ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राभू मस्त प्रतिसाद असतात तुमचे.
>>>>>हे जर खरे असेल तर कठिण आहे. पाक अजुन मुजोर होत जाणार.
+१
त्यांना हुकमी एक्का मिळालेला दिसतोय. न्युक मीटिंग घ्यायची की अमेरिका मधे पडते. आणि संकट टळते. यांच्या हाती न्युक म्हणजे माकडाच्या हाती कोलित असा प्रकार दिसतोय.

म्हणजे अश्या गोष्टी टिमवर्क असतं हे मान्य आहे. पूर्वसुरींच्या खांद्यावरती उभे राहूनच करता येतात . हे मान्य.
>>>>After Shastri's death in 1966, Indira Gandhi became the prime minister and work on the nuclear programme resumed.

>>>With the return of Indira Gandhi in 1980, the nuclear programme gained momentum.

>>>>Having tested weaponized nuclear warheads, India became the sixth country to join the nuclear club.[30] Shortly after the tests, Prime Minister Vajpayee appeared before the press corps and made the following short statement: Today, at 15:45 hours, India conducted three underground nuclear tests in the Pokhran range.

वाचतेय.

माजी लष्करप्रमुख नरवणे ह्यांनी शस्त्रसंधी झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. माजी लष्करप्रमुख मलिक ह्यांनी देखील अशीच भावना व्यक्त केलीये.

काश्मीरच्या वादात तात्या मध्यस्थी करू इच्छीतो हे भारताच्या आजवरच्या भूमिकेच्या विरोधात आहे. ह्यावर भारत सरकारकडून अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

>>>With the return of Indira Gandhi in 1980, the nuclear programme gained momentum.
भारताने पहिली अणुचाचणी १९७४ मध्ये केली, त्यावेळी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या.

राफेल किंवा इतर कोणतेही फायटर जेट पाडले गेल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यावर बोलताना एअर मार्शल भारती म्हणाले की, आपले कोणते जेट पाडले गेले किंवा नाही यावर सद्यस्थितीत ते कोणतेही भाष्य करणार नाहीत, कारण आपण अजूनही कॉम्बॅट सिच्युएशनमधे आहोत. पण आमचं जे कोणतेही लक्ष्य भेदण्याचे उद्दीष्ट होतं ते आम्ही पुर्णतः साध्य केले आणि आमचे सर्व वैमानिक सुखरूप आहेत.

- डसॉल्ट एव्हिएशनचा शेअर आज ३.५% नी कोसळला आहे.

हवाई दलाची कामगिरी ऐकून मान उंचावली. शत्रू तयारीत असतानाही आपण attack आणि defence दोन्ही उत्तम प्रकारे केले.

सायो यांनी शेयर केलेली शशी थरूर यांची लिंक युद्धविराम आणि एकूणच ह्या ऑपेरेशन सिंदूर वरचे भाष्य चपखल आहे. इथे नेहमीचे गोंधळी आपला कार्यक्रम राबवत आहेत. थरूर आणि ओवेसी यांचे ह्या ऑपेरेशन दरम्यानचे विचार आवडून गेले.

खरोखर, पहिल्यांदा ओवेसी काहीतरी बोललेले आवडले.
हवाई दलाची कामगिरी ऐकून मान उंचावली. शत्रू तयारीत असतानाही आपण attack आणि defence दोन्ही उत्तम प्रकारे केले.>>>>
सगळे फासे भारताच्या बाजूने आहेत, सैन्य प्रबळ आहे, युद्धाला कारण आहे, जनता कधी नव्हे तेवढी पेटली आहे! अनेक नेते पाठिंबा देऊन आहेत, माजी सैन्य प्रमुख नरवणे सुधा बोलले की संधी घालवली, भारताकडे आज काही नसेल तर ते म्हणजे “चांगले नेतृत्व.”
पहा सुभ्रमण्यम स्वामी काय म्हणताहेत ते.
https://x.com/swamy39/status/1498508248533835776?s=46

विरोधी पक्ष सरकारच्या बाजूने असूनही एक माणूस सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांसमोर येत नाही हे असे का घडत आहे ?

<< आता तर वाचायला मिळतेय की पाकने न्युक बॉम्ब ची तयारी सुरु केली, त्याला घाबरुन वान्स व ट्रम्प मध्ये पडले आणि युद्ध थांबवले. >>
------ अशाच प्रकारचे काहीसे (थेट अण्वस्त्रांचा उल्लेख नव्हता ) मी वाचले होते. BBC च्या बातमीत तो दिसत आहे.
https://www.bbc.com/news/articles/clyn617xv4no

युद्धाची व्याप्ती वाढत होती आणि परिस्थिती बिघडतच चालली होती. भारताचेही फार मोठे नुकसान झाले असते आणि अमेरिकेला हे टाळायचे होते. युद्ध विराम मिळाला हे दोन्ही देशांच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे - फार मोठी मानवी हत्या टळली.

<< त्यांना हुकमी एक्का मिळालेला दिसतोय. न्युक मीटिंग घ्यायची की अमेरिका मधे पडते. आणि संकट टळते. यांच्या हाती न्युक म्हणजे माकडाच्या हाती कोलित असा प्रकार दिसतोय. >>

----- कुणाच्याही हातामधे अण्वस्त्र असणे घातकच आहे.

दोन राष्ट्रामधे कमालीचा अविश्वास आहे. भारताचे no first use हे तत्व आहे पण चूक होणे, गैरसमज होणे सहज शक्य आहे. उदा - युद्धाच्या काळांत सोडा पण अगदी शांततेच्या काळांत भारताकडून चुकून पृथ्वी क्षेपणास्त्र पाकच्या दिशेने ( पाकच्या हद्दीमधे प्रवेश ) झेपावले आहे. असे होण्याची शक्यता किती वाटते?

परदेशी मीडियामधे कोणाचे नॅरेटिव्ह जिंकले वगैरे काही नाही. पाक अतिरेक्यांना सपोर्ट करते हे अमेरिका व इतर विकसित देशांना ऑलरेडी माहीत आहे व त्यांच्या बोलण्यातही येते. भारताला प्रतिकाराचा हक्क आहे हे ही सर्वांना मान्य आहे. भारताने यापेक्षा जास्त काही केले नाही हे चांगलेच झाले. जनमताची सहानुभूती भारताकडेच राहिली. इस्रायलसारखे काही करायला गेले असते तर ते जनमत फिरले असते.

एकूण परदेशी पब्लिकचे मत पाकने अतिरेकी हल्ले केले, भारताने प्रत्त्युत्तर दिले व आता दोघेही थांबले आहेत, इतकेच आहे.

मुळात काही अतिरेकी ठाण्यांवर हल्ला केल्यानंतर भारतालाही लगेच पुढे काही वाढवण्यात इंटरेस्ट नसेल. मिडियाने व इतर उत्साही पब्लिकने यातून आता काहीतरी मोठे युद्ध होणार आहे असे चित्र उभे केले होते पण सरकारचा/सैन्याचा तसा मुळात काही प्लॅन होता असे वाटत नाही.

>> असे होण्याची शक्यता किती वाटते?<<
अशी शक्यता अजिबात नाहि. नुक्लियर वॉरहेड्स असे दिवाळीच्या रॉकेट्स प्रमाणे उडवता येत नाहित..

परंतु रावळपिंडि जवळील नूर खान एयरबेस, सरगोधा एयरबेस ज्या ठिकाणी नुक्लियर आर्सनलचा मोठा साठा आहे, तिथे आपण केलेल्या हवाई हल्ल्यामुळे रेडिएशन लिकेजचा धोका निर्माण झालेला आहे. पुढे परिस्थिती अजुन चिघळु नये म्हणुन अमेरिकेने मध्यस्थि करण्याचा प्रयत्न केला, अशी बातमी आहे. इजिप्तने देखिल बोरॉन लोडेड कार्गो विमान पाकिस्तानात पाठवलेलं आहे. रेडिएशन डँपन करण्याचं काम बोरॉन करतं..

यातुन एक कठोर संदेश पाकिस्तानला दिला गेला कि भारताकडे पाकिस्तानच्या नुक्लियर आर्सनल वर हल्ला करुन तिथेच हा:हाकार माजवण्याची क्षमता आहे, नुक्लियर वॉरहेड्स डागण्याची गरज नाहि. आशा करुया कि पाकडे यातुन काहि धडा घेतील आणि भविष्यात भारताची कुरापत काढणार नाहित...

युवी २०१५ , सामो आभारी आहे. Happy

भारताच्या आकाश या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला मिडल ईस्टमधून मागणी येण्याची चिन्हे आहेत. आताच्या युद्धात एस ४०० ची चर्चा झाली पण २० ते ३० किमी रेंजमधे आकाशने सुद्धा प्रभवी कामगिरी केली. त्याचं नवं क्षेपणास्त्र ५० किमी रेंजमधे येत आहे. आकाश ऑलरेडी अर्मेनियाला विकलेले आहे. तेजसला सुद्धा मागणी येईल असे दिसते. पूर्वी आपण विकसित केलेली शस्त्रास्त्रे इतर राष्ट्रांना विकण्याची पॉलिसी नव्हती.

याचबरोबर या युद्धामुळे रशियाच्या एस ४००, इस्त्रायलच्या पायथन या शस्त्रांची जाहीरात झाली. राफेल आणि सुखोई ३० पाडलं हा प्रचार पाश्चिमात्य मीडीया युएस च्या शस्त्रास्त्र कारखानदारांसाठी करत असावा असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. पण राफेल पाडलंच नाही असे खणखणीत उत्तर एअरफोर्स कडून मिळालेले नाही. एव्हढ्या धामधुमीत एखादे फायटर जेट पडणे अशक्य नाही.

राज, अगदी तुमच्याच प्रतिसादाशी मिळताजुळता रिपोर्ट
https://www.youtube.com/watch?v=sptw9uw1Ve8

मला ह्या ऑपरेशन च्या संदर्भात "बाहेरच्या दबावाची" शक्यता वाटतेय.
वरिष्ठ पत्रकार ब्रह्म चेलानी ह्यांनी 'भारताने लढाईत जे कमावले, ते चर्चेत घालवले' अशा अर्थाचे ट्विट केले. निवृत्त जनरल वेद प्रकाश मलिक आणि मुकुंद नरवणे ह्यांनी ही तडकाफडकी सीजफायर बद्दल आश्चर्य (नाराजी) व्यक्त केली.

ह्या पार्श्वभूमीवर एक बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे ती म्हणजे स्टिव विटकाॅफ चा मुलगा झॅक विटकॉफ ह्याने इतक्यात घेतलेली असीम मुनीर आणि शाहबाझ शरीफ ह्यांची भेट. ट्रंप च्या बिटकॉइन बिझनेस विस्ताराच्या संदर्भात ही भेट होती असे कळले.

ही बातमीची लिंक: https://m.economictimes.com/markets/cryptocurrency/crypto-news/what-is-w...

<< >> असे होण्याची शक्यता किती वाटते?<<
अशी शक्यता अजिबात नाहि. नुक्लियर वॉरहेड्स असे दिवाळीच्या रॉकेट्स प्रमाणे उडवता येत नाहित.. >>

---- मी पृथ्वी क्षेपणास्त्र असे लिहीले आहे. त्यावर अण्वस्त्र ( nuclear warheads) चा उल्लेखही केला नाही. Happy

दिवाळीच्या रॉकेटप्रमाणे सहज उडविता येत नसतील पण अशी घटना ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबत ९ मार्च २०२२ रोजी घडलेली आहे आणि तिघांना शिक्षा मिळाली आहे. technical malfunction, maintenance अशी कारणे दिली आहेत.

https://www.thehindu.com/news/national/accidental-missile-firing-three-i...

https://www.cnn.com/2022/03/11/asia/india-pakistan-missile-intl-hnk/inde...

मुळात काही अतिरेकी ठाण्यांवर हल्ला केल्यानंतर भारतालाही लगेच पुढे काही वाढवण्यात इंटरेस्ट नसेल. मिडियाने व इतर उत्साही पब्लिकने यातून आता काहीतरी मोठे युद्ध होणार आहे असे चित्र उभे केले होते पण सरकारचा/सैन्याचा तसा मुळात काही प्लॅन होता असे वाटत नाही.>>>>>>

प्लॅन नव्हताच. ऑप सिन्दुर नंतर भारताने हे सांगितले होते की अतिरेकी तळ उडवणे हे साध्य होते आणि ते पुर्ण झाले. त्यानंतर पाकने जे सुरु केले त्याला भारत फक्त उत्तर देत होता.

पाकशी युद्ध सुरु केले आणि त्यात पुढे जाऊन इराकसारखी पाकची अवस्था झाली तर भारतालाच ते महाग पडणार. त्या दिशाहीन देशाचा बरा शेजार भारतच आहे.

यातुन एक कठोर संदेश पाकिस्तानला दिला गेला कि भारताकडे पाकिस्तानच्या नुक्लियर आर्सनल वर हल्ला करुन तिथेच हा:हाकार माजवण्याची क्षमता आहे, नुक्लियर वॉरहेड्स डागण्याची गरज नाहि. आशा करुया कि पाकडे यातुन काहि धडा घेतील आणि भविष्यात भारताची कुरापत काढणार नाहित...>>>>

हे असे झाले तर बरेच आहे. न्युक इकडे येऊन फुटायच्या आधीच भारताने तिकडे हल्ला करुन नुकसान केले तर सगळ्यांसाठी चांगले आहे.

जरब बसली हे दाखवणे पाकसाठी अवघड आहे कारण त्यांच्या गांजलेल्या जनतेला आपण भारताला हरवले ही अफुची गोळी चारली की मिलिटरीला सुखाने चरत राहता येते. पण सत्य परिस्थिति मुनिर व कंपनीला माहित असणार.

एनी वेज, कालचा दिवस शांततेत गेला. संध्याकाळची प्रेस मिट चांगली झाली. भारताने पाक भुमीत प्रवेश न करता हे सगळे केलेय असे म्हणताहेत तर राफेल पडायचा प्रश्न येत नाही. कदाचित म्हणुनच यावर नि:संदिग्ध उत्तर मिळत नसावे.

वरिष्ठ पत्रकार ब्रह्म चेलानी ह्यांनी 'भारताने लढाईत जे कमावले, ते चर्चेत घालवले' अशा अर्थाचे ट्विट केले>>>>

चर्चा कधी व कोणाबरोबर झाली? मिडिया स्वतःच स्वतःशी चर्चा करतेय.

विक्रम मिसरीना सीजफायरची घोषणा केली म्हणून बोल लावण्यात येत होते. त्यामुळे त्यांनी अकाउंट रिस्ट्रिक्टेड केलं. बोल लावणे हे खूप अंडरएस्टीमेट झाल . त्यांच्या बायको मुलीवर अश्लील टिप्पणी करण्यात आली. त्यांच्या काश्मिरी पंडित मूळ असल्याचा देखील उद्धार करण्यात आला. कुठले फ्रस्ट्रशन कुठे काढत असतात हे ट्रोल!

मिसरी त्यांचे काम चोखपणे बजावत आहे. त्यांच्या कुटुंबाला ट्रोल करणे चिड आणणारे आहे Angry .
हिमांशी नरवाल यांनाही ट्रोल्सचा सामना करावा लागला होता. किती घाणेरडे लिहीले होते त्यांच्याबद्दल. दोष काय होता त्यांचा? आवरा या ट्रोल करणार्‍यांना.

खोट्या बातम्या देणाऱ्या चॅनेल्स वरतीही कारवाई व्हायला पाहिजे. पण नाही होणार.आपल्याच चॅनेल्स वर भाजपा कारवाई नाही करणार.

साधना ट्रंप ने स्वतः ट्विट करुन सांगितले ना त्याने भारत आणि पाकिस्तान दोघांशिही चर्चा केली. ट्रंप ची एकुण कार्यपद्धती बघता ती चर्चा होती की अरेरावी हे उघड आहे. त्याने इतक्या घाईत हे जगजाहीर का केले. तडकाफडकी सीजफायर साठी भारतीय नेतृत्वाने मान्यता दिली म्हणुन पॉलिसी लेव्हल चे जाणकार का नाराज आहेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही अंशी ह्या बातमीतुन मिळतात.

https://www.lokmat.com/international/india-will-blow-up-terrorist-camps-...
अमेरिकेला कारवाई बद्दल आधीच माहिती का द्यावी.
शिवाय ट्रम्प ही भारत आणि पाकिस्तानला एकाच तराजूत का तोलत आहेत. भारताची शक्ती, विचारधारा आणि संस्कृती खूपच भिन्न आहे.
कारवाई अचानक त्यांना न सांगता झाली असती तर कदाचित दहशतवाद्यांचा आकडा आज हजारात असता.
नुसत्या भिंती आणि इमारती जाऊन खूप काही मोठा फायदा होतो असं वाटत नाही. दहशतवाद हाच मुळात वैचारिक किडा आहे. कश्मीर पुन्हा सुजलम सुफलाम झालं तर त्यांना अजून त्रास होतो. तरीही पाकिस्तानला आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना नक्कीच धडा बसला असेल.
सध्याच्या घडीला आज जे काही घास खाते मी त्यामागे फक्त आणि फक्त भारतीय army ची कृपा आहे. आजचे वर्तमान आणि उद्याचे भविष्य त्यांच्याच हातात आहे.

मानव हो बरोबर मला पण एरर येते आहे. नेटवर शोधले असता ही हिंदुस्थान टाइम्स ची बातमी मिळाली. इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमीत साधारण हाच मजकूर होता.

वाचली. तुम्ही म्हणता ते बरोबर वाटतेय. एवढा चांगला पार्टनर आहे पाक त्यांचा, ट्रम्पने चांगलाच दबाव टाकला असेल.

Economics Time ची खालील लिंक उघडतेय.

https://m.economictimes.com/markets/cryptocurrency/crypto-news/what-is-w...

Pages