हैदराबाद गटग - डॉ. कुमार सोबत- ०१ जून २०२५

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 May, 2025 - 08:58

तर हैदराबादकरहो,

पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.

तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9

भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.

तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.

https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8

कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.

गटगला यायचंच हं!

आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:

वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५

शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…

निवासी गटगचा पहिला फोटोनिवासी गटग चा पहिला फोटो

सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.

मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगतानाएक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…

एका घुमटाखाली माबोकरबरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!

माबोकर गोलकोंडा पाहतानामाबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना

सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.

सात जणांचा फोटोजेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)

दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!

फानुस हॉटेलात काही माबोकर्सफानुस हॉटेलात काही माबोकर्स

प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.

पदार्थांचे फोटोहलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश

रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
रिकाम्या टेबलाचा फोटो

आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.

सूप दोनसूप आलं

त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.

कुमार१ चे अभिवाचनकुमार१ यांचे अभिवाचन

यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.

वेज बुलेट्सवेज बुलेट्स १

चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिशचिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश

नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.

दम की बिर्याणीदम की बिर्याणी

शाही तुकडा आणि खुबानी का मीठाशाही तुकडा आणि खुबानी का मीठा

मिपाकरांचा लॉबीमध्ये फोटोलॉबीमध्ये एक फोटो काढला

पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमली हो अगदी !
* **
* *पुणे, मुंबई येथील मंडळींनी हैद्राबादला जाऊन गटग करावा ही कल्पनाच भन्नाट आहे.**
@ चामुंडराय धन्यवाद !

हैदराबाद मनात येण्याचे कारण म्हणजे तिथे मानव नावाचे लोहचुंबक बसलेले आहेत आणि त्यांना वामन राव या सहचुंबकांनी मस्त साथ दिलेली आहे. Happy
आम्ही तिकडे आकर्षित होणारच यात नवल ते कसले !

मलाही आवडतो बरं पूथरेकुलु.

मी एकदा हौशीने साबांना नेऊन दिला होता. नंतर विचारलं कसा होता तर म्हणे किती कागद होते गुंडाळलेले. सोडवायला खूप वेळ लागला Uhoh

Lol
रच्याकने: मी स्वतः अद्याप पूथरेकुलु खाल्ले नाही. नातेवाईक/मित्र मंडळी मी त्यांच्याकडे इथुन जात असलो तर आवर्जून मागवतात, घेऊन जातो किंवा पाहुण्यांना ते परत जात असताना देण्याच्या खाउत कधी हे देतो.
मी आता पर्यंत न खाण्याचे कारण म्हणजे खायचं राहुन गेलं एवढंच आहे.
आता पुढच्या सणाला मी खाणार आहे.

आमचे शेजारी हैद्राबादला गेले की आणतात. आमच्याकडच्या वाट्या,ताटल्या एकमेकांकडे फिरतात त्यात हा प्रकार खाल्लाय. इतकं पातळ कसं काय करतात? हैद्राबादची फेणी प्रसिध्द मामा आणायचा.

भातावर पापुद्रा येतो त्यात सारण भरुन केलेलं स्वीट म्हणजे पुथरेकुलु, फोटो सॉलीड. नवऱ्याच्या बँकेतले हैद्राबादचे एकजण नेहेमी द्यायचे, टेस्टी असतं.

आता पुढच्या सणाला मी खाणार आहे. >>> नक्की खा.

मस्त झालेले दिसतेय गटग ... आमच्या पाहुण्यानी एक दिवस मुक्काम वाढवला सो मला खूप इछ्छा असुनही जमल नाही Sad

>>>भातावर पापुद्रा येतो त्यात सारण भरुन केलेलं स्वीट म्हणजे पुथरेकुलु
अश्या भाताच्या सारणातील जॅपनिस कॅन्डी मी खाल्लेली आहे. पण हा पुथुरेकुलु मस्त दिसतोय.
बाय द वे, तेलुगु शब्द जास्त करुन 'उ'कारान्त का असतात? Happy
---------
मृनिश - बेटर लक नेक्स्ट टाइम.

पुतरेकुलु == पेपर स्वीट्स

पिठीसाखर किंवा गूळ पूड किंवा या दोनपैकी एक आणि सुकामेवा पूड अश्या तीन-चार प्रकारांत मिळते. आंध्रची लोकप्रिय मिठाई आहे.
तांदळाच्या अगदी पातळ पिठात कापड बुडवून ते मातीच्या भांड्यावर थोपवून कागदासारखा पातळ पापुद्रा तयार केला जातो. तो काढून त्यावर तूप लावून वरीलप्रमाणे पिठीसाखर वगैरे घालून घड्या केल्या जातात.

माझेमनच्या साबांचा किस्सा मजेशीर आहे! असा विचार कधी केला नव्हता.

कुमार१, वरचे वाक्य वाचलेत ना, ते वेष्टण नाही!!!! Wink

वृत्तांत,फोटो,गटग सगळंच छान !
अभिवाचन, पुरस्कार हे ही आवडलं!
कुमार सर किल्ली दूर राहते म्हणून ये म्हणताय का? मी जवळच राहते. कधी न खाल्लेल्या पुथरेपुलू साठी न बोलवता येईन बरं का!

तेजो
या मग लगेच या !
तो खाऊ संपायच्या आत Happy
तेवढेच आपलेही एक गटग होऊन जाईल Happy Happy

निवासी गटगच्या निमित्ताने अजून थोडे काही . . .

आमच्या सात जणांपैकी वामन, श्रीगणेशा आणि संजय हे मूळचे मिपाकर; कालांतराने ते आपल्याकडे आले आणि त्यापैकी फक्त संजय हे चांगल्यापैकी सक्रिय झाले. तर सतीश, ऋतुराज आणि मी दोन्हीकडची मंडळी. मानव मात्र एकनिष्ठ माबोकर ! Happy

या धाग्याच्या निमित्ताने आता सगळेच इथे छानपैकी सक्रिय होतील असे दिसते. वामनरावांनी तर आघाडी घेतलीच आहे. अशा तऱ्हेने या गटगमुळे दोन संस्थलांच्या सीमारेषा देखील पुसल्या गेल्यात.

आपण मराठी बांधव कुठेही भेटलो तरी आपली मूळ ओळख मराठी हीच आहे. अशा प्रकारची सर्वसमावेशक संमेलने / कट्टे ठराविक काळाने होत राहावेत ही इच्छा.

पूथरेकुलू नाजूक, खुसखुशीत( flaky) दिसत आहे. मी 'गोडात काय खाल्ले आणि गटगकर सुखरूप घरी पोचले का' हे दोन प्रश्न विचारणारच होते. Happy

आता नवीन 'गटगंज' शब्द मनात आला आहे, गडगंज सारखा. गटग माबोकरांना समृद्ध आणि प्रसन्न करतात त्यासाठी चपखल आहे. 'घरचं कार्य' वाटून भरपूर सहभाग घेतला, भरपूर चौकशा केल्या, वाचक म्हणूनही मजा आली. Happy

तारुण्य पुरस्कारासाठी मानव यांचं अभिनंदन. >>>> +१
असेच तरुण रहा आणि गटग अ‍ॅरेंज करत रहा. एखाद्या गटगच्यावेळी मी भारतात असले तर नक्की येईन.

धमाकेदार झालंय गटग
निवासी केलं त्यामुळे भारीच.
Test match सारखं.
घरचं कार्य शब्द आवडला अस्मिता.

>"आता नवीन 'गटगंज' शब्द मनात आला आहे, गडगंज सारखा.">>>
भलताच आवडला आहे हा 'गटगंज' शब्द 👍

झाली एकदाची सकाळी 9 ते रात्री 9 अशी तब्बल 12 तासांची 'रामोजी फिल्म सिटी हॉलिडे कार्नीव्हल स्टुडिओ टूर' सुफळ संपूर्ण!

२४ एप्रिल ते ७ जून अशा मर्यादित कालावधीतच अशी संधी मिळणार असल्याने हा अट्टाहास केला होता. मजा खूप म्हणजे खूप आली, पण आता पाय नावाचा अवयव आपल्या शरीराला आहे की नाही असा प्रश्न पडलाय 😂

आता उद्या दुपारी इथून निघून संध्याकाळी घरी पोचल्यावर अंगात त्राण उरले असल्यास काही गमती-जमती प्रतिसादात लिहीन 😀

पुथरेपुलू पुथरेकुलू पुतरेकुलू इतकी व्हर्जन्स वाचली. त्या पदार्थाला काय आनंद झाला असेल नाही. Proud
रामोजीचा फोटु : सेम हीच इमेज मेंदूत खूप वर्षांपुर्वी प्रिंट झालेली, अजूनही आहे.
रामोजी सुंदर आहेच.
गटगंज शब्द सुंदर आहेय. आजवर कसा कुणाला सुचला नाही, इतके function at() { [native code] }अरंगी लोक हजारो वरषं इथं बागडत असताना.

खूपच दिस झाले, हैद्राबादेस गेले पाहिजे..

"पुथरेपुलू पुथरेकुलू पुतरेकुलू" हा खाप बघून बकलावा आठवला.
आता बकलावा आणणे आले.

पूथरेकुलुचा फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद, कुमार सर! कसला इंटरेस्टिंग पदार्थ दिसतोय. त्यात पुन्हा तांदुळाचा असल्यामुळे मला विशेष उत्सुकता आहे. कुठून तरी मिळवून खाऊन पहायला हवा.

सध्या बकलावा आणला आहे घरी. तर तोच खाऊन मी ही समाधान मानते आहे Happy

गटगंज >>> भारी शब्द सुचला यार! Happy

Pages