Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आत्ता 'घोस्ट' पाहीला. काय
आत्ता 'घोस्ट' पाहीला. काय डेमी मुरला नुसतं रडवलय यार. व्हॉट अ वेस्ट >> तुला काय हव होत नक्की सामो ?
बाय द वे "जुरासिक वर्ल्ड - फॉलन किंगडम" मधे लायन किंग चा एक छोटा संदर्भ आहे >> येस तो फारच ऑब्व्हियस नि विनाकारण आहे
जेम्स अर्ल जोन्सचा "मुफासा" चा आवाज भारी आहे. आणि हाकुना मटाटा! हिंदी पिक्चर मधल्या हीरो सारखा सिम्बा त्या गाण्यात मोठा होतो. पिक्चरच्या सुरूवातीला "सर्कल ऑफ लाइफ" गाण्यातली ती सुरूवातीची आफ्रिकन आरोळी आहे ती पिक्चर पाहताना चांगल्या स्पीकरवरच ऐकावी! >> सगळ्याला अनुमोदन.
पिक्चरच्या सुरूवातीला "सर्कल
पिक्चरच्या सुरूवातीला "सर्कल ऑफ लाइफ" गाण्यातली ती सुरूवातीची आफ्रिकन आरोळी आहे ती पिक्चर पाहताना चांगल्या स्पीकरवरच ऐकावी!>>> मला तर गूसबम्प्स येतात उगाच, हे तर आपलेही नाही तरीही.
अशाच काही स्वाहिली / आफ्रिकन प्रार्थना किंवा गीतं Wakanda Forever या मार्व्हलच्या सिनेमातही आहेत. त्याही सुंदर वाटल्या होत्या. तो फार सुरेख चित्रपट आहे, टिपिकल मार्व्हल सिनेमा असूनही.
असामी, पोस्ट वाचली. छान लिहिले आहे.
म्हणजे तू माझ्याकडून आहेस का ?
श्रद्धा, धमाल पोस्ट.
माबोवरील एका खेळात चित्राला टॅग लाईन देताना 'लायन किंग' मधल्या या चित्रासाठी 'छावा, छावा मंकिया से छावा, छावा' दिली होती.
'छावा, छावा मंकिया से छावा,
'छावा, छावा मंकिया से छावा, छावा' >>>
मला तर गूसबम्प्स येतात उगाच, हे तर आपलेही नाही तरीही. >>> मला नॉस्टॅल्जिक करणारी गाणी ऐकली की साधारण असे होते. पण आपल्या सर्वांचेच ओरिजिन आफ्रिकेत असल्याने हजारो वर्षे सर्वांमधे असलेली एखादी निद्रिस्त पेशी ही आरोळी ऐकून खडबडून जागी होत असेल
इथे अनेक बाफवर फाको सुरू असतात. पण लायन किंग मधला "झाझू" चा मॉर्निंग रिपोर्ट हा सगळा फाकोंनेच बनला आहे. धमाल आहे
Crocodiles are snapping up fresh offers from the banks
showed interest in my nest egg but I said no thanks
we haven't paid the hornbills and the vultures have a hunch
not everyone invited will be coming back from lunch
बँक/नदीचा काठ या अर्थाने रिव्हर बँक, मगरींनी काठावरची ऑफर "स्नॅप" करणे, नेस्ट एगचा आर्थिक संदर्भ व पक्ष्याच्या अंडयांमधे मगरींचा इंटरेस्ट. गिधाडांच्या पाठीचा बाक या अर्थाने "हंच" व अंदाज या अर्थानेही , हॉर्न'बिल्स' चे पेमेण्ट - सगळेच मस्त
"मुफासा" पिक्चरचे पोस्टर्स पाहिले आहेत.
आफ्रिकेत असल्याने हजारो वर्षे
आफ्रिकेत असल्याने हजारो वर्षे सर्वांमधे असलेली एखादी निद्रिस्त पेशी
Mitochondria from the primordial mother ??
>>>>
काही लहान मुलांसाठी असलेले चित्रपट फार क्लेव्हर किंवा चतुर संवाद व गाण्यांची रेलचेल असलेले आहेत. डिस्नीला तोड नाही याबाबत. 'आईस एज' ची ट्रिलजी पण फार क्लेव्हर आहे. नसेल बघितली तर बघाच.
आत्ता 'घोस्ट' पाहीला.
आत्ता 'घोस्ट' पाहीला.
>>
आता 'प्यार का साया' पण बघ...
Mitochondria from the
Mitochondria from the primordial mother ?? >>>
डिस्नीला तोड नाही याबाबत >> एक्झॅक्टली! मोठ्यांनाही हसवतील असे संवाद असत. "नीमो" मधे माशांची लहान "मुले" त्या बोटीला "बट" म्हणतात त्यावेळचे संवाद असेच धमाल आहेत.
आईस एज पहिला पाहिला आहे. पुढच्या भागांपैकी एक दोन पाहिले असतील पण तुकड्यांत.
आता 'प्यार का साया' पण बघ... >>>
श्रद्धा, जबरी पोस्ट. क्रमशः
श्रद्धा, जबरी पोस्ट. क्रमशः आणखी येऊ द्या प्लीज.
आईस एज पहिले दोन चांगले होते.
आईस एज पहिले दोन चांगले होते. पुढे त्यांची धर्मा प्रॉडक्शन्स रॉम् कॉम झाली.
<<<<ज्ञुरासिक पार्क बद्दल -
<<<<ज्ञुरासिक पार्क बद्दल - मूळ पुस्तक उच्च कोटीचे आहे. नंतर पहिला भाग पण तोही पुस्तकाच्या तुलनेमधे फारच कमी पडतो. दुसरा नि तिसरा विसरून गेलो तरी चालतील ह्या लायकीचे होते. नंतरचे सॉफिस्टिकेटेड वाटतात. अशा अॅक्शन पटांमधे जेव्हढा कथेला जेव्हढा वाव असतो तेव्हढाच वाव असलेले आहेत. उगाच त्यांच्यात फारसे लॉजिक शोधायला जाण्यात काही हशील वाटत नाही. त्यांचा स्ट्राँग पॉईंट अॅड्रेनलीन रश ,सॉफिस्टेकेटेड ग्राफिक्स्/व्हीएफ्केस नि किती कल्पक स्टंट्स असू शकतात हे आहेत. ते बघितले कि मजा येते.>>>
शतप्रतिशत सहमत. शेंगा सोलुन, त्यातील दाणे वेगळे काढुनी टरफलांचा भाग वापरून क्राफ्ट प्रोजेक्ट करावे तसे पुस्तकातला इंटलेक्च्युअली स्टिम्युलेटिंग भाग वेगळा ठेउन देऊन कथानकाच्या उरलेल्या भागातुन पहिला भाग बनवला आहे. त्या गणितज्ञाचे मुळ पुस्तकातील पात्र खुप इंटरेस्टिंग होते त्याला तर अगदी राजेंद्रनाथ च्या तोडीचा आचरट साइडकिक करुन ठेवला आहे.
पुढचे भाग मी बघितलेच नाहीत वैतागून.
जुरासिक पार्क पोस्ट श्रद्धा
जुरासिक पार्क पोस्ट श्रद्धा
योगायोग मी हा मागल्या आठवड्यातच पाहिला.
तो डायनो दार उघडून यायचा प्रसंग तर फार च हास्यास्पद आहे..
सध्या रीटर्न ऑफ ममी बघतेय , ह्यावर परिक्षण लिहिलेय का कुणी?
ज्ञुरासिक पार्क बद्दल - मूळ
ज्ञुरासिक पार्क बद्दल - मूळ पुस्तक उच्च कोटीचे आहे. <<<<<
क्यापिटल J मुळे एकदम ज्ञुरासिक पार्क झाले आहे! नावालासुद्धा उच्च कोटी प्राप्त झाली आहे त्यामुळे.
क्रमशः आणखी येऊ द्या प्लीज.
<<<< द्या??
म्हणजे तू माझ्याकडून आहेस का ?
<<<<<
मै तो आपही की तरफ से हूं..
उंगली आपकी तरफ है, दिल डायनो की तरफ है...
ज्ञुरासिक >> हे मिस झालं होतं
ज्ञुरासिक >> हे मिस झालं होतं. पण याचा मूळ उच्चार ज्+ञु केल्यास तो बरोबर आणि उच्च आहे
द्या >> आधी दे लिहून मग खोडलं होतं मी. चांगदेव झाला माझा.
काय डेमी मुरला नुसतं रडवलय
काय डेमी मुरला नुसतं रडवलय यार. व्हॉट अ वेस्ट >>>>
सामो पॉटरीचा सीन नाही का पाहिला त्यात? त्यावरून बऱ्याच हिंदी पिक्चरांना अचानक पॉटरी आवडायला लागली. लगे हाथ शिबा वगैरेंनी पॉटरीवर हात साफ करून घेऊनही बॉक्स ऑफिसवर माती खाल्ली.
ज्युरासिक पार्क सगळ्याच पोस्टी हहपुवा. पण त्या गणितज्ञाला काय बोलायचं नाही सांगून ठेवते.
माझे मन, आपण आकुकाक वर
माझे मन, आपण आकुकाक वर अरुंधती च्या काढलेल्या उखाळ्या पाखाळ्या वेळेत आठवल्या म्हणुन थांबले नाही तर गणितज्ञावरुन आत्ता आपलं जोरदार भांडणच व्हायचं होतं.
नाही तर गणितज्ञावरुन आत्ता
नाही तर गणितज्ञावरुन आत्ता आपलं जोरदार भांडणच व्हायचं होतं. >>>>
मी पुस्तक वाचले नाहीये ना....
पुस्तकात गणितज्ञ मच बेटर असू शकेल. पण मला बुवा जेफ गोल्डब्लम आवडतो ❤ (हुश्श आणला एकदाचा बदाम)
❤️
❤ हा रहस्यकथेतला वाटतोय..
❤
हा रहस्यकथेतला वाटतोय..
❤ काळा कसा झाला?
❤ काळा कसा झाला?
बदाम म्हणेल काले है तो क्या
बदाम म्हणेल काले है तो क्या हुआ दिलवाले है.
व्वा! काळे आणि दिल! मान गये
व्वा! काळे आणि दिल! मान गये
इस दिलमे कुछ काला है.
इस दिलमे कुछ काला है. <<मनमे
इस दिलमे कुछ काला है. <<
मनमे कुछ काला है..
ओके दालमे कुछ काला है दया,
ओके
दालमे कुछ काला है दया,
घना, का तुटले चिमणे घरटे
घना, का तुटले चिमणे घरटे
पण मला बुवा जेफ गोल्डब्लम
पण मला बुवा जेफ गोल्डब्लम आवडतो > >एकदा तो त्याचा फ्लाय सिनेमा बघून घ्या
आता 'प्यार का साया' पण बघ... , ज्ञुरासिक >>
Mitochondria from the primordial mother >> हेच आठवले एकदम. सेपियन्स चा परीणाम
माझेमन आणि पर्णीका,
आता 'प्यार का साया' पण बघ... , ज्ञुरासिक >>
सगळ्या पोस्टींची मिळून 'ज्ञुराश्वरी' झाली आहे.
||ॐ प्रिहिस्टॉरिक आद्या, डायनो प्रतिपाद्या ||
माझेमन आणि पर्णीका,
जेफ गोल्डब्लम बद्दल मीही 'आवडतो' असं लिहिलं आहे वर माझेमन.
मै तो आपही की तरफ से हूं..
उंगली आपकी तरफ है, दिल डायनो की तरफ है..>>>>
डायनोप्रेमींनो, तुमच्या टि- रेक्सने माझ्या इरफानला मारलं होतं, (बघितला नसल्यास) पापप्रक्षालन म्हणून निदान 'करीब करीब सिंगल' बघा.
डिस्नी बद्दल मम फा. फाईन्डिग निमो तीन वेळा आणि डोरी दोन वेळा बघितला आहे. शिवाय टॉय स्टोरी, क्रूएला, मूलान, झूटोपिया, मोगली (जुने), अप, सोल, द लायन किंग, ब्रदर बेअर हे ऑटाफे आहेत. बेसिकली 'प्रिन्सेस स्टोरी' नसलेले जास्त आवडते आहेत.
>>>>सामो पॉटरीचा सीन नाही का
>>>>सामो पॉटरीचा सीन नाही का पाहिला त्यात? त्यावरून बऱ्याच हिंदी पिक्चरांना अचानक पॉटरी आवडायला लागली. लगे हाथ शिबा वगैरेंनी पॉटरीवर हात साफ करून घेऊनही बॉक्स ऑफिसवर माती खाल्ली.
होय होय पॉटरीचा सीन पाहीला पण मला उगाचच आता तो पसारा आवरणार कोण आणि अश्या पसार्यात लव्हमेकिंगचा मूड येतो कसा? वगैरे
ममव खुसपटं आठवली
>>>>पण आपल्या सर्वांचेच ओरिजिन आफ्रिकेत असल्याने हजारो वर्षे सर्वांमधे असलेली एखादी निद्रिस्त पेशी ही आरोळी ऐकून खडबडून जागी होत असेल Happy
हाहाहा
>>>>>तुला काय हव होत नक्की
>>>>>तुला काय हव होत नक्की सामो ? Wink
हाहाहा.
जेफ गोल्डब्लम बद्दल मीही
जेफ गोल्डब्लम बद्दल मीही 'आवडतो' असं लिहिलं आहे वर माझेमन.
>>> हो हो. ते मिस झालं होतं. त्याला देखणा म्हणाली आहेस. आता तुला सगळं माफ…
ममव खुसपटं
मलाही फाइन्डिंग निमो, डोरी, रिओ, आईस एज आवडतात. अजून एक छोटा डायनो बेबी हरवलेला असतो आणि त्याला पेरेंटस् सापडतात असा गोड मुव्ही होता तो आवडलेला. टिपीकल डिस्ने प्रिन्सेस मुव्हीज् नाही आवडत. आणि लिटल मर्मेडची तर त्यांनी ट्रॅजेडीची कॉमेडी करून वाट लावली. स्नो क्वीनचं पण रुपडं बदललं. पण फ्रोझन कल्ट आहे आमच्याकडे.
||ॐ प्रिहिस्टॉरिक आद्या,
||ॐ प्रिहिस्टॉरिक आद्या, डायनो प्रतिपाद्या ||
मै तो आपही की तरफ से हूं..
मै तो आपही की तरफ से हूं..
उंगली आपकी तरफ है, दिल डायनो की तरफ है >>>
एक टीरेक्स फॅन क्लब काढू व एक अॅण्टीरेक्स क्लब
डायनोप्रेमींनो, तुमच्या टि- रेक्सने माझ्या इरफानला मारलं होतं >>> तीव्र निषेध. हा गरीब बिचार्या टीरेक्सला अडकवण्याचा डाव आहे. अरूंधतीला अडकवणार्या संजनाच्या, भूमीला अडकवणार्या आत्याच्या आणि जानकीला अडकवणार्या ऐश्वर्याच्या (सिरीजचे नाव लक्षात नाही) कटांपेक्षा जास्त कुटील. मसरानी (इरफान) च्या कंपनीने इण्डॉमिनस हा एक नवीन कृत्रिम डायनो तयार केला. म्हणजे तसे सगळेच डायनो कृत्रिम पण टीरेक्स पूर्वी आस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. इण्डॉमिनस हा इकडून तिकडून जीन्स जमवून नव्याने तयार केलेला. केएफसी चिकन सारखा. त्यानेही थेट मारला नाही मसरानीला. तोही आपल्या नॅचरल सवयीप्रमाणे आजूबाजूची माणसे मारत होता. पण त्याला मारायचा प्रयत्न केल्यावर तो पळत सुटला व थेट घुसला ते उडणार्या डायनोज च्या इमारतीत. त्यांचे उच्चार अवघड असल्याने उडते डायनोजच म्हणू. त्यावरची काच फुटल्यावर ते उडणारे डायनो इकडेतिकडे उडत सुटले व याच्या हेलिकॉप्टरवर आदळले. हे खरे कारण आहे. अधिक माहितीकरता इथे पाहा शेवटी टीरेक्स यांच्या बाजूने लढतो. ब्लू सुद्धा. तरीही बदनाम. खरे म्हणजे हे लोक सीनमधून निघून जाताना मेलोड्रामॅटीक म्युझिक वाजवले पाहिजे - हिंदीत जसे एखादे फ्रेण्डली कॅरेक्टर हीरोला लास्ट फायटिंग मधे मदत करून हीरो-हिरॉइनला एकत्र भेटवून नंतर सीनमधून निघून जाते तसे.
अस्मिता तुझी लिस्ट भारी आहे. त्यातले बरेच पाहिलेले नाहीत. नीमो, जंगल बुक, सिंडरेला, डम्बो, स्नो व्हाईट, लायन किंग, कार्स - हे असंख्य वेळा पाहिले आहेत. बाकीचे काही एकदोनदा. "अप" सुद्धा मस्त होता. अगदी नवे पाहिलेलेच नाहीत अजून. फ्रोजन वगैरे. एकेकाळी डिस्ने-पिक्सार चा एक अॅनिमेशनवाला हुकमी समर ब्लॉकबस्टर असे दरवर्षी.
Pages