चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पॉटरी सेन्शुअस आहे, नाही का ? पण कोण करतेय यावर अवलंबून असेल. शीबाची बेसिक कुंभारकाम तर डेमी मूरची कस्टमाईज्ड 'वन ऑफ अ काईन्ड' वेस वगैरे. 'घोस्ट' बघितला आहे पण आठवत नाहीये.

रंगरसिया -

प्रेमात असलेल्या दोघांनी मिळून कलाकृती बनवणं 'सेन्शुअस' असतेच की. राजा रविवर्मावर बेतलेल्या 'रंगरसिया' सिनेमातले 'काहे सताये' गाण्यात सुरवातीला स्वर्गातून उतरून पुरुरव्याच्या भेटीला आलेल्या अभिसारिकेच्या स्वरूपातील उर्वशीचे चित्र काढून नंतर भलतीच रंगरंगोटी केलेली आहे. रमणीय, रोमॅन्टिक व नाविन्यपूर्ण वाटले होते.

नंदना सेन व रणदीप हुडा आहेत. चित्रपट फारच आवडला होता. सादरीकरण, चित्रिकरण, अभिनय, कथा, नंदनाचे काम, रणदीपने दाखवलेला विक्षिप्त, लहरी किंवा eccentric पणे कलेत रमणारा रविवर्मा, त्याबाबत अतिशय स्वार्थी वाटतो. याबाबत त्याचा राग यावा का कौतुक वाटावे हे प्रेक्षकांनाही कळत नाही. राजा रविवर्मा या असा चित्रकार होता ज्याने पहिल्यांदा देवळात जाण्याची मुभा नसलेल्या लोकांसाठी देवीदेवतांची चित्रे काढून ती प्रिंट करून ( त्यात दादासाहेब फाळके यांचेही योगदान होते) सर्वसामान्यांसाठी- सवर्ण नसलेल्यांसाठी खुली करून त्याचं अवडंबर कमी केलं. ती कृती फक्त चित्रकलेसाठीच नाही तर माणुसकीसाठीही मैलाचा दगड असेल. जिच्यावरुन त्या स्त्री देवतांची चित्रांची प्रेरणा घेतलेली असते, ती एक ठेवलेली बाई किंवा कुण्या श्रीमंताची अंगवस्त्र असते. तो गदारोळ वेगळाच. त्या काळात चांगल्या घरच्या स्त्रिया ह्या अशा कामांना कमी लेखायच्या, किंवा त्यांना त्यांच्या घरातील पुरुषांकडून हे असे करण्याची अनुमती नसायची.

पॉटरीच्या ओघाने आठवण आली आणि उत्स्फुर्तपणे लिहिले आहे पण रेकोही आहे. Happy

जास्त कुटील. >>> Lol डायनोंची स्लीबा झाले की काय मी. Proud
केएफसी चिकन>>> Lol त्याचे सिक्रेट इन्ग्रेडियन्ट म्हणे कुणालाच माहीत नाहीत. तसेच आहे का हे, जमले नाही की सिक्रेट म्हणायचे.
त्यांचे उच्चार अवघड असल्याने उडते डायनोजच म्हणू. >>> Lol
हीरो-हिरॉइनला एकत्र भेटवून नंतर सीनमधून निघून जाते तसे.>>>> Lol

किती ती CGI ugly reptile/ bird whatever डायनासोरची बाजू घेतली आहे. लिटरली आणि मेटॅफॉरिकली लिहावं वाटतंय, माणसात या. Wink Happy

मी जंगल बुकला चुकून मोगली लिहिले. Happy

मी वरची पोस्ट खरडेपर्यंत तीन पोस्टी आल्या.
रियोला+१ माझेमन.

त्यावरची काच फुटल्यावर ते उडणारे डायनो इकडेतिकडे उडत सुटले व याच्या हेलिकॉप्टरवर आदळले.
<<<<< अरे वा, डायनोनेडो??

'घोस्ट' बघितला आहे पण आठवत नाहीये. > काय आठवत नाही नक्की ? सिनेमा कि डेमीची पॉटरी ? पहिले असेल तर माफ आहे. दुसरे असेल तर प्रायश्चित्त म्हणून 'प्यार का साया' बघायलाच हवा. तो आधीच बघितला असेल तर त्यावर 'मला आवडलेला चित्रपट' मधे एक लेख यायला हवा. Wink

'काहे सताये' गाण्यात >> अनुमोदन. दुर्दैवाने सिनेमा नि गाणॅ वेगळ्याच कारणासाठी गाजले.

"ओह नो, इट्स थिसॉरस" >> जबरी आहे तो जोक. नेहमी पाहिला कि चकल करायला होतेच.

शीबाची बेसिक कुंभारकाम >>> कुंभारकाम कसलं? मातीकाम….

@अस्मिता रंगरसिया बघितलेला नाही. त्यावेळी बघायचा राहून गेला. कुठे पाहिलास? ती नंदना सेन होती की कार्तिका राणे? मला दोघी सेमच वाटतात.

राजा रविवर्म्यावर पुस्तक वाचलंय बालपणी त्यात त्या उर्वशी प्रसंगाचं वर्णन आहे. पण वेगळंच. की त्या बाई गोव्याच्या. अतिशय सुंदर व कसलेल्या गायिका. बहुतेक भाविण कुळातल्या त्यामुळे प्रतिष्ठा नाही. परिस्थितीमुळे या मॉडेलिंगसाठी तयार झालेल्या. रविवर्मा कित्येक दिवस त्यांना अल्पवस्त्रांकित अवस्थेत मॉडेल म्हणून उभं तर करतो पण चित्र काढत नाही कारण स्त्रीसुलभ लज्जेमुळे त्याला जो नॅचरल वावर कॅप्चर करायचाय तो मिळत नाही. तर बाई इथे चिडलेल्या की काय चाललंय. त्यात रविवर्मा तरूण, उत्तम कलावंत. त्यामुळे त्याही आकर्षित होतात. शेवटी चीड + सौंदर्याचा अपमान + आकर्षण यामुळे त्यांच पुढाकार घेऊन या वेगळ्या रंगात न्हाऊन घेतात. पण रविवर्मा हा विवाहीत आणि लहानपणी सासरच्या श्रीमंतीमुळे कलेला प्रोत्साहन मिळालेले त्यामुळे हे शॉर्ट लिव्ह्ड अफेअर ठरले. त्या बाई फार लवकर वारल्या.

रविवर्मा बडोदा दरबारचा राजचित्रकार होता. त्यामुळे बडोद्याला लक्ष्मिविलास पॅलेसमध्ये राजघराण्याची तसेच इतरही विविध प्रसंगांची पुरूषभर उंचीची ओरिजनल्स आहेत. शिवाय फत्तेसिंग म्युझिअममध्ये समस्त देवी देवतांच्या फुटभर उंचीच्या ओरिजिनल तसबिरी ज्यांच्यावरून आपले लहानपणीचे देवी देवतांचे कॅलेंडरवरील फोटो निघाले त्या आहेत. कृष्ण, राम, सरस्वती वगैरेंच्या तसबिरी मला आवडल्या. भगवान शंकर फारच गुळगुळीत वाटले.
बडोद्याचा राजचित्रकार असल्याने स्वतः मल्लु असला तरी चित्रातील वेशभुषा मराठी पद्धतीची आहे. सगळ्या देवी नववारी का नेसतात या माझ्या बालपणीच्या प्रश्नाचे उत्तर बडोद्यात मिळाले.

छान माहिती माझेमन. Happy मी कुठे बघितला लक्षात नाही आता, झाली दोन तीन वर्षे. पण यूट्यूबवर असावा बहुतेक.
नंदना सेनच आहे, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांची कन्यका.

"ओह नो, इट्स थिसॉरस" >>> Lol हो भारी आहे तो

किती ती CGI ugly reptile/ bird whatever डायनासोरची बाजू घेतली आहे. लिटरली आणि मेटॅफॉरिकली लिहावं वाटतंय, माणसात या >>> Lol

रियोला+१ माझेमन. >>> एरव्ही ब्लेम इट ऑन रियो म्हणतात. पण रियोच विसरला तर कोणाला ब्लेम करायचे? हे चिंगारी कोई भडके गाण्यासारखे झाले.

डायनोनेडो?? >>> Lol श्र - शार्कनेडेचे ५ भाग आहेत. त्यात डायनोजही येउन गेले असतील कदाचित.

रंगरसियाबद्दलची व रवि वर्माबद्दलची - दोन्ही पोस्टी मस्त. तो पिक्चर पाहिलेला नाही पण ट्रेलर किंवा गाणे पाहिले आहे आणि त्यात "इल्युजिव्ह सेन्शुअ‍ॅलिटी" जाणवली होती.

काय आठवत नाही नक्की ? सिनेमा कि डेमीची पॉटरी ? पहिले असेल तर माफ आहे. दुसरे असेल तर प्रायश्चित्त म्हणून 'प्यार का साया' बघायलाच हवा. तो आधीच बघितला असेल तर त्यावर 'मला आवडलेला चित्रपट' मधे एक लेख यायला हवा.
>>> असामी, स्वतःच्याच नादात असल्याने हुकले होते. आता वाचले. Lol डायनोपेक्षा शीबा बघणेबलच. Wink

ओह नो, इट्स थिसॉरस" >>> Lol जबरी.
चिंगारी कोई भडके गाण्यासारखे झाले.>> काय आहे हे.. Lol Lol
डायनोनेडो?? >>> Lol
शार्कनेडेचे ५ भाग आहेत. त्यात डायनोजही येउन गेले असतील कदाचित. >> ते कशाला अजून. Lol आधीच मर्कटा, त्यात मद्य प्याला, त्यात.....

"युध्रा" - अ‍ॅमेझॉन प्राइम. सिद्धांत चतुर्वेदी आवडतो म्हणून थोडा पाहिला. मालविका मोहानन हे नाव ऐकले होते पण तिचा पिक्चर पाहिल्याचे लक्षात नाही. यात छान दिसते. पिक्चरवर तेलुगू चित्रपटांची छाप आहे. हीरो लहान असतानाच त्याच्या स्वभावाची चुणूक दिसणे. मग मोठा झाल्यावर एण्ट्री झाली की लगेच एक डान्स वाले गाणे, नंतर पाच मिनिटात एक दणादण फाइट, एक रॅण्डम सामाजिक किंवा जनरल चांगले काम, त्याच्यावर कौतुकमिश्रीत रागावणारे काही सिनीयर लोक सपोर्टिंग रोल मधे - सगळे आहे.

अर्धा-पाऊण तास पाहिला आहे. सध्यातरी "बघणेबल" कॅटेगरी.

ज्यूरसिक पार्क पुस्तकाबद्दल प्रचंड सहमत
असलं जबरदस्त पुस्तक आहे ते आणि इयन माल्कम चे विचार, मनुष्यप्राणी, शास्त्रज्ञ, पृथ्वी याबाबतीत त्याचे डायलॉग वाचनीय नाही तर चिंतीनिय सुद्धा आहेत
पण त्याला सिनेमात जोकर करून टाकलाय पार
बहुदा हे सगळं सिनेमात मांडला तर डॉक्युमेंटरी म्हणून लोकं बघणार नाहीत या भीतिने कदाचित
त्यापेक्षा मग रेक्स आणि रापटर ना अजून 4 माणसं खा म्हणून मोकळीक दिलीये
डेनिस नेद्रीला पैसे देणारा बायोसीन चा माणूस दुसऱ्या पुस्तकात पण आहे पण त्याला गायबच करून टाकलाय,इतका मोठा रोल असूनही
दुसरा पार्ट तर अक्षरशः अ आणि आ आहे

ते डायनो पिल्लाला आणल्यावर हल्ला करण्याचे उत्तम स्पष्टीकरण पुस्तकात दिलेलं आहे, इथं काही नाही आलोच आहोत तर मारू काही माणसे असं म्हणत रेक्स मोकाट हिंडतो

असो खूप आहे लिहिण्यासारखे पण गाडी लायन किंग वरून घोस्ट पार करून रणवीर दीपिका वर आलीये सो वरतीमागून घोडे प्रकार झाला Happy

बाप रे!
किती धावला धागा...

प्यार का साया
चिंगारी कोई भडके
Biggrin

https://www.youtube.com/watch?v=zA1D1QEcUXQ
Floating Weeds (1959, Yasujiro Ozu)
जापनीज मास्टर Yasujiro Ozu चा एक ग्रेट मूवी. इंग्लिश सब टायटल्स सहित.
ओझू च्या Cinematography- बद्दल.
Quiet Cinematography- Floating Weeds (1959)
https://www.youtube.com/watch?v=0Ra0xEQ8yaU

रेडी ऑर नॉट नेफ्लीवर. ब्लॅक कॉमेडी प्लस थ्रिलर. फारच वेगळा आणि अचाट, आवडला. बॅकग्राऊंड स्कोअर पण मस्त आहे. Love me tender (Elvis चे) वेगळ्या ट्यून मध्ये आहे जे की अफाट आहे. मृणाली ने सजेस्ट केला होता.

हिडन फिगर्स - पिकॉक
Taraji P Henson, Octavia Spencer, Janelle Monáe , Kevin Costner

तीन कृष्णवर्णीय स्त्रियांचे नासातले योगदान (Katherine Johnson, Dorothy Vaughan and Mary Jackson) यावरील बायोग्राफिकल ड्रामा आहे. तिघीही ब्रिलियंट आफ्रिकन अमेरिकन स्त्रिया होत्या. ज्यांनी जॉन ग्लेनच्या नासातील ॲस्ट्रॉनॉट स्पेस शटल ऑर्बिटसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. एक सुपरवायजर, एक इंजिनिअर व एक गणितज्ञ असते. हा काळ सेग्रेगेशन, केनेडी, सिव्हिल राईट्स, व्हिएतनामीज वॉर व वेगवेगळ्या घडामोडींशी संलग्न असा असणारा आहे. त्यामुळे कृष्णवर्णीय स्त्रियांचे नासातही वेगळे बाथरूम असणे. त्यांना स्त्री आणि वर ब्लॅक म्हणून अधिकचा संघर्ष करावा लागणे हे सगळे यात येते. नाट्यमयता कमी असल्याने चित्रपटाचे सादरीकरण चरित्रपटासारखे वाटते. मेलोड्रामा कुठेही ताणलेला नाही.

गणितावर खूप भर आहे पण नाही समजले तरी संदर्भ कळतो. जुन्या काळातील नासाची लॉन्चिंग ऑपरेशन रूम वगैरे तंतोतंत वाटली कारण ह्यूस्टनचे नासा बघितले आहे त्यात अगदी असेच होते. नासाप्रमुख म्हणून केव्हिन कॉसनरचे काम अतिशय छान झाले आहे. संयत आणि नॉर्मल तरीही प्रोग्रेसिव्ह पात्र आहे. त्याचे आणि गणितज्ञ कॅथरीन जॉन्सनचे नाते फार सुरेख आहे. स्त्रियांच्या ड्रेस कोडमधे दागिन्यांची मुभा नसते पण मोत्याची सर चालत असते. कृष्णवर्णीय स्त्रियांच्या पगारात अर्थात परवडत नसते. ते एका उद्विग्न मोनोलॉग मधे बोलून दाखवले असताना तो बायकोसोबत जाऊन कॅथरीन साठी मोत्याची सर घेऊन भेट देतो.

क्रिस्टिन डंस्ट व जिम पार्सन किंचित ग्रे शेड मधे आहेत. यात जिम नसता तरी चाललं असतं. अगदी मालिकेतील कधीमधी येणाऱ्या नंदेच्या स्वरूपातील सौम्य छळ आहे. क्रिस्टिन झोपेतून उठल्यासारखी दिसते. डोळ्यांत तरतरीतपणा नाही.

मला आवडला. एंगेजिंग आणि प्रेरणादायी चित्रपट आहे. कसलाच दिखाऊपणा नाही. संघर्षात कुठलाही आक्रमकपणा न दाखवताही व्यवस्थित पोचवला आहे, चटकन लक्षात येतात. सर्वांची कामे उत्तम झाली आहेत. ताराजी/ कॅथरीनच्या कथेवर वर जास्त फोकस आहे. बाकी दोघींची कथा समांतरपणे उभी केली आहे. त्या दोघींची कामेही उत्तम झाली आहेत. नक्की बघा.

खालील मोनोलॉग प्रसिद्ध आहे.
कॅथरीनचा बाथरूम मोनोलॉग -
https://youtu.be/9j6p7ajuh-E?si=UR-q0YNMu-7ze0Mq

अस्मिता रेको खतरनाक आहे. खरं करीअर या बायकांनी केलं. ‘द हेल्प’ व ‘हिडन फिगर्स’बद्दलचे तुझे रेको वाचून हे पिक्चर मस्ट वॉच कॅटेगरीत गेलेत.

Ready or not इंग्रजी नेटफ्लिक्सवर
एका नववधूचे तीच्या सासरी आगमन होते..घराण्याचा पारंपरिक खेळ जो प्रत्येक नववधूला खेळावा लागतो..वरवर मजेदार दिसणारा खेळ भयंकर जीवघेणी वळणं घेत सुरू होतो... हॉरर,कॉमेडी,थ्रीलर सिनेमा..

Strange darling इंग्रजी प्राईमवर
सिनेमा ६ chapters मधे आहे..सुरुवात रैन्डमली होतें.. एक सीरियल किलर आणि जीव मुठीत घेऊन पळणारी एक तरुणी..इतकी साधी नाही स्टोरी.. आगे आगे देखो होता है क्या..खतरनाक वायोलंस, थ्रीलर सिनेमा.
(for adult only)

शक्ति द पावर नावाचा करिष्माचा चित्रपट बघितला युटुब वर. चांगला आहे.
>>>>
करिष्मा, संजय कपूर नाना आणि शाहरूख खान ऐश्वर्या इश्क कमीना..
चांगला आहे पण सर्वांचा अभिनय फार भडक आहे. शाहरूखला सुद्धा तेच करायला लावलेय Sad

एके ठिकाणी "SHAH RUKH KHAN: A GLOBAL ICON" हा Anupama Chopra ह्यांचा लेख वाचनात आला. त्यात "कुच कुच होता है"
बद्दल बरेच विवेचन होते. म्हणून मग मुद्दामहून काल तो सिनेमा पुन्हा बघितला. Mixed Bag. नंतर सविस्तर लिहीन. आज रुमाल टाकून ठेवतो.

हो, माझेमन. जमल्यास बघच. Happy
माधव, भारतात 'द हेल्प' कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे कल्पना नाही पण तोपर्यंत मिळाला तर 'हिडन फिगर्स' बघून घ्या. Happy

मृ आणि लंपन,
'रेडी ऑर नॉट' नोट केला आहे.

काल टॉम क्रुझ चा 'रिस्की बिझनेस' पाहीला. आई-वडील ट्रीपवरती गेलेले असतेवेळी, एक हायस्कुलर (आपला टॉम) एका प्रॉस्टिट्युटला बोलावतो. आणि ती त्याच्या घराचे ब्रॉदेल बनवुन टाकते. ठिक होता. लव्हमेकिंग सीन्स , टॉम क्रुझ करता पाहीले. लव्हली!. फार नाहीत पण आहेत.

Pages