हैदराबाद गटग - डॉ. कुमार सोबत- ०१ जून २०२५

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 May, 2025 - 08:58

तर हैदराबादकरहो,

पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.

तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9

भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.

तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.

https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8

कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.

गटगला यायचंच हं!

आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:

वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५

शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…

निवासी गटगचा पहिला फोटोनिवासी गटग चा पहिला फोटो

सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.

मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगतानाएक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…

एका घुमटाखाली माबोकरबरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!

माबोकर गोलकोंडा पाहतानामाबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना

सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.

सात जणांचा फोटोजेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)

दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!

फानुस हॉटेलात काही माबोकर्सफानुस हॉटेलात काही माबोकर्स

प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.

पदार्थांचे फोटोहलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश

रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
रिकाम्या टेबलाचा फोटो

आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.

सूप दोनसूप आलं

त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.

कुमार१ चे अभिवाचनकुमार१ यांचे अभिवाचन

यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.

वेज बुलेट्सवेज बुलेट्स १

चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिशचिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश

नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.

दम की बिर्याणीदम की बिर्याणी

शाही तुकडा आणि खुबानी का मीठाशाही तुकडा आणि खुबानी का मीठा

मिपाकरांचा लॉबीमध्ये फोटोलॉबीमध्ये एक फोटो काढला

पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे वा!
मायबोलीवर 'आया मौसमऽऽऽ जीटीजीऽ का' असं वाटतंय! Happy
वृत्तांत हैदराबादी बोलीत हवेत, बरं का!

वृत्तांत हैदराबादी बोलीत हवेत, बरं का!>>>>> याला माझा पास.
आणि
यासाठी अनिंद्य यांनी हजेरी लावणे अनिवार्य आहे.>>>>> याला माझे प्रचंड अनुमोदन ..

सुस्वागतम!
मानव आणि अन्य हैद्राबादकरांना भेटण्यास अति उत्सुक . . .

जानेवारीमध्ये जमलेली 'भायखळा गॅंग' (https://www.maayboli.com/node/86169) आता प्रवास आणि निवासाच्या जय्यत तयारीनंतर सीमोल्लंघन करुन तेलंगणाच्या राजधानीत घुसत आहे . . . Happy
भेटूयात हो SSS

अगत्याबद्दल आभारी आहे. खुषजुबान हो तुम लोगां ❤

त्याच दिवशी एक सोहळा मुंबईत आहे आणि मी होस्ट आहे.

नै तो मिलते थे हैदराबादमेच. संजय देतील हैदराबादीत वृत्तांत, वो तो किसिसेच कम नै.

बोटी तोडो, नल्ली खाओ नै तो सब्ज बिरियानी. हौर हमकू यादां मे रखे वास्ते शुकरान 🙏

अरे वाह भारीच!
पुणे मुंबई
अमेरिका
आणि आता हैद्राबाद
मज्जा Happy

और एक gtg ?
क्या बाता कर रेले मामुजान !!!!!

एकामागोमाग एक gtg सुरुयेत.
माबोवर उत्साहाचे वातावरण.
Admin आणि वेबमास्टर दोघांनाही आमंत्रण द्या.
येतील ते दोघेही उत्साह वाढवायला.

Btw,
अनिंद्य तिथे नाहीयेत का?
त्यांची हजेरी का नाही बरं?
संजय भावे आणि त्यांची जोडी जमली तर हैदराबादी लहेजात पूर्ण वृ येईल.

पुणे मुंबई
अमेरिका
आणि आता हैद्राबाद <<
ठाणे.... ठाणे..

>>> ठाणे.... ठाणे..
Lol
बघा हं, तुम्हीच म्हटलंत! Proud

सगळे माबोकर गटगू लागलेत.
शुभेच्छा!
पाहुण्यांना मोत्यांचा हार कि बिर्याणी?
कुमार सर पण आहेत आणि मानव पण.
म्हणजे कोडी घालायचा कार्यक्रम नक्की.

सामो Happy
मिसाईल नेमके कुठे पडले यावर यातले दोघे तर नक्कीच कोपऱ्यात बसून "चर्चा" करू शकतील.

>>>>चर्चा
चुकुन मी चर्वितचर्वण वाचले Happy

* पाहुण्यांना मोत्यांचा हार कि बिर्याणी?>>>
माझ्यासाठी ती शाकाहारी जमणार नसेल तर मला हार चालेल ! Happy
. . .
* वैचारिक गटग होणार तर >>> कै च्या कै ! उलट हैदराबादी कल्ला होणार आहे !!

>>>> उलट हैदराबादी कल्ला होणार आहे !!
तथास्तु.

कल्ला Lol शब्द .... डॉक्टरांचा आय डी हॅक झालाय Happy

* डॉक्टरांचा आय डी हॅक >>> काय राव ... तथास्तु !
..
* नबाबांचं शहर >>> आहे खरं !
बोला, येताय का नबाबांच्या राज्यात Happy
. .
गटगकर संघातील सहावे खेळाडू वामन यांचे स्वागत !
आता मानव- वामन ही हैदराबादी (नबाबी) जोडी आमचे नेतृत्व करणार . . . ध - मा - ल !

येताय का नबाबांच्या राज्यात >> अस्सल मोत्यांच्या हारासाठी कुठेही.
(धागा वर ठेवण्यासाठी)
गटगला शुभेच्छा.
जोरदार होऊ द्या.

गटगची जाहिरात पुरेशी आधी केलेली आहे.
बोला, वरच्या प्रतिसादकांपैकी कोण कोण येतय ...
कोणी छुपे हैदराबादी रुस्तुम आहेत का? Happy

>>"नै तो मिलते थे हैदराबादमेच. संजय देतील हैदराबादीत वृत्तांत">>

क्या उस्ताद, हैदराबादमे आपसे रुबरू मुलाकात करनेका अपन लोगां का पुरा पिलान बैंगनमे मिला रै आप 😀
एक काम करते... 2 तारीख को मुंबई एअरपोर्टपे अपन दोनोंच एक गटग करते फिर 😂
...

>>"त्यांची जोडी जमली तर हैदराबादी लहेजात पूर्ण वृ येईल.">>

जो भी कोई 'वृ' लिखेगा उसमें दो चार लाईना दख्खनीमें जोडनेकी कोशिश करता मै बादमे 😀
...

>>"वैचारिक गटग होणार तर">>

हे राम 😂
...

>>"मिसाईल नेमके कुठे पडले यावर यातले दोघे तर नक्कीच कोपऱ्यात बसून "चर्चा" करू शकतील.">>

मस्तपैकी 'बसून' चर्चा होणार असेल तर भारताकडून पोर्किस्तानवर होणाऱ्या पुढच्या हल्ल्यात वापरल्या जाणाऱ्या मिसाईल्सच्या लॉंचिंग कोड्सची पण देवाणघेवाण आमच्यात होईल हे निश्चित 😂
...

>>"ऋतुराज सटासट गटग attend करत चालला आहे">>

ऋतुराज = गटग'ऋतु'चे अनभिषीक्त राजे 🙏
...

>>"डॉक्टरांचा आय डी हॅक झालाय">>

हमारी संगत का असर बाबुभैय्या... संगत का असर! वाण नाही पण गुण लागला म्हणतात तसे काहीसे झाले असावे 😀 😀 😂
...

>>"संघातील सहावे खेळाडू वामन यांचे स्वागत !
आता मानव- वामन ही हैदराबादी (नबाबी) जोडी आमचे नेतृत्व करणार . . . ध - मा - ल !">>

भारीच 👍
द्येसमुकरावांचे हार्दीक स्वागत! (हैद्राबादेस आल्यावर उत्तम हलीम खाऊ घालण्याचे जाहीर वचन त्यांनी मागे दिले होते त्याची आठवण त्यांना करून द्यायची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही 😀)
...

बादवे, गटगचे नेतृत्व करणाऱ्या 'मानव' आणि 'वामन' ह्या दोन्ही सदस्यांच्या नावातली तिन्ही अक्षरे सामान आहेत, फक्त त्यांचा क्रम आणि एक काना तेवढा इकडचा तिकडे असणे हा भारी योगायोग आहे!

'कसम चारमिनारा की' आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे हैदाराबाद गटग एकदम 'नवाबी' थाटाचे होणार ह्यात काहीच शंकाच नाही 🙏

Pages