ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!
राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी
गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची
मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती
हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण
-विनायक दामोदर सावरकर

FB_IMG_1746806212652.jpg

काळजी घ्या

>>काही लोकांना मोठे झाले तरी त्याच शाळकरी गप्पा, बढाया यात रमायला आवडतं. शत्रु व त्यांचे सेनापती सगळेच प्रचंड मूर्ख, भित्रे, अंगशक्तीने लेचेपेचे तर आपल्याकडील रस्त्यात गस्त घालणाऱ्या गुरख्यापासून सगळेच प्रचंड महापराक्रमी अशा गप्पा करणे, त्या अनुशंगाने विनोद व किस्से रचणे, ते ऐकणे ऐकवणे यातुन त्यांना खूप समाधान मिळत रहाते. त्यांना अशा बातम्या फार आवडतात.

अगदी अगदी ! शिवाय शाळकरी मुले अशा hoaxes ना बळी पडली तर एकवेळ समजू शकतो पण अगदी ( एकेकाळी) रिस्पेक्टेड चॅनेल / पेपर चे सिनियर पत्रकारही फसतात हे पाहून हसावे की रडावे ? 'क्रांती' मध्ये इंग्रज चना जोर गरम खाऊन बेशुद्ध पडतात, 'पद्मावत' मधला खिल्जी, 'छावा' मधला औरंगजेब ई.ई. सेम !

रिस्पेक्टेड चॅनेल / पेपर चे सिनियर पत्रकारही फसतात हे पाहून हसावे की रडावे ?
>>>>>

ते फसत नाहीत तर फसवतात. कारण हा व्यवसाय आहे. यात पैसा आहे.
जसे आयपीएल हे क्रिकेटच्या कल्याणासाठी नाही तर पैसे कमावण्यासाठी आयोजित केले जाते तसे सतराशे साठ न्यूज चॅनेल उघडले गेले आहेत ते लोकशाहीच्या कल्याणासाठी नाही तर पैसे कमावण्यासाठी आहेत. त्यांचा प्राथमिक उद्देश काय आहे हे आपल्यालाच समजायला हवे.

आरडाओरडा करा, मीठ मसाला लावा, बातमी देणाऱ्यांच्या मागे चिअर गर्ल नाचवा, हवा तो गोंधळ घाला.. फक्त बातमी खोटी देऊ नका इतकीच अपेक्षा.

तरीही परवाच्या तुलनेत काल आणि आज आरडाओरडा कमी आहे. भारत आणि पाकिस्तान ने एकमेकांविरोधात मिसाईल हल्ला केला आहे.

कर्नल सोफिया कुरेशी यांचा डॉक्टर्ड व्हिडीओ पाकिस्तानकडून व्हायरल केला जात आहे.
हा खोटा आहे हे कुणाही भारतियाला लगेच ओळखता येईल इतका बिनडोक आहे.

पाकिस्तानी news नुसार त्यांनी महाराष्ट्राच्या पॉवर ग्रीड वरती सायबर हल्ला केला आहे. मी राहतो तिथे तर वीज काही गेलेली नाही.

Claim That 70% Of India’s Power Grid Hit By Pakistan Cyberattack Is Fake: PIB
टाइम्स ऑफ ईंडिया

इफ आय आम करेक्ट
या युद्धाची सुरुवातच नॄसिंह नवरात्रात झालेली आहे.
याहून अधिक काव्यात्मक कौल काय असू शकतो!

भरत हे वाक्य सरकॅस्टिक आहे का? (उपरोधिक)
मनोधैर्य खच्ची करणार्‍यांना तुरुंगाचीच हवा दाखवायला नको का? तुरुंगात काय ते पाकिस्तान झिंदाबाद म्हणत नाच म्हणावं. भांगडाच कर.

तितका भडक सिनॅरिओ फक्त फीअर माँगरिंग करणा र्यांच्या कल्पनेत घडतो.

कोण्या एका नेत्याने फक्त एका कवितेच्या नावाखाली एका मुलीला तुरुंगाची हवा दाखवलेली तेव्हा इथे ब्र निघत नव्हता.

मी त्याबद्दल व्यवस्थित लिहिलं होतं. अजूनही असेल.
-----------------
. आय एम एफ ने पाकिस्तानला कर्ज दिलंय. अमेरिकेचा काय स्टँड होता ?

स्काय न्युज वर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री
You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organisations,” asked Ms. Hakim.

“Well, we have been doing this dirty work for the United States for about three decades, you know, and the West, including Britain,” replied Mr. Asif.

म्हणजे रशियाला शह द्यायला अमेरिकेने पाकिस्तानात दहशतवाद पोसला आणि त्याची फळं भारत भोगतोय?

https://threadreaderapp.com/thread/1921076918205489516.html

मग मी चुकले. ़ केतकी चितळे केस मधे, …
मी , शेंडेनक्षत्र व फारेन्ड यांनी केलेला निषेध सापडला. बाकी मूग गिळून आहेत. काहीजण बीजेपी मधे असे होत नाही का म्हणुन मुद्द्यास बगल देताना आढळले.

आत्ता मात्र अनेकांना वाचा फुटेल.

ओके. फेअर इनफ. मला सापडले नाही म्हणजे एखादी प्रतिक्रिया अस्तित्वातच नाही असे होत नाही. मला मान्य आहे. तुमचा स्टँडही ठीकच.

हल्ले किंवा ड्रोन/ मिसाईल पडणे/पाडणे हे फक्त रात्रीच होतेय असे नाही. आत्ता तासाभरापूर्वी पठाणकोट जवळ रस्त्याच्या दोन बाजूला दोन स्फोट झाले. मिसाईल किंवा ड्रोन न्यूट्रालाइज केले. एअर बेस पासून 7/8 किमी अंतरावर.
माझा चुलत दिर पठाणकोट ला चालला होता त्याच्या आईला भेटायला. त्याच्या समोर ही स्फोट झालेत. त्यानंतर अर्थात तिथला रस्ता बंद केला आहे. तो पुढे न जाता परत घरी निघाला होता.

सगळे पाकडी कलाकार भारताच्या नावाने टाहो फोडताहेत.
आपले भारतीय लोकं कशाला ह्यांना घेतात भारतीय मूवीत कळत नाही.

आमचे लोकं मारले गेले तेव्हा नाही वाईट वाटले ह्यांना.

ऑपेरेशन सिंदूर मध्ये भारताने जो पाक विरुद्ध strike केला त्यात अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खत्मा झाला आहे. हळू हळू एकेकाची नावे समोर येत आहेत. ह्यात एक जरी सामान्य माणूस मेला असता तरी पाकिस्तान ने थयथयाट केला असता.

आमच्या सोसायटीत सकाळी सर्वांना मैदानात बोलावलं होतं. काही जणांचा चेअरमनच्या रात्रीच्या ब्लॅक आउटला विरोध आहे.
एका रिटायर्ड आर्मी ऑफीसरला पण बोलावले होते. त्यांनी युद्धकाळात काय करावे काय करू नये हे सांगितले. ते असो.
त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भविष्यवाणी नाही पण अशा वेळी डावपेच काय असू शकतात किंवा असायला हवेत याबद्दल माहिती दिली.
आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल कि भारत सीमेच्या आतून का मिसाईल डागत बसलाय ?

आंतरराष्ट्रीय समुदायापुढे युद्धाला समोरचे राष्ट्र कारण आहे हा नरेटिव जाणे गरजेचे असते. तसेच पाकिस्तानला आपण उकसवतोय तसेच पाकिस्तान सुद्धा आपल्याला उकसवतोय.

भारताची रणनीती काय असेल याबद्दल ते म्हणाले कि पाकिस्तानने इंधन जमा करायला सुरूवात केली असेल. त्यांच्याकडे साठे कमी आहेत. त्यातच युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांना घिरट्या घालाव्या लागत आहेत. त्याला प्रचंड इंधन लागते. याशिवाय सैन्याचे मोबिलायझेशन सातत्याने करावे लागेल. इंधन नाही म्हणून या अ‍ॅक्टिव्हिटीज होत नाहीत हे कळू द्यायचे नाहीये. इंधनाचा बंदोबस्त होईपर्यंत वेळकाढूपणा पाकिस्तान करणार. आता जागतिक बँकेने त्यांना कर्ज देऊन ही अडचण दूर केली आहे. अमेरिकेने ही मदतचे केली आहे.

दुसरे म्हणजे पाकिस्तान हमासचं तंत्र वापरू शकेल. भारताचं आयर्न डोन किंवा सुदर्शन चक्र किंवा एस ४००, आकाश हे मिसाईल विरोधी,ड्रोन विरोधी किंवा हवेतून येणारा कोणताही हल्ला परतवण्यासाठी किती सज्ज आहेत याचा अंदाज पाकिस्तान घेईल. त्यासाठीच ड्रोन आणि स्वस्तातले मिसाईल्स, रॉकेट्स यांचा मारा केला जाईल. भारताकडची एअर डिफेन्स सिस्टीम जर सतत चालू राहिली तर एका वेळेला ७० - ८० मिसाईल्स, अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून एका रात्रीत जास्तीत जास्त कॅसेट्स ( एका वेळी डागता येण्याइतका मिसाईल्सचा संच) संपवण्याचे डावपेच असतील.

रात्रीच्या अंधारात आलेले ड्रोन चार्ज घेऊन आलेय कि नुसतेच टेहळणी साठी आले आहे हे समजणार नाही त्यामुळे क्षेपणास्त्रं डागणे हे कंपल्शन आहे. पण सुदैवाने पाकिस्तानकडे इतके ड्रोन्स नाहीत कि जे आपला दारूगोळा संपवू शकतील.

भारत वाट बघत असेल , पाकचा इंधनसाठा आणि क्षेपणास्त्रे संपतील याची. त्यानंतर नेतृत्वाने ठरवलं तर मोठा आणि निर्णायक हल्ला होऊ शकतो. अर्थात त्यासाठी उद्देश असावा लागतो. तो काय असेल हे सध्या तरी कुणीही सांगू शकत नाही ( बलुचिस्तान किंवा पी ओ के ).

ता.क. : कसलाही संबंध नसताना उगीचच देशभक्त बनून मी कसा युद्धाबाबत गंभीर आहे आणि तुम्ही कसे माझे न ऐकल्याने बेजबाबदार आहात हे दाखवण्याच्या चेअरमनच्या लक्षात येईल अशा वागणुकीमुळे (डोक्यात गेल्याने) कदाचित माझं नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. तसं झालं तर आम्हाला फ्लॅट खाली करावा लागू शकतो. Lol

Pages