
तर हैदराबादकरहो,
पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.
तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9
भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.
तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.
https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8
कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.
गटगला यायचंच हं!
आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:
वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५
शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…
निवासी गटग चा पहिला फोटो
सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.
एक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…
बरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!
माबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना
सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.
जेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)
दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!
फानुस हॉटेलात काही माबोकर्स
प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.
हलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश
रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.
सूप आलं
त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.
कुमार१ यांचे अभिवाचन
यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.
वेज बुलेट्स १
चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश
नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.
दम की बिर्याणी
शाही तुकडा आणि खुबानी का मीठा
लॉबीमध्ये एक फोटो काढला
पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.
संजय, गोपनिय माहिती आताच
संजय, गोपनिय माहिती आताच फोडू नका ही विनंती. धागा सार्वजनिक आहे, पाकिस्तानी हेरांचे लक्ष्य असेल.
हलीम व बिर्याणी साठी शादाबमध्येही एक गटग करता येईल.
हैदराबादकरांनो लौकर हजेरी लावा.
विपु बघा. म्हणजे तिथे तुम्हाला या धाग्याची लिंक दिसेल. ती उघडून हजेरी लावा पटकन.
अरे! आधीच्या गटगचे वृत्तान्त
अरे! आधीच्या गटगचे वृत्तान्त येताहेत, तोवर नव्या गटगची घोषणाही झाली!
मायबोलीकर आता थांबणार नाहीत. गटग पे गटग करत राहणार.
मजा करा.
मला आवडले असते हैद्राबाद
मला आवडले असते हैद्राबाद गटगला यायला!
ह्यापुर्वी मी आणि मानव आम्हा दोघांचा मायक्रो हैद्राबाद गटग दोन वेळा झाला आहे तो देखिल जवळपास दिवसभर!
कृष्णा,
कृष्णा,
जेव्हा हैदराबाद ठरवले तेव्हाच तुमची आठवण काढली होती आणि मनातल्या मनात तुम्हाला गृहीत धरले होते
बघा अजूनही जमतय का . . .
२९-१ माझ्या घरीच
२९-१ माझ्या घरीच शाळासोबत्यांच गटग आहे, ते वेळेत परत गेले तर नक्की यायचेय.
कृष्णाना पुण्यात गटग ला पाहिले तेव्हाच विचारणार होते की त्यांनी हैदराबाद सोडले का? आम्ही बेगमपेट सोडले त्यानंतर कुणीच माबोकर भेटले नाही
जमल तर नक्की यायचेय
>>"संजय, गोपनिय माहिती आताच
>>"संजय, गोपनिय माहिती आताच फोडू नका ही विनंती. धागा सार्वजनिक आहे, पाकिस्तानी हेरांचे लक्ष्य असेल.">>
खरंच की!
आपल्या गटग विषयीचा हा धागा आणि दर्दी माबोकरांचे त्यावरचे उत्साहवर्धक प्रतिसाद वाचून थोडे भान हरपल्याने तो प्रमाद घडला... तरी बरे निर्धारित टार्गेट्स बद्दल काही वाच्यता नाही केली मी 😀
>>"हलीम व बिर्याणी साठी शादाबमध्येही एक गटग करता येईल.">>
तुम्ही हैद्राबादकर म्हणाल तसें... शादाब असो की आदाब, आम्ही आनंदाने यायला तयार आहोत 🙏
>>"आधीच्या गटगचे वृत्तान्त येताहेत, तोवर नव्या गटगची घोषणाही झाली!">>
मानव ह्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून ह्या 'डेस्टिनेशन गटग' ची कल्पना कुमार सरांनी फेब्रुवारी महिन्यात मांडली होती आणि सतीश, ऋतुराज व मी अशा शिष्यांनी गुरुची आज्ञा शिरसावंदय मानून त्वरित होकारही भरला होता. सगळ्यांसाठी सोयीस्कर ठरेल अशी वेळ जुळून आल्यावर आणि प्रवासाचे नियोजन पार पाडल्यावर 'हैदाराबाद गटग' साठी जून महिन्याची 1 तारीख नक्की झाली. (जी मलाही आज सकाळीच हा धागा वाचल्यावर कळली, मला वाटले होते शुक्रवार 30 मे रोजी संध्याकाळी गटग होईल 😀)
* शुक्रवार 30 मे रोजी
* शुक्रवार 30 मे रोजी संध्याकाळी गटग होईल >>
हा का ना का ! तेव्हा आपले पक्षांतर्गत होणार आहेच की
. . .
* शिष्यांनी गुरुची आज्ञा >>> काय राव, असलं गुरु-बिरु नको ! आपण चौघेही 'गॅंग'चे सभासद आहोत असं समजा.
सगळे डॉक्टर्स मिळून मायबोली
सर्व डॉक्टर्स मिळून सरप्राइज तर देणार नसतील ना?

सुस्वागतम मृनिश! तुमचे नाय
सुस्वागतम मृनिश! तुमचे नाव यादीत घेत आहे.
नक्की जमवा. गटग ३ -३:३० पर्यंत नक्कीच लांबेल.
तसेच हा धागा नियमित बघत रहा. १ तारखेला मुख्य गटग व्यतिरिक्त ३० व ३१ ला शक्य असल्यास मिनी गटग करता येईल का बघु.
>>"सगळे डॉक्टर्स मिळून
>>"सगळे डॉक्टर्स मिळून मायबोली हॉस्पिटल ची घोषणा हैद्राबादेतून तर करणार नसतील ना?">>
मायबोली हॉस्पिटल 😀 😀 😀
मी डॉक्टर नाही, त्यामुळे बाकी मान्यवरांची अशी काही गुप्त योजना असल्यास कंपाउंडर किंवा गेलाबाजार वॉर्डबॉय पदासाठी तरी आत्ताच वशिला लावून ठेवावा म्हणतो 😂
- डॉन कुमार ह्यांच्या अध्यक्षतेखाली 'भायखळ्यात' स्थापन झालेल्या 'गँग'चा शार्प शुटर - संभा
संभा
संभा
अंगाशीSSS
आता कसं, अगदी फिट्ट नाव
अरे काय हे अजून एक..
अरे काय हे अजून एक..
एडमिन यांनी गटगसाठी एक वेगळा विभाग काढून द्यायची वेळ आली आहे.
बाई दवे,
ऋतुराज हे अमेरिकेतील गटगला नव्हते. त्यांना ऐनवेळी व्हिसा नव्हता मिळाला का?
राभु ,
राभु ,
फोटोतले लोक कोण आहेत ?
. . .
‘ऋ’पवान माबोकर >>>> येताय का ?
व्हिसा शिवाय प्रवेश आहे इथे
उद्घाटन करताहेत ते तुम्ही
उद्घाटन करताहेत ते तुम्ही (समजा)
आणि बाकी गटगकर.
Chat GPT च्या सौजन्याने.
ओ हो ! मस्तच केलं की
ओ हो ! मस्तच केलं की
>>"Chat GPT च्या सौजन्याने.">
>>"Chat GPT च्या सौजन्याने.">>
🙏
मला आधी चित्र दिसले नव्हते... नंतर ऍडवलेत का?
हो.
हो.
गटग कु जो बी लोआँ आरेँ नइ
गटग कु जो बी लोआँ आरेँ नइ आरेँ वो सोब लोओं कु नमस्ते।
सप से पैले तो मेरे कु याद करे कर के हमारे कुमार भाई कु होर बाक़ी बी बड़े-बड़े लोओं कु थँक्यू बोल्तुं। मैं तो गटग कु पक्का आतुं। होर पुरे अपनेच लोआँ हैं कर के अकेलेच आतुं, बम्सरॉं नइ लातुं।
---
या दिवसांत चांगले हलीम तर मिळणार नाही त्यामुळे क्षमस्व, तथापि ग्रॅन्ड हॉटेलची चिकन बिर्याणी अगदी स्वादिष्ट असते ती पाहुण्यांच्या स्वागतासाठी उपलब्ध करता येईल. त्याशिवाय शनिवार संध्याकाळ पासून चिकन नहारी आणि रोजच पाया नहारी मिळेल.
All the best for हैदराबाद गटग
All the best for हैदराबाद गटग .
रिपोर्टा पढने के वास्ते अभीसेच लैन लागता...
@ वादे
@ वादे
2023 मधील आपला शिवसागर कट्टा अजूनही चांगला आठवतो आहे.
आता लवकरच हुसेनसागरला भेटणार आहोत . . .
येताय का ? >>> छे हो, मी तर
येताय का ? >>> छे हो, मी तर एवढा करंटा की भायखळा जमवता नाही आले. हैदराबाद तर फार लांब गेले.. तरी कुठून कुठून किती लोक येणार याची उत्सुकता आहे.
>>"या दिवसांत चांगले हलीम तर
>>"या दिवसांत चांगले हलीम तर मिळणार नाही त्यामुळे क्षमस्व">>
चालतंय की... आपल्यासारख्या चांगल्या जालीय मित्रांशी प्रत्यक्ष भेट होणे महत्वाचे, त्यापुढे बाकीच्या गोष्टी अगदीच दुय्यम!
खाना-पिना तो लगा रहेगा, आपण भेटूयात आणि खूप धमाल करूयात...
कृष्णाना पुण्यात गटग ला
कृष्णाना पुण्यात गटग ला पाहिले तेव्हाच विचारणार होते की त्यांनी हैदराबाद सोडले का? आम्ही बेगमपेट सोडले त्यानंतर कुणीच माबोकर भेटले नाही>>>
बेगमपेट मध्ये होतात? मी पंजागुट्टा सर्कलला बंजाराहिल्स रोड नं १ वर जवळपास ८-९ वर्षे होतो. मागिल वर्षीच पुण्यात आलो परत.
बेगमपेट मध्ये होतात? > मी
बेगमपेट मध्ये होतात? > मी तिथे असताना एकदा आपण भेटलो होतो, तुम्ही गौरीच्या (महालक्श्मी) च्या दर्शनाला आला होतात माझ्याकडे
आपल्यासारख्या चांगल्या जालीय
आपल्यासारख्या चांगल्या जालीय मित्रांशी प्रत्यक्ष भेट होणे महत्वाचे <<
जालीम लोकांपुढे हालीम दुय्यम आहे..
गौरीच्या (महालक्श्मी) च्या
गौरीच्या (महालक्श्मी) च्या दर्शनाला आला होतात माझ्याकडे>>>
अरेच्चा! सॉरी सॉरी हो की विसरलोच होतो मी पूर्णपणे!!
>>> जालीम लोकांपुढे हालीम
>>> जालीम लोकांपुढे हालीम दुय्यम आहे..
हो हो, अशीच आपली तालीम आहे!
नहारी आणि बिर्याणी खाताना
नहारी आणि बिर्याणी खाताना आमची आठवण काढा आणि आमच्यावाटचे दोन घास जास्त खा , लोक्स!
मायबोली हॉस्पिटल, हैद्राबाद
मायबोली हॉस्पिटल, हैद्राबाद
मायबोली व्यसनमुक्ती केंद्राचे
मायबोली व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन तर नाही ना? फार गरज आहे.

कुमार सर, तुम्ही माझ्या वाटच्या हैदराबादच्या शाकाहारी डिशेस खा.
Pages