
तर हैदराबादकरहो,
पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.
तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9
भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.
तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.
https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8
कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.
गटगला यायचंच हं!
आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:
वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५
शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…
निवासी गटग चा पहिला फोटो
सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.
एक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…
बरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!
माबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना
सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.
जेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)
दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!
फानुस हॉटेलात काही माबोकर्स
प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.
हलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश
रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.
सूप आलं
त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.
कुमार१ यांचे अभिवाचन
यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.
वेज बुलेट्स १
चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश
नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.
दम की बिर्याणी
शाही तुकडा आणि खुबानी का मीठा
लॉबीमध्ये एक फोटो काढला
पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.
मला काल संध्याकाळी काही
मला काल संध्याकाळी काही उचक्या वगैरे लागल्या नव्हत्या. म्हणजे माझी आठवण कोणी काढली नाही असं दिसतंय! हायला, एवढ्यात मायबोलीवर हलीमची चर्चा सुरू केली मी, आणि मलाच विसरले सगळे!
"खाने-पीने में कोई दोस्ती नही" ह्या वचनाला जागणारे सर्व इसमांचा या ठिकाणी, या प्रसंगी, या निमित्ताने तसेच या माध्यमातून मी तीव्र निषेध नोंदवतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो.
पण तरीही आज मी पुन्हा उगवणार आहेच म्हणा!
वामन राव, हलीमची चर्चा आम्ही
वामन राव, हलीमची चर्चा आम्ही रमजान मध्येच सुरू केली होती. तीच सुरू आहे
अरेच्चा! असं आहे होय!
अरेच्चा! असं आहे होय!
एवढे बोलून मी माझे दोन शब्द मागे घेतो!
*आधी कधी इतके लांबलेले गटग
*आधी कधी इतके लांबलेले गटग वाचलेले / ऐकलेले नाही.

>>>
याला निवासी गटग म्हणता येईल. पुढच्या वर्षीपासून अशा गटगंची लाट यावी . . .
सुप्रभात माबोकर्स...
सुप्रभात माबोकर्स...
सध्या सर्व प्रतिसादांचा नुसताच पाठपुरावा घेतोय, पण अनंत कारणांमुळे चर्चेत सहभागी होता येत नाहीये 😀
परवा रात्री गटगला आवर्जून हजेरी लावणाऱ्या श्रीगणेशा ह्यांचा अद्याप एकही फोटो धाग्यावर आला नसल्याचे लक्षात आल्याने ती कमतरता दूर करण्यासाठी हा प्रतिसाद प्रपंच...
ग्रँड हॉटेलमध्ये काढलेल्या ह्या फोटोत सगळ्यात मध्ये जे सुहास्यवदनी व्यक्तिमत्व दिसत आहे, तेच 'श्रीगणेशा'.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
छान प्रसन्न फोटो
छान
प्रसन्न फोटो
एक लक्षात आलंय का लोकहो,
एकही स्त्री आयडी उपस्थित नाही
माझी आठवण न काढल्याबद्दल
.
ते "तला हुआ गोश्त" आहे,
ते "तलावा गोश्त" आहे, तिलावा नाही. बिचाऱ्या वेटरने तिलावा असे कोणी म्हटले त्यावर चमकून बघुन दोन वेळा "तला हुआ सर, तला हुआ" असे सांगितले की.
निषेध नोंदवतो आणि एवढे बोलून
निषेध नोंदवतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो. ===>
आठवण काढली, पण उचक्या आम्हालाच लागल्या. ==>>कुछ तो हैद्राबादी जादू हुआ मियाँ..
मानवादा पण होते..... तुम्ही विचारू शकता..... हाहा हाहाहा...
फक्त ते ताजमहाल हॉटेल परवडणार
फक्त ते ताजमहाल हॉटेल परवडणार नाही मला>>>>> तुम्ही विचार करताय ते ताज महाल नाही हे
तिलावा गोश्त म्हणजे तळलेले मटण
सिरमल म्हणजे इराणी ब्रेड. हा आम्हाला आमचे फोटो काढतानाचा व्यासंग पाहून त्यांनी complementry दिला.
पायी नाही जाणार ठीक आहे पण पाया सूप नाही खाल्ले तर ते फाऊल ठरेल.
माझी आठवण न काढल्याबद्दल ऋतुराजचा निषेध!>>>>> आता तुझी आणि बाकीच्यांची आठवण काढण्यासाठी तरी मला आज हलीम आणि बिर्याणी खावी लागणार तर....
आज दुपारच्या जेवणाचे प्रायोजक तूच.
सिरमल म्हणजे इराणी ब्रेड
सिरमल म्हणजे इराणी ब्रेड
तिलावा गोश्त म्हणजे तळलेले मटण >>>> थॅंक्यू.
बिचाऱ्या वेटरने तिलावा असे कोणी म्हटले त्यावर चमकून बघुन दोन वेळा "तला हुआ सर, तला हुआ" असे सांगितले की.
मला वाटले तीळ लावलेले वगैरे की काय.
>>>
खरंच किल्ली.
आज दुपारच्या जेवणाचे प्रायोजक
आज दुपारच्या जेवणाचे प्रायोजक तूच >>> लोल
मी खादाडीचा फोटो पाहिला नाही.
मी खादाडीचा फोटो पाहिला नाही.
त्यामुळे अज्जिबात जळजळ झालेली नाही.
(कोण रे तो 'दोन नकार=होकार' म्हणणारा?)
*एकही स्त्री आयडी उपस्थित
*एकही स्त्री आयडी उपस्थित नाही

>>> बोला मग अजून कोण येतंय का !
आहोतच आम्ही उद्या पहाटेपर्यंत. आम्ही केव्हाचे आमंत्रण देऊन थकलोय
>>"एकही स्त्री आयडी उपस्थित
>>"एकही स्त्री आयडी उपस्थित नाही">>
'भायखळा गँग'चे चार मेम्बर्स उपस्थित असल्याने त्यांच्या मनात भीतीची भावना उत्पन्न झाली असावी का 😂
>>आहोतच आम्ही उद्या
>>आहोतच आम्ही उद्या पहाटेपर्यंत>>
मी ३ तारखेला सगळ्यात शेवटी परतणार असल्याने २ तारखेला रामोजी फिल्म सिटीमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ ह्या वेळेत एखादे 'मायक्रो' गटगही होऊ शकते... 😀
ग्रँड हॉटेलमध्ये काढलेल्या
ग्रँड हॉटेलमध्ये काढलेल्या ह्या फोटोत सगळ्यात मध्ये जे सुहास्यवदनी व्यक्तिमत्व दिसत आहे, तेच 'श्रीगणेशा'. <<
तसेही कोणत्याही शुभकार्याला (पक्षी : गटग) मध्यभागी श्रीगणेशाची स्थापना करण्याची परंपराच आहे आपली. शास्त्र असतं ते.
१२:१५ ला आम्ही रेस्टॉरंटच्या
१२:१५ ला आम्ही रेस्टॉरंटच्या आत प्रवेश केला तेव्हा पहिले येणारे आम्हीच होतो. मग होल वावर इज अवर म्हणत मंडळींनी ठिकठिकाणी फोटो सेशन सुरू केले त्याची झलक:





.
.
.
.
सूप घेतल्यानंतर डॉ. कुमार
सूप घेतल्यानंतर डॉ. कुमार यांनी त्यांच्या "असे देश, अशी नावे" या त्यांच्या लेखाचे अभिवाचन केले.

आजच्या गटगचे (माबोचे) 'ब्रँड
आजच्या गटगचे (माबोचे) 'ब्रँड ॲम्बॅसेडर' सतीश ह्यांनी स्टार्टर खाल्ल्यावरच पोट भरल्याचे जाहीर केल्याने थोडा पेच-प्रसंग उभा ठाकला आहे... परंतु मानवदा, ऋतुराज आणि वामनराव ह्यांनी शर्थीने किल्ला लढवण्याचा निर्धार जाहीर करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे 😀
फानूझ या शांत रेस्टॉरंट मध्ये
फानूझ या शांत रेस्टॉरंट मध्ये नेले व तिथे खास हैदराबादी हलीम, चीकन नहारी, गोष तला हुआ, रोटी, नान, एक चिकन बिर्याणी असा बेत झाला.
>>>
आम्हांला सोडून?
जाहिर णिषेद. कुफेहेपा?
आज दुपारी साडेबारा ते चार
आज दुपारी साडेबारा ते चार पर्यंत palace हाइट्समध्ये मुख्य ग टग झाले आणि तुफान रंगले. मानव यांनी यासाठी अतिशय उत्तम ठिकाणाची निवड केली होती. तिथल्या खिडक्यामधून सुरेख हैदराबाद दर्शन झाले.
सर्व खाद्यपदार्थ अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर. खुबानी मीठा व शाही तुकड्याने खादाडीची सांगता.
.....
आताच संजय रामोजी सिटी साठी एकटे रवाना झाले.
तर ऋतुराजने विमानतळाकडे कूच केले.
मावा या यजमान जोडीला आम्ही सर्वांनी भावपूर्ण निरोप दिला आणि ते त्यांच्या घरी गेलेत.
...
आता राहिलो आहोत सतीश व मी. उद्या भल्या पहाटे चार वाजता उठून आम्ही देखील उड्डाणासाठी रवाना होऊ.
. . .
हैदराबाद निवासी गटग सुफळ संपूर्ण !
सर्व सहभागी मंडळींना मनापासून धन्यवाद !!
अरे काय मस्त वृत्तांत आहेत.
अरे काय मस्त वृत्तांत आहेत. लेखाचे अभिवाचन - अरे वा! मस्त आयडीया आहे की. हे असे अभिवाचन दर गटगला करा आणि व्हिडीओ काढा.

>>> सतीश यांनी निर्माण केलेला पेचप्रसंग
बरं, आता मला हे सांगा की
बरं, आता मला हे सांगा की तुम्ही लोक तिकडे "फक्त" गटग करायला गेला होता की दुसरी काही कामे होती ?
गटग + दोन दिवसांचे पर्यटन.
गटग + दोन दिवसांचे पर्यटन.
कोणाचेही इथे कुठलेही काम नव्हते म्हणूनच शुक्रवार ते रविवार असा बेत आखला होता.
. . .
भायखळाच्या वेळेस मी कामासाठी गेलेलो असल्यामुळे तेव्हा नाईलाजाने सोमवारी संध्याकाळी गटग भरवावे लागले होते. ते लक्षात ठेवून आता हे करमणूक गटग विकांताला ठेवण्यात आले.
>>>>>तेव्हा नाईलाजाने सोमवारी
>>>>>तेव्हा नाईलाजाने सोमवारी संध्याकाळी गटग भरवावे लागले होते. ते लक्षात ठेवून आता हे करमणूक गटग विकांताला ठेवण्यात आले.
अरे वा!! कार्यक्रमाचा वृत्तांत फार छान दिलाय प्रत्येकाने. मस्त झालय हे गटग.
मस्त झालं गटग.
मस्त झालं गटग.
हे शिखर परीषदेसारखंच झालं . ( शिखर परीषद एव्हरेस्ट वर भरवत असतील असं वाटायचं )
पण पॅलेस हॉटेलचे फोटोज आले नाहीत. आधी दिलेल्या लिंकवर जाऊन पाहिले तेव्हां पासून गटगकर वृ सोबत फोटो टाकतील असे वाटत होते.
अर्थात डायनिंग एरिया सुद्धा देखणाच आहे. मला तर आत शिरायचीही भीती वाटेल. गटगकरांसारखे श्रीमंत लोकच आत जायचे धाडस करू जाणे.
आम्हाला या हॉटेलच्या प्रांगणात गोविंदाचा ढाबा असेल तर सांगा.
एकही स्त्री आयडी नाही >>> असं
एकही स्त्री आयडी नाही >>> असं नाही. हे असं झालंय.

मानवदा व वामनरावांचे ने
मानवदा व वामनरावांचे सुचवलेले ... हे desert....रुचकर. खुबानी मीठा, " गोड " असल्याने...ऋतुराजने माघार घेतली... संभा जरा व्यस्तच होते( का??)..... म्हणून मी, कुमार सर व मावा ह्यांनी... मनसोक्त खादाडी ची सांगता केली....
संभा
Pages