
तर हैदराबादकरहो,
पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.
तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9
भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.
तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.
https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8
कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.
गटगला यायचंच हं!
आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:
वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५
शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…
निवासी गटग चा पहिला फोटो
सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.
एक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…
बरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!
माबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना
सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.
जेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)
दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!
फानुस हॉटेलात काही माबोकर्स
प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.
हलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश
रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.
सूप आलं
त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.
कुमार१ यांचे अभिवाचन
यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.
वेज बुलेट्स १
चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश
नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.
दम की बिर्याणी
शाही तुकडा आणि खुबानी का मीठा
लॉबीमध्ये एक फोटो काढला
पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी
पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुब्बलक्ष्मींच्या सुमधूर स्वरातील कौसल्या सुप्रजा हे प्रभातगीत...
https://www.youtube.com/watch?v=R-bwYbOExt8
आता तीन दिवस गटग मध्ये बिझी
हैदराबादकरांनो पाहुणे पोचताहेत.
या पटापट. भेटू आज चार वाजता गोवळकोंड्याला.
परवाच आहे नाही का? सर्वांना
परवाच आहे नाही का? सर्वांना शुभेच्छा!!
तो पॅलेस पाहिल्यावर एक शंका राहून राहून येतेय मनात कि,
गटगच्या आयोजनात हैदराबादचे निजाम सहभागी असावेत किंवा
निजाम म्हणजे आपले ते हे तर नाहीत?
धन्यवाद मावा !
धन्यवाद मावा !
मित्रहो,
हैदराबादला पोचणारा पाहुण्यांपैकी मी पयला असून आताच एबीड्स भागातील ताजमहाल हॉटेलला आलेलो आहे. आता प्रतीक्षा करतोय मुंबईहून येणाऱ्या त्रिकुटाची.
मज्जा करा शुभेच्छा
मज्जा करा
शुभेच्छा
मजा येतेय हा धागा वाचताना.
मजा येतेय हा धागा वाचताना. गटग ला शुभेच्छा.
गटग तीन दिवस मिळून तीन अंकी
गटग तीन दिवस मिळून तीन अंकी असणार आहे.
हा घ्या पहिल्या अंकातील पहिला प्रवेश :
भायखळा-टोळी आणि हैदराबादी-मावा यांची सुरेख युती अजून काही तासांनी तेलंगणाच्या भूमीत होणार आहे..
आता पाहुण्यांच्या एकमेकांच्या गळाभेटी आणि गप्पांना उधाण आलेले आहे. काही जोड्यांच्या भेटी पहिल्यावहिल्या असल्यामुळे प्रथमदर्शनाचा माहोल काय विचारता ? आ हा हा !
असा हा षड्वृंद धमाल करण्यास सज्ज होत आहे. . .
यापूर्वी संजयना तीनदा तर
यापूर्वी संजयना तीनदा तर बाकी सर्वांना एकदा भेटलो आहे. आजच्या पुनर्भेटीतून आमची मैत्री दृढ झाली आहे हेवेसांनल . . .
(गमतीचा भाग म्हणजे संभा आणि वादे यांची व माझी पहिली भेट मिपाकर या नात्याने झाली होती).
>>>>>>तसेच मिनी गटग सुद्धा ३०
>>>>>>तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
वृत्तांत प्लीज
गोवळकोंडा किल्ला बघून छान
गोवळकोंडा किल्ला बघून छान दमलो आहोत आणि आत्ताच खोलीवर आलो आहोत. भरपूर फोटो काढले आहेत.
आता दमाने उद्याच हळूहळू वृत्तांत येतील.
अर्रे मस्त मस्त!!! वाट
अर्रे मस्त मस्त!!! वाट पहातोय.
वृ वाचायला मजा येणारे…
वृ वाचायला मजा येणारे…
आमची आठवण काढली णा
आमची आठवण काढली ना
Please हो म्हणा
हो हो! तुम्हा सर्वांची आठवण
हो हो! तुम्हा सर्वांची आठवण काढतच मजा करीत आहोत.
...
मानव व माझी ही पहिलीच भेट. अर्थात गेल्या बऱ्याच वर्षांपासून इथल्या अनेक धाग्यांवर आमचे मैत्र छान जुळलेले आहे. ‘मानव पृथ्वीकर हे माबोवरील एक उत्कृष्ट आणि कल्पक सदस्यनाव आहे ! या नावातून कोणताही वर्गभेद ध्वनीत होत नाही याचे अप्रूप वाटते. म्हणूनच, हे नाव धारण केलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी भेटायचेच हे मनात केव्हाच ठरले होते. आज तो सुंदर योग आलेला आहे.
वामांचे नियोजन अतिशय उत्तम असून आज किल्ला दर्शनाने त्याची झकास सुरुवात झालेली आहे.
वादे हे पण एक हसरे आणि उमदे
वादे हे पण एक हसरे आणि उमदे व्यक्तिमत्व. त्यांची माझी ही दुसरी भेट. आज किल्ल्याकडे जाताना ते व मी एका रिक्षात होतो. त्यादरम्यान त्यांच्याकडून हैदराबादमधील सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचा एक धावता आलेख ऐकायला मिळाला.
इथल्या बहुसंख्य दुकानांवरच्या आणि उद्योगांवरच्या पाट्या इंग्लिशमध्ये आहेत. फक्त सरकारी कार्यालय व बँकांवर द्वैभाषिक लिहिलेले आढळते. मुंबईच्या तुलनेत ही अगदी विरुद्ध परिस्थिती म्हणावी लागेल !
एकंदरीत इथे स्थानिक भाषेतील पाट्यांचा बिलकुल आग्रह नाही अशी माहिती मिळाली.
आमची आठवण काढली ना
आमची आठवण काढली ना
Please हो म्हणा
हो ना, किल्ली या शब्दाची खुप आठवण येत होतीच!
एखादे वेळी गरज पडली तर असावी म्हणून ॲबिट्सच्याच एका मित्राच्या फ्लॅटची किल्ली मी सोबत नेली होती. गोलकोंडा किल्ला बघत फिरताना आणि इतर प्रवासात ती किल्ली कुठे पडणार तर नाही ना म्हणून मी ती खिशातली किल्ली सारखी चाचपून बघत होतो!
हघ्याहेवेसांन
काल गोवळकोंडा किल्ला पुन्हा
काल गोवळकोंडा किल्ला पुन्हा नव्याने पाहिला! गाईड घेण्याची कल्पना मांडल्याने किल्ल्याची सविस्तर माहिती आणि अनेक अद्भुत प्रत्यक्षिके आम्हाला बघायला मिळाली त्यासाठी मानवदांचे विशेष आभार

वरील फोटोत डावीकडून अनुक्रमे
वरील फोटोत डावीकडून अनुक्रमे
वामन राव, मानव पृथ्वीकर, सतीश, ऋतुराज, कुमार१ आणि
..... संजय भावे .
* * *
काल रात्रीची हॉटेलमधील मैफिल जबरदस्त आणि रंगतदार झाली. त्याला गटगचे सातवे सदस्य श्रीगणेशा देखील हजर होते. प्रत्येक माबोकराचा विस्तृत परिचय, गंमतजंमत आणि प्रत्येकाची उलट तपासणी हे या मैफिलचे संस्मरणीय वैशिष्ट्य !
मानव सरांचे दर्शन झाले आज.
मानव सरांचे दर्शन झाले आज.
बाकी उत्सवमूर्तींपैकी ऋतुराज, कुमार सर आणि संभा सरांना सहज ओळखता आले.
नवीन उत्सवमूर्तींचे रोमातून मंचावर स्वागत.
किल्ला पण बघू द्या हो. उत्सुकता आहे.
गटगच्या ठिकाणी असलेल्या पॅलेस बद्दल सुद्धा उत्सुकता आहे. दोन्हीचे फोटो टाका.
येणार येणार.....
येणार येणार.....
सविस्तर वृत्तान्त येणार.
आमची आठवण काढली ना
Please हो म्हणा Happy>>>>> हो आठवण काढली.
आता तुम्ही कुठे गटग आयोजित करताय...... म्हणजे मला तस यायला
गटगच्या ठिकाणी असलेल्या पॅलेस बद्दल सुद्धा उत्सुकता आहे.>>>> आम्हालाही ती उत्सुकता आहे.
वृत्तारंभः
वृत्तारंभः
), तसेच इतर राज्यांत फिरावं, तिथली लोकसंस्कृती पहावी" असे त्यांनी ठरवल्याचे सांगितले. आणि तिथे मायबोलीकर भेटले/गटग झाले तर दुधात-साखर!
१ एप्रिलला मला कुमारांचा इ-मेल मेसेज आला की ते त्यांचा भायखळा गटग चमु सोबत हैदराबादला येत आहेत ३० मे ते १ जून.
कुमारांचा मेसेज असल्याने हे एप्रिलफूल प्रॅंक असण्याची शक्यता अर्थात शून्य होती
नंतर WA उघडले तिथे कुमारांचा WA मेसेजसुद्धा आलेला होता. मग फोनवर बोलणे झाले आणि शेवटी मायबोलीचे एक गटग आता हैदराबादलाच होणार आहे याचा आनंद झाला.
"महाबळेश्वर, लोणावळा व इतर पुणे-मुंबई आसपास खूप फिरून झालं आणि त्याचा आता कंटाळा येतो (वाचतायना मुंबईकर, पुणेकर
(आता वृत्तांतांव्यतिरिक्त आपल्याला त्यांचा हैदराबादबद्दल वेगळा लेख वाचायला मिळण्याची दाट शक्यता आहे. )
मी त्यावेळी हैदराबादला असेन व भेटेनना आणि गटग करता येईल ना याची त्यांना खात्री करायची होती.
ती खात्री होताच चौघांनी धडाधड तिकटं बूक करून टाकली. हे तर मला फारच आवडलं. विचार आहे, प्लॅनिंग चाललंय, वेळ आहे अजुन बराच, बघु , तसं यायचं आहेच वगैरे काही नाही. येत आहोत म्हणजे येत आहोत.
मग तीन आठवडे आधी हॉटेल बुकिंग झाले व वामनराव देशमुखयांचीही जालीय ओळख झाली.
त्यांना इथे काय काय बघायचंय ही माहिती आल्यावर तीन दिवसांचे कधी कुठे जावे/खावे/बसावे(इथे बसावे हे गप्पा मारायला साठी वापरले आहे पण त्यात काहीजणांचे दुसरे बसणे सुद्धा आले.) वेळेनुसार प्लॅनिंग झाले.
वामन रावांचा उत्साह आणि जुन्या हैदराबादची इत्थंभूत माहिती दोन्ही वाखाणण्याजोगे आहेत.
गटगकरांचा कायप्पा ग्रुप झाला आणि त्यात सगळ्यांनी डिपीला अद्ययावत फोटो लावले असल्याने फोटो ओळख झाली.
फक्त सतीश यांचा जरा गोंधळ झाला. डीपीला माझा अद्ययावत फोटो मी तीन महिन्यांपूर्वी लावला. तो पर्यंत २०१५चा पहिल्यांदा अकाऊंट उघडले तोच फोटो होता. तीन वर्षांपूर्वी आम्ही व्हॉट्सऍपवर बोललो होतो तेव्हा ती इमेज त्यांच्या डोक्यात होती. मग भेटल्यावर ते म्हणाले की तुमच्या डीपीला कुठला वेगळाच फोटो होता ना, त्याला मिशी पण होती. मीच तो, तो फोटो दहवर्षं जुना होता, अलीकडेच बदलला, दीड वर्षांपासून मिशी ठेवत नाही सांगितल्यावर (आणि काही खुणा सांगितल्यावर) "एकतर तो तोतया किंवा हा" अशा त्यांच्या शंकेचे निरसन झाले असावे.
मग शेवटी काल गोलकोंडा मिनीगटगचा दिवस उजाडला.
मी वामन रावांना पिकअप करायला नियोजित स्थळाच्या जवळच्या चौकातून टर्न घेतला तर तिथे समोरुन मला वामन राव रस्ता ओलांडतना दिसले. (त्यांना इतक्या चटकन ओळखता आले की पटकन ओळखता यावे म्हणुन ते त्यांच्या डीपीतल्या फोटोसारखेच भाव चेहऱ्यावर ठेवून आले असावेत अशी मला शंका आहे) हॉर्न देऊन त्यांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण हॉर्न ऐकुन ते जरा लांब गेले असे वाटले. मग मी टर्न पूर्ण केल्यावर लगेच डावीकडे गाडी उभी करण्यास जागा होती, तिथे थांबवून त्यांना फोन केला आणि ते लगेच आले.
(वामन राव आणि मी जवळ जवळच्या भागात राहतो. हे अर्थात तीन आठवड्यांपूर्वी कळले.)
गाडीत आपापली ओळख करून देत गप्पा मारत तीन वाजता आम्ही पाहुणे मंडळीच्या हॉटेलवर पोचलो.
मी सगळ्यांना पहिल्यांदा भेटत असलो तरी फोटो ओळख झाली असल्याने कोण, कोण हे एकमेकांना सांगायची गरज पडली नाही. सगळयांनी अगदी जुने मित्र असल्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे एकमेकांची गळाभेट घेतली आणि गप्पा सुरू झाल्या.
आम्ही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये भेटलो होतो.
काही जणांना कपडे बदलायचे होते. संजय भावे शॉर्ट घालुन होते तेही म्हणाले बदलायचे आहेत. मग मी व ऋतुराज जे शॉर्ट्स घालूनच गटग करणार असल्याने त्यांना हाच ड्रेस किती छान दिसतोय वगैरे करत परावृत्त करण्याचा असफल प्रयत्न केला.
शेवटी मी , ऋतुराज व ते त्यांच्या सोबत रूमवर गेलो.
आम्ही इकडे बोलत असताना ज्या पॅसेजमध्ये संजय गेले होते तिकडे परत माझे लक्ष गेले तर तिकडच्या दारातून कुणी पठाण आत आला होता आणि आरशात बघत केस ठीक करत होता. मी काही विचसरणार एवढ्यात तो मराठीत काहीतरी बोलला आणि लक्षात आलं अरे हे तर संजय भावे.
हैदराबादला फिरण्यास त्यांनी खास तो ड्रेस मुद्दाम आणला होता आणि शोभून दिसत होता.
शेवटी आम्ही गोलकोंड्याकडेन कूच केले. इथे आम्ही सहजणां शिवाय कुणी येत असल्याचे कळवले नव्हते व आले नाही. आम्ही गाईड घेऊन गोलकोंडा बघायला सुरवात केली.
डावीकडुन: संजय भावे, ऋतुराज, मानव पृथ्वीकर, वामन राव, कुमार१, सतीश
रानभूली धन्यवाद एकंदरीतच या
रानभूली धन्यवाद एकंदरीतच या गटगच्या तुमच्या सातत्याच्या कुतुहलाबद्दल.
गटगसाठीचे रेस्टॉरंट माझ्या जुन्या आवडत्या रेस्टॉरंट्सपैकी एक आहे. गेल्या पंधरा वर्षात मी तिथे गेलो नव्हतो.
गेल्या शनिवारी तिथे फक्त भेट देऊन पाहिले, दिसण्या बाबतीत अजुनही तीच "रौनक" कायम आहे.
फूड बाबतीतही असेलच, उद्या कळेल.
बहुतेक फोटो वामन राव यांच्या डिजिटल कॅमेरात आहेत.
ते आज गुगल ड्राईव्हवर अपलोड करून इथे शेअर करतील.
वा!! भारीच!! मी मिस केले!
वा!! भारीच!!
मी मिस केले!
मानव सर धन्यवाद.
मानव सर धन्यवाद.
कुतूहल आहे अर्थात. पॅलेस, किल्ला पहायचा आहे. तुम्हाला सुद्धा पहाता आले. बाकि वेगळं असं कुतूहल नाही. गैस नसणारच.
गटगच्या धागा वर राहतो प्रतिसाद दिल्याने.
छान वृतांत आणि photo.
छान वृतांत आणि photo.
.
लाल रंग एकदम डोळ्यावर येतोय
रोमातले माबोकर ना red shirt वाले..
(आता कुणीतरी म्हणेल भगवा आहे )
.
वामन राव ह्यांचा photo बघून अपेक्षा आणि वास्तवात फरक असतो ते प्रत्ययास आले.
मला ते शिक्षक असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील असे उगाच वाटले होते.
.
मस्त वृत्तांत.. फोटोही मस्त..
मस्त वृत्तांत.. फोटोही मस्त..!
सगळ्यांना फोटोत पाहून छान वाटलं. दिड वर्षापूर्वी हैद्राबादला फिरायला आले होते तेव्हा अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत मानवना मायबोली मार्फत संपर्क करावा आणि त्यांची भेट घ्यावी असं मनापासून वाटत होतं.. पण फक्त सोशल मिडिया वरच्या ओळखीने त्यांना माझी भेट घ्यावी असं वाटेल की नाही अशी शंका मनात होती त्यामुळे आणि माझ्या जराश्या संकोची स्वभावामुळे मी माघार घेतली. आम्ही नामपल्ली भागात हॉटेलमध्ये राहिलो होतो .. तिथून रेल्वस्टेशन जवळ होते म्हणून..!
गोलकोंडा किल्ल्यावर जिथे उभं राहून तुम्ही सर्वांनी फोटो काढलायं तिथेच मी सुद्धा फोटो काढलायं ..
मानव
मानव
अतिशय सुंदर आणि दिलखुलास प्रतिसाद !
....
रोमातले माबोकर ना red shirt वाले
>>> नाही. हे ऋतुराज.
ते आहेत श्री गणेशा. यांचा फोटो अजून इथे आलेला नाही. ते नम्र आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांचे स्मितहास्य तर प्रेमात पाडणारे आहे
लवकरच ते एखादा साहित्यिक लेख लिहून माबोवरील उद्घाटन करणार आहेत.
.....
आज चार मिनार करून आता सालारजंगमध्ये पाय दुखदुखेपर्यंत जातिवंत कारागिरी बघणे चालू आहे. . .
मानव
काल विमानतळावरून हॉटेलकडे 28 किलोमीटरचा पल्ला गाठताना एक गोष्ट अगदी नजरेत भरली. आजूबाजूंनी आणि पुढे असणाऱ्या गाड्यांच्या नोंदणी क्रमांक पाट्या तीन प्रकारच्या नोंदणी क्रमांक दाखवत होत्या.
AP, TS & TG.
AP हे राज्य विभाजनापूर्वीचे आहे हे सहज समजले. परंतु तेलंगणा निर्मितीनंतर T वाल्या दोन प्रकारच्या पाट्या का असाव्यात याचे आश्चर्य वाटले. आधी वाटले की खाजगी आणि सार्वजनिक वाहनांना वेगळा कोड दिला आहे की काय? पण नंतर तसेही नाही हे पण लक्षात आले.
मग दुपारी हा कुतूहलजनक प्रश्न वामनरावांपुढे टाकला आणि या प्रश्नामागचे पक्षीय राजकारण समजून आले.
TRS चे सरकार असताना त्यांनी नवीन राज्याला TS नाव ठरवले. परंतु अलीकडे जेव्हा काँग्रेस सत्तेत आली तेव्हा त्यांना ही अद्याक्षरे म्हणजे जणू TRSचा राजाकीय प्रचार आहे असा साक्षात्कार झाला !
मग काय बदलून टाका ती प्रचारकी अक्षरे आणि त्यांनी TG असे नवे बारसे केले, जे तिथून पुढच्या नव्या वाहनांना लागू झाले.
आता पूर्वीच्या राज्य परिवहन गाड्या सुद्धा TSRTC ऐवजी TGSRTC अशा पाट्या लावून धावत आहेत.
कुमार१ यांना आधीच परिचय होता,
कुमार१ यांना आधीच परिचय होता, दोन वर्षांनी पुन्हा भेटून आनंद वाटला. इतरांना पहिल्यांदाच भेटत होतो. पहिल्याप्रथम मानव भेटले. आम्ही शीव-शेजारी आहोत हे कळल्याने आपलेपणा वाटला. नंतर इतरजण भेटले. दिलखुलास व्यक्तिमत्व संजय, पहिल्या भेटीतच मैत्री जुळलेले सतीश, निर्व्याज, हसतमुख श्रीगणेशा आणि इतरांशी मस्त गप्पाटप्पा झाल्या. ऋतुराजना भेटून तर मला तरुण मुकेश अंबानींना भेटल्यासारखे वाटले!
तरुण मुकेश अंबानी ३ दिवसांची
तरुण मुकेश अंबानी
३ दिवसांची सगळी बिलं अंबानीकडूनच घ्या आता!
मानव कडक शिस्तीचे हेडमास्तर वाटतात. त्यांच्या पोस्ट्सवरून मात्र तसं कधी वाटलं नव्हतं.
सगळ्यांना बघून छान वाटलं..
गोवळकोंड्याचा लाईट अँड साऊंड शो चालू आहे का अजून
Pages