ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाक युद्ध घडामोडी

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14

आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..

ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.

केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.

भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीनने पाकिस्तानला आपल्या नव्या तंत्रज्ञानाची शस्त्रे, लढाऊ विमाने पुरवली आहेत. प्रत्यक्ष वापरात ते कसे परफर्म करतात याची चाचणी होत असेल तर त्यांना ते हवंच असेल.
आणि चिनी शस्त्रे कशी परफर्म करतात आणि त्याविरुद्ध आपण भारतास दिलेली शस्त्रे कशी परफर्म करतात हे बघण्यास अमेरिकेला पण इंटरेस्ट असेल.
तेव्हा वेस्ट कडुन पाकिस्तानवर एस्केलेशन नको म्हणुन दबाव आणणण्याचे प्रामाणिक प्रयत्न लौकर होतील का यात शंका आहे.

कुठली इकॉनॉमी? IMF ने पाकिस्तानला १ बिलीयनचं नवीन कर्ज दिलं आहे त्यांना आपल्या विरोधात लढता यावं म्हणून. त्यातून जे उरतील ते दहशतवादात गुंतवता येतीलच.

आय एम एफ च्या कर्जाबद्दल काल विविध्भारतीवर ऐकले. पण एवढे मोठे?
बातम्यात आप्ल्या तिव्र निषेधाचा उल्लेख होता.
पण मी ऐकलय २ लेन्डर्स आहेत.ग्लोबल लेन्डर्स. फायनेन्शिअली जेव्हा एखादा देश डबघाइला येतो तेव्हा आय एम एफ स्टेप्स ईन.
वर्ल्ड बँक बिल्ड्स ईन्फ्रास्ट्रक्चर. पोर्ट वगैरे जागतिक दळण वळण व व्यापाराकरता.

ट्रम्प तात्यांच्या X हँडलनुसार भारत पाकिस्तान इमीडियेट सिझफायर करायला तयार झाले आहेत .

उपतात्यानी none ऑफ our business म्हणून हात झटकले होते .

"Pakistan has always strived for peace and security in the region: FM"

Foreign Minister Ishaq Dar has confirmed Pakistan’s ceasefire with India in a post on X.

“Pakistan and India have agreed to a ceasefire with immediate effect,” he said.

The minister added: “Pakistan has always strived for peace and security in the region, without compromising on its sovereignty and territorial integrity!”"

विषय संपला???

आज पाच वाजतापासून दोन्ही बाजूंनी पूर्ण सिझफायर, आपल्या रक्षा मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन.
पाकिस्तानकडुन फोन आल्याचे आपल्या रक्षा मंत्रालयाने सांगितले.

कोणत्याही अटी शर्ती शिवाय युद्ध विराम झाला की काय?
पाकिस्तानला कर्जाचे पैसे मात्र मिळाले.
अजर मसुद अजूनही आहे.
युद्ध विराम ठीक आहे पण टेरर कॅम्पस चे अस्तित्व नष्ट झाले असावे.

आपण अटी ठेवल्या असणारच, समजतील नंतर. ऑफीशियल स्टेटमेंट येईलच. प्रेस कॉन्फरन्स होणार आहे.

बरं झालं.
आता आपल्या मीडीयाला परत बोलावून घ्या.
पाकिस्तानची हद्द ओलांडून काबूल, कंदाहार, बगदाद च्या पलिकडे पोहोचला असेल.

https://www.imf.org/en/News/Articles/2025/05/09/pr-25137-pakistan-imf-co...
Executive Board of the International Monetary Fund (IMF) completed the first review of Pakistan’s economic reform program supported by the EFF Arrangement. This decision allows for an immediate disbursement of around $1 billion (SDR 760 million), bringing total disbursements under the arrangement to about $2.1 billion (SDR 1.52 billion). In addition, the IMF Executive Board approved the authorities’ request for an arrangement under the Resilience and Sustainability Facility (RSF), with access of about US$1.4 billion (SDR 1 billion).

https://www.imf.org/en/About/executive-board/members-quotas %

United States 16.49 United Kingdom 4.03 Japan 6.14 Italy 3.02 Germany 5.31 France 4.03 Canada 2.22 China 6.08

इतर देशांचा व्होट शेअर १ च्या मागे पुढे वा नगण्य आहे. यातल्या किती देशांनी भारतासोबत अ‍ॅब्स्टेन केलं ते कळत नाही.

दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्यांना तरी ताब्यात घ्यायला हवं.
तोपर्यंत पाकिस्तानला पूर्ण जेरीस आणायला पाहिजे होते.
भौगोलिक दृष्ट्या आणि सैनिकांच्या गरजेप्रमाणे एखादा चांगला भूभाग आपण ताब्यात घ्यायला पाहिजे.
युद्धविराम आपल्यासारख्या संपन्न देशासाठी चांगलीच गोष्ट आहे.

सीझफायर झालं ते बरं झालं. आय पी एल स्थगित करायला लागल्यामुळे बीसीसीआय आणि रिलायन्सचं नुकसान होणार होतं, ते कमी झालं.

बिहार निवडणुकीत भाजप पाकिस्तानला घर में घुस के मारा प्रचाराचा मुद्दा करतो की नाही ते कळेलच.
आताच त्यांच्या ट्विटर हँडलवरून आता युपीए / काँग्रेस नाही , मोदी भाजप आहेत, असा प्रचार सुरू झाला आहे.

युद्धाने एकूणच भारताचे आर्थिक नुकसान झाले असते ना? की नुसते रिलायन्स आणि बीसीसीआय पर्यंत मर्यादित राहिले असते?

>>"युद्धविराम आपल्यासारख्या संपन्न देशासाठी चांगलीच गोष्ट आहे.">>
एका दगडात अनेक पक्षी मारुन झाल्यावर पाकीस्तानने दिलेला युद्धविरामाचा प्रस्ताव भारताने मान्य केला आहे ही देशासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यावर काल आणि आज पाकिस्तानमध्ये भरपुर विध्वंस करुन जनतेला खुश करुन झाले आहे.
पाकिस्तानला आय एम एफ कडुन जेवढं कर्ज मिळणार आहे त्याच्या तिप्पट-चौपट भरेल एवढा खर्च ह्या हल्ल्या-प्रतिहल्ल्यांवर आणि मालमत्तेच्या नुकसानातुन झाला/होणार आहे.
चिन, अमेरिका आणि टर्की (तुर्कीए) ह्यांनी पाकिस्तानला पुरवलेल्या संरक्षण साहित्याच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असुन आपल्या इंटीग्रेटेड एअर डिफेंस सिस्टीमचा जगभर बोलबाला झाला आहे. ह्याच्या परिणामी आपल्याला ह्या एअर डिफेंस सिस्टीमसाठी ३-४ देशांच्या ऑर्डर्स मिळाल्या तरी आपल्याला ह्या कारवाईसाठी आलेल्या खर्चाच्या कित्येक पटींत परतावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

असो... उद्देश सफल झाल्यावर घेतलेल्या युद्धबंदीच्या योग्य निर्णयासाठी भारत सरकारचे अभिनंदन आणि आपल्या सामर्थ्यशाली संरक्षण दलांना कडक सलाम!

जय हिंद! जय हिंद की सेना!

जास्त नुकसान जम्मू काश्मीरमध्ये होत होतं. ते चालतं की. तसंही त्यांना धडा मिळायलाच हवा होता.
पंजाब, राजस्थानमध्ये व्हायला लागलं तेव्हा काळजी वाटू लगली.
----
आय एम एफ चं कर्ज हवं तर गप बसा अशी अट तात्यांनी पाकिस्तानला घातली असावी.

संजय भावे तुमच्या पोस्ट मध्ये राष्ट्रीय एकात्मता मुद्दा सुद्धा जोडा.

दहशतवादी हल्ल्यानंतर जे चिथावणीखोर वक्तव्ये आणि आवाहने करून धार्मिक तेढ वाढवणे असले प्रयत्न जो तो आपल्या सोयीने करत होता. हे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सारेच राजकीय पक्ष आणि छोट्या मोठ्या लोकल संघटना आल्या. ज्यात काही जण धार्मिक कट्टरता दाखवतात तर काही सेक्युलर असल्याचे ढोंग करतात. आणि आपल्या राजकीय फायद्यासाठी प्रकरण तापवत ठेवतात. पण भारतीय सरकारने एकूणच ज्या पद्धतीने ही प्रकरण हाताळले त्यामुळे या प्रकाराला बिलकुल यश न मिळता वातावरण स्थिर झाले आहे.

आता राजकीय धुरळा उडत राहील नेहमीप्रमाणे. पण सामान्य जनजीवन त्यापासून अलिप्त असेल.

फुकट मिळणाऱ्या पैशांचा वापर तो देश कसा करेल याची कल्पना आपण करू शकतो.
आपली डिफेन्सिस्टीम आपण दुसऱ्या देशांना विकताना जिओ टॅगिंग करून विकावी जेणेकरून एखाद्या border ओलांडल्यानंतर ते self destruct होईल. त्याच्या वापराचा कंट्रोलkey आपल्याकडेच असायला हवा.
सोमवारी 12 तारखेला पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
सध्या त्यांच्या पोकळ नुकसानापेक्षा आपलं नुकसान हे वजनदार असल्यामुळे युद्धविराम ठीक आहे.

https://theprint.in/defence/pahalgam-satellite-image-us-space-tech-firm-...

Orders for Pahalgam satellite images from US firm peaked two months before attack
Maxar Technologies began receiving orders for high-resolution satellite images of Pahalgam in June 2024, just months after a Pakistani geospatial firm indicted by the US became a partner

https://theprint.in/defence/pahalgam-satellite-images-bsi-pakistan-maxar...

Controversial Pakistani firm BSI removed as partner from US satellite company’s website
Hours after ThePrint revealed that Maxar had been receiving orders for high-resolution satellite images of Pahalgam, including 10 days before the attack, the company removed the Pakistani firm from its website.

Maxar provides high-resolution satellite imagery to government bodies across the world, including India’s Ministry of Defence and the Indian Space Research Organisation (ISRO).

Maxar वरती पण कारवाई व्हायला पाहिजे.

We have been doing dirty work for the US and the west for decades या संदर्भात हिलरी क्लिंटन यांचे हे वक्तव्य ऐका.
https://www.youtube.com/watch?v=AwpR6ngoSjQ

ISI , wahabi brand of islam या सगळ्यांचा त्रास भारताला होतो आहे, त्यांना कोणी उभं केलं?

> हे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सारेच राजकीय पक्ष आणि छोट्या मोठ्या लोकल संघटना आल्या.
हे खोटे आहे. या हल्ल्याचा राजकिय उपयोग करण्यात एकच पक्ष आघाडीवर होता. विरोधी पक्षांनी संयम दाखवला.
For the record ,
२६/११ च्या घटनेनंतर एकही अतिरेकी जिवंत ठेवला नाही, कसाब ला जगासमोर आणून पाकिस्तान चा सहभाग स्पष्ट केला, केंद्रिय गृहमंत्री, मुख्य मंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामे दिले, मेडियाने मनमोहन सरकार ला धारेवर धरले (जे योग्यच होते) तो हल्ला अजून सुरुच असताना मोदी तिथे आले आणी त्यांनी टीका केली.

यावेळी पेहेलगाम ची नैतिक जबाबदारी कुणीही घेतली नाही, मेडियाने तर विरोधी पक्षांनाच प्रश्न विचारले, रात्रभर गोदी मेडियाने गांजा मारून बातम्या दिल्या आणी आता तात्याने डोळे वटारताच सीझ फायर केला !

गौरव आर्याचा उल्लेख वर आलाच आहे , मोदीभक्तांचे अवडते दुसरे बक्षी यांनी तर थेट तुर्कस्तान वरच अणू बाँब टाकायचा सल्ल दिला !

ट्रम्प ने सीझ फायर ची घोषणा करताच फील्ड मार्शल आर्णब ने जो आरडा ओरडा केला तो लाजबाब आहे !

Pages