Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुजोर देश आहे. चीनच्या
मुजोर देश आहे. चीनच्या हातातलं खेळणं
उत्तर हेच वाटते की त्यांना
उत्तर हेच वाटते की त्यांना माहित आहे त्यांचे काहीही वाकडे होणार नाहीये. कारण काहीही असो. >>> Because of this confidence only they always attempt to bleed us and that too on our soil.
They must be knowing की कधी भारत प्रतिकार म्हणून युद्ध करू लागलाच तर घरचाच विरोध खूप असणार आहे. त्याचे खच्चीकरण घरचेच करायला बघणार आहेत...... कारण ते भारताच्या भूमीत हे करत आहेत... स्वतःच्या भूमीत नाही. कधीही भारताच्या अंगणात, स्वयंपाकघरात, पडवीत घुसावं आणि मारून जावं.... आणि कांगावा करावा. त्यांनी नुसत्या जम्मू काश्मिरमध्येच नाही हे केलं... मुंबईपर्यंत घुसले, संसदेपर्यंत घुसले, पठाणकोट, अक्षरधाम, उरी...
बलोच लोकांनी संघर्ष पेटवल्यावर चटके काय असतात ते कळू लागले त्यांना. तरी ज्यांचे अस्तित्वच भारताबद्दलच्या द्वेषावर अवलंबून आहे ते कागदोपत्री ceasefire असो वा नसो... आपल्याला त्रास देतच राहणार..... आपण सहन करतच राहणार. त्यांना जाऊन उपदेशचे डोस पाजणारे कोणी नाही.
पाक सैन्य सरकारच्या विरोधात
पाक सैन्य सरकारच्या विरोधात गेले असेल का?
पाऊण तासापुर्वीची शहबाज शरिफ
पाऊण तासापुर्वीची शेहबाज शरिफ ह्यांची 'X' वरची पोस्ट 😀
Pakistan PM says ceasefire deal ‘marks a new beginning’
In an earlier post on X, Pakistan Prime Minister Shehbaz Sharif has framed today’s ceasefire as the beginning of a wider movement towards stability in the region.
“Pakistan believes this marks a new beginning in the resolution of issues that have plagued the region and prevented its journey toward peace, prosperity and stability,” he wrote.
He also stressed the role of the Trump administration in the ceasefire, thanking not only the US president for his “leadership and proactive role”, but also Vice President JD Vance and Secretary of State Rubio.
“Pakistan appreciates the United States for facilitating this outcome, which we have accepted in the interest of regional peace and stability,” he said.
काय म्हणायचं ह्या लोकांना?
पाक सैन्य सरकारच्या विरोधात
पाक सैन्य सरकारच्या विरोधात गेले असेल का? >>>> एवढा नको विचार करुस भ्रमा. त्यांचं त्यांनाच माहित नाहीये ते. त्यांच्या जनतेला तर काहीच माहित नाही. तिसरंच कुणी दोर ओढतंय त्यांचे.
<>
>>They must be knowing की कधी भारत प्रतिकार म्हणून युद्ध करू लागलाच तर घरचाच विरोध खूप असणार आहे. त्याचे खच्चीकरण घरचेच करायला बघणार आहेत >>>
सद्य परिस्थितीत हे नेमके कोणी आणि कसे केले यावर प्रकाश टाकता येईल का?
>>"पाक सैन्य सरकारच्या
>>"पाक सैन्य सरकारच्या विरोधात गेले असेल का?">>
पाक सरकारनी बहुतेक सैन्याच्या विरोधात जाउन परस्पर शस्त्रसंंधी केली असावी 😀
सैन्य सरकार च्या विरोधात गेले
सैन्य सरकार च्या विरोधात गेले असे जरी म्हटले तरी ओवरऑल जे होतय ते त्यांच्याच फेवर मधे आहे ना.
सीझफायर चे फायदे पदरात पाडून घ्ययाचे आणि कारवाया चालू.
सैन्य सरकार च्या विरोधात गेले
डु. प्र.
कदाचित र्ट्म्प तात्यांनी शेअर
कदाचित र्ट्म्प तात्यांनी शेअर मार्केटमध्ये अपडाऊन बघायला मिळावेत म्हणून असं काही स्टेटमेंट केला असेल.
जर दोनचार तासात सीजफायर तोडले
जर दोनचार तासात सीजफायर तोडले असेल तर नक्की काय फायदा झाला असेल त्याचा?
मला नाही वाटत हे फायद्यासाठी मुद्दाम केले असावे.
बहुधा त्यांचेच काही नक्की नसावे. तेथील सरकार जनतेचा कल बघून चालणारे असावे आणि लष्कर त्यांना फारसे जुमानत नसावे.
भारतीय परराष्ट्र सचिवांकडून
भारतीय परराष्ट्र सचिवांकडून पाकिस्तानच्या युद्धबंदी उल्लंघनाची ऑफिशिअल प्रेस रिलीज आली. आजूनही समजवयाच्या भूमिकेतच दिसतोय आपण....तात्याने चांगलेच डोळे वटारलेले दिसतायत.
https://x.com/MIB_India
https://x.com/MIB_India/status/1921255738573304306
एकीकडे परराष्ट्र सचिव पुन्हा हल्ले झाल्याचं सांगताहेत, दुसरीकडे न्यूज चॅनेल आर्मी सोर्सेसच्या हवाल्याने गोळीबार थांबला, स्फोट झाले नाहीत, रिकामी ड्रोन्स होती, असं सांगताहेत
https://x.com/sidhant/status/1921244754097905967
>>आजूनही समजवयाच्या भूमिकेतच
>>आजूनही समजवयाच्या भूमिकेतच दिसतोय आपण...>>
हो... 'शस्त्रसंधीची बातमी/आदेश त्यावेळी तळागाळापर्यंत पोचली नसल्याने मगाचचा हल्ला झाला असावा" ह्या कारणासाठी त्यांना बेनीफीट ऑफ डाऊट मिळाला असल्याचे ऐकले. अर्थात त्यात कितपत तथ्य आहे काय माहित पण सध्यातरी सर्व ठिकाणी शांती असल्याचे दिसतंय.
शस्त्रसंधीची बातमी/आदेश
शस्त्रसंधीची बातमी/आदेश त्यावेळी तळागाळापर्यंत पोचली नसल्याने मगाचचा हल्ला झाला असावा" ह्या कारणासाठी त्यांना बेनीफीट ऑफ डाऊट मिळाला असल्याचे ऐकले.>>> काकायययय?? १६ व्या शतकात रहातोय का आपण? कायच्या काय सबबी द्यायच्या.... जे माहीती पोचायला दिवस आणि तास लागतात??..आणि आपण त्यांना बेनीफीट ऑफ डाऊट द्यायला इतके तत्पर??
>>कदाचित र्ट्म्प तात्यांनी
>>कदाचित र्ट्म्प तात्यांनी शेअर मार्केटमध्ये अपडाऊन बघायला मिळावेत म्हणून असं काही स्टेटमेंट केला असेल.>>
त्यांनी सिझफायर स्टेटमेंट केले तेव्हा US share market ओपन होते का?
असल्यास तुम्ही म्हणता ते शक्य आहे.
मला वाटते आपण आता न्यूज
मला वाटते आपण आता न्यूज मिडिया सारखे नको वागूया. तर्क लावण्यापेक्षा आणि उडत्या बातम्यांवर चर्चा करण्यापेक्षा थोडा धीर धरूया. उद्या ऑफिशिअली क्लिअर होईल काय ते. बातम्या तुम्हाला पुन्हा रात्रभर खेळवत राहतील.
"१६ व्या शतकात रहातोय का आपण?
"१६ व्या शतकात रहातोय का आपण? कायच्या काय सबबी द्यायच्या...."
आपण एकविसाव्या शतकात आहोत पण ते मदरसाछाप लोकं अजुन मध्ययुगातच रमलेत 😀
पण गंमत म्हणजे आधी ऐकले तेव्हा मलापण ही भंकसच वाटली होती पण खालची बातमी वाचल्यावर त्यात किंचीत का असेना पण तथ्य असावे असे वाटले होते.
Jammu and Kashmir minister warns of ‘heavy firing’
An Indian minister in the Jammu and Kashmir government is warning of “heavy firing at [the] border”.
Satish Sharma posted on Facebook urging residents to not to rush back to their homes along the Line of Control (LOC).
“I appeal to the people of Chhamb Constituency that stay at safer places and don’t rush back to homes at LOC as the Ceasefire announcement might not have travelled to all the places [and] people,” he said.
“We’ll coordinate your return to homes,” he added.
सुरवातीचा तिव्र भावना ( संताप
सुरवातीच्या तिव्र भावना ( संताप, राग, मानवी हत्यांचे दु : ख, फसविल्या गेल्याची भावना.... मग बदला घेण्याची भावना, सामान्यांचा युद्धज्वर वाढणे) ओसरल्यावर प्रामाणिक पण कठोर आत्मपरिक्षणाची तिव्र गरज जाणवते.
पहलगाम ( बैसरण खोरे) येथे पर्यटकांवर हल्ला करुन २८ निरपराधी लोकांची हत्या केल्यानंतर हे कृत्य करणारे राक्षस कुठे लपले आहेत? त्यांनी जो " मेसेज " दिला आहे तो चिंताजनक आहे त्यामुळे चौकशीच्या दृष्टीने ते जिवंत सापडणे महत्वाचे आहे. एव्हढी मोठी सुरक्षा यंत्रणा भेदून पहलगाम मधे चार - पाच अतिरेकी शिरणे, सुरक्षा नसणारी नाजूक जागा शोधणे, या जागेवर आपल्याला कुठलाही विरोध होणार नाही याची खात्री बाळगून अनेक तास हिंसेचा थैमान घालणे अनेक निरपराधी लोकांची हत्या करणे आणि नंतर सुरक्षा व्यावस्थेला गुंगारा देत आरामात निसटून जाणे हे न उलगडणारे कोडे आहे. आपले प्राधान्य पाकला ठेचायला होते त्यामुळे सुरक्षा यंत्रणेच्या अपयशा बद्दल चर्चा न होता रोख पाक आणि केवळ पाकच राहिला.
युद्धविरामाचे पाकने उल्लंघन
युद्धविरामाचे पाकने उल्लंघन केले तर अगदी दुसर्या क्षणी भारताकडून पण उल्लंघन होतच असते ( तशाच ऑर्डर असतात ). केलेल्या ' खोडसर ' हल्ल्यांना आपण केवळ प्रत्युत्तर देत असतो - कायमच. एखाद्याने बळजबरीने लादलेला युद्धविराम फार काळ टिकाव धरत नाही. आतून तशी परिस्थिती असायला हवी.
युद्धविराम झाल्यास जगभरांतल्या मोठ्या शस्त्रविक्रेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांचा उजव्या तळहाताला सुटलेली खाज आता खिजवत आहे.
"अतिक्रमण झालं " असं
"अतिक्रमण झालं " असं सांगण्यात आलंय नक्की काय झालं असेल ?
नक्की काय सुरू आहे?
नक्की काय सुरू आहे?
भारतीय लोकांना युद्ध अजुन पुढे सुरू हवे होते का? युद्धबंदीला नकार द्यायला हवा होता का?
आम्ही दहशतवादी तळांवर हल्ला करुन त्या नष्ट केल्या, आम्ही पाकि नागरी किंवा मिलिटरी आस्थापनांवर हल्ला केलेला नाही, आम्हाला युद्ध नको हेच भारताचे ७ मे पासुनचे म्हणणे आहे.
पाकिस्तानला तसे बोलता येत नाही कारण भारतातले, असलेच तर दहशतवादी तळ कुठे आहेत ते त्याला माहित नाही. तो नागरी वस्ती, एअरपोर्ट वगैरेवर मिसाईल व ड्रोन डागत बसणार आणि आपण ते परतवत राहणार, हेच सुरु ठेवायचे होते का?
युद्ध नको म्हटले तर आता निगेटिव कमेंट येताहेत. सुरू व्हायच्या आधी युद्ध नको म्हणुन गळा काढत पोस्टी टाकत होते, आता संपवले म्हटले तर का संपवले म्हणुन गळा काढणे सुरुच.
नक्की काय हवेय?
तिकडे पाकमध्येही असेच सुरु असेल का? सारख्या मानसिकतेचे लोक दोन्हीकडे भरलेत का?
आता गळा काढणारे आधी मानवतेच्या गप्पा मारत होते. पाक नागरी वस्तीसकट पुर्ण बेचिराख करायला हवा होता का??
कोणीतरी लिहा बाबा सुरवातीपासुन काय हवे होते आणि काय मिळतेय यावर.
तिकडे पाकमध्येही असेच सुरु
तिकडे पाकमध्येही असेच सुरु असेल का?
पाक मीडिया नुसार पाक जनता खुश आहे. त्यांच्यामते त्यांनी भारताला चोख प्रतिउत्तर दिले आहे आणि त्यांनी आपले S-400 आणि एअर base उध्वस्त केलेले आहेत. कारगिल मध्येही हेच झाले होते. त्यांनी सुरवातीला मान्यच केले नव्हते कि त्यांचे सैनिक कारगिल मध्ये मरत आहेत ते. पण हळू हळू सत्य बाहेर येत गेले.
ते कायम डिनायलमध्येच असतात.
ते कायम डिनायलमध्येच असतात. १९७१ चे युद्धही त्यांनीच जिंकलेय.
bum strike चा एक फोटो बघितलेला त्यावर english मध्ये crush India लिहिले होते जे वाचता आले म्हणुन विचारले.
साधना - मला वाटतंय, ज्या
साधना - मला वाटतंय, ज्या प्रकारे हे सगळं झालं , ते बघता - आपल्या सार्वभौम देशाने आपलं सार्वभौमत्व गमावल्यासारखं लोकांना वाटलं. आपण इतके वर्षे कॉशन (लोकांच्या मते बोटचेपे पणाने) वागलो, पण असे दुसऱ्या देशाने इतक्या ओपनली आपल्या वतीने निर्णय घेऊन डेक्लर करणे असे झाले नव्हते.
आपण आपली पोझिशन खराब करून घेतली असे लोकांना वाटतेय.
युद्ध नको होते. पण आपण सुरुवात केली, फक्त दहशतवादी तळांवर हल्ले केले जी ह्याचे लोकांना कौतुक वाटत होते. एक मेसेज गेला आणि तो म्हणजे आम्ही ते च जुने नाही जे आम्ही हे खपवून घेणार नाही, असा मेसेज गेला.
असे म्हणेपर्यंत आपण ज्या प्रकारे माघार घेतली.
ज्या प्रकारे दहशतवाद्यांना शाही इतमामाने पाकिस्तान वागवताना दिसला ( अंत्यसंस्काराच्या वेळेस), त्यांच्या फायनान्स मिनिस्टर ने ओपनाली आम्ही दहाशतवाद पोसला असे स्काय न्यूज वर सांगितले, मदरसा सेकंड लाइन ऑफ डिफेन्स आहे हे सांगितले आणि इतके करूनही त्यांना इतके मोठे लोन मिळाले आणि वर आपण काहीही पदरात न पाडून घेता शस्त्रसंधी केली आणि तिही दबावाखाली जी ह्या सगळ्यातून आपण हतबल आहोत हा मेसेज गेला, आपण strong आहोत हा मेसेज जाण्याऐवजी (which was intentionally behind operation sindoor).
नेट नेट पाकिस्तान स्ट्रॅटेजिकली जिंकले आहे as ऑफ now . पैसा मिळाला, दबावापुढे भारत झुकला. तोंडाने कोणी काही म्हणाले तरी आपल्याला मदत मिळते हे ऍक्शन मधून त्यांना आणि (आपल्यालाही) दिसले.
Would you agree?
ह्या सगळ्यामुळे पक्के मोदीभक्त वैतागलेले मी पाहिले
सामो धन्यवाद
सामो धन्यवाद
लष्कराने फटकारल्यामुळे पाकिस्तानने सीजफायरचं उल्लंघन करूनही मीडीयाने रात्री हल्ले केले नाहीत.
नाहीतर आता पर्यंत अर्णब गोस्वामीने शहनाब शरीफ यांना अटक करून स्वतःचा शपथविधी पण केला असता.
लष्कराने मीडीयाला दुखावून नुकसान करून घेतले.
नवीन Submitted by नानबा on 11
नवीन Submitted by नानबा on 11 May, 2025 - 08:12>>>> +११११
नेट नेट पाकिस्तान
नेट नेट पाकिस्तान स्ट्रॅटेजिकली जिंकले आहे as ऑफ now . पैसा मिळाला, दबावापुढे भारत झुकला. तोंडाने कोणी काही म्हणाले तरी आपल्याला मदत मिळते हे ऍक्शन मधून त्यांना आणि (आपल्यालाही) दिसले.
Would you agree?>>>>
येस. इतके असुनही पैसा मिळाला हे मलाही चिड येणारेच वाटले.
याचाच दुसरा अर्थ हा की पुर्ण जग तोंडाने दहशतवादाचा तिरस्कार करताना दिसला तरी प्रत्येकाला आज स्वतःचा फायदा करुन घ्यायचा आहे. मग तो फायदा कोणा दहशतवादी देशाकडुन मिळत असेल तरी चालेल. उद्या हा दहशदवाद आपल्यावर उलटला तर तेव्हा जे कोणी आपल्या जागी असतील ते बघतील.
भारताने पाकशी युद्ध पुकारायला हवे होते तर नेमके काय करायला हवे होते? मिलिटरी स्थानांवर हल्ला करायला हवा होता जे त्याने काही प्रमाणात केले.
नागरी वस्तींवर भारत हल्ला करणार नव्हताच. तो योग्य नव्हताच. केला असता तर भारतातुनच किती विरोध झाला असता , मीही त्यात असले असते.
भारताचे म्हणणे हे होते की हल्ले थांबवा व दोन अतिरेकी ताब्यात द्या. हे केले असते तर भारताच्या बाजुने विषय संपला असता.
हल्ले थांबले नाहीत, अतिरेक्यांचे काही माहित नाही. भारत ट्रंपकडे गेला नाही. ट्रम्प मध्ये तोंड घालतोय त्याला काय करणार, त्याचा साथिदार हात झटकतोय आणि हा मध्यस्थी करतोय. काय नक्की चाललेय?
याला सिजफायर तरी म्हणायचे का?
आपल्या सार्वभौम देशाने आपलं
आपल्या सार्वभौम देशाने आपलं सार्वभौमत्व गमावल्यासारखं लोकांना वाटलं.>>>> हंं?????? सार्वभौमत्वाची व्याख्या काय आहे?
हे "माघार घेणं" वगैरे दिसतं एव्हढं सोपं नसतं हो. मायबोलीवर टाईअपण्याएवढं तर नक्कीच नाही
बाकी चालू द्या.
आपण लगेच जी काही अमेरिका आणि
आपण लगेच जी काही अमेरिका आणि पाक बरोबर चर्चा करून विरामची घोषणा केली त्यामाघे ही करणे असतील का
१) अतिरेकी तळ उध्वस्त केले. म्हणजे उद्धीष्ट पूर्ण झाले.
२) अडचणीत मदत करणारे दोन मित्र रशिया आणि इस्राएल दोन्ही अडकलेले असणे. त्याच वेळी तुरकी आणि आझारबाईझन ने मात्र पाकिस्यान ला दिलेला पाठिंबा.
३) उक्रेन युद्धात आपण रशियला विरोध न केल्यामुळे युरोप कडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती.
Pages