ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युद्धात फक्त एकाच बाजूचे नुकसान किंवा फायदा होत नाही. दोन्ही बाजूंना काही मिळते तर काही गमवावे लागते. दोन्ही बाजूनी काय मिळवले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडून मगच कुणाची सरशी झाली ते सांगता येईल ना? इथे आपण फक्त आपल्याच बाजूचा विचार करतोय. तिकडे काय झाले आहे त्याचे चित्र अजून स्पष्ट नाहीये.

https://www.instagram.com/reel/DJfAPxnof-i

पालकी शर्माने मांडलेले सगळेच मुद्दे चिंतनीय आहेत. पण महत्चाचा मुद्दा मुनीरचा - त्याचे दोन देशांबाद्दलचे भाषण आणि त्यानंतर फक्त सहाच दिवसात घडलेले पहलगाम हत्याकांड यांचा संबंध नाही असे म्हणायचे असेल तर प्रश्नच नाही. पण माझ्यासारख्या अनेकांना त्यातली लिंक ठळकपणे जाणवत होती. त्यामुळे हत्याकांड घडवणार्‍या दहशतवाद्यांना शिक्षा होणे जेवढे गरजेचे होते / आहे तेवढेच तो कट रचणार्‍यांनाही शिक्षा होणे गरजेचे होते. (कोर्ट पण मारेकर्‍यांबरोबर मारेकरी पाठवणार्‍यांनाही दोषी ठरवते) त्यामुळे ऑपरेशन सिंदूर गरजेचे नव्हते असे म्हणणे चूक ठरेल.

कोणतेही युद्ध मुळात लढलेच न जावे यासाठी प्रयत्न करणे हे शहाणपणाचे असते. प्रत्यक्ष युद्ध न लढता शत्रूची गळचेपी करणे हा मुत्सद्दीपणा असतो पण प्रत्यक्षात युद्धाला तोंड फुल्यावर अप्परहॅंड असताना / अथवा निकडीचे उद्देश सफल झाल्याशिवाय युद्धबंदी करणे हे अपरिपक्वता दाखवते.>>+१००

सीजफायरमुळे भडकलेल्यांनी राग काढायला कोणाला निवडावं?
https://x.com/VikramMisri/status/615583358999920640
----

ऑपरेशन सिंदूर गरजेचे नव्हते असं कोण म्हणालंय?

<महत्चाचा मुद्दा मुनीरचा - त्याचे दोन देशांबाद्दलचे भाषण आणि त्यानंतर फक्त सहाच दिवसात घडलेले पहलगाम हत्याकांड यांचा संबंध नाही >

त्याच्या वक्तव्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या होत्या का? पंतप्रधानांनी काश्मीर दौरा रद्द केला - खराब हवामानाचे कारण दिले. पण पहलगामसारखा टुरिस्ट स्पॉट दुर्लक्षित राहिला आणि तो आम्हांला न सांगता ओपन केला असं सांगायची वेळ का आली?

राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता यावरुन मुंबई वर २६-११ रोजी झालेला हल्ला स्मृतीपटलावर आला. ऑबेरॉय - ट्रायडंट मधे अतिरेक्यांचे हत्यासत्र सुरु होते. त्यांना आटोक्यात आणायचे सुरक्षादलाचे काम अहोरात्र सुरु होते. अशा मोक्याच्या वेळी, गुजरातचे मुख्यमंत्री अहमदाबादेतून धावत - धावत मुंबईला येतात... ४८ तासांत राष्ट्रिय एकात्मतेचे दर्शन - थेट कॅमेर्‍यासमोर.
https://youtu.be/G7ggDt1cIBI?si=gq5dDUXhqYtH6EN1&t=144

प्रत्येक हल्ल्याच्या वेळी त्या वेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठविण्याची भाषा व्हायची. नागरिकांच्या सुरक्षेची ज्यांची जबाबदारी आहे अशा गृहमंत्री, अंतर्गत सुरक्षा मंत्री, संरक्षण मंत्री अशांच्या राजिनाम्याची मागणी व्हायची. पहलगाम मधे, अभेद्य वाटेल अशा सुरक्षा व्यावस्थेला गुंगारा देत अतिरेकी एव्हढे आंत खोलवर आले. धर्म विचारत गोळ्या झाडणे सुरु होते - फार मोठा वेळ होता हा. आपली सुरक्षा व्यावस्था, गुप्तहेर खात्याचे अपयश किंवा इतर कारणांवर चर्चा होण्यापेक्षा पाक कडे बोट दाखविले म्हणजे सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतात.

पहलगाम येथे हल्ला झाल्यावर, पंतप्रधान मोदी परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. पहलगाम येथे गेले का?
बिहार प्रचार , मुंबई वेव्हज परिषद किंवा अडाणीचे विझिंगम बंदर उद्घाटन.... येथे तर विरोधकांचीच झोप उडाली असे त्यांचे भाष्य आहे.
https://youtube.com/shorts/8qQa1hrOwLE?si=BXa1o9enD8CQAMrg

{आपले खरे शत्रू आपल्याला झुंझावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणारे आहेत. जेव्हा ती मदत बंद होईल, हा प्रश्न सुटेल. कदाचित पाकिस्तानचेही लाँग टर्म भले होईल असली मदत बंद झाली तर - अशी मदत जी त्यांच्या मिलिटरीला strong करतेय आणि दहशतवादाला पोसतेy.}

हा मुद्दा कोणीतरी उचलला हे पाहून बरं वाटलं.

>>"मी त्या मेजर गौरव आर्या यांचा फॅ न होऊ घातलो होतो.">>
😀
@ भरत
७ तारखेला भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याआधी टाईम्स नाऊ नवभारत ह्या न्यूज चॅनलवरच्या एका कार्यक्रमात 'व्यूहात्मक लष्करी डावपेच' चांगल्या प्रकारे समजावताना ह्या मेजर गौरव आर्यांना युट्युबवरच्या एका व्हिडिओत पाहिले होते. त्यानंतर त्यांच्या चाणक्य डायलॉग्स आणि मेजरली राईट ह्या दोन चॅनल्सवरचे व्हिडीओज सतत सजेशनमध्ये दिसायला लागले. त्या चॅनल्सवरचे एक-दोन व्हिडीओज पाहिल्यावर हे (रिटायर्ड) मेजर साहेब आपल्या नावापुढे अजूनही केवळ 'मेजर' लावत आहेत हा त्यांचा विनय वाटला होता, खरंतर त्यांनी आपल्या नावापुढे , जनरल, 'महा' जनरल किंवा गेलाबाजार 'महा' मेजर वगैरेतरी लावायला पाहिजे होते असे वाटून गेले 😂

आपल्या 'महागुरु', 'संतोष जुवेकर', 'उर्वशी रौतेला' वगैरे मंडळींपेक्षा ह्या गौरव आर्यांची पातळी थोडी अजुन वरची वाटल्याने त्यांचे व्हिडिओज पहाणे बंद केले असले तरी कुठल्या ना कुठल्या चॅनलवर ते 'ग्यान' वाटताना दृष्टीस पडतच असतात!

कोणतेही युद्ध मुळात लढलेच न जावे यासाठी प्रयत्न करणे हे शहाणपणाचे असते. प्रत्यक्ष युद्ध न लढता शत्रूची गळचेपी करणे हा मुत्सद्दीपणा असतो पण प्रत्यक्षात युद्धाला तोंड फुल्यावर अप्परहॅंड असताना / अथवा निकडीचे उद्देश सफल झाल्याशिवाय युद्धबंदी करणे हे अपरिपक्वता दाखवते.>>> +१
आपले खरे शत्रू आपल्याला झुंझावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणारे आहेत. जेव्हा ती मदत बंद होईल, हा प्रश्न सुटेल. कदाचित पाकिस्तानचेही लाँग टर्म भले होईल असली मदत बंद झाली तर - अशी मदत जी त्यांच्या मिलिटरीला strong करतेय आणि दहशतवादाला पोसतेy>>> +१

दोन्ही बाजूंना काही मिळते तर काही गमवावे लागते. दोन्ही बाजूनी काय मिळवले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडून मगच कुणाची सरशी झाली ते सांगता येईल ना? इथे आपण फक्त आपल्याच बाजूचा विचार करतोय.>>>
या युद्धबंदीमधून भविष्यात उपयोगी पडू शकतील अशा सध्यातरी फक्त दोन गोष्टी भारताच्या पदरात पडल्याचे दिसत आहे.
१) सिंधू करारावर सेस्टस को
२) दहशतवादी हल्ला = ॲक्ट ऑफ वॉर डॉक्टरिन

पण या दोन्हींच्या लॉंगटर्म उपयोगीत्वाबद्दल मी काहीसा साशंकच आहे.

पहिल्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय मानवतावादी भूमिकेतून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, त्याला आपण कितपत निभावून नेतो अथवा अचानक केलेल्या सिजफायर सारखं कोलमडतो ते काळचं सांगेल.

दुसरा मुद्दा आपल्याला पाकिस्तानवर हल्ल्यासाठी पार्श्वभूमी उपलब्ध करुन देतो. पण पाकिस्तान त्या ॲक्ट ऑफ वॉरच्या भारताच्या उत्तरावर प्रत्यूत्तर देणार नाही हे समजणे भोळसटपणाचे ठरेल ( जसे त्यांनी या वेळी सुद्धा केले) याचं फलीत म्हणजे आपण त्यांच्या देशावर (दहशतवादी तळांवर) हल्ला करुन त्यांचे दहशतवादी मारणार आणि पाकिस्तानी लष्कर प्रतिहल्ला करून आपले निरपराध नागरीक मारणार एवढंच दिसत आहे.

रानभूली, सरकार कुठल्याही पक्षाचं असण्यापेक्षा सरकार भारताचे आहे हेच मान्य हवे. राजकारण्यांना किंवा त्यांची बाजू घेत बसणाऱ्यांना हवे ते करू दे..... देशाला धोका नाही दिला गेला पाहिजे एवढेच महत्वाचे आहे.

पाकिस्तान किंवा कुणाही शत्रूपुढे आपण सगळे एक आहोत. त्यावेळी ही राजकारण धुळवड, धर्म वगैरे माळ्यावर टाका.

जेव्हा कुणी पाकिस्तानी ओवेसीला शिव्या घालत होता तेव्हा एक हिंदू त्याला उत्तर देत होता... "टेरेरिस्ट तो तू है... यह मुल्ला हमारा है... जैसा भी है." सेम एका otherwise मोदी द्वेषीने लिहिलेलं वाचायला मिळालं होतं.

कधीही जेव्हा पाकिस्तान कुरापती करतो तेव्हा माझ्यासारखा एक section असा असतो जो सरकार कोणाचं (पक्षाचं) आहे हे बघत नाही. तो सतत त्या भारत सरकारच्या पाठीशी असतो, त्याच्या निर्णयाच्या पाठीशी असतो.... unconditionally. त्याच्यावर अश्या बिकट प्रसंगी चिखलफेक करुन पोळी भाजून घ्यायला बघत नाही. हिमांशी बद्दल त्याला सहवेदना असते, त्याला शक्यतो युद्ध नको असते, त्याला हिंदू मुस्लिम तेढ नको असते. धर्मापेक्षा त्याला जो माझ्या देशावर प्रेम करतो तो जवळचा वाटतो. त्याला देशाच्या शत्रूला जबर जरब बसवली जावी अशी इच्छा असते.

इंदिराजींनी युद्ध नको म्हटले नाही जेव्हा त्यांनी बांगलादेश तोडला. त्यांनी ती खेळी खेळली. त्यावेळीही आपली व त्यांची कित्येक माणसे मारली गेलीच असतील. तेव्हाही तेव्हाच्या पद्धतीने Intelligence वापरला गेलाच असेल... पण तेव्हा कुणीही उठून त्यांना धारेवर धरले नव्हते... हे असेच का आणि तसेच का, आम्हाला सगळे कळलेच पाहिजे...

एक दहशतवादी हल्ला successful झालेला दिसून येतो... त्या आधी किंवा त्या नंतर किती दहशतवादी हल्ले आपल्या intelligence ने track करुन unsuccessful केले आहेत हे फार कमी वेळा उघड केले जाते. आणि आपण सरसकट discredit करुन टाकतो. At times we are really ungrateful.

जम्मू काश्मिर मध्ये तर JKP मध्ये काश्मिर posted mostly काश्मिरी मुस्लिम असतात. आणि ते त्यांच्याच रिजन व रिलीजनच्या दहशतवादी व radicals, separatists ह्यांच्याशी लढत असतात. त्यांचे काम दुर्लक्ष करण्याजोगे नाहीये. त्यांना वेगळे पाडणे म्हणजे कृतघ्न होणे आहे. जो आदर बाकी सगळ्या SF men ना दिला जातो त्याचे हकदार ते ही आहेत.

ह्या सगळ्यात एवढेच वाटते.... वर्षानुवर्षांचा दहशतवाद संपवला जावा. नागरिक किंवा सैन्य, पोलीस... कुणालाही बलिदान करावे लागू नये. सैन्यात इतकी भरती व इतका खर्च करायची आवश्यकताच पडू नये.

माहित नाही ह्या lifetime मध्ये असे होईल का..

ह्या वेळी आपण फक्त दहशतवादी तळावरचं हल्ला केला नाही तर त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिम, एअर फील्ड, रडार site वर म्हणजेच पाकिस्तानाच्या वायू सेने वर हल्ला केला आहे.तेही तेही आंतरराष्ट्रीय सीमेच्या 200 किलोमीटर आत.

तो पुरेसा नव्हता हे त्यांच्या नंतरच्या दर्पोक्ती वाचुन वाटतेय. आणि ते करुनही त्यांचे हल्ले सुरुच होते. हे हल्ले बंद पडतील याची सोय आताच करायला हवी होती.

फाविदडी, अश्विनी चांगली पोस्ट. धन्यवाद.

मोदींनी राजिनामा द्यावा. भारताची, नामुष्की केलीये जगात. डिगिटायझेशन, स्त्रीयांना सक्षम बनविणे, काळा पैसा बाहेर आणला - फार चांगली कामे त्यांच्या कारकिर्दीत झालेली आहेत.
पण एका निरणयाची शाई वाळायच्या आत, दुसरा मोठा महत्वाचा निर्णय घेउन ...
जे जवान शहीद झाले त्यांचे काय? त्यांनी हकनाक प्राण गमावले.
पाकिस्तान तर झुरळ देशच आहे. पैसेही खातोय, दहशतवादही पोसतोय. अमेरिका आनि अन्य देश द्या पैसे अजुन. बौद्धिक दिवाळखोरी निघालेले लोक.

बाकी भारतीय मीडियावरच्या बातम्यांवर माझा तेवढाच विश्वास आहे जेवढा पोलोटिकल सायन्सच्या डिग्रीवर!

तो पुरेसा नव्हता हे त्यांच्या नंतरच्या दर्पोक्ती वाचुन वाटतेय. आणि ते करुनही त्यांचे हल्ले सुरुच होते. हे हल्ले बंद पडतील याची सोय आताच करायला हवी होती.>> होय, ते तिकडे त्यांचा विजय झाला आणि भारताने माघार घेतली म्हणून जल्लोष करताहेत.

अश्विनी, तुमची पोस्ट आवडली

होय, ते तिकडे त्यांचा विजय झाला आणि भारताने माघार घेतली म्हणून जल्लोष करताहेत.>>> या संदर्भात भारतीय मेनस्ट्रीम मिडीयाची 'कानफाट्या' म्हणून ठळक झालेली नाचक्कीची प्रतीमा, आपण या संघर्षात प्रस्थापित करु शकलो असतो त्या नरेटीव/ ऑप्टीक्सवर तसेच या पुढच्या नरेटीव/ ऑप्टीक्सवर किती व्यस्त प्रभाव टाकला/ टाकेल याचा अभ्यास नक्कीच करावा लागेल.

>>"ते तिकडे त्यांचा विजय झाला आणि भारताने माघार घेतली म्हणून जल्लोष करताहेत.">>
आणि आपल्या हवाई दलाने 'ऑपरेशन अजुन सुरु असल्याचे' सांगत 'खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहा' अशी पोस्ट X वर केली आहे....

दहशतवाद विरोधातल्या ह्या कारवाईत भारताकडुन 'ब्रम्होस' मिसाईल्सचा वापर झाला असल्याच्याही बातम्या येत आहेत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हे मान्य केल्याचे म्हंटले जात आहे पण भारताने अजुन अधिकृतरित्या असे काही अद्याप जाहिर केलेले नाही. त्यामुळे काल-परवाकडे नक्की काय काय घडामोडी घडल्या आहेत किंवा घडु घातल्या आहेत ह्याविषयीची एक सहस्त्रांश माहिती देखिल आपल्यापर्यंत अजुन पोचली नसल्यासारखे वाटत आहे.
येतील हळुहळु एकेक गोष्टी उजेडात... तो पर्यंत वाट बघण्याशिवाय आपल्या हातात तरी दुसरं काय आहे आहे म्हणा.

पाकिस्तानातल्या अनेकांना भारताच्या प्रगतीचं कौतुक आहे. काही जण मात्र भारत शत्रू राष्ट्र मानतात.
मध्यंतरी एका कथेच्या निमित्ताने रीसर्च करताना खूप गोष्टी नव्याने समजल्या. त्यासाठी काही चॅनेल्स पण फॉलो केली.
काही युट्यूबर्स भारतातल्या शहरांचे फोटो दाखवून हे कोणत्या देशात आहे हे विचारतात. हा भारत आहे हे समजल्यावर ते डोळे विस्फारतात.
भारताच्या प्रगतीचं कौतुक करतात त्याच वेळी पाकिस्तान कधीच सुधारणार नाही अशी भावना व्यक्त करतात.
असंच वैफल्य मागची पिढी नव्वदच्या दशकात व्यक्त करत होती. बरेच जण मोटरसायकल, सायकल किंवा असेच जग फिरायला जातात.
भारतातून आलो हे सांगितल्यावर पैसे घेत नाहीत. बलुचिस्तानात लोक खाण्यापिण्याचे पैसे घेत नाहीत.
पन तुमच्या गव्हर्नमेंटला सांगा आमच्या सुटकेसाठी प्रयत्न करायला असा निरोप देतात. बरेच जण भारताच्या लष्करी सामर्थ्याबद्दल सुद्धा जाणून आहेत.
तसेच पाकिस्तान युद्ध हरलेला असताना शाळेत चुकीचं शिकवलं याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात. आमचा देश असाच आहे वगैरे.
भ्रष्टाचारामुळं कधीच देश सुधारणार नाही. भारतात आम्हाला येऊ द्या वगैरे बोलत असतात.

हे सगळेच दहशतवादी आहेत असे समजण्याचं कारण नाही.
पाकिस्तानातली सत्ता मूठभर लोकांच्या हातात फिरते. प्रचंड भ्रष्टाचार, देश खड्ड्यात गेला तरी चालेल ही बेफिकीरी आणि जनतेचं लक्ष वळवण्यासाठी काश्मीरचं गाजर यामुळे त्या देशाची गाडी कधीच रूळावर येत नाही.
जसं पाकिस्तानने सत्य समजून घ्यावं असं आपल्याला वाटतं तसंच आपणही समजून घ्यावं.
उद्या पाकिस्तानचं विलीनीकरण झालंच (समजा) तर ही पोसलेली कटुता घेऊन एकत्र कसं नांदणार ?
उलट विलिनीकरणाने प्रश्न प्रचंड वाढतील. सत्तेची गणितं उलथीपालथी होतील.
त्यामुळं पाक ताव्यात घेण्याचा प्रयत्न सध्याचे राज्यकर्ते तरी करतील का ?
मला नाही वाटत तसं.
प्रत्येकाचं मत वेगळं असेल.

दहशतवादावर बरंच वाचलं होतं.
अमेरिका - रशिया - अफगाणिस्तान या त्रिकोणातून अमेरिकेने कसा मुस्लीम दहशतवाद उभा केला आणि तो भस्मासुराप्रमाणेउलटला. त्यानंतर आखातातल्या तेलासाठी अमेरिकेने कसे तालिबान आणि अन्य दहशतवादी संघ उभे केले. सद्दामचा वापर कसा केला. हे सगळे उलटल्यावर त्यांना कसे संपवले याच्या कहाण्या अमेरिकन - युरोपियन लेखकच मांडत असतात. इराण मधली उलथापालथ. तिथले पुरोगामी सरकार उलथवून धार्मिक सत्ता कुणी आणली हे सगळं रंजक आहे.

हे सर्व खरंच असेल असं मुळीच म्हणायचं नाही. त्यात संदर्भ दिलेले असतात. ते कधी तपासले नाहीत. कारण आपण पत्रकार नाहीत.
पण थोडा तरी सत्याचा अंश असेलच कि. तसे असेल तर ज्या अँगलने आपण या सगळ्याकडे पाहतो तो ही चुकीचा आहे.
कुणाला जर हा प्रतिसाद प्रो पाकिस्तान वाटला तर त्याची इच्छा. खोडून काढत बसत नाही.

आता त्या सर्व लिंक्स सापडणार नाहीत. जेव्हढ्या हाताशी आहेत त्या इथे दिल्या आहेत.
१. https://www.pbs.org/wgbh/pages/frontline/shows/target/etc/modern.html

२. https://www.britannica.com/topic/al-Qaeda

३. https://publicintegrity.org/accountability/osama-bin-laden-how-the-u-s-h...

४. https://edition.cnn.com/2016/08/12/middleeast/here-is-how-isis-began

५. https://en.wikipedia.org/wiki/Soviet_Union_and_state-sponsored_terrorism

६. https://www.vox.com/world/22634008/us-troops-afghanistan-cold-war-bush-b...

७. https://digitalcommons.buffalostate.edu/cgi/viewcontent.cgi?article=1050...

८. https://foreignpolicy.com/2013/08/26/exclusive-cia-files-prove-america-h...

९. https://en.wikipedia.org/wiki/United_States_and_state-sponsored_terrorism

इराणने तेलावर अमेरिका आणि बिटनचं नियंत्रण नको म्हणून अरब राष्ट्रांची एकी करायला सुरूवात केल्यावर अमेरिकेने त्या राष्ट्रात कट्टरतावाद उभा केला. सद्दाम हुसेनच्या आडून इराणशी नऊ वर्षे युद्ध केले. सद्दामने अमेरिकेची लष्करी मदत वापरून स्वतःचे सामर्थ्य वाढवत नेले आणि नंतर त्यानेही ब्रिटीश व अमेरिकन कंपन्यांना तेल काढायला बंदी घातली. यात अम्रिकेतल्या बुश कुटुंबाचे ४० ते ५० टक्के शेअर्स होते. म्हणून थोरल्या बुशने सद्दाम विरोधात रासायनिक शस्त्रांचा कांगावा करून युद्ध पुकारले. बुश गेल्यावर कुणाला काही प्रॉब्लेम नव्हता. पण ज्युनि बुश सत्तेत आले आणि त्यांनीही सद्दामविरोधात युद्ध करून त्याला फाशी दिलं. मुस्लीम दहशतवाद हा शब्द तेव्हांपासून रूढ झाला.

इस्लामिक क्रांतीच्या आधीचा इराण . वाईट वाटतं हे पाहून.
एखादी संस्कृती जर आधीपासूनच बुरसटलेली असेल तर तिच्यात बदल न होणं हे त्रासदायक नाही. पण अशा पद्धतीने मॉडर्न सोसायटीला कट्टर बवनताना त्या लोकांनी कसं ते सहक केलं असेल याची कल्पना करवत नाही. विशेषतः स्त्रियांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं. इराणचे त्या वेळचे बीचेस पाहिले तर हे युरोपातला आहेत असे वाटेल. बिकिनीमधल्या स्त्रिया हे सर्रास चित्र होतं.
आता कायच्या काय होऊन बसलंय.
iran-before-revolution-photos-small-1152x759.jpg417ee75e18439bf5d3f2302fa995f8f9.jpgimages (16).jpeg

सद्दामला मारल्यानंतर एका अमेरिकन पत्रकाराने इराक मधे कधीही रासायनिक आणि आण्विक अस्त्रे नव्हती हे अमेरिकेला पहिल्यापासूनच ठाऊक होतं असा लेख लिहीला होता. आता शोधत बसत नाही. कुणाला वाचायचा असेल तर गुगळून घ्यावा. थोडक्यात ही हत्या होती. तेलावरच्या मालकीतून झालेली. या अशा घटना माहिती झाल्या कि आपला दृष्टीकोणच बदलतो. घटना आपल्या पर्यंत जशा पोहोचतात तशाच त्या आहेत का याबद्दल मन नेहमी साशंक राहते. पण हे बोलून दाखवणे शहाणपणाचे नसते दर वेळी. सोमिवर बे एके बे अशा चर्चांमधे म्हणूनच मन रमत नाही.

माझ्या समजुतीप्रमाणे
१) पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगामला भारतीय हिंदू पर्यटकांचे हत्याकांड केले
२) ह्याची प्रतिक्रिया म्हणून भारताने नऊ ठिकाणी दहशतवादी अड्ड्यांवर precision strikes केले.
३) भारताच्या दृष्टीने मिलिटरी ऑपरेशन इथे संपले होते.
४) पण मग पाकिस्तानने भारतावर ड्रोन वगैरे वापरून हल्ले केले
५) ह्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या मिलिटरी तळांवर हल्ले केले
६) भारताच्या अधिकृत निवेदनानुसार पाकिस्तानकडून सीझफायर चा प्रस्ताव आला. जर पाकिस्तान ने #४ थांबवले तर भारताने #५ continue करायचा प्रश्नच नाही. Go to #३

हे असे असेल तर सार्वभौमत्व गमावले असे नाही. युद्ध करणे हा भारताचा अजेंडा नव्हताच. तात्या खूप बडबड करतो. पडद्यामागे अमेरिकेशी चर्चा झालीही असेल. पण भारत सरकारने आणि भारतीय मीडियाने "आमचे सैन्य फक्त respond करत होते. पाकिस्तानने सीझफायर प्रस्ताव दिला म्हणून आमच्या सैन्याने response थांबवला आहे. ह्यात इतर देशांचा संबंध नाही. " असे narrative establish करायला हवे होते. आंतरराष्ट्रीय मीडिया असे narrative करणार नाही कारण तो तर भारताच्या नेहमीच विरुद्ध राहिला आहे. त्यामुळेही बऱ्याच जणांचे perception सार्वभौमत्व गमावले असे झाले आहे. भारत सरकार आणि भारतीय मीडिया narrative setting मध्ये कमी पडलेआहेत.
एकंदरीतच मीडिया भारत आणि हिंदू ह्यांच्या विरुद्ध बायस्ड आहे. जर भारत आणि हिंदूंची बाजू अन-बायस्ड प्रकारे संयतपणे जगासमोर पोहोचली तरी खूप. एखाद्या हिंदू अल जझीराची गरज नाही. सरकारने गेल्या अकरा वर्षात जागतिक स्तरावर असा मीडिया निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले असते तरी भारत आणि हिंदूंच्या दृष्टीने चांगले झाले असते. परंतु अँटी हिंदू , अँटी भारत मीडियाला उत्तर म्हणून निर्माण झाले काय, तर अर्णवचा आक्रस्ताळेपणा आणि "पाकिस्तानकी चड्डी गीली" वगैरे टाईपची मस्तकात तिडीक नेणारी पत्रकारिता. दुर्दैव.

नोइडा मेडियाने हा जो युद्धाचा उन्माद निर्माण केला होता (जो सरकारच्या पाठिंब्याशिवाय असणे शक्य नव्हते) तो निषेधार्ह होता. रात्र भर खोट्या बातम्या दाखवून मोदीभक्तांच्या अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या. आता सीझ फायर झाल्यावर हेच मोदीभक्त मिस्त्री यांच्यावर (व अर्थात त्यांच्या मुलीवर) तुटून पडले आहेत.

परवाच्या बातम्या खोट्याच होत्या. पण त्या खऱ्या वाटून फक्त मोदी भक्तच खुश झाले होते असं आहे का? काँग्रेस समर्थकही खुश झाले असतीलच की. जे कुठल्याच पक्षाचे समर्थक नाहीत ते पण खुश झाले असतील. ह्या सीझ फायर नंतरही बहुतांश लोकं नाराज आहेत पण त्यांना भक्त किंवा गुलाम बोलून आप आपला अजेन्डा रेटला जातोय.

गोदी मीडियावर पॉर्न पाहून कपडे काढले आणि पतन झाले अशी अवस्था झाली भक्तांची.

सगळ्यात वाईट अवस्था अर्णव गोस्वामीची.

रॅशनल लोक तर आधीपासून फक्त आतंकवाद्यांना संपवा एवढंच म्हणत होते, आहेत आणि आत्तापर्यंतच्या सैन्याच्या अधिकृत प्रेसमधून तेच साध्य केले असल्याचे समजते.

आता तर वाचायला मिळतेय की पाकने न्युक बॉम्ब ची तयारी सुरु केली, त्याला घाबरुन वान्स व ट्रम्प मध्ये पडले आणि युद्ध थांबवले.

हे जर खरे असेल तर कठिण आहे. पाक अजुन मुजोर होत जाणार.

अश्विनी, रातीचे चांदणे पोस्ट आवडली..

सीझफायर (सरकारी भाषेत अंडरस्टॅंडींग) झाले असले तरी भारताच्या दृष्टीने गेन्स
1. केवळ LOC नाही तर IB ओलांडून दहशतवादी तळ उध्वस्त केले. कारगिल युद्धाच्या दरम्यानही आपण LOC ओलांडली नव्हती.
2. भारताच्या एअर डिफेन्सचे प्रात्यक्षिक झाले. काही चुकार ड्रोन्स वगळता फारशी जिवितहानी झाली नाही.
3. पाकिस्तानचे मेजर लष्करी तळ उध्वस्त केले. पाकिस्तानचा एअर डिफेन्स निकामी केला. पायदळ किंवा नौदलाचा वापर न करताही पाकिस्तानचे कंबरडे मोडू शकतो याची खात्री आहे.
4. कधी नाही ती युद्धादरम्यान बऱ्यापैकी जनसामान्यांत एकतेची भावना निर्माण झाली होती. विरोधी पक्षही सरकारला पाठिंबा देत होते. दूर्दैवाने सीझफायर होताक्षणी परत नेहमीची हाणामारी सुरू झाली.
5. ॲंटी मनी लॉंडरींग व टेररिस्ट फंडींगचा गवगवा करणाऱ्या संस्था व देशांचा दुटप्पीपणा प्रकर्षाने दिसून आला.
भारताचा तोटा
1. सुरूवातीची जम्मूतील जिवीतहानी mmg व तोफांमुळे झाली. आपण हल्ले केल्यावर लगेच तिथल्या लोकांना हलवले पाहिजे होते.
2. सीझफायर अमेरीकेने जाहिर केल्यामुळे भारताचा वरचष्मा संपला. किमान असा समज निर्माण झाला.
3. सीझफायर पाकिस्तानला हवे होते हे जनतेच्या मनावर ठसवण्याचा कोणताही प्रयत्न न झाल्याने व तिकडे पाकीस्तानने आपला विजय झाल्याचे घोषित केल्याने तसेच पाश्चिमात्य माध्यमांनी पाकिस्तानची तळी उचलण्यासारखे रिपोर्टींग केल्याने जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. नॅरेटिव्ह गेममधे भारत सपशेल हरला.
4. पहलगाम हल्यापूर्वी तिथल्या पर्यटन स्थळांच्या हाय रिझॉल्युशन इमेजेसची मागणी होत होती याचा भारताला सुगावा लागला नाही. यापुढे कमर्शिअल व प्रायव्हेट सॅटेलाईटस् चा वापर अशा भारतविरोधी कारवायांसाठी होऊ नये यासाठी भारताला काहीतरी SOP बनवावी लागेल.
पाकिस्तानचे गेन्स
1. सरळ सरळ दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असून (फक्त पहलगामच नाही) आणि बराचसा पैसा परत दहशतवाद व सैनिकीकरणाकडे वळेल हे ठाऊक असून पाकिस्तानला पुन्हा एकदा जागतिक मदत मिळते आहे.
2. पाकिस्तानला त्यांचा दहशतवाद व लष्करी अट्टाहास कंटीन्यू करण्यासाठी अवकाश व कारण मिळाले.

वाजपाईंनी न्युच्लीअर पॉवर भारतात आणली का? खंदे समर्थक होते वाटतं. मग किती वेगळ्या उंचीवर नेलं भारताला.*

बी जे पी चे नेतृत्व स्ट्राँग असते, देशाकरता रॅडिकल असते हे वेळोवेळी दिसून आलेले आहे.
भारताकडे न्युक नसते तरपाकिस्तानने , चीनने नक्की लचके तोडले असते.

भ्रमर यांच्या कमेन्टमुळे संपादित. थँक्स भ्रमर.
एकंदर ओपनली मते मांडण्याची हौस फार आहे मला Happy सगळीकडेच - अ‍ॅक्टिव्ह मेम्बर

Pages