Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजलीशी सहमत.
अंजलीशी सहमत.
पंजाब व जम्मुतल्या लोकांना ह्या युद्धाविषयी काय वाटत होते, गेले चार दिवस ते कोणत्या मनस्थितीत होते आणि मुंबई पुण्यातल्या लोकांना काय वाटत होते यात जमिन आसमानाचा फरक आहे.
आज पाक युद्धबंदीचे उल्लंघन करतोय त्याचा फायदा घेऊन सरळ मिलिटरी बेसेसवर हल्ला करावा आणि विषय संपवावा असेही वाटतेय.
अंजली, माघार घेण्यावरून >>
अंजली, माघार घेण्यावरून >> हेच आधीच सरकार देखील करत होतं. They were trading more cautiously.
त्यांच्या ह्याच धोरणामुळे देशाचे कसे मोठे नुकसान झालेय असे बरेच जण बोलत होते.
ते व्हॉट्सॲप वर टाइप करण्याइतक सोप्प नसत हे आता तरी आपण acknowledge करतोय, हे काय कमी!
त्यांना ह्या खेळाचा अधिक अनुभव होता असं मला काल/परवाच्या जागतिक पटावरच्या घडामोडी बघून वाटलं.
तसही पाकिस्तानला काहीही वाटलं आणि पाकिस्तानचा आपल्याला कितीही त्रास झाला तरी पाकिस्तान फक्त एक प्याद आहेत. आपले खरे शत्रू आपल्याला झुंझावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणारे आहेत. जेव्हा ती मदत बंद होईल, हा प्रश्न सुटेल. कदाचित पाकिस्तानचेही लाँग टर्म भले होईल असली मदत बंद झाली तर - अशी मदत जी त्यांच्या मिलिटरीला strong करतेय आणि दहशतवादाला पोसतेy.
Saadhanaa, युद्धाचे परिणाम कळतात म्हणून तर इथली लोक युद्ध नको असं म्हणत होती ना?
भारत पाकिस्तानच्या वादात
भारत पाकिस्तानच्या वादात दुसऱ्या कोणाचीही मध्यस्थी चालणार नाही ही भारताची आता आतापर्यंत भूमिका होती .
तात्याने तोंड घालून स्वतःच क्रेडिट घेतलं. परराष्ट्र सचिवांनी परिषदेत स्पष्टीकरण दिलं असल तरीही जगात अमेरिकेमुळे सिझफायर झाल असा मेसेज गेलाच . पुढील वेळी जयशंकरांना अजून काम करायला हवे.
नानबा आणि जाई यांच्याशी सहमत.
नानबा आणि जाई यांच्याशी सहमत.
खूप छान प्रतिसाद.
पण नक्की ट्रम्पनेच मध्यस्ती
पण नक्की ट्रम्पनेच मध्यस्ती केली का?
तो काय ट्विट करतो, बोलतो यावर विश्वास ठेवता येईल का?
त्याने असे क्लेम्स आधी सुद्धा केले आहेत.
२०१९ मध्ये अमेरिकेने काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करावी यासाठी भारत तयार आहे असे चुकीचे स्टेटमेंट केले होते.
भारताने मध्यस्थी नाकारून पाकिस्तानला आतंकवाद संपवायला सांगा म्हटले होते तीन दिवसांपूर्वी.
पाकिस्तानकडुन सिझफायर प्रस्ताव आल्यास आपण थांबू ही भूमिका सुरवतीपासूनच होती.
आपल्या अधिकृत निवेदनात पाकिस्तानकडुन प्रस्ताव आल्याने दोन्ही बाजुंनी सिझफायर घोषित करत आहोत म्हटले होते.
पाकिस्तानशी बोलून तो सिझफायरला तयार आहे असे कळल्यावर ट्रम्पने मी दोघांशीही बोललो दोघांनाही समजावले आणि दोघेही सिझफायरला तयार झाले आहेत घोषीत करणे अगदीच शक्य आहे.
पाकिस्तानचा इतिहास पहाता ते सिझफायर डिक्लेअर केल्याच्या दुसऱ्या क्षणीच तोडू शकतात हे माहिती आहे. आपण सिझफायरला तयार झालो म्हणजे सैन्य लगेच घरी जाऊन झोपले असे नाही. पण ते सिझफायर करू म्हणताहेत तर आपण त्याला हो म्हणणे आणि तोडल्यास परत प्रत्त्युत्तर देणे हे पण साहजिकच आहे.
मधल्यामधे "आता आपण पाकिस्तान पूर्ण संपवल्या शिवाय किमान पिओके परत घेतल्या शिवाय थांबणार नाही" वाटणाऱ्यांचा विरस झाला असेल एवढंच ते काय.
---
जाई बरोबर, आपल्या पोस्ट्स क्रॉस झाल्या. पण ट्रम्प कुणाशीही न बोलता सुद्धा कुठल्याही देशांबद्दल असे स्टेटमेंट देऊ शकतो.
पाकिस्तानचे जे कुणी धोरणकर्ते
पाकिस्तानचे जे कुणी धोरणकर्ते आहेत ते एव्हढे मूर्ख निघतील असे वाटले नव्हते ( सॉरी हा शब्द वापरला म्हणून).
सीझफायर झाल्यानंतर ड्रोन अॅटॅक करून त्यांना नेमका कोणता फायदा मिळणार होता हे त्यांनाच ठाऊक. ते ही भारताची एअर डिफेन्स प्रभावी आहे हे माहिती असतांना !
पण याचा फायदा उचलत भारत पाकिस्तानला बेचिराख करू शकतो आणि मग कुठलाही देश मध्यस्थी करू शकणार नाही एव्हढे बेसिक त्यांना समजत नव्हते तर देश कशाला चालवावा ? एव्हढे बावळट लोक असू शकतात ?
. आपले खरे शत्रू आपल्याला
. आपले खरे शत्रू आपल्याला झुंझावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणारे आहेत>>>>
अगदी बरोबर.
या छुप्या शत्रूंवर एक नवीन tariff लादायचा दहशतवाद थांबेपर्यंत. त्यांनाही किंमत मोजावी लागेल.
या पाकिस्तानी पत्रकाराचे
या पाकिस्तानी पत्रकाराचे विश्लेषण नक्की ऐका.
https://www.youtube.com/watch?v=VeJWwH2HVds
जाई + मानव +१.
जाई + मानव +१.
भारताच्या परराष्ट्र सचिवांनी सीझफायरची घोषणा करताना प्रेस समोर अमेरिका, ट्रंप, व्हान्स, रुबिओ यांच्यातल्या कोणाची नावं घेतली नाहीत.
पाकिस्तानने या मंडळींचे आभार मानले आहेत.
सुहासिनी हैदर यांनी ट्वीट केलं आहे -Govt sources counter US President Trump and US Sec State statement, say that the "stoppage of firing and military action between India and Pakistan was worked out directly between the two countries". Add the call was made by Pakistan DGMO and an understanding reached.
एक शक्यता ही आहे की अमेरिका आणि पाकिस्तान एकमेकांशी बोलत होते. पाकिस्तानला सीझफायरसाठी पुढाकार घेण्यात लाज वाटणं स्वाभाविक आहे. अमेरिका पाकिस्तानची लाज वाचवायला सीझ फायरची घोषणा करते की श्रेय उपटण्याच्या आजाराची लागण त्यांना झाली आहे , ते सांगणे कठीण आहे.
सीझ फायरचं ठरल्यावर पाकिस्तान आणि कदाचित भारतानेही अमेरिकेला कळवलं असेल आणि हे घोषणा करून मोकळे झाले असतील.
यात अमेरिकेने इतर सगळ्या गोष्टींप्रमाणे ज्या कोलांट्या उड्या मारल्या आहेत, त्यामुळे बिनभरवशाचे हा शिक्का गडद होत जाणार आहे.
त्यातून माय डिअर फ्रेंड डोलांड असल्याने भारताला उघड काही बोलताही येईना.
भारताला चांगले नेतृत्व
भारताला चांगले नेतृत्व नसल्याने अशा क्षणी नेमके काय करावे हे कळत नाहीये, पंतप्रधान भारताचा नाहीये तर भाजपचा आहे हे लक्षात घ्या, पंतप्रधानाच्या डोक्यात युद्धापेक्षा बिहारची निवडणूक कशी जिंकावी ह्याचे विचार चाललेत, तसे नसते तर आल्या आल्या थेट बिहार निवडणुकीचा नारळ फोडायला गेले नसते.
७१ च्या युद्धा आधी इंदिरा गांधी मॉस्कोत जाऊन थेट सोविएतशी करार करून आल्या होत्या. आपले आताचे पंतप्रधान इतका मोठा विचार करू शकत नाही, निदान अमेरिकेत जाऊन इस्राईलला मध्ये पडून अमरेकीशी तरी युद्धात पडण्याबाबत गळ घालायला हवी होती कारण रशिया युक्रेन युद्धात गुंतलाय, जपान, तैवान, मंगोलिया, द. कोरिया, अश्या चीनविरोधी देशांचा तोंडी पाठिंबा तरी मिळवायला हवा होता. आता पाकिस्तान मुत्सद्दीगिरीत एक पाऊल पुढे आहे आपल्या, त्यांनी वेळ न दवडता चीनचा पाठिंबा मिळवला नी हवे तसे वागताहेत. भारत हतबल झाल्यासारखा सगळं बघतोय, जागतिक स्तरावर भारताची नाचक्की झालीय.
अर्णवचं रिपब्लिक पाहणारं
अर्णवचं रिपब्लिक पाहणारं कोणी असेल तर त्यांनी सांगा -
. ट्रंपचं ट्वीट आलं होतं आणि भारताची पत्रकार परिषद व्हायची होती. त्या दरम्यानच्या काळातल्या रिपब्लिकच्या टेलिकास्टची क्लिप मला दिसली. https://x.com/Amockx2022/status/1921222898586394646
इथे अमेरिकेने अशी घोषणा करण्याबद्दल तो तीव्र नाराजी व्यक्त करतो आहे.
दुसर्या एका ट्वीटमध्ये वाचलं की त्याचं हे असं चालू असताना मध्येच तो ऑफ एअर गेला आणि परत आला तेव्हा त्याचा सूर बदलला होता. हे कदाचित सीझफायर व्हायोलेशनच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हाचं.
हे माजी परराष्ट्र सचिव आहेत.
हे माजी परराष्ट्र सचिव आहेत.
Kanwal Sibal
@KanwalSibal
·
9h
Given the victory rhetoric by Shehbaz Sharif and the Pak narrative that India took a besting and sought a ceasefire, claims echoed by CNN and sections of the western media one can conclude that Pakistan hasn’t fully absorbed the lesson India wanted to teach it.
At the international level the issue of Pak involvement in terror has been papered over and the burden has been put on both countries to exercise restraint and find a diplomatic solution.
US claiming mediation has detracted from India’s long held position against mediation. US is equating India and Pakistan. This has implications. Can US be trusted?
In the midst of the conflict the IMF approves a financial bail out of Pakistan.
The answer is building up our military capacity even more and give no quarter to Pakistan
माजी लष्कर प्रमुख
Ved Malik
@Vedmalik1
Ceasefire 10 May 25: We have left India’s future history to ask what politico-strategic advantages, if any, were gained after its kinetic and non-kinetic actions post Pakistani horrific terror strike in Pahalgam on 22 Apr.
मात्र दोघांचे अकाउंट व्हेरिफाइड नाहीत.
हा बाबा काय थांबायचं नाव घेत
हा बाबा काय थांबायचं नाव घेत नाही.
https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/114487190752990599
Donald J. Trump
@realDonaldTrump
I am very proud of the strong and unwaveringly powerful leadership of India and Pakistan for having the strength, wisdom, and fortitude to fully know and understand that it was time to stop the current aggression that could have lead to to the death and destruction of so many, and so much. Millions of good and innocent people could have died! Your legacy is greatly enhanced by your brave actions. I am proud that the USA was able to help you arrive at this historic and heroic decision. While not even discussed, I am going to increase trade, substantially, with both of these great Nations. Additionally, I will work with you both to see if, after a “thousand years,” a solution can be arrived at concerning Kashmir. God Bless the leadership of India and Pakistan on a job well done!!!
<< आता पाकिस्तान
<< आता पाकिस्तान मुत्सद्दीगिरीत एक पाऊल पुढे आहे आपल्या, त्यांनी वेळ न दवडता चीनचा पाठिंबा मिळवला नी हवे तसे वागताहेत. >>
----- ( भारताच्या विरोधांत ) चीनचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकला फार मोठ्या मुत्सद्देगिरीची गरजच नाही. पाक भारताला काही प्रमाणांत गुंतवून ठेवत असेल तर चीनसाठी सुंठीवाचून खोकला गेला.
अॅपलची असेंब्ली ( production) लाईन चीन मधून भारतात जाणार आहे. २० -५० बिलियन $ चा उद्योग आहे. भारत व्यावसाय करण्यासाठी असुरक्षित देश आहे हा मेसेज जगाला पाठवायचा होता का ?
https://www.youtube.com/watch?v=EqFrV9uVY28
भारताचे प्राधान्य हत्याकांड करणार्यांना जिवंत पकडण्यावर असायला हवा होता. आजही हे अतिरेकी मोकाट फिरत आहे. ते भारतात लपलेलेच नाहीत असेही खात्रीने म्हणता येत नाही. त्यांना शिक्षा मिळावी. आज नाही तर सहा महिन्यांनी. अशी टारगेटेड सर्जरीच जास्त परिणामकारक ठरली असती.
>>"तुमच्या पोस्ट मध्ये
>>"तुमच्या पोस्ट मध्ये राष्ट्रीय एकात्मता मुद्दा सुद्धा जोडा.">>
@ ऋन्मेऽऽष
मला वाटतं राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा त्यात का घेतला नव्हता ते आता तुमच्या लक्षात आले असेल 😀
२२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाल्यापासुन मेनस्ट्रीम मिडिया आणि सोशल मिडिया (आणि सँपल साईझ छोटी असली तरी इथे मायबोलीवरही) भारतीय्/अनिवासी भारतीय् ज्या प्रकारे व्यक्त होत होते त्यात दुर्दैवाने 'राष्ट्रीय एकात्मता' सोडुन बाकीच्याच गोष्टी ठळकपणे दिसल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी आपला वैयक्तीक द्वेष, तिरस्कार, आकस व्यक्त करणारे, आपआपल्या आवडत्या राजकिय पक्षांचा/नेत्यांचा अजेंडा पुढे रेटणर्या लोकांना तर भलतेच स्फुरण चढलेले दिसत होते/ आहे (ह्याची उदाहरणे इथेही बघायला मिळतील!)
एकंदरीत पहाता अशा कठीण प्रसंगी बहुसंख्य लोक आपले पक्षीय, वैचारीक मतभेद वगैरे बाजुला ठेउन सरकार आणि संरक्षण दलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन आदर्श नागरीकाचे कर्तव्य बजावताना दिसत होते, पण देशाचे नागरीक असल्यापेक्षा मतदाराच्या भुमिकेतुन व्यक्त होणार्यांचे लक्षणीय प्रमाण बघीतल्यावर राष्ट्रीय एकात्मता ये किस चिडियाका नाम है? असा प्रश्न पडला होता!
आजही इथे तशीच परिस्थिती दिसत आहे.
९ मेच्या रात्री आपल्या NEWS
९ मेच्या रात्री आपल्या NEWS चॅनेल्सनी ज्या चुकीच्या बातम्या दाखवल्या त्या बद्दल त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे. अतिशय मूर्खपणा होता तो.
काश्मिरी आणि मुस्लिमांचा
काश्मिरी आणि मुस्लिमांचा द्वेष करू नका, असं म्हणणार्या हिमांशी नरवाल आणि काश्मिरींना अशा वेळी एकटं टाकू नका असं म्हणणार्या कविता गाडगीळ या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होत्या. त्यांना काय प्रतिसाद मिळाला?
राष्ट्रीय एकात्मतेची प्रत्येकाची व्याख्याही वेगळी असावी.
ह्म्म…
ह्म्म…
पाकिस्तानला मिळत असलेला उघड पाठिंबा पाहता यापुढेही भारतियांवर दहशतवादी हल्ले होत राहणार हे उघड आहे.
आता जुनपासुन अमरनाथ यात्रा सुरु होतेय आणि या यात्रेवर आजवर खुप हल्ले झालेले आहेत. भारताविरुद्ध युद्ध जिंकल्याच्या गुर्मीत असलेला पाकिस्तान आता अजुन बेधडक भुमिका घेऊ शकतो कारण त्याला जग पैसे देतेय आणि हे पैसे कसे वापरले हे जग विचारत नाहीय.
भारताने पाक मिलिटरी नष्ट करायची संधी गमावली हे माझे मत झालेय. अर्थात मला यातले काहीही कळत नाही पण सामान्य मणुस म्हणुन प्रथमदर्शनी तरी असे वाटायला लागलेय.
परत दहशतवादी हल्ला झाल्यास ते युद्धच समजुन कारवाई करणार असे जे भारत म्हणतोय ते खरे करायचे म्हणजे अजुन काही भारतियांचे प्राण गेल्याशिवाय हे करता येणार नाही.
ठिक.
भारताचे प्राधान्य हत्याकांड
भारताचे प्राधान्य हत्याकांड करणार्यांना जिवंत पकडण्यावर असायला हवा होता. आजही हे अतिरेकी मोकाट फिरत आहे. ते भारतात लपलेलेच नाहीत असेही खात्रीने म्हणता येत नाही. त्यांना शिक्षा मिळावी. आज नाही तर सहा महिन्यांनी. अशी टारगेटेड सर्जरीच जास्त परिणामकारक ठरली असती.
पहलगाम हल्ला झाल्यानंतर सरकारने ह्या दहशतवाद्यांना पकडण्यास कधीच प्राधान्य दिले नाही. थेट पाकिस्तानला धडा शिकवायची भाषा करू लागला. जो देश दुसऱ्या देशातील अतिरेकी स्थळांवर अचूक हल्ला करू शकतो तो आपल्याच हद्दीतील दहशतवाद्यांना पकडू शकत नाही ह्यावर कोण विश्वास ठेवेल? हेच दहशतवादी जिवंत पकडले गेले असते तर पाकला आंतरराष्ट्रीय दबाव आणून नमवणे सोपे गेले असते.
>>"राष्ट्रीय एकात्मतेची
>>"राष्ट्रीय एकात्मतेची प्रत्येकाची व्याख्याही वेगळी असावी.">>
'राष्ट्र' आणि 'राष्ट्रवाद' ह्या संकल्पनांच्या व्याख्या आणि मान्यताही जिथे व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या असु शकतात तिथे राष्ट्रीय एकात्मतेची प्रत्येकाची व्याख्याही वेगळी असणे सहज शक्य आहे!
बाकी कविता गाडगीळ जे म्हणाल्या होत्या ते चुक की बरोबर ह्यात पडण्यापेक्षा त्यांच्या पत्राचा प्रसार करण्याची वेळ अत्यंत चुकीची होती असे माझे वैयक्तीक मत!
आपल्याच हद्दीतील
आपल्याच हद्दीतील दहशतवाद्यांना पकडू शकत नाही ह्यावर कोण विश्वास ठेवेल? >>
कशावरुन ते अजुनही आपल्याच हद्दीत आहेत किंवा घटना घडल्यावर ८ दिवस इथेच बसुन राहिले? त्यांच्याकडे आधुनिक ट्रेकिंग यंत्रणा होती असे वाचलेय ज्यायोगे ते व्यवस्थित हवे तिथे पोचु शकले व परत जाऊ शकले.
हो. हो. तात्यांनी परस्पर
हो. हो. तात्यांनी परस्पर युद्ध विराम जाहीर केल्यावर कविता गाडगीळांचं पत्र युद्ध कसं चांगलं नाही, हे सांगायला फिरवायला हवं होतं.
परत गेले असले कांय किंवा
परत गेले असले कांय किंवा हिथेच लपून बसले असले कांय दोन्हीही शक्यतेत आपले अपयशसच आहे.
>>"हो. हो. तात्यांनी परस्पर
>>"हो. हो. तात्यांनी परस्पर युद्ध विराम जाहीर केल्यावर कविता गाडगीळांचं पत्र युद्ध कसं चांगलं नाही, हे सांगायला फिरवायला हवं होतं.">>
आपल्या ह्या वैयक्तीक मताचाही आदर आहे 😀
मी त्या मेजर गौरव आर्या यांचा
मी त्या मेजर गौरव आर्या यांचा फॅ न होऊ घातलो होतो.
तर हे वाचायला मिळालं.
https://www.hindustantimes.com/india-news/iranian-embassy-objects-to-gau...
त्यांच्याकडे आधुनिक ट्रेकिंग
त्यांच्याकडे आधुनिक ट्रेकिंग यंत्रणा होती असे वाचलेय ज्यायोगे ते व्यवस्थित हवे तिथे पोचु शकले व परत जाऊ शकले.
आपल्याकडील ड्रोनद्वारे त्यांना ट्रॅक करणे सहज शक्य होते. हां , त्यांच्याकडे ड्रोन जॅमर असतील तर आपण तांत्रिकदृष्ट्या खूपच मागे आहोत ह्या दहशतवाद्यांपेक्षा.
नानबा आणि जाई, पोस्ट पटल्या
नानबा आणि जाई, पोस्ट पटल्या
पहालगाम का घडलं, सुरक्षेमध्ये त्रुटी कोणामुळे राहिल्या हे प्रश्न आता गाडले गेले.
भारत सरकार हरले, भाजप मात्र जिंकली असं आता नक्कीच म्हणता येईल.
तात्यांना 1000 वर्ष जुना काश्मीर प्रश्न समजावून द्यायला नागपुराहून खास तुकडी रवाना होतेय अशी बातमी आलीये
NIA, JKP, CIK वगैरे त्या
NIA, JKP, CIK वगैरे त्या अतिरेक्यांना शोधायचे काम करत आहेत. खूप काही चालू असतं पडद्यामागे. प्रत्येक गोष्ट उघड केली जाऊ शकत नाही... हे आपल्याला कळायला पाहिजे. हा शोध थांबला आहे किंवा तो बाजूला सारला गेला आहे असे का वाटतेय काही जणांना?
अश्विनी के,बरोबर आहे हे.
अश्विनी के,बरोबर आहे हे.
पण २०१४ च्या आधीही हे फॅक्टर्स सेमच असताना गदारोळ व्हायचा ना ? एकाने राजकारण केलं कि दुसराही करतो. आपल्या देशात फक्त राजकारणच चालतं हे दुर्दैव.
नवीन Submitted by साधना on 11
नवीन Submitted by साधना on 11 May, 2025 - 07:28>>> यावर मी माझे मत मांडू शकेन....कोणतेही युद्ध मुळात लढलेच न जावे यासाठी प्रयत्न करणे हे शहाणपणाचे असते. प्रत्यक्ष युद्ध न लढता शत्रूची गळचेपी करणे हा मुत्सद्दीपणा असतो पण प्रत्यक्षात युद्धाला तोंड फुल्यावर अप्परहॅंड असताना / अथवा निकडीचे उद्देश सफल झाल्याशिवाय युद्धबंदी करणे हे अपरिपक्वता दाखवते. तसही युद्धात जिंकणं आणि तहात हरणं याचा खुपसा अनुभव गाठीशी होताच भारताच्या तोच कित्ता पुन्हा गिरवण्यापेक्षा त्या अनुभवाचा फायद्यासाठी उपयोग करुन घेणे देशहिताचे ठरले असते.
हे "माघार घेणं" वगैरे दिसतं एव्हढं सोपं नसतं हो. मायबोलीवर टाईअपण्याएवढं तर नक्कीच नाही>>> किंबहुना ते तेवढ सोप नसतं म्हणूनच एक अब्ज जनता सरकार निवडून त्यांना देशहिताला, त्याचे सार्वभौमत्व अबाधित ठेवणारे निर्णय करण्यासाठी पाठींबा देते, अजस्त्र सरकारी यंत्रणा आणि जगातले चौथ्या क्रमांकाचे लश्कर दिमतीला राहील याची शहानिशा करते. नक्कीच त्या स्तरावर वर सोपे काहीच नसते पण सोमी वर आपले मत व्यक्त करणार्या कुणाही माणसापेक्षा लाखोपट निर्णयशक्ती आणि अंमलबजावणीसाठी यंत्रणा त्यांना नक्कीच बहाल करण्यात आलेली असते. तेच त्यांना नेमून दिलेले काम असते.
Pages