हैदराबाद गटग - डॉ. कुमार सोबत- ०१ जून २०२५

Submitted by मानव पृथ्वीकर on 20 May, 2025 - 08:58

तर हैदराबादकरहो,

पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.

तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9

भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.

तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.

https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8

कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.

गटगला यायचंच हं!

आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:

वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५

शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…

निवासी गटगचा पहिला फोटोनिवासी गटग चा पहिला फोटो

सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.

मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगतानाएक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…

एका घुमटाखाली माबोकरबरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!

माबोकर गोलकोंडा पाहतानामाबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना

सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.

सात जणांचा फोटोजेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)

दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!

फानुस हॉटेलात काही माबोकर्सफानुस हॉटेलात काही माबोकर्स

प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.

पदार्थांचे फोटोहलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश

रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
रिकाम्या टेबलाचा फोटो

आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.

सूप दोनसूप आलं

त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.

कुमार१ चे अभिवाचनकुमार१ यांचे अभिवाचन

यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.

वेज बुलेट्सवेज बुलेट्स १

चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिशचिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश

नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.

दम की बिर्याणीदम की बिर्याणी

शाही तुकडा आणि खुबानी का मीठाशाही तुकडा आणि खुबानी का मीठा

मिपाकरांचा लॉबीमध्ये फोटोलॉबीमध्ये एक फोटो काढला

पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रानभूली, ती अगदीच साधी काँक्रीट रेसीडेंशियल+कमर्शियल इमारत आहे.
त्यात आठव्या मजल्यावर पॅलेस हाईट्स हे रेस्टॉरंट आहे.

हो मानवजी, पुन्हा कधी योग आला हैद्राबादला येण्याचा तर नक्की भेट घेईन.

अस्मिता, शक्य असतं तर मी सगळ्या गटगना उपस्थित राहिले असते.

हैद्राबादची मस्त ट्रीप झाली सगळ्यांची.. छान एन्जॉय केलं.. फोटो सुंदर ..

हैदाबाद खाण्याच्या बाबतीत एकदम नवाबी थाट असलेलं आणि खाण्याची चंगळ असलेलं शहर वाटलं मला. कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर प्रत्येकाच्या टेबलवर बिर्याणी दिसायची ती पण मोठं पातेल भरून.. अगत्याने वाढल्यासारखी..! आमच्या हॉटेलच्या जवळच famous बेकरी होती. शुभम बेकरी असं नाव होते असं आठवतेयं.

चौमाला पॅलसमध्ये नवाबी थाटात मस्त फोटोसेशन करून काही क्षण नवाब असल्यासारखं मनाला वाटून घेतलं ..

रुपाली, हो शुभम बेकरीच. चौमाला, फलकनुमा पॅलेस मी अजुन बघितले नाहीत. आणि अशी बरीच ठिकाणे आहेत, अनेकदा तिथे अगदी समोरून जाणे होते, पण आता जरा घाई आहे नंतर नक्की बघणारच आहोत करून राहुन गेलेली.

काल 'फानुस' मध्ये हलीम, नहारी, तलावा (तला हुवा) गोश, नान आणि कुठलासा ब्रेड (ज्याचे नाव ऋतुराजने आधी वरती एका प्रतिसादात दिले आहे) चाखणारे चार गटगकर 😀

पहिल्या रात्री रंगलेल्या परिचय मैफिलीत सर्वांवर दोन बंधने होती. पहिले म्हणजे स्वतःचे खरे नाव सांगणे आणि दुसरे स्वतःचे खरेखुरे वय. त्यानंतर मुक्तपणे स्वतः संबंधी जे काही बोलायचे असेल ते.
सर्वांचे परिचय झाल्यानंतर २ पुरस्कार देण्याचे ठरले
१. सोज्वळता पुरस्कार एकमताने श्रीगणेशा यांना देण्यात आला.

२. तारुण्य पुरस्कार : यासाठी शारीरिक वय आणि मनाचे तारुण्य यांचा संबंध लावून विजेता निवडण्यात आला. याबाबतीत मात्र निर्णय घेण्यापूर्वी प्रचंड वादंग झाला. हा विजेता कोण असावा हे मात्र वाचकांनी ओळखायचे आहे !

फोटो आणी व्रुतात दोन्ही छान ..२-३ दिवस चालल्याने आणी गटगच हा एक्मेव उद्देश ठरवुन केल्याचा निवान्तपणा फोटोत रिफ्लेक्ट होतोय.

राभू हा फोटो फक्त तुमची उत्सुकता शमवण्यासाठी...
फोटोतल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून फक्त इंटीरिअरचा अंदाज घ्या 😀

आम्ही इथे पोचलो होतो तेव्हा रेस्टोरंटमध्ये आमच्याशिवाय कोणीच नव्हते... पण गटगकरांच्या पायगुणामुळे थोड्याच वेळात बहुतेक सर्व टेबल्स ग्राहकांनी व्यापली होती 😀

तारुण्य पुरस्कार विजेते - माझा अंदाज मानवदादा.
कारण त्यांच्या पोस्ट दिलखुलास, मजेदार व विज्ञाननिष्ठ असतात. विज्ञाननिष्ठ म्हणजे आधुनिक म्हणजे तरुणच. सगळीच लक्षणं तारुण्याची आहेत.

>>तारुण्य पुरस्कार विजेते - माझा अंदाज मानवदादा.>>

यु इज द म्हणीन्ग इज द राईट...
(निर्णय झाला तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो त्यामुळे माझाही हाच अंदाज आहे बरं का...😀)

ध-मा-ल !
दुसरे शब्दच नाहीत.

पुणे, मुंबई येथील मंडळींनी हैद्राबादला जाऊन गटग करावा ही कल्पनाच भन्नाट आहे.

आम्ही मात्र वृत्तांत वाचून आणि प्रकाशचित्रे बघून व्हिस्कीची तहान बियर वर भागवली.

माबोवर आता अश्या "निवासी गटग" चा पायंडा पडावा अशी सदिच्छा Happy

अभिवाचनाची कल्पना आवडली >>> +१

सगळेच फोटो छान. खाऊचे फोटो टोटल लाळगाळू आलेत.

तारुण्य पुरस्कार विजेते >>> मानव. अर्थातच! Happy

शक्य असतं तर या गटगला पण व्हर्च्युअल उपस्थिती लावली असती. पण इथे अगदीच मध्यरात्र होती तेव्हा. त्यामुळे नाही जमलं.

सहीच सर्व, वाचतानाही मजा आली, मस्त फोटो.

बाकी भावे भाऊ (माहेरचं आडनाव म्हणून ते आडनावबंधु अर्थाने लिहीतेय), एकदम संदीप कुलकर्णी सारखे दिसतात.

तारुण्य पुरस्कारासाठी मानव यांचं अभिनंदन.

संभा_जी,
हेडर मध्ये मानव सरांनी गुगल मॅप्सची जी लिंक दिली आहे तिथे या हॉटेलच्या पेजवर एका पॅलेसचे भरपुर फोटोज आहेत. त्यामुळे निजामाच्या वंशजांनी त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीमधे रेस्तरां चालू केले असेल असा समज झालेला माझा.
तसे असते तर तुम्ही नक्की आजूबाजूच्या परिसरातील फोटोज टाकून आमची दूधाची तहान फोटोवर भागवली असती.

मानव सरांनी आता ते फोटो रिलेव्हंट नाहीत असा निर्वाळा दिला आहे. पण त्यामुळे माझ्या सर्व पोस्ट्स असंबद्ध गप्पा वाटल्या असतील. कदाचित मिठाचा खडा वाटला असेल. त्यासाठी क्षमस्व..

Blame it on Google Maps.

वृ वाचतानाच मजा आली तर प्रत्यक्षात किती धमाल केली असेल कल्पना करून मन आनंदले..
तारुण्य पुरस्कारासाठी मानव यांचं अभिनंदन. >>>> +१

रानभूली तुम्ही तसेच इतरांनी माबोकरांचे अजुन एक गटग होते आहे म्हणुन आनंदाने व कुठे , कसे होईल, काय काय मजा करणार या उत्सुकतेने व प्रोत्साहनपर प्रतिसाद दिले आणि गटग सुरू असताना/झाल्यावरही कौतुकाने प्रतिसाद दिले.
यामुळे आम्हा सगळ्यांनाच फार छान वाटले, उत्साह वाढला. एखाद्या ट्रिपला गेलो की घरचे कसे आता फोन येईल आणि तिकडली मजा सांगतील म्हणुन ऐकण्यास उत्सुक व आपण सांगण्यास उत्सुक असतो तसेच फीलिंग आले.
तेव्हा तुम्हा सर्वांना धन्यवाद.

मावा मंडळी
आता घरी सुखरूप पोहोचलो.
आता मानव यांनी दिलेल्या पूथरेकुलुवर (हैदराबादी खाऊ) तुटून पडतो
Happy Happy

बलामावर>>>

की बकलावा?

ह्या गटगला मला हजर राहता नाही आले ह्याची रुखरुख कायम राहील. अर्थात मी कदाचित जून दुसर्‍या आठवड्यात मध्ये हैदराबादेत असेल तेंव्हा मानव यांच्याशी संपर्क करेनच. आमच्या ७-८ वर्षापुर्वी झालेल्या मायक्रो गटगला उजाळा द्यायला. Happy

पूथरेकुलु Happy
साजूक तुपातला तांदळाच्या वेष्टणात गुंडाळलेला छान तलम खाऊ आहे.
तो त्या वेष्टणासकट खायचा आहे असे समजले.
मानव, धन्स

थॅंक्स मानवदा.
वारजात एक हैदराबाद हाऊस आहे. व्हेज डिशेस ची नावे एकत्र लिहा ना प्लीज.
तिथे मिळत असेल तर एकदा आणून चाखून पाहीन.
रेसिपी मिळाली तर नंतर बनवून पण पाहता येईल.

साजूक तुपातला छान तलम खाऊ आहे.>>>
पूथरेकुलु आहे तो>> येस हा आंंध्रामधील माझा आवडता गोड पदार्थ. मी राजमहेंद्रीला वारंवार जायचो. तिथून येताना हमखास आणायचो. तिथे खूप उत्तम दर्जाचा मिळे. नाजूक पातळ काहिश्या पाळीत पिठीसाखर/गूळ तूप आणि सुकामेवा यांचा रोल.

Pages