हैदराबाद गटग - डॉ. कुमार सोबत- ०१ जून २०२५

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 May, 2025 - 08:58

तर हैदराबादकरहो,

पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.

तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9

भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.

तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.

https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8

कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.

गटगला यायचंच हं!

आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:

वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५

शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…

निवासी गटगचा पहिला फोटोनिवासी गटग चा पहिला फोटो

सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.

मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगतानाएक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…

एका घुमटाखाली माबोकरबरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!

माबोकर गोलकोंडा पाहतानामाबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना

सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.

सात जणांचा फोटोजेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)

दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!

फानुस हॉटेलात काही माबोकर्सफानुस हॉटेलात काही माबोकर्स

प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.

पदार्थांचे फोटोहलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश

रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
रिकाम्या टेबलाचा फोटो

आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.

सूप दोनसूप आलं

त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.

कुमार१ चे अभिवाचनकुमार१ यांचे अभिवाचन

यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.

वेज बुलेट्सवेज बुलेट्स १

चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिशचिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश

नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.

दम की बिर्याणीदम की बिर्याणी

शाही तुकडा आणि खुबानी का मीठाशाही तुकडा आणि खुबानी का मीठा

मिपाकरांचा लॉबीमध्ये फोटोलॉबीमध्ये एक फोटो काढला

पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मजा चालली आहे!

प्रत्यक्षातले मानव प्रतिमेमेक्षा वेगळे वाटले.

वामन राव, तुम्हांला पाहून तुम्ही तरुण मुकेश अंबानींना भेटले असाल असे वाटत नाही Light 1

फोटो पाहून छान वाटले. सर्वजण उत्साहात आहेत.
तरुण मुकेश अंबानी Happy
किल्ली तू ऋतुराजना, ओळखलं कसं नाहीस. कमाल आहे. मुंबई गटगत फोटो आहे की त्यांचा.

नाही ओळखलं मी Proud
ऋतुराज कोणता जुना आयडी असेल, मी नविन आहे माबोवर, सांभाळून घ्या.
Wink

किल्लीनी छान पीळ मारला होता हे माझ्या नंतर लक्षात आले
Happy
मानव यांच्याबद्दल मनात मी जे रेखाचित्र काढले होते त्यापेक्षा एकदम वेगळे व्यक्तिमत्व प्रत्यक्षात दिसले.

>>>>>किल्लीनी छान पीळ मारला होता हे माझ्या नंतर लक्षात आले
खरच की हे माझ्या लक्षातच नाही आले. सगळं फेस व्हॅल्यु वरच घेते मी Happy मग फसते.

मस्त फोटो
संजय भावे एकदम रुबाबदार आहेत.
त्यांचे फोटो आधीही पाहिले आहेत म्हणून ओळखले.
मानव yo !
ते लाल /भगवे तरुण अंबानी पिंचित आले की पार्टी घेउ.
ते येणार आहेत असे मागच्या एक वर्ष झालं ऐकतोय.:D
वामन राव म्हणजे 50 प्लस कोणीतरी असेल असे वाटले होते.
डॉ साहेब नेहमीप्रमाणे छानच.
सतीश ह्यांचे दर्शन प्रथमच.

मानव पृथ्वीकर अशी id धारण करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा बघायची उत्सुकता होती. तुमच्या प्रतिसादावरून / लिखाणावरून जी कल्पना केली होती त्यापेक्षा वेगळे निघालात तुम्ही मानव सर. पण अर्थात ह्यात वाईट अर्थाने काही नाही. एक फक्त निरीक्षण. छान वाटले सर्वांचे फोटो बघून.

मस्त गटग, मस्त फोटो आणि मस्त वृत्तांत..!
ऊन नाही लागले ना फार, हैद्राबाद प्रचंड गरम आहे. त्यात किल्ला फिरणं वगैरे. छान झालेली दिसतेय गटग सहल. काय खाल्ले हेही लिहा आता, शास्त्र असतं ते..! Happy

रूपाली, पुढच्या वेळी भेट नक्की. हल्ली गटगची लाट आलेली आहे. माझेही पहिले (फारएण्ड आणि अंजली) गटग नुकतेच झाले. वृत्तांत लिहिलाय‌. Happy

मस्त झालेले दिसते गटग. नुकतेच व्हर्च्युअली भेटल्याने मानव व ऋतुराज फोटोतून ओळखले. डॉ कुमारही आधीच्या फोटोंमुळे ओळखले.

या वरच्या फोटोत सर्वांनी एक पोज घ्यायची असे ठरले पण फक्त संजय भावे व ऋतुराजने ते केले असे काही झाले का? Happy

हैद्राबाद प्रचंड गरम आहे.
>>> दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आमची तारीख ठरली आणि बुकिंग केले तेव्हा फोनवर मानव म्हणाले होते की उन्हाळ्याचा त्रास जाणवेलच. परंतु आम्हाला अन्य तारीख सोयीची नव्हती.

परंतु निसर्गानेच कृपा केली म्हणायची. मॉन्सूनपूर्व पावसाने मध्य आणि दक्षिण भारतात चांगल्यापैकी हजेरी लावल्याने वातावरण बऱ्यापैकी सौम्य राहिले. किंबहुना गेल्या गेल्या पहिल्या दिवशी तर मला खोलीत पंखा नसला तरी चालणार होता !

इथल्या सर्व जुन्या दगडी बांधकामातील ऐतिहासिक वास्तूंचे एक वैशिष्ट्य आहे. भले बाहेर कितीही उन्हाळा असो, एकदा तुम्ही आत प्रवेश केलात की अक्षरशः सुरेख नैसर्गिक गारवा जाणवतो.

आज दुपारी बारा वाजता जेव्हा आम्ही चारमिनारच्या गॅलरीत उभे होतो तेव्हा आम्ही तिथून काय बघत होतो त्याला काही महत्त्व नाही. परंतु अंगावर जो काही सुखद गारवा अनुभवत होतो त्याला तोड नाही !

>>>>>हल्ली गटगची लाट आलेली आहे.
माझ्या टॅरॉट रीडींगमध्ये एसेस (एक्के) आलेले तेव्हाच मी म्हटलेले एक्के कशाची तरी सुरुवात दर्शवितात.

>>>>>>>>>इथल्या सर्व जुन्या दगडी बांधकामातील ऐतिहासिक वास्तूंचे एक वैशिष्ट्य आहे. भले बाहेर कितीही उन्हाळा असो, एकदा तुम्ही आत प्रवेश केलात की अक्षरशः सुरेख नैसर्गिक गारवा जाणवतो.
आहाहा!! दगडी ना बरोबर. शंकराच्या पायर्‍या उतरुन असलेल्या गाभार्‍यातही असाच नैसर्गिक आणि सुखद गारवा असतो.

सामो, तुम्ही टॅरो रीडिंग पुणे गटगसाठी केलंत. त्या आधीच दोन गटग झाली होती -- राले आणि ठाणे. हे हैद्राबाद गटग तर त्याही आधी ठरले होते.

मानवमामांचे दर्शन झाले एकदाचे. जबरदस्त लोकं आहेत सगळी. पहिल्या फोटोत मागे गार्डनमध्ये बसलेल्या पामरांना पुसटशी पण कल्पना नाहीये किती महान मंडळी त्यावेळी तिथे उपस्थित होती. व्यर्थ आयुष्य आहे त्या लोकांचं. कीव येते मला त्या लोकांची.

सर्व प्रतिसाददात्यांना धन्यवाद.

रुपाली, पुढल्या वेळेस आलात की भेटू.

आता सुद्धा ही मंडळी नामपल्ली जवळच्याच ऍबिड्स या भागात उतरली आहेत. उद्याचे गटगही त्याच भागात आहे.

गोवळकोंड्याचा लाईट अँड साऊंड शो चालू आहे का अजून>> पूर्वीचा लाईट-साउंड शो बंद करून लेजर शो सुरू झाला आहे. लाईट-साउंड शो छान असायचा.
त्यामुळे काल आम्ही लेजर शो बघितला नाही.

पण खरी मजा गोलकोंड्याला गाईड घेऊन तिथे किल्ला बांधताना केलेली मूळ लाईट-साउंड व्यवस्था बघण्यात आहे.
किल्ल्याचे छत, भिंती, कमानी यांची रचना अशी आहे की दिवसभराचे सूर्य भ्रमण, आणि वाऱ्याची कुठली दिशा असली तरी आत सूर्य प्रकाश व वारा खेळता राहील, तसेच अनेक ठिकाणाहुन आवाज ठराविक ठिकाणी परावर्तीत केला जाईल, काही ठिकाणी कुणी आले तर पावलांचा आवाजही ठराविक जागी स्पष्ट ऐकू येईल वगैरे. आता तिथे फक्त अधिकृत गाईड्सनाच परवानगी आहे, आणि त्यांना व्यवस्थित ट्रेन केले आहे हे लक्षात येते.

बाकी मी दिसण्याने अथवा येथील लिखाण, प्रतिसादांमधुन अनेकांचा अपेक्षाभंग केल्याचे दिसतेय Proud Light 1
पण कडक शिस्तीचा हेड मास्तर ही कॉमेंट वाचून फुटलो साजीरा.

सगळीच मंडळी फिरून, दमुन रात्री उशिरा हॉटेलात/घरी पोचत असल्याने फोटो, खादाडीचे फोटो इत्यादि आमच्यातच शेअर झाले नाहीयेत, वामन रावांनी आज त्यांच्या गुगल ड्राईव्हवर प्रत्येकाला फोल्डर बनवून दिला आहे. आता लौकरच सगळे तिथे अपलोड करतील, इथे शेअर करतील.

तरी खादाडी बद्दल थोडक्यात माहिती:
काल गोलकोंड्यावरून हॉटेलला परत येऊन एका खोलीत गप्पांची मैफल रंगली, त्यात काही बसणारे लोक होते. श्रीगणेशा आवर्जुन लांबून आले. काजु, बनाना वेफर्स, ऑरगॅनिक पेपर पिनट्स असे स्टार्टर्स होते.
कुमार सरांनी दहीभात खाऊन घेतला आणि जेवणार नाही असे सांगितले. श्रीगणेशा जेऊनच आले होते.
एकमेकांची सविस्तर ओळख करून देण्याच्या कार्यक्रमात बरीच तांत्रिक चर्चा आणि उपचर्चा झाली. आम्ही मग अकरा वाजता आम्ही जवलाच्याच अर्धा किमीवरच्या ग्रँड हॉटेलला तिथली प्रसिद्ध बिर्याणी खायला जाणार गेलो.
तिथे प्रचंड गर्दी होती आणि आणि २० मिनिट थांबायला सांगितले. पण १० मिनिटातच टेबल मिळाला.
कुमार श्रीगणेशा काही न खाणारे , मी कच्चा लिंबू आणि इतर चौघे जेवणारे होतो.
पाच जणांसाठी दोन चिकन बिर्याणी आणि दोन एक्ट्रा लेग पीस अशी ऑर्डर दिली. पाच जणांना तेवढी संपवायला जरा जड गेले, वामन राव व ऋतुराजमुळे बाजी मारता आली.

आज वामन येणार नव्हते आणि कुमार सुद्धा हॉटेलवरच लाईट स्नॅक्स खाणार होते. मग मी तिघांना फानूझ या शांत रेस्टॉरंट मध्ये नेले व तिथे खास हैदराबादी हलीम, चीकन नहारी, गोष तला हुआ, रोटी, नान, एक चिकन बिर्याणी असा बेत झाला.
ऋतुराज फोटो पोस्ट करतील या खादाडीचे .

मानव मामांनी एकदम भन्नाट बेत सांगितला आहे. जमले तर हैदराबादला एक दिवस जाऊन यायलाच हवे Lol
(आताच चेट्टीनाड खाऊन आल्यामुळे पोटात दुखलेले नाही) Wink

गटग झकास सुरू आहे. तीन दिवस जंगी गटग आहे. आधी कधी इतके लांबलेले गटग वाचलेले / ऐकलेले नाही.

भले बाहेर कितीही उन्हाळा असो, एकदा तुम्ही आत प्रवेश केलात की अक्षरशः सुरेख नैसर्गिक गारवा जाणवतो.
>>>> आम्हालाही जाणवला गारवा. छान वर्णन. Happy

किल्ल्याचे वर्णन व खादाडीची पोस्टही छान. नॉनव्हेजची रेलचेल दिसतेय. कुमारसरांनी दहीभात खाल्ला. Happy

बाकीच्या फोटोंच्या प्रतिक्षेत. Happy

गटगला झालेल्या मनमोकळ्या गप्पांनी इतके पोट भरले की पोटाला अन्ना साठी थोडीच जागा राहिली होती !

आज रात्री मी ताजमहाल हॉटेलचे जे ग्रील्ड सँडविच खाल्ले ते अप्रतिम होते. कधी इथे आलात तर एकदा तरी जरूर चाखा असे म्हणतो. या खाद्याच्या रूपाने मी देखील माझ्या 'हलीम करीम'चा स्वाद घेतला आहे हे नक्की Happy
आणि
त्यानंतर जे मधुर कोकम सरबत प्यालो ते कोणत्याही सोमरसापेक्षा माझ्या दृष्टीने श्रेष्ठ होते. . .
Happy Happy

तुमच्या मेन्यूचा पाठपुरावा घेत आहे कारण 'नो मांसाहार, नो सोमरस' गटात येते. कधी हैद्राबादला गेले तर नक्की चाखणार आहे. Happy

जंगी सुरवात झालीय की गटग ची..मस्त फोटो...Poor veg Happy असल्यामुळे जलन झाली नाही पदार्थ वाचून..
आजच्या फोटो आणि वर्णनाच्या प्रतीक्षेत ..

तरुण मुकेश अंबानी Lol ३ दिवसांची सगळी बिलं अंबानीकडूनच घ्या आता!>>>>> मीच भरतोय सगळी बिलं, खरंच.

नाही ओळखलं मी Proud
ऋतुराज कोणता जुना आयडी असेल, मी नविन आहे माबोवर, सांभाळून घ्या.>>>>>> नमस्कार किल्लीताई. कदाचित माझी भेट झाली नसणार. तुम्ही इथे नवीन असल्यामुळे मला ओळखले नसेल.

ते लाल /भगवे तरुण अंबानी पिंचित आले की पार्टी घेउ.
ते येणार आहेत असे मागच्या एक वर्ष झालं ऐकतोय.:D>>>> अंबानी वैगरे फार बिझी माणसं असतात झकासराव. त्याचं सोडा, मी येईन तुम्हाला भेटायला लवकरच.

काय खाल्ले हेही लिहा आता, शास्त्र असतं ते..!>>>>>> हो हो टाकणारच. आधीच्या गटग मध्ये घेतलेला धडा. काय बोलतो त्यापेक्षा काय खातो ह्यात माबोकरांना जास्त रस. काल अख्ख हॉटेल आमच्याकडे कुतुहलाने की कुत्सित नजरेने बघत राहील अशा थाटात आम्ही फोटो काढले आहेत जेवणाचे. हा घ्या
Screenshot_20250601_060033_Gallery.jpg
हैदराबादी हलीम, चीकन नहारी, तिलावा गोश्त , सिरमल

@ धनि, तुझी आणि अनिंद्य यांची हलीम खाताना आठवण काढली आम्ही.

आज मुख्य गटग (अजून बाकी) आहे.
बाकी मस्त भटकंती, खाणेपिणे चालू आहे
याबद्दल अधिक वृतांतात/ वृत्तान्तात येईलच (अनुस्वाराचा धसका अजून कायम आहे Happy )

अस्मिताला मम. मीही तिच्या गटात.

फक्त ते ताजमहाल हॉटेल परवडणार नाही मला Lol

खाणं फोटो भारी आलेत ऋतुराज. सर्व नावं नवीन माझ्यासाठी. हलीमबद्दल चर्चा झाली आणि वामन यांनी त्याची रेसिपीही सांगितली म्हणून ते माहितेय.

भारी आहेत photo खादाडी चे.
Veg मेनू ची वाट बघतेय Happy
आता fomo पायी हैद्राबाद ला जावे असे वाटत आहे.
(पायी नाही जाणार, संभाव्य फाको ला आताच नको येऊ म्हणते)

माझी आठवण न काढल्याबद्दल ऋतुराजचा निषेध! Angry

काय हे लोक्स, बिर्याणी आणि हलीम खाताना माझी आठवण काढा असं आवर्जून सांगितलं होतं ना? खाणं समोर आल्यावर विसरलेले दिसताय Sad

Pages