आहे..
बिर्याणीच्या देशा, हलीमच्या
बिर्याणीच्या देशा, हलीमच्या देशा, नहारीच्या देशा, "बोटी-नल्ली" च्या देशा, नवाबांच्या देशा, चार्मिंगनार... सवारी..चारमिनाराच्या देशा, हैद्राबादी बोलीच्या देशा, "मा-वा" च्या देशा, माबो-हॉस्पिटलच्या देशा, सचित्र हौर दख्खनीमें वृत्तांत 'देवा' खुषजुबान लोगां !!!
'कुमार-संभा' गटगला हार्दिक शुभेच्छा
हलीम माहीतीसाठी धन्यवाद वामन
हलीम माहीतीसाठी धन्यवाद वामन देशमुख.
भाऊ हैद्राबादला जायचा तेव्हा कराची बिस्कीटस आणायला सांगायचे, आता इथेही सहज उपलब्ध असतात, तोही शाकाहारी असल्याने हलीम वगैरे ऐकलं नव्हतं कधी. मोत्याचे सेटस आणलेले एकदा त्याने आणि नेहेमी कराची बिस्कीटस आणायचा.
Pages