चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

'हाऊ टु लुझ अ गाय इन १० डेज' परत पहाते आहे. भीषॉण फनी!!! एकदम सुरेख सिनेमा. अ चिक फ्लिक. मॅथ्यु मॅकगनी (हेच आहे का प्रोनन्सिएशन (उच्चार)?) असो. फार आवडतो हा सिनेमा. खो खो हसू येते.

Catch me if you can
स्पीलबर्ग चा आहे

खूप मस्त सिनेमा
थिएटर ला पाहिला होता
कॉलेज ला असताना यावरून प्रेरित होऊन धिंगाणा केला होता

DL स्कॅन करून त्याचा फोटोशॉप वर ब्लँक बनवला होता, अन् डॉट मॅट्रिक्स प्रिंटर ऐवजी टाईरायटर वापरून २-३ फेक DL बनवली होती

आरटीओ मधे एजंट लोक काहीही डॉक्युमेंट प्रूफ नसतानाही टेंपररी इन्शुरन्स काढून त्या बेसिस वर लर्निग DL काढून द्यायचे
ते ही एक काढलं होतं, पण पर्मनंट नाही बनवलं...

रियल लाईफ मधे डू आय काढता आला असता नाहीतर...

“ यात शीला की जवानी गाणे फिट्ट होईल एकदम. किसी और की मुझको जरूरत क्या मै तो....” Lol

“निरूपा रॉय = (विनोद, ऋषी, अमिताभ)” - सॉलिड कल्पनाविलास आहे हा. Lol

>>>>Catch me if you can
अमेरीकेस यायचा इन्टर्व्यु पास झाल्या झाल्या, कॉन्स्युलेटवरुन थेट थिएटरात जाउन पाहीला होता Happy अ गुड मेमरी असोसिएटेड

Like आणि subscribe चित्रपटासाठी >>
खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. चित्रपट वेगळ्या धर्तीचा आहे. त्यात रहस्य आहे, आणि शेवटच्या मिनिटापर्यंत उत्कंठा टिकवणारे आहे. चित्रपटाची कथा जलद उलगडत जाते. अजिबात एक मिनिट सुद्धा चित्रपट रेंगाळत नाही. दोनच गाणी आहेत. एक गौतमी पाटीलची लावणी. आणि दुसरं ब्लॉगरच. अमेय वाघ आणि अमृता खानविलकरचा अभिनय उत्तम. जुई भागवतचा पदार्पणातही छान अभिनय. दिग्दर्षकाने प्रत्येक पात्राचा व्यवस्थित उपयोग करून घेतला आहे. एकही पात्र उगाचच आहे वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टीही अचूक आणि जिथल्या तिथे आहेत.++ अचूक समीक्षण विक्रमसिंह

अगदी. अतिशय चार्मिंग, विटी आणि अवखळ भूमिका आहे. >> हो ना. त्याचीच वुल्वस ऑफ वॉल स्ट्रीट मध्ये अतिशय दांडू भूमिका आहे. कसला चतुरस्र अभिनेता आहे!

Lol म्हणूनच मी इंग्रजी शब्द शक्यतो इंग्रजीत लिहीते. चल, वॉल स्ट्रीट वर खेळू मग. Catch me if you can. Happy

कॉलेज ला असताना यावरून प्रेरित होऊन धिंगाणा केला होता>>> Lol

मॅथ्यु मॅकगनी (हेच आहे का प्रोनन्सिएशन (उच्चार)?) असो>>> मॅथ्यू मकॉनहे असा उच्चार आहे बहुतेक. Happy

अँकी Lol

विटी आणि दांडू Lol

मी जुरासिक पार्क्/वर्ल्ड्चा टोटल फॅन आहे. त्यातील "फॉलन किंगडम" बर्‍याच दिवसांपासून बघायचा राहिला होता. तो या वीकेण्डला पीकॉक वर पाहिला. मूळ जुरासिक पार्क चे तीन भाग होते. त्यानंतर जुरासिक वर्ल्ड पासून त्याचे नवीन भाग आले. हा त्यातील दुसरा.

नेहमीचाच मालमसाला आहे. पण जर तुम्ही त्या जॉनराचे फॅन असाल तर आवडेल. आणि ख्रिस प्रॅटचे बॅण्टर मस्त आहे. या पिक्चरमधे सगळे डायनोसोर कॅलिफोर्नियामधे आणून मोकळे सोडून दिले आहेत. पिक्चर संपायच्या आधी "अरे मेन व्हिलनला खायचे राहिले" म्हणून एक टी रेक्स कोठूनतरी येतो, त्याला खातो व अवतारकार्य पूर्ण झाल्यासारखा जंगलात निघून जातो. त्यावेळेस आधी घरामधे यांच्यावर हल्ला करणारा दुसरा एक "इण्डोरॅप्टर" मेल्यावर हे लोक आरामात घराबाहेर येउन डॉयलॉग मारत बसतात. हे चांगले लोक असल्याने टी रेक्स पुन्हा येत नसावा. तो इण्डोरॅप्टर मुळात सगळे मोठे लोक सोडून त्या लहान मुलीच्याच का मागे लागतो ते माहीत नाही. तसेच ओपनिंग सीन मधे पार्कची दारे उघडल्याने पाण्यात निघून गेलेला तो सर्वात मोठा जलचर डायनोसोर नंतर परत दाखवलेला नाही. दिग्दर्शक त्याला विसरलेला दिसतो. तिसर्‍या भागात तो आला होता का लक्षात नाही.

या सिरीज मधली "ब्लू" नावाची ती फीमेल रॅप्टर आणि ख्रिस प्रॅट बरोबरचे तिला ट्रेन करताना व नंतरचेही सीन्स मस्त आहेत - तिन्ही पिक्चर्स मधे.

फा Lol

जुरासिक पार्क्/वर्ल्ड्चा टोटल फॅन >>> मला पहिला ( ओरिजिनल ) जुरासिक पार्क सगळ्यात जास्त आवडतो. नुकताच तो आणि जुरासिक वर्ल्ड परत पाहिला. पहिला भाग त्यातल्या त्यात लॉजिकल अ‍ॅक्शन्स दाखवतो, एका माणसाच्या हावेमुळे बाकीच्यांच्या जीवावर कसं बेतलं वगैरे दाखवतो. पण निदान त्यात लोकं जरातरी सिरीअसनेस दाखवतात. दुसरा भाग का-ही-ही आहे असं वाटून गेलं. माणसं इतकी मूर्खासारखी वागत राहतात की तोडच नाही. पहिली बावळट व्यक्ती म्हणजे हिरोईन. अगं बाई पॅलेन्टॉलॉजिस्ट ना तू? मग इतक्या जवळ जाऊन डायनोसॉरच्या बाळाचे फोटो कस्ले काढतेस? पिल्लांच्या इतका जवळ माणूस आला तर कुत्री सुद्धा हल्ला चढवते, इथे तर आख्खा डायनो आहे! तीच गोष्ट त्या जखमी डायनो बाळाला उचलून गाडीत घेऊन यायची - काही गरज होती का?
तशीच ती गोल्डब्लमची मुलगी. लपून असं डायनो आयलंडला येतं का कोणी?
त्यात ते छोटे डायनो एका माणसाचा फन्ना उडवतात आणि तो ज्याला सांगून गेलेला असतो तो फुल व्हॉल्यूमवर गाणी ऐकत असतो हे पाहून कपाळात हात मारून घेतला मी. आपण आलोत कुठे, आपण करतोय काय? काही गांभीर्यच नाही.
तिसर्‍याचा रिरन करावा की नाही याचा विचार चालू आहे Happy

रमड इतके डिटेल्स आठवत नाहीत पण मलाही फक्त पहिला आपल्या लहानपणीचा आवडतो. मला ही सिरिज अजिबात आवडली नाही. काहीही आहे. ती ब्लू रॅप्टर तर कुत्र्यासारखी वागते, सगळा आविर्भाव व ट्रेनिंग कुत्र्यासारखी आहे. काल्पनिक असली तरी पाळीव कशी असतील डायनासोर. हिंस्र प्राण्यांचे इंस्टिंक्ट वेगळे असणार ना, दोन मांसांच्या तुकड्यात ती डोमेस्टिकेटेड होते. Happy

एक डायनासोर पाण्यातून उडी मारून बेबीसिटरलाच खाऊन टाकतो, तरीही हे चिल पणे इकडेतिकडे हिंडतात. यात इरफान खान होता ना? सिंधी आडनावाचा थीम पार्कचा ओनर आहे, जो हेलिकॉप्टर घेऊन वाचवण्यासाठी जातो आणि तत्काळ मरतो. मग घेतलं कशाला इरफानला, डायव्हर्सिटी हायर होते तर तो तेलकट कुमैल का कुणीतरी आहे की त्याला घ्यायचे. मी हा थिएटरमध्ये बघितला आहे. बहुतेक मला हा काल्पनिक जनावरांचा प्रकारच आवडत नाही, ट्रेमर काय, शार्कनॅडो काय, ई ई. ओढूनताणून आणलेली कॅटॅस्ट्रॉफी वाटते, मग घाबरायचे, कुणीतरी हुतात्मा व्हायचे, मात करायची. कुण्या देवाने सांगितले आहे..! Happy

डायनो बाळाला उचलून गाडीत घेऊन यायची - काही गरज होती का?>>>> Lol आ डायनो मुझे मार.
'आईस एज- डॉन ऑफ द डायनासोर' मधे सिड- द स्लॉथ सगळ्यांना पिल्ले होत आहेत आणि आपल्याला तर गर्लफ्रेंड पण मिळेल असं वाटत नाही म्हणून डायनासोरची अंडी मनानेच उचलून आणून दत्तक घेऊन उबवतो, ते त्याला जन्मल्यानंतर 'मम्मा' म्हणतात, मग तिकडून आई येऊन याला लांब फेकून देते. अर्थात.. Happy डिएगो सेबरटूथ वाघोबा म्हणतो 'मर मूर्खा' Lol

आ डायनो मुझे मार. >> Biggrin
पहिला थेटरात जाऊन बघितलेला. नंतरचे असेच इकडे तिकडे र्यांडमली बघितले आहेत. कंटिन्यूइटी/ स्टोरी इतका कधी विचार केला नाही. आहे समोर बघ. इरफान चा पण थेटरात बघितलेला. आता मॅरेथॉन करावी का?

आ डायनो मुझे मार >>>
अगं बाई पॅलेन्टॉलॉजिस्ट ना तू? मग इतक्या जवळ जाऊन डायनोसॉरच्या बाळाचे फोटो कस्ले काढतेस? >>> Lol

तशीच ती गोल्डब्लमची मुलगी. लपून असं डायनो आयलंडला येतं का कोणी? >>> Happy आणि तिचे जिम्नॅस्टिक्स आठवले का? Happy आख्खा रॅप्टर उडवते किक ने Happy

पहिला जबरदस्त आहेच. मला दुसराही आवडतो (त्यात अचाटपणा असूनही). तिसरा "बघणेबल" आहे :). जुरासिक वर्ल्ड सिरीज मधे मूळची उसाची कांडी आता जरा हाय टेक चरकातून काढली आहे. पण मला सगळेच आवडतात. मी तर यातल्या एक दोन पिक्चर्सचे "मेकिंग" सुद्धा पाहिले आहे. "ब्लू" च्या इन्स्टिंक्ट बद्दल पॉइण्ट बरोबर आहे. पण तेवढी सिनेमॅटिक लिबर्टी चालवून घेतली मी. तसे तिचे जन्मापासूनचे ट्रेनिंग दाखवले आहे.

पहिल्याचे ऑस्कर बहुधा स्पीलबर्गने त्याच वर्षी "शिंडलर्स लिस्ट" काढल्याने हुकले असावे. फक्त इफेक्ट्सकरता मिळाले होते असे आठवते. त्यातल्या टी रेक्सच्या एण्ट्रीला तोड नाही. मॉन्स्टर जॉनरामधली सर्वात भन्नाट एण्ट्री असेल ती. त्यात बरेच मेमोरेबल संवाद आहेत. दुसर्‍यातही थोडे आहेत.

"Talent skips a generation. I am sure your kids will be fine" Happy

पहिल्या दोन मधे खूप खाचाखोचा आहेत. दुसर्‍यात ते सॅन डिएगो मधे येतात तेव्हा रस्त्यावर जपानी लोक रॅण्डम आकाशात बघून पळताना दाखवले आहेत. स्पीलबर्गने ते जुन्या गॉडझिला पिक्चर्समधल्या तशा सीन्सचे विडंबन म्हणून केले आहे. नाहीतर पहिल्यामधे जेव्हा तो टी रेक्स, कार वगैरेचा सीन आहे त्यावेळेस त्या टी रेक्सच्या तोंडाची उंची मोजून त्या उंचीवर प्रॉप्स लावून यांना तेथे बघायला सांगितले होते - इतके ते अचूक होते.

ब्लू रॅप्टर तर कुत्र्यासारखी वागते
तेलकट कुमैल
आ डायनो मुझे मार
>>> Lol

आणि तिचे जिम्नॅस्टिक्स आठवले का? >>> हो ते पण कैच्याकै. पाहताना मला आपला सारखा हिमालयपुत्र आठवत होता Proud

संवाद चांगले आहेत काहीकाही खरंच.

सीन्सचे विडंबन म्हणून केले आहे >>> हे मला माहिती नव्हतं. तसं असेल तर ओके. नाहीतर मला तूच एका लेखात लिहील्याप्रमाणे ती 'मागे बघत पुढे पळणारी' माणसं पाहून जाम नैराश्य आलं होतं. स्पिलबर्ग, एट टू? असं झालं होतं अगदी Happy

तशीच ती गोल्डब्लमची मुलगी. >>>>
हो ते पण कैच्याकै. पाहताना मला आपला सारखा हिमालयपुत्र आठवत होता>>>> Lol गोल्डब्लम इतका देखणा वाटायचा, जरा भारतीय लूक आहे त्याचा. त्याच्या लेकीच्या कोलांट्या उड्यांकडे दुर्लक्ष केले. Happy

फा- इंट्रेस्टींग पोस्ट, I am not buying though! Happy
"Talent skips a generation. I am sure your kids will be fine">>>> Lol
तसे तिचे जुरासिक वर्ल्ड सिरीज मधे मूळची उसाची कांडी आता जरा हाय टेक चरकातून काढली आहे. >>> Happy तेथेच घात झाला, ह्यूमन इमोशन flight or fight या एकाच प्रतलात गेली. डायनासोर्सच्या रूपात/ visually क्रांती आली, त्यांना मारायचे कसे यातही नाविन्य आले. ते माणसांना कसे मारणार यातही वैविध्य आले पण त्यापेक्षा जास्त काही मिळत नाही यात. ही एक प्रकारची adrenaline rush आहे, जी प्रेक्षकांना बघताना मिळत असावी.

जन्मापासूनचे ट्रेनिंग दाखवले आहे.>>> ya...right..! Wink
बघून पळताना दाखवले आहेत. स्पीलबर्गने ते जुन्या गॉडझिला पिक्चर्समधल्या तशा सीन्सचे विडंबन म्हणून केले आहे.>>> हे मलाही माहिती नव्हते.

पिल्लांच्या इतका जवळ माणूस आला तर कुत्री सुद्धा हल्ला चढवते, इथे तर आख्खा डायनो आहे! तीच गोष्ट त्या जखमी डायनो बाळाला उचलून गाडीत घेऊन यायची - काही गरज होती का? >>> Lol

तशीच ती गोल्डब्लमची मुलगी. लपून असं डायनो आयलंडला येतं का कोणी? >>>
तो एवढा चक्रम मग मुलगी नको का?

"Talent skips a generation. I am sure your kids will be fine" हा खास कोकणातल्या समस्त म्हयशी गाभण लेव्हलचा टोमणा आहे.

“Talent skips a generation. I am sure your kids will be fine" - Lol ह्याची नोंद करून ठेवलीय. आता वापरून बघायला हवा.

मला पहिला ज्युरासिक पार्क आवडतो. तिसरापण तसा चांगला आहे. दुसरा पूर्ण बघितलाच नाही न आवडल्यामुळे.
पहिल्यातला हापण संवाद चांगला आहे.
God makes dinosaur.
God makes man.
असं काही तरी आधी आहे आणि मग
Dinosaur eats man. Woman inherits the Earth. Wink

सध्या ओझू (Ozu) ह्या जपानी दिगदर्शकाचे सिनेमे पाहतोय. आज "Floating Weeds" बघितला. त्याने भारावून जाऊन नेट वर जेव्हढे साहित्य मिळाले तेव्हढे वाचून काढत आहे. एक स्वतंत्र धागा काढावा लागेल.

अरे वा, जुरासिक पार्कची चर्चा चालू आहे... टोटल खतरनाक! Lol मी पण पहिला थिएटरमध्ये बघितला आहे.

-------
हे असंच कधीतरी फेबुवर खरडलं होतं.

आज खूप वर्षांनी 93 सालचा ज्युरासिक पार्क पाहिला आणि त्यात दाखवलेल्या डायनॉसोर्सच्या प्रगतीमुळे (आणि त्यातल्या मनुष्यांच्या मठ्ठपणामुळे) थक्क व्हायला झालं.

१. दोन मुले भल्यामोठ्या किचनमध्ये दरवाजापासून भरपूर लांब लपलेली आहेत. डायनो व्यवस्थित हँडल फिरवून दार उघडून आत येतो. आत मुले लपली आहेत, हे तर त्याला कळतेच शिवाय दरवाजे तोडण्याऐवजी उघडून आत येण्याइतका तो सॉफीस्टीकेटेड आहे. (याच्यापुढे सीआयडीचा दया गावठी वाटेल!) थोड्या वेळात त्यातली मुलगी ओव्हनमध्ये लपल्यावर हा खुनशी हसत दार लावून, हाय टेम्प सेट करून ओव्हन ऑन करणार असे मला वाटून गेले.

२. जीपचा पाठलाग करता करता एका फोर्कवरून जीप एका रस्त्याला तर टी रेक्स वेगळ्या रस्त्याला लागतो तेव्हा एका पॉइंटला तो त्या वेगळ्या रस्त्याने लौकर पोचून पुन्हा यांच्या जीपसमोर दत्त म्हणून उभा ठाकतो, हे पाहायचीही मी तयारी ठेवली होती.

३. याउलट सिनेमातले मठ्ठ मनुष्यप्राणी. टी रेक्स म्हणे हलत्या गोष्टीच पाहू शकतो, तर त्या दोन लहान मुलांतली मुलगी टी रेक्सला टॉर्च लावून इकडेतिकडे झोत टाकून दाखवते. इतर लोक 'टॉर्च बंद कर, टॉर्च बंद कर' ओरडतात तरी तिचे हे उद्योग त्याने त्यांची गाडी ढकलून पाडल्यावरच थांबतात. बहुधा तिला टी रेक्सचे पोट आतून पहायचे असणार.

४. तो टी रेक्स जबरी शार्प आहे. तो एकदोनदा गाडीची मोडतोड करायचे थांबवून इतर नासधूस करणे व एका मनुष्याला खाणे हे काम करतो तरी मूळ कामाचा त्याला विसर पडत नाही. शेवटी बचावलेली मंडळी 'हुश्श.. सुटलो' म्हणत हेलिकॉप्टरमध्ये बसतात तेव्हा 'डॉन'मधल्या 'रमेशचा सुटकेचा अयशस्वी प्रयत्न' सीनप्रमाणे हेलिकॉप्टर पायलट म्हणून हा टी रेक्स दिसणे अगदी अशक्य नव्हते.

.... हे क्रमशः ठेवले होते पण नंतर पूर्ण करायचा कंटाळा आला.

हा ओरिजनल ज्यू पार्क थिएटरला बघितला होता. हिंदी dubbed रिलीज झाला होता इंग्लिश बरोबर. काय क्रेझ होती तेंव्हा ह्याची. आणि तो सुरुवातीचा हेलिकॉप्टर शॉट तर फारच भारी वाटला होता. मस्त आहे ओरिजनल.

ज्ञुरासिक पार्क बद्दल - मूळ पुस्तक उच्च कोटीचे आहे. नंतर पहिला भाग पण तोही पुस्तकाच्या तुलनेमधे फारच कमी पडतो. दुसरा नि तिसरा विसरून गेलो तरी चालतील ह्या लायकीचे होते. नंतरचे सॉफिस्टिकेटेड वाटतात. अशा अ‍ॅक्शन पटांमधे जेव्हढा कथेला जेव्हढा वाव असतो तेव्हढाच वाव असलेले आहेत. उगाच त्यांच्यात फारसे लॉजिक शोधायला जाण्यात काही हशील वाटत नाही. त्यांचा स्ट्राँग पॉईंट अ‍ॅड्रेनलीन रश ,सॉफिस्टेकेटेड ग्राफिक्स्/व्हीएफ्केस नि किती कल्पक स्टंट्स असू शकतात हे आहेत. ते बघितले कि मजा येते.

मस्त आहे ओरिजनल. >> +१

जुरासिक वर्ल्ड सिरीज मधे मूळची उसाची कांडी आता जरा हाय टेक चरकातून काढली आहे. पण मला सगळेच आवडतात >> फा +१ थोडे इकडे तिकडे करून.

तो इण्डोरॅप्टर मुळात सगळे मोठे लोक सोडून त्या लहान मुलीच्याच का मागे लागतो ते माहीत नाही. >> फा त्या मुलीला टॅग केले जाते ना चुकून म्हणून. इण्डोरॅप्टर टॅगच्या पाठी जातो.

काल्पनिक असली तरी पाळीव कशी असतील डायनासोर. हिंस्र प्राण्यांचे इंस्टिंक्ट वेगळे असणार ना >> रॅपटरचे माहित नाही अस्मिता पण वाघ, सिंह, प्यूमा, ब्राऊन बेअर्स असे हिंस्त्र प्राणी ज्यांनी लहानपणापासून वाढवले असतील त्यांच्याशी खेळीमेळीने वागतात ना त्यावरून उचलले असावे.

श्रद्धा Lol

हा खुनशी हसत दार लावून, हाय टेम्प सेट करून ओव्हन ऑन करणार असे मला वाटून गेले>> हे भारी आहे Lol

काल पुनश्च 'द लायन किंग' डिस्नी चा, कार्टुन पाहीला. किती गोड!!! सिनेमालाच, कम्प्लीटली ऑरेन्ज ऑरा. अपलिफ्टिंग, सकारात्मक, सनी, किंग लाइक, लार्जर दॅन लाईफ, उत्साही, सळसळता.
परत तितकाच आवडला. स्पेशली, जेव्हा सिंबा स्वतःमधली ताकद ओळखतो. ही क्लेम्स हिज राईटफुल प्लेस इन द सर्कल ऑफ लाईफ.

असामी - बहुतांश सहमत. फक्त त्या मुलीला टॅग केले जाते ते लक्षात नाही. लिलाव सुरू असतो त्यातील एका प्रेक्षकालाच केलेले असते ना आधी? ते टॅगिंग विसरला तो बहुतेक.

मला दुसरा प्रचंड आवडतो ("लॉस्ट वर्ल्ड"). एक चित्रपट म्हणून पहिल्याइतका चांगला नाही हे खरे पण थ्रिल्स जबरी आहेत. डायनोचे सीन्स ही कहानी की माँग असल्याचे लक्षात आल्याने त्यात वाढवलेले आहेत.

ओरिजिनल १९९५ चा लायन किंग (अ‍ॅनिमेशन) ऑटाफे आहे. हाताने काढलेली चित्रे वापरून केलेला डिस्नेचा शेवटचा पिक्चर. त्यातले ते विल्डबीस्ट्स पळत सुटतात तो स्टॅम्पीड सीन अफलातून आहे. विशेषतः ही हाताने काढलेली चित्रे आहेत हे लक्षात घेऊन पाहिले तर. त्या स्टॅम्पीडच्या मधे कॅमेरा ठेवल्यासारखे चित्रीकरण आहे. जेम्स अर्ल जोन्सचा "मुफासा" चा आवाज भारी आहे. आणि हाकुना मटाटा! हिंदी पिक्चर मधल्या हीरो सारखा सिम्बा त्या गाण्यात मोठा होतो. पिक्चरच्या सुरूवातीला "सर्कल ऑफ लाइफ" गाण्यातली ती सुरूवातीची आफ्रिकन आरोळी आहे ती पिक्चर पाहताना चांगल्या स्पीकरवरच ऐकावी!

बाय द वे "जुरासिक वर्ल्ड - फॉलन किंगडम" मधे लायन किंग चा एक छोटा संदर्भ आहे. शेवटी डायनोज इतर प्राण्यांसारखे वावरताना दाखवले आहेत त्यात प्राइड रॉक सारख्या रॉक वर तो लायन किंग सारखाच सिंह व त्याच्यासमोर तसाच एका रॉकवर टी रेक्स दाखवला आहे.

>>>>>>त्यातले ते विल्डबीस्ट्स पळत सुटतात तो स्टॅम्पीड सीन अफलातून आहे. विशेषतः ही हाताने काढलेली चित्रे आहेत हे लक्षात घेऊन पाहिले तर.
ओहो!!

>>>>>जेम्स अर्ल जोन्सचा "मुफासा" चा आवाज भारी आहे.
येस्स!!

>>>>आणि हाकुना मटाटा!
एकदम मस्त गाणं आहे ते.

>>>>हिंदी पिक्चर मधल्या हीरो सारखा सिम्बा त्या गाण्यात मोठा होतो. पिक्चरच्या सुरूवातीला "सर्कल ऑफ लाइफ" गाण्यातली ती सुरूवातीची आफ्रिकन आरोळी आहे ती पिक्चर पाहताना चांगल्या स्पीकरवरच ऐकावी!
क्या बात है!

लायन किंग क्लासिक आहे. आता "मुफासा" येतो आहे माहित आहे का? हा लायन किंग चा प्रिक्वेल आहे !
https://images.app.goo.gl/orWsFEpBNJgVaJ5d9
होपफुली लायन किंग ची लेवल त्यांना गाठता येईल!

>>>>>> आता "मुफासा" येतो आहे माहित आहे का?
होय मै! मला बघायचाय.

आत्ता 'घोस्ट' पाहीला. काय डेमी मुरला नुसतं रडवलय यार. व्हॉट अ वेस्ट Sad रडारडच जास्त आहे. हेवी.

Pages